Maharashtra

Sindhudurg

CC/12/9

Sou. Anagha Rajendra Kesarkar - Complainant(s)

Versus

The New India Assurance - Opp.Party(s)

31 May 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/9
 
1. Sou. Anagha Rajendra Kesarkar
A/P 474, Bhat building,Pan bazar,Kudal Tal- Kudal 416 520
Sindhudurg
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance
A/P 1806, 'Aashirwad bhavan'Near Post Office, Kudal Tal Kudal
Sindhudurg
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Dayanand Madke PRESIDENT
 HONOURABLE MRS. Vafa Khan MEMBER
 HON'ABLE MRS. Smt. Ulka Pawaskar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

Exh.No.20
सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 09/2012
                                          तक्रार दाखल झाल्‍याचा दि. 24/02/2012
                                           तक्रार निकाल झाल्‍याचा दि. 31/05/2013
 
सौ.अनघा राजेंद्र केसरकर
रा.474,, भाट बिल्डिंग, पानबाजार,
मु.पो.ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग.                    ... तक्रारदार
     विरुध्‍द
दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि.
1806, आशीर्वाद भवन, पोस्‍ट ऑफिस जवळ,
मु.पो.ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग-416 520    ... विरुध्‍द पक्ष.
 
                                                                 गणपूर्तीः-
                                  1) श्री. डी.डी. मडके,   अध्‍यक्ष                                                                                                                               
                                 2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्‍या.
                                3) श्रीमती उल्‍का अंकुश पावसकर (गावकर), सदस्‍या
तक्रारदारातर्फेः- कुलमुखत्‍यारी श्री राजेंद्र केसरकर                                   
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ एस.एन.. भणगे, श्री जी.टी. पडते.
 
निकालपत्र
(दि.31/05/2013)
श्री डी.डी. मडके, अध्‍यक्षः -        तक्रारदार यांचा घाऊक औषध वितरणाचा व्‍यवसाय असून त्‍याचे नाव इनफार्मा सर्व्‍हीस असे आहे. तक्रारदार यांनी इनफार्मा सर्व्‍हीसमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या सर्व औषधांचा तसेच रोख रक्‍कमेचा  विरुध्‍द पक्ष यांचेकडे विमा उतरविलेला आहे. तक्रारदाराचे दुकानातील औषधांची तसेच रोख रक्‍कमेची चोरी झालेमुळे तक्रारदाराने विमा उतरविलेल्‍या औषधांच्‍या किंमतीची तसेच चोरीस गेलेल्‍या रोख रक्‍कमेची  मागणी विरुध्‍द पक्ष यांचेकडे केली परंतू विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदाराची मागणी फेटाळल्‍यामुळे तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे.
      2)    तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीची थोडक्‍यात हकीगत अशी की,
विरुध्‍द पक्ष ही इंश्‍युरंस कंपनी असून तक्रारदाराने आपल्‍या औषधाचे दुकानातील औषधांचा तसेच रोख रक्‍कमेचा विमा विरुध्‍द पक्ष यांचेकडे उतरविलेला आहे याबाबत तक्रारदाराने नि.    4/4 वर विमा पॉलिसीची प्रत हजर केलेली आहे त्‍याचे अवलोकन करता, तक्रारदाराने त्‍याचे औषधाच्‍या मालाचा रक्‍कम रु.35,75,000/- एवढया रक्‍कमेकरिता व सुरक्षित रक्‍कम (Cash in safe) रु.50,000/- एवढया रक्‍कमेचा विमा विरुध्‍द पक्ष यांचेकडे उतरविलेला आहे. त्‍याचा विमा क्र.152201/48/10/34/000328 असा असून त्‍याचा कालावधी 14/01/2010 ते 13/01/2011 असा आहे. तक्रारदार याचे दुकानात दि.21/08/2010 ते 23/08/2010 या मुदतीत चोरी झाली. तक्रारदाराचे दुकानातील रक्‍कम रु.2,87,522/-एव्‍हढया रक्‍कमेच्‍या औषधांची व रोख रक्‍कम रु.17,500/- ची चोरी झाली. दि.23/08/2010 रोजी  तक्रारदाराने दुकान उघडल्‍यानंतर दुकानात चोरी झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर दि.23/08/2010 रोजी पोलीसात तक्रार दिली. ती 4/1 वर हजर केली आहे. सदरहू तक्रारीचे अवलोकन करता त्‍यात रु.17,500/- चा उल्‍लेख असून औषधांच्‍या चोरीबाबत काही उल्‍लेख नाही. परंतू औषधांची चोरी झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर तक्रारदाराने दि.24/08/2010 रोजी पुरवणी जबाब देऊन त्‍याबाबतची कल्‍पना पोलीसांना दिली. तसेच याबाबत विरुध्‍द पक्ष तसेच भारतीय स्‍टेट बँक, कुडाळ यांनाही समज दिली. दि.24/08/2010 रोजी तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष यांचेकडे चोरीस गेलेल्‍या औषधांच्‍या किंमतीची तसेच रोख रक्‍कमेची मागणी केली. याकामी विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांचे पॅनेलवरील सर्व्‍हेअर श्री खानोलकर व श्री शहापुरकर यांचेकडून अहवाल मागविला. तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या पॅनेलवरील वकील श्री दांडगे व श्री नार्वेकर यांचेकडूनही खुलासा मागविला. तक्रारदाराचे म्‍हणण्‍यानुसार  सर्व्‍हेअर खानोलकर यांनी दुकानाची तपासणी करुन चोरी झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे सांगीतले आहे तसेच सर्व्‍हेअर शहापुरकर यांनी दुकानातील रक्‍कम रु.2,87,543/- एवढया रक्‍कमेच्‍या औषधांच्‍या मालाची चोरी झालेली आहे असे नमुद केलेले आहे. असे असतांना विरुध्‍द पक्ष यांनी दि.23/08/2011 रोजीचे पत्राने तक्रारदाराची मागणी फेटाळलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने चोरीस गेलेली रक्‍कम, औषधे चोरीच्‍या मालाची रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज, आर्थिक, मानसिक नुकसान व तक्रारीचा खर्च याकरिता रक्‍कम रु.5 लाख एवढया रक्‍कमेची विरुध्‍द पक्ष यांचेकडून मागणी केलेली आहे.
      3)    तक्रारीची नोटीस विरुध्‍द पक्ष यांना पाठवण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष हे या कामी हजर होऊन तयांनी नि.11 वर आपले म्‍हणणे हजर केले. तक्रारदाराने नि.18/1 वर अखत्‍यारपत्र हजर करुन सदरहू केस चालवण्‍याबाबत आपले पती राजेंद्र गजानन केसरकर यांना अधिकार दिलेले आहेत. तसेच तक्रारदाराने तक्रारीपुष्‍टयर्थ व विरुध्‍द पक्ष यांनी कागदपत्रे हजर केलेली आहेत. तक्रारदाराने व विरुध्‍द पक्ष यांनी हजर केलेली कागदपत्रे, तसेच लेखी युक्‍तीवाद, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे, तोंडी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्‍कर्षासाठी निघतात.

अ.क्र.
                   मुद्दे
निष्‍कर्ष
1
ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत विरुध्‍द पक्ष यांनी त्रुटी केली आहे का ?   
होय
2
तक्रारदार आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे का ?
होय  
3    
आदेश काय  ?
खालीलप्रमाणे

 
-          विवेचन -
      मुद्दा क्रमांक 1 व 2 -     तक्रारदाराने आपल्‍या घाऊक औषधाच्‍या दुकानाचा दि.14/01/2010 रोजी विमा उतरविलेला आहे व या विम्‍याची मुदत ही दि.13/01/2011 रोजीपर्यंत आहे. सदरहू विम्‍याची कागदपत्रे तक्रारदाराने नि.4/4 वर हजर केलेली आहेत. सदरहू विमा पॉलिसीचे अवलोकन करता नि.4/4 वरील पॉलिसी शेडयुलमधील आयटेमवाईज सम अॅश्‍युअर्ड मधील मजकुरानुसार रक्‍कम रु.35,75,000/- एवढया रक्‍कमेच्‍या औषधाचा साठा हा इंश्‍युअर्ड केलेला दिसतो व सुरक्षित ठेव (Cash in safe) करीता रक्‍कम रु.50,000/- ची जोखीम स्‍वीकारल्‍याचे दिसते. सदरील पॉलिसीची मुदत दि.13/01/2011 रोजी संपते तक्रारदाराचे दुकानात चोरी ही दि.23/08/2010 रोजी उघडकीस आलेली आहे. त्‍यामुळे चोरीच्‍या दिनांकास सदरहू पॉलिसी ही जिवीत होती व वस्‍तुस्थिती विरुध्‍द पक्ष यांनी नाकारलेली नाही.  दि.21/08/2010 रोजी तक्रारदाराने आपले दुकान बंद केले व सुट्टीनंतर दि.23/08/2010 रोजी दुकान उघडण्‍यास गेला असता त्‍याला दरवाजास वेगळे कुलूप लावल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर दुकानाचे मालकाकडे चौकशी केल्‍यानंतर संशय आल्‍याने तक्रारदाराने कुलूप तोडले व आत प्रवेश करता दुकानात चोरी झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर लगेच पोलीसांना दि.23/08/2010 रोजी लेखी तक्रार देऊन कळविले. सदरची तक्रार नि.4/1 वर हजर केलेली आहे. सदरहू दि.23/08/2010 रोजी तक्रार देतांना तक्रारदाराने आपले दुकानातील चोरीस गेलेल्‍या रोख रक्‍कमेची तक्रार दिलेली होती.   परंतू प्रथमदर्शनी औषधांची चोरी पोलीस तपासाच्‍यावेळी तक्रारदार किंवा अन्‍य कोणत्‍याही इसमांना दुकानात प्रवेश नसल्‍यामुळे तक्रारदाराचे औषधाची चोरी झाल्‍याचे लक्षात न आल्‍यामुळे त्‍यांने दि.23/08/2010 रोजीचे तक्रारीत औषधांच्‍या चोरीचा उल्‍लेख केलेला नाही परंतू त्‍यानंतर औषधांची चोरी झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर त्‍याच रात्री पूर्ण चोरीस गेलेल्‍या औषधांची खात्री करुन व तसे लिस्‍ट तयार करुन लगेचच दुस-या दिवशी म्‍हणजे दि.24/08/2010 रोजी तक्रारदाराने पोलीसांकडे पुरवणी जबाब दिला व त्‍याच रक्‍कमा रु.2,87,271/- एवढया रक्‍कमेची औषधांची चोरी झाल्‍याचे पोलीसांना सांगितले. सदरहू पुरवणी जबाब हा नि.3/3 वर हजर केलेला आहे. असे असतांना विरुध्‍द पक्ष यांनी दि.23/08/2011 रोजी तक्रारदाराची विम्‍याची रक्‍कम फेटाळलेली आहे. सदरहू पत्र नि.3/5 वर हजर केलेला आहे. सदरहू पत्राचे अवलोकन करता मुख्‍यतः दोन कारणाकरिता क्‍लेम नाकारलेला आहे ते म्‍हणजे विरुध्‍द पक्ष यांचेकडे कागदपत्रे जमा करणेस उशीर तसेच तक्रारदाराचे प्रथम खबरमध्‍ये चोरीस गेलेल्‍या औषधांचे वर्णन नमूद नाही. परंतू वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे तक्रारदाराने दि.23/08/2010 रोजीच्‍या तक्रारीत चोरीस गेलेल्‍या औषधांचा उल्‍लेख का नमूद केलेला नाही याचे कारण स्‍पष्‍ट केलेले आहे. तसेच तक्रारदाराने लगेचच दुस-या दिवशी एकंदरीत बस्‍तीस हजार औषधांची पाहणी करुन रक्‍कम रु.2,87,271/- एवढया रक्‍कमेच्‍या औषधांची चोरी झालेली आहे, असा पुरवणी जबाब पोलीस स्‍टेशनला दिलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराची विमा मागणी ही प्रथम खबरमध्‍ये औषधांचे वर्णन नसल्‍याने विरुध्‍द पक्ष यांनी नाकारणे हे अयोग्‍य आहे, असे मंचाचे मत आहे. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदाराने कागदपत्रे जमा करणेस उशीर केल्‍यामुळे विमा नाकारलेला आहे असे कळविलेले आहे; परंतू  तक्रारदाराने दि.13/01/2012  रोजी विरुध्‍द पक्ष यांना सविस्‍तर नोटीस पाठवून त्‍यांना कागदपत्रे पाठवण्‍यास उशीर झाला नसलेबाबत कळविले आहे. सदरहू नोटीस ही नि.3/6 वर हजर केलेली आहे. तक्रारदाराने नि.3/1 सोबत चोरी झालेपासून ती विमा नाकारणेपर्यंतचा घटनाक्रम दिलेला आहे, त्‍याचे व सोबत हजर केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराने कागदपत्रे हजर करण्‍यास कोणताही विलंब केलेला नाही असे आमचे मत आहे. या कामी तक्रारदाराने नि.3/7 वर विरुध्‍द पक्ष यांचा सर्व्‍हेअर शहापूरकर यांचा अहवाल सादर केलेला आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी एकूण चोरीस गेलेल्‍या मालाची रक्‍कम रु.2,87,543/- असे नमूद केलेले आहे. सवर्हेअर शहापुरकर यांनी दि.21/08/2010 रोजीचा असलेला स्‍टॉक रजिस्‍टरप्रमाणे औषधांचा साठा व दि.23/08/2010 रोजीचा प्रत्‍यक्षात दुकानात असलेला साठा यावरुन रक्‍कम रु.2,87,543/- एवढया रक्‍कमेची चोरी झालेबाबतचा अहवाल दिलेला आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांचे दुसरे सर्व्‍हेअर खानोलकर यांनी दि.5/9/2010 रोजी प्रत्‍यक्ष दुकानाची पाहणी करुन दुकानातील औषधांची चोरी झाली असा अहवाल दिलेला आहे. सदरचा अहवाल नि.3/8 वर हजर केलेला आहे. तसेच विरुध्‍द पक्षाचे कंपनीचे पॅनेलचे वकील श्री दांडगे यांनी दि.5/5/2011 रोजी कंपनीला पत्र पाठवून विरुध्‍द पक्ष कंपनीला तक्रारदाराने केवळ F.I.R. मध्‍ये चोरीस गेलेल्‍या औषधांचे वर्णन केलेले नसल्‍यामुळे त्‍यांचा क्‍लेम नाकारु शकत नाही असे स्‍पष्‍टपणे कळविले आहे सदरहू पत्र नि.3/9 वर हजर केलेले आहे. तसेच वि.प. यांचे पॅनेलवरील अॅड. नार्वेकर यांनीही विरुध्‍द पक्ष यांना सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराचे दुकानात चोरी झाल्‍याचे व त्‍याचे रक्‍कम रु.2,87,271/- एवढया रक्‍कमेच्‍या औषधांची चोरी झाल्‍याचे दिसून येते असा अभिप्राय दिलेला आहे. सदरहू पत्र नि.3/10 वर हजर केलेले आहे. तसेच तक्रारदाराने या कामी 12/1 स्‍टॉक रजिस्‍टर हजर केलेले आहे. त्‍यामुळे सदरहू स्‍टॉक रजिस्‍टर व दि.23/08/2010 रोजी दुकानात असलेल्‍या औषधांची तपासणीनुसार रक्‍कम रु.2,87,271/- एवढया रक्‍कमेच्‍या औषधांच्‍या रक्‍कमेची चोरी झाले हे स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारदाराचे पतीने पोलीसांना पुरवणी जबाब देतांना चोरीस गेलेल्‍या औषधांची यादी दिलेली आहे. सदरहू यादी नि.4/5 वर तक्रारदाराने हजर केलेली आहे. तक्रारदाराने या कामी चोरी पुर्वीच्‍या औषधांचा साठा, चोरी झालेल्‍या औषधांची यादी व शिल्‍लक राहिलेल्‍या औषधांचा साठा अशी एकत्रित यादी हजर केलेली आहे यावरुन दुकानात रक्‍कम रु.2,87,271/- एवढया रक्‍कमेच्‍या औषधांची चोरी झालेली होती हे स्‍पष्‍ट होते. सदरहू यादी नि.12/1 वर हजर केलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी नि.11 वर म्‍हणणे देऊन सर्व्‍हेअर खानोलकर व श्री शहापुरकर व अॅड. दांडगे व अॅड.नार्वेकर हे त्‍यांचेच पॅनेलवर असल्‍याचे मान्‍य केले आहे व त्‍यांचे अहवाल हे विरुध्‍द पक्ष यांना क्‍लेम मंजूर करण्‍यास सहकार्य करतात परंतू त्‍यांचे अहवाल हे औषंधाची चोरी झाली या निष्‍कर्षाप्रत येण्‍यास पुरेसे नाहीत असे आपले म्‍हणणे पॅरा.9 मध्‍ये म्‍हटले आहे, हे परस्‍परविरोधी म्‍हणणे मंचास योग्‍य वाटत नाही. 
तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम अदा न केल्‍यामुळे विमा कंपनीस तक्रारदाराने दि.04/05/2011 तसेच दि. 16/05/2011 रोजी रक्‍कम अदा करणेविषयी पत्रव्‍यवयहार केलेला आहे सदरहू पत्र ही नि.3/4  वर हजर केलेली आहेत. त्‍यानंतर दि.23/08/2011 रोजी विरुध्‍द पक्ष यांनी पत्र पाठवून तक्रारदाराची मागणी फेटाळलेली आहे. ते पत्र नि.3/5 वर हजर केलेले आहे. त्‍यानंतर तक्रारदाराने दि.13/1/2012 रोजी नोटीस पाठवून दि.23/8/2011 रोजीच्‍या पत्राचा खुलासा केलेला आहे. त्‍यानंतर तक्रारदाराने आपले सी.ए. मार्फत ऑडिट करुन घेतले व त्‍यांनी ऑडिट रिपोर्टमध्‍ये रक्‍कम रु.2,87,271/- किंमतीचे औषधांची चोरी झाल्‍याचे नमूद केलेले आहे. सदरहू रिपोर्ट नि.17/1 वर आहे. तसेच तक्रारदाराने सी.ए. कडील सविस्‍तर बॅलंसशिट हजर केलेली आहे. सदरहू बॅलंसशिट नि.17/4 वर हजर केलेली आहे, यावरुनही तक्रारदाराचे झालेल्‍या नुकसानीची खातरजमा होते. एकंदरीत विरुध्‍द पक्ष यांनी कोणतेही योग्‍य कारण नसतांना जाणूनबूजून तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेला आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.  
      मुद्दा क्रमांक 3-    तक्रारदाराने विमा कंपनीकडून ड्रॉवरमधून चोरीस गेलेली  रक्‍कम रु.17,500/- तसेच दुकानात चोरी झालेल्‍या औषधांची रक्‍कम रु.2,87,271/- एवढया रक्‍कमेची मागणी केलेली आहे. विमा कंपनीने रोख रक्‍कम चोरीस गेल्‍याचे नाकारलेले नाही. त्‍यामुळे सदरहू रक्‍कम विरुध्‍द पक्ष तक्रारदारास देणे लागतात. त्‍यामुळे तक्रारदार हे चोरीस गेलेल्‍या औषंधांची रक्‍कम व चोरीस गेलेली रक्‍कम अशी एकूण  रु.3,04,771/-(रुपये तीन लाख चार हजार सातशे एकाहत्‍तर मात्र) मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच तक्रारदाराने स्‍टेट बँकेचे कर्ज घेऊन औषधे खरेदी केल्‍याने बँकेमार्फतच विमा उतरविलेला होता ही गोष्‍ट विरुध्‍द पक्ष यांनी नाकारलेली नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी 12 %  व्‍याजदराने सदरहू रक्‍कम तक्रारदारास अदा करावी असे आमचे मत आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत कसुर केल्‍यामुळे तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रार खर्च रु.7,000/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत. त्‍यानुसार आम्‍ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करीत असून त्‍या दृष्‍टीकोनातून खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
                     अंतिम आदेश
1)      तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2) विरुध्‍द पक्ष दि न्‍यु इंडिया ऍश्‍युरंस कंपनी, कुडाळ यांनी तक्रारदारास चोरीस गेलेल्‍या औषधाची किंमत रक्‍कम रु.2,87,271/- व चोरीस गेलेली रक्‍कम 17500/- मिळून रक्‍कम रु.3,04771/-(रुपये तीन लाख चार हजार सातशे एकाहत्‍तर मात्र) एवढी रक्‍कम चोरी झाल्‍याचे तारखेपासून म्‍हणजे दि.23/08/2010 पासून 12 % व्‍याजदराने सदरहू रक्‍कम पूर्ण फेड होईपर्यंत अदा करावी.
3) विरुध्‍द पक्ष दि न्‍यु इंडिया ऍश्‍युरंस कंपनी, कुडाळ यांनी ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी केल्‍यामुळे तसेच आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) व व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.7,000/-(रुपये सात हजार मात्र) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास अदा करावा.
5) सदरहू आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्‍तीच्‍या तारखेपासून 30 दिवसांचे आत करणेत यावी.
6) तक्रारदाराच्‍या इतर मागण्‍या फेटाळण्‍यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 31/05/2013
 
 
 
(वफा खान)                (डी. डी. मडके)             (उल्‍का अंकुश पावसकर (गावकर),
   सदस्‍या,                     अध्‍यक्ष,                  सदस्‍या,
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
 
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.
 
 
[HON'ABLE MR. Dayanand Madke]
PRESIDENT
 
[HONOURABLE MRS. Vafa Khan]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Smt. Ulka Pawaskar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.