Maharashtra

Akola

CC/15/254

Arvind Mukutrao Deshmukh - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Hemant Deshmukh

20 Apr 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/254
 
1. Arvind Mukutrao Deshmukh
R/o.Flat No.7,Balaji Nagar,Gorakshan Rd.Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.Ltd.
through Senior Divisional Manager, Divisional Office, Gorakshan Rd.Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 20.04.2016 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

           सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली आहे.

     तक्रारकर्ती क्र. 2 हिने सन 2008 मध्ये मारोती वॅगन आर रजि. नं. एम.एच. 12 एफएफ 2282 ह्या क्रमांकाची कार विकत घेतली व सदर कारचा इन्शुरन्स विरुध्दपक्षाचे कासारवाडी, पुणे येथील कार्यालयामार्फत प्रपोजल क्र. 43432792 दि. 28/12/2013 व्दारे पॉलिसी क्र. 31260031130101223533 नुसार काढला.  सदर विमा हा दि. 02/04/2014 ते दि. 01/01/2015 पर्यंत होता व त्यामध्ये तक्रारकर्ते क्र. 1 हे नॉमिनी होते. तक्रारकर्ती क्र. 2 ला अमेरीकेला जावयाचे असल्यामुळे तिने सदर कार त्यांचे वडील म्हणजे तक्रारकर्ता क्र. 1 यांच्या नावाने विनामोबदला माहे एप्रिल 2014 मध्ये करुन दिली व आर.टी.ओ. अकोला यांच्याकडे तक्रारकर्ता क्र. 1 चे नांव, मालक म्हणून नोंदविण्यात आले.  सदर कारचा दि. 29/10/2014 रोजी नॅशनल हायवे क्र. 6 वर एका अज्ञात ट्रकव्दारे धडक दिल्यामुळे अपघात झाला व त्यामध्ये कारचा संपुर्णपणे चुराडा झाला.  सदर अपघातासंबंधी एफ.आय.आर. सिव्हील लाईन पोलिस स्टेशन अकोला येथे दर्ज करण्यात आला.  सदर कार, मारोती शोरुम अकोला येथे दाखविल्यानंतर सदरहू कार ही संपुर्णपणे नादुरुस्त असल्याचे कारण देत ती परत पाठविली व सद्यस्थितीत सदर कार तक्रारकर्ता क्र. 1 चे घरी नादुरुस्त अवस्थेत उभी आहे.  अशा परिस्थितीत सदर कारचा विमा वैध असल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने दि. 25/11/2014, 03/12/2014, 16/12/2014, 19/12/2014 रोजी पत्र पाठवून रक्कम देण्याची विनंती केली,  विरुध्दपक्ष यांनी दि. 05/03/2015 रोजी तक्रारकर्ता क्र. 1 यास पत्र लिहून कळविले की, ते तक्रारकर्त्यास सदरील इन्शुरन्सचे पैसे देऊ शकत नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 13/05/2015 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्षाला नोटीस पाठवून कारची इन्शुरन्स पॉलिसीची परतावा रक्कम रु. 1,52,845/-  तसेच अपघात स्थळावरुन शोरुम पर्यंत व परत घरी आणणे करिता लागलेला खर्च रु. 3500/ असे एकंदरीत रु. 1,56,345/- व नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे कळविले.  सदरची नोटीस Not Claimed  म्हणून परत आली.  अशा प्रकार विरुध्दपक्षाने सेवा देण्यात कुचराई केली.  तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यास अपघातग्रस्त कारच्या विम्याची रक्कम रु. 1,56,345/ - व मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी रु. 40,000/- विरुध्दपक्षाकडून मिळवून द्यावे व अर्ज खर्चासह मंजुर करण्यात यावा.  

      सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 15 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष यांचा लेखीजवाब :-

2.        विरुध्दपक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब प्रकरणात दाखल केला आहे.  त्यानुसार तक्रारीतील आरोप नाकबुल करुन विरुध्दपक्षाने असे नमुद केले की,  सदर कारच्या अपघाताची सुचना मिळाल्यानंतर विरुध्दपक्षाने सर्वेअर श्री अरविंद लखदिवे यांनी नेमणुक केली.  त्यानुसार सर्वेअर श्री लखदिवे यांनी खंडेलवाल ॲटो व्हील्स प्रा.लि. चे एस्टीमेट रु. 5,89,233.23 ची तपासणी केली व त्यांचे प्रतिनिधींशी चर्चा करुन वाहन दुरुस्ती संबंधीचे नुकसानीचे मुल्यांकनाची आकारणी रु. 1,96,000/- इतकी केली.  कारची सम इन्शुअर्ड रक्कम ही रु. 1,52,845/- आहे.  सदर कारच्या दुरुस्तीसाठी सर्व्हेअरने  आकारलेले मुल्यांकन रु. 1,96,000/- चे आहे,  म्हणजेच कार दुरुस्तीसाठी लागणारी रक्कम ही आय.डी.व्ही. रक्कम रु. 1,52,845/- चे वर जात असल्याने सर्वेअरने सदरहू कारचे टोटल लॉस बेसीस च्या आधारे नुकसानाच्या मुल्यांकनाची आकरणी केली.  त्याकरिता सर्व्हेअरने आय.डी.व्ही. / सम इन्शुअर्ड रक्कम रु. 1,52,845/- गृहीत धरुन त्यामधून इंन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे एक्सेस क्लॉज पोटी रु. 1000/- वजा केले व सॅलवेजचे मुल्यांकनाची आकारणी ही रु.15,000/- धरुन उर्वरित रक्कम रु. 1,36,845/- ही निव्वळ देय रक्कम सर्व्हेअरने अहवालामध्ये नमुद केली.  परंतु सदर रक्कम ही तक्रारकर्त्यास देता येत नाही.  कारण्‍  अपघात घटनेच्या दिवशी तक्रारकर्ता क्र. 1 हे आर.टी.ओ. व  आ.सी. बुक प्रमाणे रजिस्टर / पंजीकृत मालक तर सदरहू कारचा इन्शुरन्स हा अपघत घटनेची तारीख दिनांक 29/10/2014 ला  तक्रारकर्ते क्र. 1 चे नावाने नव्हता हा इन्शुरन्स तक्रारकर्ती क्र. 2 च्या नावाने होता. म्हणजेच तक्रारकर्ता क्र. 1 व विमा कंपनी मध्ये वादातील वाहनाचे नुकसान भरपाईचा कोणताही विमा करार अस्तीत्वात नव्हता.  तक्रारकर्ते क्र. 1 व 2 हे नातेवाईक जरी असले तरी कायदेशिरित्या त्या स्वतंत्र व्यक्ती आहेत. सदरचे प्रकरणात अपघाताचे दिवशी असणारे वाहनाचे मालक तक्रारकर्ता क्र. 1 यांनी त्यांचे मालकीच्या वाहनाचा विमा विरुध्दपक्षाकडे उतरविला नाही.  तक्रारकर्ता क्र. 2 ने विरुध्दपक्षाकडे केलेला विमा करार तक्रारकर्ता क्र. 1 ला लागु होणार नाही. वरील बाबीवरुन तक्रारकर्त्याला सदरहू वाहनाचा क्लेम देता येत नाही.  तक्रारकर्ते हे ग्राहक या संज्ञे अंतर्गत येत नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.

3.  त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतीउत्तर दाखल केले व उभयपक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात  

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.        सदर प्रकरणात उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकुन व उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन, काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.

  1. तक्रारकर्ते क्र. 1 व  2 हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहे किंवा नाही, हा मुद्दा विचारात घेतांना विरुध्दपक्षाच्या जबाबाचे अवलोकन केले.  विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार, “ तक्रारकर्ता क्र. 1 व विमा कंपनी म्हणजे विरुध्दपक्ष  यांच्या मध्ये वादातील वाहनाचा नुकसान भरपाईचा कोणताही विमा करार अस्तीत्वात नाही आणि नव्हता, म्हणून विमा कंपनी तक्रारकर्ता क्र. 1 यांना कोणतेही नुकसान भरपाई देणे लागत नाही व देण्यास बांधील व जबाबदार नाही,  तक्रारकर्ता क्र. 2 ने विरुध्दपक्षाकडे केलेला विमा करार, तक्रारकर्ता क्र. 1 ला लागु होणार नाही.  त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्र. 1 चा क्लेम नाकारुन सेवेत कोणतीच त्रुटी व निष्काळजीपणा केलेला नाही.  तक्रारकर्ता क्र. 1 हे ग्राहक या संज्ञेचे अंतर्गत येत नसल्याने त्यांची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही.”   विरुध्दपक्षाच्या म्हणण्यावर दाखल दस्तांचे अवलोकन मंचाने केले असता तक्रारकर्ता क्र. 1 व विरुध्दपक्ष यांच्यात कुठलाही करार झालेला नसल्याचे दिसून येते.  त्यामुळे  तक्रारकर्ता क्र. 1 हे विरुध्दपक्षाचे ग्राहक नसल्याचे मंच ग्राह्य धरीत आहे.  विरुध्दपक्षाकडे वादातील वाहनाच्या नुकसान भरपाईचा दावा तक्रारकर्ता क्र. 1 ने दाखल  केला असल्याने, विरुध्दपक्षाने तो, तक्रारकर्ता क्र. 1 व विरुध्दपक्ष यांच्यात कुठलाच करार झाला नसल्याच्या कारणावरुन नाकारल्याचे दिसून येते.  (दस्त क्र. अ 13)  त्यामुळे सदर दावा नाकारुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्र. 1 ला देण्यात येणाऱ्या सेवेत त्रुटी केली, हे सिध्द होत नसल्याचे मंच ग्राह्य धरीत आहे.  परंतु दस्त क्र. अ-2 वरुन तक्रारकर्ता क्र. 2 व विरुध्दपक्ष यांचे मध्ये करार झाल्याचे दिसून येते.  त्यामुळे सदर प्रकरणातील तक्रारकर्ती क्र. 2 ह्या विरुध्दपक्षाच्या ग्राहक असल्याचे मंच ग्राह्य धरीत आहे.
  2. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार “  अपघाताचे दिनांकास  तक्रारकर्ता क्र. 2 ह्या वादातील वाहनाच्या पंजीकृत मालक नाही व त्या दिवशी तक्रारकर्ते क्र. 2  सदरहू  वाहनाचे मालक नसल्याने त्या वाहनाच्या अपघातामुळे तक्रारकर्ता क्र. 2 चे कोणतेही नुकसान झाल्याचे मानता येणार नाही.”

    तसेच विरुध्दपक्षाचे सर्वेअर श्री अरविंद लखदिवे यांनी त्यांच्या प्रतिज्ञालेखात असे नमुद केले आहे की, “ अपघाताच्या दिवशी व वेळी अपघातग्रस्त वाहन हे  ज्या व्यक्तीच्या नावाने आहे, त्याच व्यक्तीच्या नावाने त्या वाहनाचा विमा असायला पाहीजे तरच विम्याचा क्लेम त्या व्यक्तीला देता येऊ शकतो.  परंतु या मामल्यामध्ये तसे नसल्याने विम्याचा क्लेम दोन्ही तक्रारकर्त्यांना देता येऊ शकत नाही.  सदर मुद्दयावर निर्णय घेतांना मंचाने विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या….

II (2014) CPJ 99(NC) 

Ram Singh Vs. Reliance General Insurance Co.;

   या न्याय निवाड्यातील तथ्यांचा आधार घेतला.  सदर न्यायनिवाड्यातील, या प्रकरणाला लागु पडणारे तथ्य येणे प्रमाणे …

10. As admitted by the parties, the vehicle in question, was sold by the original owner/ petitioner Ram Singh to Satish Chand on 7.2.2008.  In accordance with Rule 55 of the Central Motor Vehicles Rules, 1989, the factum of transfer was reported to the registering authority by the transferor Ram Singh on the prescribed Form -29 and by the transferee Satish Chand on Form -30.  It is not understood, therefore, how the petitioner took the insurance policy In his name,  valid from 29.5.2009 ot 28.5.2010, when he had already sold the vehicle to Satish Chand and also filed Form-29 and Form -30 In support of having sold the vehicle.  It is also clear from record that the alleged theft of the vehicle took place from the custody of the transferee, Satish Chand only. The FIR In question was lodged with the Policy by Satish Chand, the transferee.  However, since the insurance policy in question stands in the name of the petitioner, it is very clear that the purchaser does not have any insurable interest with regard to the vehicle.  Further, even the registration of the vehicle stand in the name of Ram Singh petitioner and the Insurance Policy is also in his name,  he shall not be entitled to get the claim,  because he has already declared on appropriate proforma that he had sold the vehicle to Satish Chand.  The peritioner is also not, therefore, entitled to the claim in question.  We therefore, find no justification to interfere with the orders passed by the State Commission, dismissing the complaint in question.    

    सदर तथ्याप्रमाणेच मंचासमोरील प्रकरणातही ज्याचे जवळ वाहनाची मालकी आहे, त्याच्या नावाने वाहनाचा विमा नाही व ज्या तक्रारकर्त्याच्या नावाने वाहनाचा विमा आहे, तिच्याकडे अपघाताच्या वेळी वाहनाची मालकी नव्हती. त्यामुळे वरीष्ठ न्यायमंचाच्या वरील न्यायनिवाड्याचा आदर राखुन सदर तक्रार खारीज करण्याच्या निष्कर्षाप्रत  हे मंच आले आहे.

    सदर प्रकरणात उभय पक्षांनी न्यायनिवाडे दाखल केले ते येणे प्रमाणे,

तक्रारकर्त्यातर्फे दाखल करण्यात आलेले न्यायनिवाडे येणे प्रमाणे.

  1. II (2015) CPJ 646 (NC)

Prem Devi Vs. Cholomandolom MS General Insurance Company Ltd.

  1. I (2014) CPJ 168 (UP) Neerajkumar Gupta Vs. United India Insurance Co.Ltd.& Anr.

     सदर न्यायनिवाड्यातील तथ्य या प्रकरणातील तथ्यांना तंतोतंत लागु पडत नसल्याने सदर न्यायनिवाड्यांचा विचार अंतीम आदेशाचे वेळी करण्यात आलेला नाही.

विरुध्दपक्षातर्फे खालील न्यायनिवाडे दाखल करण्यात आले.

  1. I (2016) CPJ 446 (NC)

Vijayan M. Aingoth Vs. Bajaj Allianz General Insurance Co.Ltd.

  1. II (2013) CPJ 401 (NC)

New India Assurance Co.Ltd. Vs. Shaik Dawood

  1. I (2014) CPJ 395 (NC)

New India Assurance Co.Ltd. Vs. Akbar

  1. III (2013) CPJ 26B(CN)(Maha.)

New India Assurance Co.Ltd. Vs. Sandeep  Devidas Bari.

     वरील सर्व न्यायनिवाड्यातील तथ्यानुसार नुकसानग्रस्त / चोरीला गेलेल्या वाहनाचा विमा तक्रारकर्त्याच्या नावाने नसल्याने विमा दाव्याची रक्कम  तक्रारकर्त्याला देय नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  सदर प्रकरणात या मंचाने तक्रारकर्ता क्र. 1, जो अपघातग्रस्त वाहनाचा मालक आहे,  परंतु विरुध्दपक्ष व तक्रारकर्ता क्र. 1 मध्ये कुठलाही विमा करार नसल्याने तो विरुध्दपक्षाचा ग्राहक  नसल्याचे मंचाने प्रथमच स्पष्ट केलेले असल्याने वरील न्यायनिवाड्यांचा विचार करण्यात आला नाही.  मात्र विरुध्दपक्ष  यांनी दाखल केलेल्या II (2014) CPJ 99 (NC) Ram Singh Vs. Reliance General Insurance Co.  या न्यायनिवड्यातील सदर तक्रारीला लागु पडणाऱ्या तथ्यांचा विचार अंतीम आदेशाचे वेळी करण्यात आला.  सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे .

                              :::अं ति म  आ दे श:::

  1. सदर प्रकरणातील तक्रारकर्ता क्र. 1 हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” नसल्याचे सिध्द झाल्याने तक्रारकर्ता क्र. 1 ची विरुध्दपक्षाविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.  तसेच तक्रारकर्ता क्र. 2 ही विरुध्दपक्षाची ग्राहक असली तरी तिच्याकडे वादातील वाहनाची मालकी नसल्याने तक्रारकर्ता क्र. 2 ची विरुध्दपक्षाविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
  2. न्यायिक खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.

सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.