Maharashtra

Nagpur

CC/598/2017

SMT. GOURABAI NAMDEV GAYDHANE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH CHIEF REGIONAL MANAGER - Opp.Party(s)

ADV.U. Y. SONKUSARE

08 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/598/2017
( Date of Filing : 22 Dec 2017 )
 
1. SMT. GOURABAI NAMDEV GAYDHANE
R/O. POST NAGARDHAN, RAMTEK, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH CHIEF REGIONAL MANAGER
NEAR T.V. TOWER, M.E.C.L. BUILDING, SEMINARRY HILL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. TALUKA AGRICULTURE OFFICER
RAMTEK, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV.U. Y. SONKUSARE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 08 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2.  तक्रारकर्ती ही मौजा-नगरधन, पोस्‍ट नगरधन तह.रामटेक, जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचा पती नामदेव बाजीराव गायधने यांचे मालकीचे मौजा-नगरधन, त.रामटेक, जि. नागपूर येथील शेत नं. 1097 खाते क्रं. 429 ही शेतजमिन होती. वि.प.क्रं.2 शासनाचेवतीने शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेअंतर्गत दावा स्वीकारतात व छाननी करुन वि.प.क्रं.1 यांचे कडे सादर करतात. वि.प.क्रं.1 हे विमा रक्कमेचे भूगतान करतात.
  3. तक्रारकर्तीच्या पतीच्या महाराष्‍ट्र शासनातर्फे विमा काढण्‍यात आला होता. तक्रारकर्तीचा पती नामदेव बाजीराव गायधेन हा अचानकपणे चूकीने तणनाशक विषारी औषध पिल्याने आकस्मीक अपघातात दिनांक 27.8.2012 रोजी मृत्यु पावला. तक्रारकर्ती ही मयत नामदेव बाजीराव गायधने यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभार्थी आहे. तक्रारकर्तीच्या पतीचे आकस्मीक निधन झाल्याने तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तीगत अपघात योजनेअंतर्गत अंतर्गत वि.प.क्रं.2 यांचेमार्फत वि.प.क्रं.1 यांचेकडे रितसर अर्ज दिनांक 22.4.2014 ला सादर केल्यानंतर वि.प.क्रं.1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 1.9.2014 च्या पत्रान्वये तक्रारकर्तीने संबंधीत कागदपत्रांची पूर्तता करुनही तक्रारकर्तीचा दावा मंजूर किंवा नामंजूर केला नाही. त्यामूळे तक्रारकर्तीने मा.आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प. ने तक्रारकती्रला विमा दावा रुपये 1,00,000/- दिनांक 22.4.2014 पासुन  द.सा.द.शे 18टक्के व्याजासह देण्‍याचे आदेशीत करावे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  4. वि.प.क्रं.1 व 2 ला आयोगा मार्फत  नोटीस पाठविण्‍यात आली असता नोटीस प्राप्त वि.प. क्रं.1 तक्रारीत हजर झाले व आपले लेखी उत्तर अभिलेखावर दाखल केले व वि.प.क्रं.2 नोटीस मिळनही तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १७.६.१२०१९ आदेश पारित करण्‍यात आला.
  5. वि.प.क्रं.1 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारकर्तीने मा.आयोगासमक्ष दाखल केलेली तक्रार मूदतीत नाही व शासनाचे अधिसूचनेनूसार दस्तऐवज सादर न केल्यामूळे, दस्तऐवजांची पूर्तता न केल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्‍यात आला. वि.प.ने तक्रारकर्तीला दिनांक 28.4.2014 आणि दिनांक 1.8.2014 अन्वये दस्तऐवज सादर करण्‍याकरिता पत्रे पाठविली होती. परंतु तक्रारकर्तीने 30 दिवसाचे आत दस्तऐवज सादर केले नाही व सदरचे पत्रे तक्रारीसोबत सादर केलेली आहे. पत्राचे अवलोकनावरुन निर्देशनास येते की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार मूदतबाहय आहे व खारीज होण्‍यास पात्र आहे.
  6. वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा महाराष्‍ट्र शासनाचे अधिसूचनेनूसार स्व‍िकारुन वि.प.क्रं.1 यांचेकडे पाठविला. शासनाचे अधिसूचनेनुसार वि.प.क्रं.2 विमा दावे स्व‍िकारुन विमा दावा अॅडव्हाइझर यांचेकडे पाठवितात व त्यानंतर अॅडव्हाइझर विमा दावा वि. प. कं.1 यांचे कडे सादर करतात. सदर प्रकरणात तक्रारकर्तीने मुद्दामून विमा दावा अॅडव्हाझरला प्रतीवादी बनविले नाही त्यामूळे विमा दावा अॅडव्हाइझरला प्रतीवादी न केल्याचे कारणास्तव तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्तीचा पती दिनांक 27.8.2012 ला किटकनाशकामूळे मरण पावल्याचे दस्तऐवज पूराव्याअभावी नाकारण्‍यात येत आहे. पोलीसांचे कागदपत्रांवरुन तक्रारकर्तीचा पती विष प्राशन करुन मरण पावला आहे.  तक्रारकर्ती शवविच्‍छेदन अहवाल सादर करण्‍यास अपयशी ठरली आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्य संशयास्पद असून आत्महत्याची शक्यता नाकारु शकत नाही. तकारकर्तीने वि.प.चे मागणीनुसार दस्तऐवज सादर केल्याबाबत कोणताही पूरावा सादर केला नाही त्यामूळे सदर तक्रार मूदतबाहय आहे व खारीज होण्‍यास पात्र आहे.
  8. तक्रारकर्ती तक्रारीसोबत व वि.प.क्रं. यांनी दाखल केलेल्या दस्‍तावेजांचे व लेखी युक्तीवादाचे अवलोकन करता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

        मुद्दे                                                                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?           नाही
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?     नाही
  4. काय आदेश                                                         अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत नि.कं.2 वर दाखल गावनमुना 7-अ व 12 , फेरफार नोंदवही , गावनमुना -6 क,मृत्युप्रमाणपत्राचे अवलोकन करता असे दिसुन येते की तकारकर्तीच्या पतीचे नावे मौजा-नगरधन, त.रामटेक, जि. नागपूर येथील शेत नं. 1097 खाते क्रं. 429 ही शेतजमिन होती व तक्रारकतीच्या पतीचे दिनांक 27.7.2012 ला निधन झाल्याने तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत पत्नी या नात्याने विमा दाव्याची लाभधारक असल्याने वि.प.ची ग्राहक आहे. तक्रारकर्तीने तिचा विमा दावा वि.प.कं.1 यांचेकडे वि.प.क्रं.2 यांचेमार्फत सादर केल्याचे नि.क्र.2(15) वर दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते परंतु वि.प.ने त्यांचे पत्र दिनांक 1.8.2014 अन्वये मागीतलेल्या दस्तऐवजांचे पूर्तता केल्याबाबतचे दस्तऐवज तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केले नाही. त्यामूळे तक्रारकर्ती शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत देय असलेली रक्कम मिळण्‍यास पात्र असल्याबाबतचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग पोहूच शकत नाही. खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षाने तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा
  3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

  

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.