जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 11/2016 तक्रार नोंदणी दि. :-17/2/2016
तक्रार निकाली दि. :- 23/09/2016
निकाल कालावधी :- 7 म.6 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- कु.कल्पना गोविंद मंडल,
वय 19 वर्षे, धंदा-शिक्षण,
रा.चितरंजनपूर, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.130800, न्यु इंडिया
सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,
मुंबई-400 001.
(2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स,
नागपूर-440018.
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री प्रमोद बोरावार व अन्य
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
( मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य )
(पारीत दिनांक : 23 सप्टेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे वडील शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्तीचे वडील कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे वडील श्री. गोविंद जोगेंद्र मंडल हे दि.7.10.2012 रोजी इलेक्ट्रीक करंट लागल्याने जागीच मृत्यु पावले. शासनातर्फे तक्रारकर्तीच्या वडीलांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचे वडील शेतकरी असल्याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होती. अपघातात मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत दि.20.7.2015 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. गैरअर्जदार क्र.1 ने दि.23.9.2015 रोजी पञ पाठवून अपघातग्रस्ताचा 6ड, घटनास्थळ पंचनामा, व्हिसेरा रिपोर्ट व पुर्ण शल्यविश्लेषक अहवाल इत्यादी कागदपत्रे न दिल्याचे कळविले. अर्जदाराने सदर दस्तऐवज व दावा उशिरा पाठवल्याचे खुलासा दि.30.11.2015 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडे दिला, परंतु, गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवला. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.20.7.2015 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 12 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.19 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.21 नुसार गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेल्या लेखी उत्तरास गैरअर्जदार क्र.2 चे लेखी उत्तर समजण्यात यावे, अशी पुरसिस दाखल केली. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.12 प्रमाणे लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.19 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, अर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजानुसार अर्जदाराव्यतिरिक्त इतरही गैरअर्जदार क्र.1 ने असे कथन केले आहे की, एफ.आय.आर अहवालानुसार मय्यत हा अवैध आणि गुन्हेगारी कारवायामध्ये सहभागी होता. मय्यत हा इलेट्रीक वायर लावून वन्य प्राण्यांची शिकार करीत होता. तो शेतीची कामे करीत नव्हता. शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना अंतर्गत गैरअर्जदार क्र.1 ला इंशुरन्स कंपनी शासन निर्णय दि. 9.8.2012 नुसार नियुक्त केले होते. अर्जदाराचा दावा हा मुदतबाहय असून अर्जदाराने त्याबाबत कोणतेही सबळ कारण अर्जासोबत दिलेले नाही. जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांचे दिनांक 11.9.2015 चे पत्र स्वयंस्पष्ट आहे. तसेच, अर्जदार यांनी तक्रारीमध्ये इतर कायदेशिर वारस यांना आवश्यक पार्टी म्हणून दाखल केलेले नाही. सबब, अर्जदाराचे कथन खारीज करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
4. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, मय्यत गोविंद जागेंद्र मंडल यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा मिळणेसाठी अर्ज व दावा प्रस्ताव दि.20.7.2015 रोजी दाखल केला होता, तो प्रस्ताव दिनांक 21.7.2015 रोजी वरीष्ठ कार्यालय मा.जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी गडचिरोली यांचेकडे सादर केला होता. मा.जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी गडचिरोली यांनी प्रस्तावाची तपासणी करुन दिनांक 5.12.2015 अन्वये प्रस्तावात त्रृटी असल्याने आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती, परंतु, अर्जदार यांनी पुनःश्च प्रस्ताव सादर केलेला नाही.
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराच्या वडीलांच्या नावाने शेती असल्यामुळे व शासनातर्फे सर्व शेतक-यांसाठी ‘’शेतकरी जनता अपघात विमा’’ काढण्यात आल्यामुळे, अर्जदार ही सदर योजनेची लाभार्थी आहे म्हणून, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. शासनातर्फे ‘’शेतकरी जनता अपघात विमा’’ प्रत्येक शेतक-यांसाठी काढण्यात आलेला असल्यामुळे व शेतक-यांच्या अपघाती मृत्युनंतर त्याचे वारसान हे योजनेचे लाभार्थी आहे.
गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, सदर अपघात हा शेतात डुकरासाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारेला हात लावल्यामुळे झाला व सदर कृत्य हे फौजदारी गुन्हा असल्यामुळे अर्जदार सदर योजनेसाठी पात्र नाही, हे गृहीत धरण्यासारखे नाही. कारण एफ.आय.आर. मध्ये हे स्पष्ट नाही की, विद्युत तार त्याने लावले होते किंवा त्याला विद्युत तारेमध्ये करंट असल्याची माहिती होती. जर सदर कृत्य त्याने केले असते तर त्याने विद्युत तारेला हात लावला नसता व त्याचा मृत्यु झाला नसता. म्हणून त्याचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे, असे दिसून येते. तसेच, अर्जदाराचे विमा दाव्याकरीता कोणत्या कारणाने फेटाळला आहे असे कुठलेही पत्र गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास दिलेले नाही. उलट त्यांच्या वतीने अर्जदारातर्फे कागदपत्राची मागणी करण्यात आलेली असून गैरअर्जदार क्र.3 तर्फे तसे पत्र अर्जदारास मिळाले आहे व अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 च्या मागणीनुसार सर्व दस्तऐवज दिलेले आहे.
गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, अर्जदाराने वेळेवर दावा दाखल केलेला नाही, हेही गृहीत धरण्यासारखे नाही कारण, शासनाच्या सदर योजनेबाबत जी माहिती अर्जदारास मिळावयास पाहिजे होती, ती अर्जदारास मिळाली नसल्यामुळे व अर्जदार हे गडचिरोली सारख्या दुर्गम भागात असणारे व अशिक्षित असल्यामुळे, त्यांना याबाबत कल्पना नसावी व शासनातर्फे योजनेबाबतची माहिती देण्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे अर्जदार वेळेवर अर्ज करु शकली नसावी. या कारणाने अर्जदाराचा दावा फेटाळणे चुकीचे आहे. म्हणून हे मंच मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. उपरोक्त विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश देण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- दिनांक 20.7.2015 पासून, द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह,
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 23.9.2016.
(सादिक मो.झवेरी) ( रोझा फु.खोब्रागडे )
सदस्य अध्यक्ष (प्र.)