विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गोंदिया ग्राहक तक्रार क्रमाक - 17/08 दाखल दिनांक - 15-03-08 आदेश दिनांक - 27-05-08 कालावधी - 73 दिवस तक्रारकर्ता - मे. श्यामबाबा राईस मिल, अड आंधळे मनोहर चौक, गोंदिया तर्फे अधिवक्ता द्वारा प्रोपा. श्री.दिपक श्रीरामजी अग्रवाल तह. व जि. गोंदिया --- वि रु ध्द--- विरुध्द पक्ष - द न्यू इंडिया अशोरंस कं. लि. (अड.अहमद पारेख भवन, स्टेशन रोड, तर्फे अधिवक्ता) दुर्ग 491001, छत्तीसगड द्वारा- ब्रॅन्च मॅनेजर समक्ष श्रीमती प्रतिभा पोटदुखे, अध्यक्षा श्री. अजितकुमार जैन, सदस्य आदेश (दि. 27-05-08) द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा - - ग्राहक तक्रार क्रं. 66/07 मध्ये दि. 24-09-07 रोजी आदेश पारित करुन तक्रारकर्ता यांची तक्रार खारीज करण्यात आली होती व तक्रारकर्ता यांना दिवाणी अथवा इतर सक्षम प्राधिकरणाकडे जाण्याची मुभा देण्यात आली होती.
- दि. 24-09-07 च्या आदेशा विरुध्द आदरणीय राज्य आयोग, परिक्रमा खंडपिठ , नागपूर यांनी दि. 20-2-08 रोजी अपिल क्रं. 981/07 मध्ये विद्यमान न्यायमंचास असा आदेश दिला की, पक्षकारांना परत नोटीसेस काढण्यात यावेत व गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा. या आदेशात पक्षकारांना दस्ताऐवज व शपथपत्र दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती.
- राज्य आयोगाच्या दि. 20-02-08 च्या निर्देशानुसार तक्रारकर्ता यांनी दि. 25-04-08 रोजी नि.क्रं. 26 हे शपथपत्र तर वि.प.यांच्या वतीने दि. 6-5-08 रोजी नि.क्र. 29 हे शपथपत्र दाखल करण्यात आले. विद्यमान मंचाने संक्षिप्त कार्यपध्दतीच्या आधारावर पुरामुळे एकूण किती नुकसान झाले हे ठरविता येणे शक्य नाही या सबबीवर ग्राहक तक्रार खारीज केली होती. आदरणीय राज्य आयोगाने प्रकरण रिमांड केल्यानंतर त्यास ग्राहक तक्रार क्रं. 17/08 हा नविन नंबर देण्यात आला. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली शपथपत्रे ही मुख्यतः पुरामुळे गोडावून मधील मालाचे एकूण किती नुकसान झाले हे दर्शविणारी आहेत.
- ग्राहक तक्रार क्रं. 66/07 च्या आदेशात तक्रारकर्ता हे ग्राहक आहेत व पुरामुळे तक्रारकर्ता यांच्या गोडावून मधील धान्याचे नुकसान झाले हे ठरविलेले असल्यामुळे या आदेशात फक्त एकूण नुकसान किती झाले हे ठरवावयाचे आहे.
- तक्रारकर्ता म्हणतात की, पुरामुळे त्याचे गोडावून मध्ये साठविलेले धान्य खराब होवून एकूण रु. 3,68,100/- चे नुकसान झाले. ही बाब सिध्द करण्यासाठी त्यांनी तलाठयाचा पंचनामा रेकॉर्डवर दाखल केला आहे. या पंचनामा व प्रतिवेदनात खराब झालेल्या धान्याची किंमत कशी ठरविली हे स्पष्ट होत नाही. तलाठी यांचे शपथपत्र रेकॉर्डवर नाही. अशा स्थितीत तलाठी यांनी ठरविलेल्या रु.3,68,100/- या किंमतीस आधार आहे असे म्हणता येत नाही.
- तक्रारकर्ता यांचे तर्फे इस्माईल अब्दुल्ला खान पठाण व इतर वि. ओरियण्टल इन्शुरन्स कं. लि. व इतर हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल करण्यात आला. (1994 (1) ) या प्रकरणात आदरणीय महाराष्ट्र राज्य आयोगाने महसूल अधिका-याने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर विमा दाव्या संबंधिचे प्रकरण मंजूर केले आहे. सदर न्यायनिवाडा या प्रकरणास लागू होत नाही. कारण या प्रकरणात सर्वे रिपोर्ट नसल्यामुळे महसूल अधिका-याने केलेल्या पंचनाम्यास ग्राहय मानण्यात आले आहे. परंतु सदर ग्राहक तक्रारीत सर्वे रिपोर्ट हा रेकॉर्डवर आहे.
- वि.प.यांच्या वतीने रिलायंस लेबोरेटरीचा दि. 22-8-06 चा टेस्ट रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल करण्यात आला आहे. त्यात धानाचे झालेले नुकसान हे पुढील प्रमाणे दाखविण्यात आले आहे.
Report of Rice 1. Report (Bottom Layer) Good Condition 96% Damage 4% 2. Report (2nd chalni) Good Condition 97% Damage 3% 3. Report (2nd sample) Good Condition 90% Damage 10% 4. Report (1st chalni) Good Condition 97% Damage 3% 5 Report (bottom layer) Good Condition 94% Damage 6% - वि.प.यांच्या वतीने श्री. हरेकेशव तिवारी, सर्वेअर यांचा दि. 31-01-07 चा सर्वे रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल करण्यात आला आहे. या सर्वे रिपोर्ट प्रमाणे तक्रारकर्ता यांच्या एकूण 541 पोत्यांचे नुकसान झाले या पोत्यांमध्ये एकूण 2,813.20 किलो धान्य होते व प्रति क्विटंल रु.1000/- याप्रमाणे रु.28,132.00/- ही रक्कम एकूण नुकसान म्हणून दर्शविली आहे.
- तक्रारकर्ता यांच्या वतीने रिलायंस लेबोरेटरी टेस्ट रिपोर्ट अथवा सर्वे रिपोर्ट याला विरोध केल्याचे कोणतेही दस्ताऐवज रेकॉर्डवर नाही.
दि. 12 व 13 ऑगस्ट 2006 रोजी पुर आला व दि. 14 ऑगस्ट व दि. 20 ऑगस्ट 2006 रोजी वि.प.यांच्या वतीने सर्वेअर श्री. तिवारी यांनी धान्यसाठा असलेल्या गोडावूनला भेट दिली. सुरगुजा ग्रॅनाईट इंडस्ट्रीज वि. ओरियण्टल इंन्शुरन्स कं.लि. या III (2005) सीपीजे 485 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय छत्तीसगड राज्य आयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, सर्वेअरने स्वतः घटनास्थळी भेट देवून तयार केलेला झालेल्या नुकसानीचा अहवाल हा महत्वपूर्ण कारण असल्याशिवाय दुलर्क्षित करता येत नाही. ओरियण्टल इन्शुरन्स कं.लि. वि. बी. रामारेड्डी या II (2006) सीपीजे 339 (एनसी) मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे की, सर्वेअरचा रिपोर्ट हा महत्वाचा पुरावा असून फक्त सर्वेअर रिपोर्टच्या आधारे नुकसानभरपाई ठरविता येते. पाम इटेबल्स लि. वि. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. व इतर या IV(2004) सीपीजे 22 एनसी मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय राष्ट्रीय आयोग म्हणते की, '' सर्वेअरचा रिपोर्ट हा महत्वाचा दस्ताऐवज असून हा रिपोर्ट नाकारतांना सबळ कारणे दिली गेली पाहिजेत '' . सदर प्रकरणात सर्वेअरचा रिपोर्ट कां स्विकारण्यात येवू नये याबद्दलची महत्वपूर्ण कारणे तक्रारकर्ता यांनी दिलेली नाहीत. सर्वेअरचा दि. 31-01-07 चा रिपोर्ट चुकिचा आहे असे दर्शविणारे एखादे पत्र ही ग्राहक तक्रार दाखल करत पर्यंत म्हणजे दि. 26-06-07 पर्यंत तक्रारकर्ता यांनी वि.प.यांना लिहिल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्ता यांनी पुढील केस लॉ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत.
अ) 1992 (1) सीपीआर 333 ब) 1998 (1) सीपीआर 613 क) 1997 (1) सीपीआर 4 ड) 1994 (1) सीपीआर 817 तथ्य व परिस्थिती भिन्न असल्यामुळे वरील केस लॉ सदर प्रकरणास लागू होत नाहीत. श्री. तिवारी यांच्या सर्वे रिपोर्टमध्ये रु. 28,132/- ही रक्कम एकूण नुकसान म्हणून दाखविण्यात आली असून त्यातून रु.10,000/- ही रक्कम '' D.E.as per the policy " असे सांगून कमी करण्यात आली आहे. ही रु.10,000/- ची रक्कम कोणत्या आधारावर कमी करण्यात आली याबद्दलचे दस्ताऐवज वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. त्यामुळे रु.10000/- ही रक्कम रु.28,132/- मधून कमी करणे हे संयुक्तिक वाटत नाही.
असे तथ्य व परिस्थितीत असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश - वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना रु.28,132/- ही रक्कम विमा दावा खारीज केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.14-05-07 पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना मिळेपर्यंत 9% व्याजासह द्यावी.
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.3000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावेत.
- वि.प.यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे.
(श्री.अजितकुमार जैन) ((श्रीमती प्रतिभा पोटदुखे) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गोंदिया |