Maharashtra

Chandrapur

CC/16/47

Shri Baliram Kisanrao Dongarkar - Complainant(s)

Versus

The New India Insurance Co. Branch Chandrapur - Opp.Party(s)

N.R.Khobragade

31 Oct 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/16/47
 
1. Shri Baliram Kisanrao Dongarkar
At Chinora Tah Warora
Chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Co. Branch Chandrapur
Gupta building Branch Chandrapur
Chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MRS.Kirti Gadgil Vaidya MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 31 Oct 2017
Final Order / Judgement

::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये किर्ती गाडगीळ (वैदय)  मा.सदस्‍या 

१.    सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.    अर्जदाराच्‍या मालकीची गाडी क्रमांक एम.एच. ३४ ए.बी. ४५०४ टाटा एल.पी.के.  २५१८ पी.सी. कंपनीचा हायवा ट्रक आहे. सदर गाडीवा विमा अर्जदारांने दिनांक २२.०३.२०१४ रोजी काढला अर्जदाराच्‍या गाडीची मुळ किंमत रु. २३,३६,०३१/- असुन सदर गाडी अर्जदाराने दिनांक १९.०३.२०१२ रोजी जायका मोटर्स लि. नागपुर येथुन खरेदी केली. अर्जदाराची गाडी त्‍याच्‍या घरा समोर ठेवली असतांना दिनांक १६.१०.२०१४ रोजी चोरी ला गेली. गाडीच्‍या चोरी संबंधी अर्जदाराने दिनांक १७.१०.२०१४ रोजी पोलीस स्‍टेशन,वरोरा येथे तक्रार दाखल केली अर्जदाराने गाडी चोरी गेल्‍याने आवश्‍यक कागदपत्रे व इंसुरन्‍स क्‍लेम दाखल केला. अर्जदाराने गाडी चोरीला गेल्‍याने आवश्‍यक कागदपत्रे व इंसुरन्‍स क्‍लेम अर्जासह त्‍या गाडीच्‍या इंसुतन्‍स पॉलीसी मध्‍ये गाडीची विमाकृत किंमत रु. १७,००,०००/- मिळण्‍याकरीता दिनांक १७.१०.२०१४ रोजी प्रस्‍ताव गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला. अर्जदाराने सदर गाडी स्‍वयंरोजगाराकरीता चालवुन मिळणा-या उत्‍पन्‍नातुन घेतलेल्‍या कर्जाची परतफेड केली व परीवाराचे पालनपोषण केले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केल्‍यानंतरही गैरअर्जदार यांनी विमा दावा रक्‍कम अर्जदारास दिली नाहीकिंवा कोणतेही अत्‍तर दिले नाही. सबब अर्जदाराने नोटीस पाठवुन सदर नोटीस दिनांक ०३.०२.२०१६ रोजी मिळवुनही गैरअर्जदाराने नोटीसचे उत्‍तर न दिल्‍यामुळे अर्जदाराने प्रस्‍तुत तकार मंचा समक्ष दाखल केली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुनवादातील वाहनाची गैरअर्जदार यांनी विमा करारात नमुद केल्‍याप्रमाणे रक्‍कम रु. १७,००,०००/- दिनांक ०२.०२.२०१६ पासुन ९ टक्‍के व्‍याजासह अदा करावी. तसेच मानसीक व शारीरीक खर्च मिळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.

३.    सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, अर्जदाराने तक्रारीतील गाडीचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र  दस्‍ताऐवज क्र. ३६ वर दाखल केलेले असुन ते प्रमाणपत्र दिनांक २८.०३.२०१४ पर्यंत वैध हाते. यावरुन असे स्‍पष्‍ट दिसुन येते कि, दिनांक १६.१०.२०१४ रोजी रात्रीच्‍या आधीपर्यंत अर्जदाराच्‍या गाडीचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र वैध नसतांना ती गाडी सार्वजनीक जागेत अर्जदार चालवित होता दाखल एफआयआर मध्‍येही अर्जदाराने त्रकार दाखल केली आहे कि, दिनांक १६.१०.२०१४ रोजी रात्री  ८.०० वाजता त्‍याचा वाहनचालक याचे गाडीचे काम आटोपुन गाडी अर्जदाराच्‍या घरासमोर आणुन गाडी बंद करुन ठेवल. यावरुनअसे दिसुन येते कि, अर्जदार हा गाडीचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र नसतांनाही गाडी चालवित होता. सदर कृती ही मोटारवाहन कायद्याचा भंग करणारी आहे. तसेच अर्जदाराने सदर गाडीची एकच चावी विमा दाव्‍यासोबत गैरअर्जराकडे दाखल केली. त्‍याबद्दल अर्जदाराने काहीही कथन केलेले नाही या सर्व कारणामुळे गैरअर्जदार अर्जदारास विमा दावा रक्‍कम देण्‍यास जवाबदार नाही. सबब तक्रार अमान्‍य करण्‍यात यावीव अर्जदारास दंड लावण्‍यात यावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.

४.   तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येत आहे.

                 मुद्दे                                                       निष्‍कर्ष 

१.   तक्रारदार सामनेवाले यांचा ग्राहक आहे काय ?             होय

२.   सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराप्रमाणे

     सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब

     तक्रारदार सिद्ध करतात काय ?                            होय    

२.      सामनेवाले तक्रारदारास नुकसानभरपाई अदा

     करण्यास पात्र आहेत काय ?                     होय

३.   आदेश ?                                                              अंशतः मान्‍य

 

                       

कारण मिमांसा

मुद्दा क्र. १  :

५.   अर्जदार यांनी त्‍यांच गाडी क्रमांक एम.एच. ३४ ए.बी. ४५०४ टाटा एल.पी.के.  २५१८ पी.सी. कंपनीचा हायवा ट्रक चा विमा करार गैरअर्जदार विमा कंपनीकडुन दिनांक २२.०३.२०१४ रोजी काढण्‍यात आला हि बाब गैरअर्जदार यांना मान्‍य असल्‍यामुळे यात वाद नाही. सबब अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे, सबब मुद्दा क्र. १ होकारार्थी नोंदविण्‍यात येतो.

 

मुद्दा क्र. २ व ३ :

६.   अर्जदाराने त्‍याच्‍यागाडीचा विमा गैरअर्जदार कंपनीकडुन दिनांक २२.०३.२०१४ ते २१.०३.२०१५ पर्यंत काढलेला होतो. अर्जदाराचे वाहन दिनांक १६.१०.२०१४ रोजी घरासमोर ठेवलेले असतांना चोरीस गेली. त्‍याची तक्रार  पोलीस स्‍टेशन, वरोरा व विमा कंपनीला दिली. सबब विमा करारामध्‍ये असणा-या कोणत्‍याही बाबीचे उंलघन अर्जदाराने केलेले नाही हि बाब स्‍पष्‍ट होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार यांना विमा दाव्‍यासोबत संपुर्ण कागदपत्रे पुरविली असुन गैरअर्जदार यांनी लेखी उत्‍तरात अर्जदाराचे वाहन चोरी गेले तेव्‍हा वाहनाचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र वैध नव्‍हते. सदर कारणामुळे विमा कपनीअर्जदारास विमा दावा रक्‍कम देण्‍यास बाध्‍य नाही, परंतु मंचाच्‍या मते वाहनाचा विमा आणि वाहनाचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र किंवा वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र यामध्‍ये तफावत असुन वाहनाचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र वैध नसणे हि गाडी  मालकाचा निष्‍काळजीपणा दिसुन येतो, परंतुतो निष्‍काळजीपणा मुद्दामहुन केलेला असेल तर कलम १९२ मोटर वाहन कायदा अन्‍वये गाडी मालकाला शिक्षा दिलेली आहे. या उलट अर्जदाराने वाहन विकत घेते वेळी त्‍याच्‍या वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडुन घेतलेला असुन त्‍याचे हप्‍ते नियमीत भरलेले आहे. अर्जदाराचे वाहन विमा मुदतीत असतांना चोरी ला गेलेले आहे हे सिध्‍द होते तसेच गैरअर्जदार कंपनीच्‍याविमा करारामध्‍ये वाहनाचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र वैध नसणे कि प्रती अटी व शर्तीचाभग करणारी आहे असे नमुद नाही. या संदर्भात मा. चंदीगड राज्‍य आयोगाने L.K. Grovar Vs New India Assurance Compony First Appeal No. 29/2014 Decided on 03.03.2014 या न्‍याय निर्णयामध्‍ये खालील प्रमाणे न्‍यायतत्‍व विषद केलेले आहे.  

         There is no condition, in the Insurance Policy that if the complainant did not have a valid Registration Certificate and a valid Fitness Certificate, and theft of the vehicle took place, then the claim could be validly and legally repudiated, by the Opposite Party. He could only be punished under Section 192 of the Motor Vehicles Act 1988, for non-carrying of a valid Registration Certificate. Keeping in view the principle of law, laid down, in the aforesaid cases, and the fact that there was no nexus, between non-carrying of a valid Registration Certificate and a valid Fitness Certificate and theft of the vehicle, in our considered opinion, the Opposite Party, illegally and arbitrarily, repudiated the genuine claim of the complainant. By repudiating the genuine claim of the complainant, the Opposite Party was certainly deficient, in rendering service. The findings of the District Forum, to the contrary, being perverse, are liable to be set aside.    

      मा. राज्‍य आयोगाने दिलेल्‍या न्‍याय निर्णयाचा आधार घेता सदर तक्रारीत सुध्‍दा विमा करार मुदतीत असतांना सुध्‍दा गैरअर्जदार कंपनीने केवळ वाहनाचे सुव्‍यवस्थित असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र वैध नसल्‍यामुळे अर्जदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी दिल्‍याची बाब सिध्‍द होत असुन कोणत्‍याही न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग न केल्याची बाब तक्रारदार यांनी सिद्ध केली आहे. सामनेवाले यांनी विमा दावा मंजुर न केल्याने तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दावा सेवेबाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन, अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्ध होते. सदर तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत तक्रारीतील वाद्कथनास लागू होत नसल्याने अमान्य करण्यात येतो. तक्रारदारानी लेखी आक्षेप सादर करूनही सामनेवाले यांनी विमा दावा रक्कम अदा करण्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्‍यावरून सिध्‍द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्‍वये “सेवा” या संज्ञेची व्‍याप्‍ती पाहता वैध विमा दावा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्‍यायतत्‍व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्‍कर्षावरून, तक्रारदारांनी सदर तक्रार विमा दावा करार सेवेबाबत दाखल केल्‍याने व ही बाब कागदोपत्री पुराव्‍याने सिध्‍द झाल्‍याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दावा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब सिध्‍द झाल्‍याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्‍द झाल्‍याने मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

मुद्दा क्र. ३ : 

६.          मुद्दा क्रं. १ ते ३ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

आदेश

 

     १.  ग्राहक तक्रार क्र. ४७/२०१६ अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

          २.  सामनेवाले यांनी, तक्रारदार यांना विमा दावा कराराप्रमाणे,ग्राहक

         संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर

         केल्‍याची बाब जाहीर करण्यात येते.

      ३.  सामनेवाले यांनी विमा दावा रक्कम रुपये १७,००,०००/- दिनांक

          ०२.०२.२०१६ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. ६% व्याजासह तक्रारदार

          यांना अदा करावी.

      ४.  सामनेवाले यांनी विमा दावा कराराबाबत सेवासुविधा पुरविण्‍यात

          कसूर करुन तक्रारदार यांना मानसिक,शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व

          तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १५,०००/-या आदेशप्राप्ती

          दिनांकापासून  ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.

            ५.  उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी. 

 

 

 

 श्रीमत       श्रीमती.कल्‍पना जांगडे                श्री.उमेश वि. जावळीकर                          श्रीमती. किर्ती गाडगीळ         

                             (सदस्‍या)                                     (अध्‍यक्ष)                                                (सदस्‍या)

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MRS.Kirti Gadgil Vaidya]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.