Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/134

Shri Dadarao Jagoji Sakharkar - Complainant(s)

Versus

The New India Assurance company Ltd. through its Devisional Manager Shri Mohan Digambar Limye - Opp.Party(s)

Shri Uday Kshirsagar

09 May 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/134
 
1. Shri Dadarao Jagoji Sakharkar
R/o Seloti post Mendha Tah-Bhivapur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance company Ltd. through its Devisional Manager Shri Mohan Digambar Limye
Divisional office No. 130800 New India Centre 7 th Floor 17/A Kuprej Road Mumbai - 039
Mumbai
Maharashtra
2. Kabal Insurance Broking Services Ltd. through Shri Sandip Vishnupant Khairnar
Smurti Building 2 nd Floor Plot No. 375 Gandhinagar, North Ambazari Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:Shri Uday Kshirsagar , Advocate for the Complainant 1
 Lalit Limaye, Advocate for the Opp. Party 1
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री  मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष. )

(पारीत दिनांक 09 मे, 2014)

1.    तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे   कलम-12 अन्‍वये त्‍याची पत्‍नी मृतक विमाधारक शेतकरी श्रीमती इंदुबाई दादाराव साखरकर हिचे अपघाती मृत्‍यू संबधाने पती या नात्‍याने व कायदेशीर वारसदार म्‍हणून शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा रक्‍कम  मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

 

2.    तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

       तक्रारकर्ता हा मृतक विमाधारक शेतकरी श्रीमती इंदुबाई दादाराव साखरकर हिचा पती आहे. मृतक श्रीमती इंदुबाई दादाराव साखरकर हिचे मालकीची मौजा तातोली, तालुका भिवापूर जिल्‍हा नागपूर येथे शेती असून तिचा सर्व्‍हे क्रं- 40 असा आहे.  ती व्‍यवसायाने शेतकरी होती आणि शेतीतील उत्‍पन्‍नावर आपले कुटूंबाचे पालनपोषण करीत होती.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं-1            दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्‍ट्र शासना तर्फे तालुका कृषी अधिकारी, भिवापूर तालुका भिवापूर जिल्‍हा नागपूर यांचे मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड ही  शेतक-यांचे अपघात विमा दाव्‍यांची छाननी करुन विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष  क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यासाठी नियुक्‍त केलेली सल्‍लागार कंपनी आहे.

      तक्रारकर्ता श्री दादाराव साखरकर याची पत्‍नी श्रीमती इंदूबाई दादाराव साखरकर ही दि.30.07.2012 रोजी घरात स्‍वयंपाक करीत असताना विषारी सर्पदंशामुळे विषबाधा होऊन उपचारा दरम्‍यान मृत्‍यू पावली. त्‍याची मृतक पत्‍नी   श्रीमती इंदुबाई हिचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे तालुका कृषी अधिकारी, भिवापूर, तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर  यांचे  मार्फतीने  आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव दि.21.09.2012 रोजी

 

 

सादर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.27.05.2013 रोजीचे पत्राव्‍दारे  विमा दावा मृत्‍यू प्रमाणपत्र सादर न केल्‍याचे दर्शवून फेटाळला व तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली. वस्‍तुतः तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सर्व दस्‍तऐवज वेळेत सादर केलेत. विमा दावा फेटाळण्‍यापूर्वी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस आवश्‍यक असलेल्‍या दस्‍तऐवजांची मागणी विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडे वा तक्रारकर्त्‍याकडे करता आली असती परंतु तशी मागणी न करता विमा दावा फेटाळण्‍यात आलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍यास शारिरीक मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

      म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे शेतकरी अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्षाकडे विमा प्रस्‍ताव सादर केल्‍याचे दिनांका पासून म्‍हणजे दि.21.09.2012 पासून द.सा.द.शे.18% व्‍याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई  रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून  रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

03.     विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर दाखल करुन, तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद केलेली विधाने जसे त्‍याची मृतक पत्‍नी श्रीमती इंदुबाई ही शेतकरी होती, अपघात विमा योजने अंतर्गत तिचा विमा काढला होता या बाबी विशेषत्‍वाने नाकबुल केल्‍यात. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केल्‍याची बाब मान्‍य आहे परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांनी दस्‍तऐवजांची योग्‍य शहानिशा न करता विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी श्रीमती इंदुबाई साखरकर ही स्‍वयंपाक घरात काम करीता असताना विषारी सर्प दंशाने दि.30.07.2012 रोजी मृत्‍यू पावल्‍याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्तीचे पत्‍नीने योग्‍य ती काळजी घेतली नाही आणि त्‍यामुळे सर्पदंशाने झालेल्‍या मृत्‍यूस तिच स्‍वतः जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे पत्‍नीचे सर्पदंशा संबधाने वैद्दकीय उपचाराचे

बिल विरुध्‍दपक्ष क्रं 1‍ विमा कंपनीकडे सादर केले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा त्‍यांचे दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये मृत्‍यू प्रमाणपत्र, गाव नमुना-6 क आणि अन्‍य कायदेशीर वारसदारांचे ना-हरकत-प्रमाणपत्र सादर न केल्‍याचे कारणावरुन फेटाळला. तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍या सोबत आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांची पुर्तता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे केली होती ही बाब नाकबुल आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस

 

 

यांना पत्र पाठवून दस्‍तऐवजांची मागणी केली होती परंतु तक्रारकर्ता व  वि.प.क्रं 2 यांनी दस्‍तऐवजांची पुर्तता केली नाही. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी विषारी सर्प दंशाने मृत्‍यू पावल्‍या बाबतचा पुरावा  दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीस लाकडाच्‍या काडया वेचताना सर्प दंश झाला आणि यासाठी तिच स्‍वतः जबाबदार आहे कारण त्‍यावेळी तिने योग्‍य ती काळजी घेतली नव्‍हती. तक्रारकर्त्‍याने पत्‍नीचे मृत्‍यू संबधाने रासायनिक विश्‍लेषण अहवाल सादर केलेला नाही. जेंव्‍हा की शासन परिपत्रका प्रमाणे सर्पदंशाने मृत्‍यू झाल्‍यास रासायनिक विश्‍लेषण (Chemical Analysis) अहवाल सादर करणे आवश्‍यक आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

      वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, यातील मृतकाचा मृत्‍यू हा दि.30.07.2012 रोजी झालेला आहे. पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार पॉलिसीचा कालावधी संपल्‍या नंतर 90 दिवसांचे आत विमा दावा सादर करणे आवश्‍यक होते परंतु तक्रारकर्त्‍याने विमा दावा  तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दि.21.09.2012 रोजी उशिराने सादर केला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास मागणी केलेले दस्‍तऐवज सादर करण्‍यास योग्‍य तो कालावधी दिला परंतु तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवजांची पुर्तता केली नाही. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने योग्‍य कारणास्‍तव विमा दावा फेटाळला असल्‍यामुळे त्‍यांनी  कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याने तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती केली.

 

04.     वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांनी लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांचे म्‍हणण्‍या नुसार, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्‍यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्‍यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्‍यामुळे विमा दाव्‍या संबधाने कोणतीही रक्‍कम देण्‍याची त्‍यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्‍या म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ त्‍यांनी मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रायव्‍हेट लिमिटेड विरुध्‍द-             श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्‍के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्‍ये                   वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे विरुध्‍द             शेतक-यास अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्‍हणून वि.प.क्रं 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्‍यांनी केली.

 

 

 

 

 

 

      विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक विमाधारक शेतकरी श्रीमती इंदुबाई दादाराव साखरकर, राहणार मुक्‍काम सेलोटी, पोस्‍ट मेंढा, तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर हिचा अपघाती मृत्‍यू दि.30.07.2012  रोजी झाला. सदर विमा प्रस्‍ताव हा जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर मार्फतीने  त्‍यांना दि. 06.11.2012 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी पुढे तो विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला असता विमा कंपनीने   दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये, दि.28.01.2013 रोजीचे पत्रा नुसार मागणी केलेले दस्‍तऐवज गाव नमुना-6 क व मृत्‍यू दाखल्‍याची पुर्तता न केल्‍याचे कारणा वरुन विमा प्रस्‍ताव नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले.

 

05.      तक्रारकर्त्‍याने निशाणी क्रं 02 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या               प्रती  सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये  शेतकरी अपघात विमा योजना शासन         निर्णय, विमा दावा प्रस्‍ताव, वि.प. क्रं 1 विमा कंपनीचे विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र, तक्रारकर्त्‍याचे मृतक पत्‍नीचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना 8-अ, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे शेताचे फेरफार पत्रक, तलाठी मेंढा यांचे प्रमाणपत्र, तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू संबधाने आकस्‍मीक‍ मृत्‍यू खबर, घटनास्‍थळ पंचनामा,इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, तक्रारकर्त्‍याच्‍या मुलांचे संमतीपत्र  इत्‍यादी प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने शपथपत्र दाखल केले तसेच लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

06.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. लेखी युक्‍तीवाद सादर केला. अन्‍य दस्‍तऐवज दाखल केले नाहीत.

07.    वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस तर्फे शेतकरी अपघात विमा योजना परिपत्रक,  मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा नाकारल्‍याचे पत्राची प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

08.     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री क्षिरसागर  आणि  वि.प. क्रं 1 विमा कंपनी तर्फे  वकील श्री लिमये यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

09.    तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्‍पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्‍यात आले.

 

           मुद्दा                                 उत्‍तर

(1)    वि.प.क्रं 1 विमा कंपनीने,

       तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर

       करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................... होय.

(2)    काय आदेश?.....................................................तक्रार अंशतः मंजूर.

 

::  कारण मिमांसा व निष्‍कर्ष    ::

मुद्दा क्रं-1 व 2-

10.    मृतक श्रीमती इंदुबाई साखरकर हिचा सर्पदंशाने अपघाती मृत्‍यू    झाल्‍या  बाबत-

       प्रकरणातील दाखल पोलीस घटनास्‍थळ पंचनाम्‍याचे प्रतीवरुन तक्रारकर्त्‍याची पत्‍नी श्रीमती इंदुबाई ही दि.30.07.2012 रोजी सकाळी 09.00 वाजताचे सुमारास आपले घरी स्‍वयंपाक करीत असताना चुलीमध्‍ये लावण्‍या करीता काडया घेण्‍यास गेली असता काडया मधून सर्प  निघून तिचे उजवे हाताचे मनगटाला चावल्‍याने तिला प्रथम ग्रामीण रुग्‍णालय उमरेड येथे वैद्दकीय उपचारार्थ नेले व तेथील डॉक्‍टरांनी रेफर केल्‍याने वैद्दकीय महाविद्दालय नागपूर येथे नेले व उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. मरणान्‍वेषण इतिवृत्‍तामध्‍ये सुध्‍दा उजव्‍या हाताच्‍या मनगटा जवळ पंज्‍याच्‍या वर सापाने चावा घेतल्‍याचे निशाण आढळल्‍याचे नमुद आहे. रासायनिक विभाग शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांचे दि.30.07.2012 रोजीचे शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये मृत्‍यूचे कारण “Death due to snake bite” असे नमुद आहे. तसेच सदर शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये “Viscera not preserved” असे नमुद आहे. ग्राम पंचायत, सेलोटी यांनी दिलेल्‍या मृत्‍यूचे दाखल्‍यामध्‍ये                श्रीमती इंदुबाई दादाराव साखरकर हिचा मृत्‍यू दि.30.07.2012 रोजी झाल्‍याचे नमुद आहे. या सर्व पोलीस आणि वैद्दकीय दस्‍तऐवजांवरुन मृतक श्रीमती इंदुबाई हिचा सर्पदंशाने मृत्‍यू झाल्‍याची बाब पूर्णतः सिध्‍द होते.  

 

11.      मृतक श्रीमती इंदुबाई साखरकर हिचे नावाने अपघाती मृत्‍यूचे वेळी शेतीची मालकी असल्‍या बाबत-

      प्रकरणातील  मृतकाचे नावे उपलब्‍ध शेतीचे दस्‍तऐवज 7/12 उतारा प्रती वरुन मृतक श्रीमती इंदुबाई हिचे नावाने मौजा तातोली, तलाठी साझा           क्रं 89 तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर येथे 0.67 हेक्‍टर आर शेती असल्‍याचे

 

 

 

दिसून येते. गाव नमुना-8 अ मध्‍ये सुध्‍दा मृतकाचे नावे मौजा तातोली, तालुका भिवापूर येथे  0.67 हेक्‍टर आर एवढया शेतीची नोंद आहे. फेरफार नोंदवहीमध्‍ये  गट नं.40, आराजी 0.67 हेक्‍टर आर एवढी शेती मृतक इंदुबाई साखरकर हिने नागो दादाजी ढोरे, रा. तातोली यांचे कडून दि.30.06.2003 रोजी विकत घेतल्‍याची नोंद फेरफार क्रं 246 दि.17.07.2003 अन्‍वये  घेतल्‍याचे दिसून येते. या सर्व उपलब्‍ध शेती विषयक दस्‍तऐवजां वरुन मृतक श्रीमती इंदुबाई साखरकर ही अपघाचे वेळी शेतकरी होती ही बाब सिध्‍द होते.  मृतकाचा तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने शेतकरी अपघात विमा योजना सन-2011-12 कालावधी दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते 14 ऑगस्‍ट, 2012 अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढला होता या बाबी प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजां वरुन सिध्‍द होतात.

12.     तक्रारकर्त्‍याने शेतकरी अपघात विमा दाव्‍या संबधीचे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने मागणी केलेले दस्‍तऐवज विमा पॉलिसी संपल्‍याचा दि.14ऑगस्‍ट, 2012  पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पर्यंत सादर न केल्‍याचे कारणा वरुन विमा दावा देय नसल्‍या बाबत.

        विरुध्‍दपक्ष क्रं 1 ( यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी म्‍हणजे दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक,                    विभागीय कार्यालय, मुंबई असे समजण्‍यात यावे ) विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा फेटाळल्‍याचे दि.27 मे, 2013 रोजीचे पत्र विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांनी दाखल केले. सदर पत्रामध्‍ये  विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून प्राप्‍त विमा दावा प्रस्‍तावा सोबतचे दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये  गाव नमुना-6 क आणि मृत्‍यू प्रमाणपत्र जोडले नसल्‍याने व त्‍या संबधाने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.28.01.2013 रोजीचे पत्रान्‍वये सदर दस्‍तऐवजाची मागणी करुनही पॉलिसी कालावधी संपल्‍याचा दि.14 ऑगस्‍ट, 2012 पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पर्यंत पुर्तता न झाल्‍यामुळे विमा क्‍लेम देय नसल्‍याचे नमुद आहे.

      या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, मृतक श्रीमती इंदुबाई हिचा अपघाती मृत्‍यू हा दि.30.07.2012 रोजी झालेला आहे.  तिचे अपघाती मृत्‍यू संबधाने सर्वप्रथम शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह तक्रारकर्त्‍याने दि.21.09.2012 रोजी तालुका कृषी अधिकारी, भिवापूर, तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर यांचेकडे दाखल केल्‍याचे पत्रा वरील पोच वरुन दिसून येते. यावरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याने विहित मुदतीत विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह तालुका कृषी

 

 

 

अधिका-यांकडे सादर केलेला आहे. तसेच विमा दाव्‍या सोबत सातबारा उतारा प्रत, गावनमुना 8-अ, फेरफार नोंदवही, तलाठी प्रमाणपत्र, आकस्‍मीक मृत्‍यू खबर, घटनास्‍थळ पंचनामा, मरणान्‍वेषण इतिवृत्‍त, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, मुलांचे तक्रारकर्त्‍याचे नावाचे संमतीपत्र आवश्‍यक दस्‍तऐवज जोडल्‍याचे दिसून येते.

        या संदर्भात तक्रारकर्त्‍याने महाराष्‍ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग शासन निर्णय क्रं शेअवि-2011/प्र.क्रं 94/11-ए मंत्रालय विस्‍तार, मुंबई -400032 दि.08 ऑगस्‍ट, 2011 रोजीचे शासन निर्णयावर आपली भिस्‍त ठेवली.

         सदर शासन निर्णयातील परिच्‍छेद क्रं 7 मध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह ज्‍या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल/प्राप्‍त होईल, त्‍या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्‍त झालेला आहे असे समजण्‍यात येईल

         तसेच सदर शासन निर्णयातील परिच्‍छेद क्रं 8 मध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

        विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्‍या नंतर 90 दिवसा पर्यंत तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक रा‍हील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर

प्राप्‍त होणारे विमा प्रस्‍ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्‍ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत या कारणास्‍तव विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत.

          मंचाचे मते उपरोक्‍त नमुद शासन निर्णया वरुन स्‍वयंस्‍पष्‍ट आहे की, प्रस्‍ताव दाखल करण्‍यास समर्थनीय कारण असेल तर केवळ विहित मुदतीत प्रस्‍ताव सादर केले नाही या कारणावरुन विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा प्रस्‍ताव उशिरा सादर केल्‍याचे कारणा वरुन विमा दावा नाकारणे ही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची सेवेतील त्रृटी आहे.

      विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस नागपूर यांचे लेखी उत्‍तरा नुसार  त्‍यांना मृतक विमाधारक शेतकरी श्रीमती इंदुबाई हिचे अपघाती मृत्‍यू संबधीचा विमा प्रस्‍ताव हा जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर मार्फतीने दि. 06.11.2012 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतर विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला होता.

 

        वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दि.27 मे, 2013 चे पत्रात एकीकडे नमुद आहे की, 14 नोव्‍हेंबर, 2012 पर्यंत मागणी केलेले दस्‍तऐवज न पुरविल्‍यामुळे विमा दावा नामंजूर करण्‍यात आला आणि त्‍याच पत्रात दुसरीकडे असे नमुद आहे की, त्‍यांचे दि.28.01.2013 रोजीचे पत्रा नुसार मागणी केलेल्‍या दस्‍तऐवजांची पुर्तता न झाल्‍यामुळे विमा क्‍लेम नामंजूर करण्‍यात आला. तसेच दि.27 मे, 2013 रोजीचे पत्रा सोबत दि.28.01.2013 रोजीचे मागणी पत्राची प्रत संलग्‍न करण्‍यात आल्‍याचे नमुद आहे परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं 2 यांनी दि.28.01.2013 रोजीचे पत्राची प्रत दाखल केली नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दस्‍तऐवजाची मागणी करणारे दि.28.01.2013 रोजीचे पत्र नेमके कोणास दिले याचाही बोध होत नाही. कारण विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा फेटाळल्‍याचे दि.27 मे, 2013 रोजीचे पत्र हे कृषी आयुक्‍त, पुणे यांना दिलेले असून पत्राची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना दिल्‍याचे दिसून येते. थोडक्‍यात विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दस्‍तऐवज मागणी पासून ते विमा दावा फेटाळल्‍या पर्यंतचा पत्रव्‍यवहार हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेशीच केल्‍याचे दिसून येते. वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने प्रत्‍यक्षात तक्रारकर्त्‍याकडे दस्‍तऐवजाची मागणी केल्‍याचा कोणताही पुरावा जोडलेला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे मार्फतीने जर दस्‍तऐवजाची पुर्तता झाली नसेल तर त्‍यास तक्रारकर्ता हा जबाबदार राहू शकणार नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स यांनी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याकडे दस्‍तऐवज मागणी केल्‍या बाबतचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍या संबधी पत्रव्‍यवहार करताना पत्राची प्रत संबधित तक्रारकर्ता यांना देणे आवश्‍यक आहे परंतु तसे या प्रकरणात झालेले दिसून येत नाही.  

       मंचा तर्फे विशेषत्‍वाने येथे नमुद करण्‍यात येते की, मृतकाचा सर्पदंशाने अपघाती मृत्‍यू संबधी शवविच्‍छेदन अहवाल तसेच मृतकाचे शेतीचे मालकी हक्‍का संबधाने 7/12 उतारा, फेरफार नोंद, गाव नमुना-8-अ दस्‍तऐवज जोडलेले असताना केवळ गाव नमुना-6 क व मृत्‍यू प्रमाणपत्रासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला आहे.  वस्‍तुतः गाव नमुना-6-क हे सहाय्यकारी दस्‍तऐवज आहे. विमा योजने नुसार मृतक हा शेतकरी व त्‍याचा अपघाती मृत्‍यू या दोनच बाबी सिध्‍द होणे आवश्‍यक आहे. तसेच सदरचे दस्‍तऐवज सादर करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास संधी दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा मंचा समक्ष विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सादर केलेला नाही. म्‍हणून वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिली असे मंचाचे मत आहे. 

 

 

 

 

 

 

13.   प्रकरणातील दाखल पोलीस घटनास्‍थळ पंचनामा,  मरणान्‍वेषण इतिवृत्‍त,  शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांचे दि.30.07.2012 रोजीचे शवविच्‍छेदन अहवाल यावरुन मृतक श्रीमती इंदुबाई साखरकर यांचे मृत्‍यूचे कारण “Death due to snake bite” सर्पदंशाने मृत्‍यू असल्‍याचे सिध्‍द होते. ग्राम पंचायत, सेलोटी यांनी दिलेल्‍या मृत्‍यूचे दाखल्‍यामध्‍ये श्रीमती इंदुबाई दादाराव साखरकर हिचा मृत्‍यू दि.30.07.2012 रोजी झाल्‍याचे नमुद आहे.

      प्रकरणातील  मृतकाचे नावे उपलब्‍ध शेतीचे दस्‍तऐवज 7/12 उतारा प्रती वरुन मृतक श्रीमती इंदुबाई हिचे नावाने मौजा तातोली, तलाठी साझा क्रं 89 तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर येथे 0.67 हेक्‍टर आर शेती असल्‍याचे दिसून येते.  गाव नमुना-8 अ मध्‍ये सुध्‍दा मृतकाचे नावे मौजा तातोली, तालुका भिवापूर येथे  0.67 हेक्‍टर आर एवढया शेतीची नोंद आहे. फेरफार नोंदवहीमध्‍ये  गट नं.40, आराजी 0.67 हेक्‍टर आर एवढी शेती मृतक इंदुबाई साखरकर हिने नागो दादाजी ढोरे, रा. तातोली यांचे कडून दि.30.06.2003 रोजी विकत घेतल्‍याची नोंद फेरफार क्रं 246 दि.17.07.2003 रोजी  घेतल्‍याचे दिसून येते. या सर्व उपलब्‍ध शेती विषयक दस्‍तऐवजां वरुन मृतक श्रीमती इंदुबाई साखरकर ही अपघाचे वेळी शेतकरी होती ही बाब सिध्‍द होते.

 

14.  तक्रारकर्त्‍याने खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्‍त ठेवली आहे. 

 

(1)                   I (2009) CPJ 147

           Hon’ble Maharashtra State Commission, Mumbai

           National Insurance Co.Ltd.-V/s- Asha Jamdar Prasad

 

        प्रस्‍तुत अपिलीय प्रकरणात आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग,महाराष्‍ट्र  मुंबई यांनी विमा दावा हा विलंबाचे कारणावरुन फेटाळण्‍यात आला परंतु विमा दावा दाखल करण्‍यास जो विलंब झालेला आहे, तो का झाला? हे विशद करण्‍याची  संधी  मृतकाचे विधवा  पत्‍नीला दिल्‍या गेलेली नाही आणि तसेही

मृतकाचे मृत्‍यूचे धक्‍क्‍यातून सावरल्‍या नंतर त्‍याचे विधवा पत्‍नीने विमा दावा सादर केल्‍याचे कारण दर्शवून विमा कंपनीचे अपिल खारीज करुन मंचाचा विमा दावा देण्‍याचा निर्णय कायम ठेवला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

(2)                               I (2013) CPJ 115

                 Hon’ble Chhattisgarh State Consumer Disputes Redressal   

            Commission Raipur

                 Ramayanvati –V/s- Oriential  Insurance Company Ltd.

 

           उपरोक्‍त नमुद प्रकरणातील विमा क्‍लेम हा ग्रुप जनता पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी अंतर्गत मृत्‍यू दाव्‍या संबधीचा आहे. विमा क्‍लेम हा घटना घडल्‍या पासून पंधरा दिवसाचे आत करणे आवश्‍यक होते. परंतु तो सादर करण्‍यासाठी 03 वर्षाचा उशिर झाल्‍यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात आली होती म्‍हणून अपिल करण्‍यात आले होते. अपिलीय आदेशात मा.आयोगाने सदर तक्रारकर्ती ही अशिक्षीत स्‍त्री असून, पॉलिसीचे अस्तित्‍वा बद्दल तिला कल्‍पना नव्‍हती. तक्रारकर्त्‍याचे मृतक पती ज्‍या ठिकाणी नौकरीस होते तेथील मालकाने पॉलिसी बद्दल माहिती देणे

बंधनकारक होते असे नमुद केलेले आहे.

       आमचे समोरील प्रस्‍तुत तक्रार प्रकरणात उपरोक्‍त नमुद मा.आयोगाचा सदर निर्णय लागू पडतो.

 

15.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता, तक्रारकर्ता हा              मृतक विमाधारकाचा पती  आणि  कायदेशीर वारसदार या नात्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम  रुपये-1,00,000/- त्‍यावर तक्रार दाखल दिनांका पासून म्‍हणजे दि.27.08.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याज यासह मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी कडून शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/- मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याच्‍या जबाबदारीतून मुक्‍त करण्‍यात येते. म्‍हणून मुद्दा क्रं 1 व 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                    ::आदेश::

तक्रारकर्त्‍याची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात

येते.

1)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी  

      तक्रारकर्त्‍यास त्‍याचे पत्‍नीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी

      व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रुपये-1,00,000/-

      (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त ) दिनांक-27.08.2013 पासून रकमेच्‍या

      प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9%  दराने व्‍याजासह द्दावी.

 

 

2)    तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या  शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल

      रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा

      बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा

      कंपनीने तक्रारकर्त्‍यास द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 यांना प्रस्‍तुत तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर

      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

             

 

     

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.