Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/15/95

Smt Rekha Chandrabhan Nimkar - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Ltd. & Other - Opp.Party(s)

Shri Uday Kshirsagar

19 Jun 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/15/95
 
1. Smt Rekha Chandrabhan Nimkar
occ. Housewife R/o Post Aroli Tah Mouda
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Company Ltd. & Other
Divisional Office No. 130800 New India Centre 7 th Floor 17-A Kuprej Road Mumbai- 01
Mumbai
Maharashtra
2. The New India Insurance Company Ltd through its Divisional Manager
Dr. Ambedkar Bhavan M E C LComplex Seminary Hills Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari Mouda
Tah Mouda
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:Shri Uday Kshirsagar, Advocate
For the Opp. Party:
Dated : 19 Jun 2017
Final Order / Judgement

                                                                                     निकालपत्र

      (पारित व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या.)

  (पारित दिनांक-19 जुन, 2017)

 

01.  तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये मंचासमक्ष दाखल करुन तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा राशी मिळावी या मुख्‍य मागणीसह दाखल केली.

 

02.    तक्रारकर्तीची थोडक्‍यात तक्रार खालील प्रमाणे-

       तक्रारकर्तीचे पती श्री चंद्रभान भाऊराव निमकर यांचे मालकीची मौजा आरोली, तालुका मौदा, जिल्‍हा नागपूर येथे भूमापन क्रं-28 शेती होती व ते शेती करुन कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत  होते. तक्रारकर्तीचे पती हे दिनांक-15/12/2011 रोजी आपल्‍या शेतात किटकनाशकची फवारणी करताना नाका आणि तोंडाव्‍दारे किटकनाशकाचा अंश गेल्‍याने विषबाधेने उपचारा दरम्‍यान दिनांक-16/12/2011 रोजी त्‍यांचा मृत्‍यू झाला. तिने तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी, मौदा, जिल्‍हा नागपूर यांचेकडे विमा दावा अर्ज दिनांक-13/03/2012 रोजी आवश्‍यक दस्‍तऐवजांसह सादर केला व पुढे मागणीनुसार वेळोवेळी दस्‍तऐवजांची पुर्तता केली.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-15/04/2014 रोजीचे पत्रान्‍वये तिचा विमा दावा व्‍हीसेरा रिपोर्ट मध्‍ये मृतकाच्‍या शरिरात विष आढळून आले नाही या करणास्‍तव नामंजूर केला. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षानीं तिला दोषपूर्ण  सेवा दिलेली  आहे.

        म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्षां विरुध्‍द मागणी केली की, तिला विमा दावा रक्‍कम                  रुपये-1,00,000/- दिनांक-13/03/2012 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचे तसेच झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानी बद्दल रुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-15,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे एकत्रित लेखी उत्‍तर नि.क्रं-10 प्रमाणे अभिलेखावर सादर करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीने ग्राहक मंचाची दिशाभूल करुन बेकायदेशीर लाभ मिळविण्‍यासाठी ही तक्रार दाखल केली आहे. महाराष्‍ट्र शासन आणि विरुध्‍दपक्ष कंपनी यांचेतील त्रिपक्षीय करारा प्रमाणे शेतक-यांसाठी अपघात विमा योजना राबविली होती आणि तिचा कलावधी हा दिनांक-15.08.2011 ते दिनांक-14/08/2012 असा होता.

        विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, दस्‍तऐवजांचे सखोल अवलोकन केल्‍या नंतर असे आढळून आले की,मृतकाच्‍या शरिरात कोणतेही विष आढळून आले नही. तसेच शवविच्‍छेदन अहवाल आणि रासायनिक अहवालातही मृतक विषबाधेने मृत्‍यू पावला असे कारण नमुद केलेले नाही, त्‍या संबधाने तक्रारकर्तीने कोणताही पुरावा सादर केलेला नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-15.05.2014 रोजीचे पत्रान्‍वये तिचा विमा दावा नामंजूर करुन फाईल बंद केली. तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार ही खोटी आणि मुदतबाहय आहे म्‍हणून ती दंडासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

04.    विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, मौदा यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर नि.क्रं-9 प्रमाणे सादर केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक-16/12/2011 रोजी मृत्‍यू झाला आणि तिने विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयात दिनांक-13/02/2012 रोजी सादर केला व त्‍यांनी तपासून तो प्रस्‍ताव पुढे दिनांक-19.04.2012 रोजी जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात सादर केला. त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिलेली नसल्‍याने त्‍यांना या प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात यावे, अशी विनंती केली.

   

 

05.  तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत दस्‍तऐवजाच्‍या प्रती सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये विमा दावा फेटाळल्‍या बाबतचे पत्र, विरुध्‍दपक्ष क्रं 3 कडे सादर केलेल्‍या विम्‍या दाव्‍याची प्रत, मृतकाचे नावाचा 7/12 चा उतारा, गवनमुना 8-अ, फेरफारपत्रक, गाव नमुना-6-क, आकस्‍मीक मृत्‍यू खबर व इतर पोलीस दस्‍तऐवज, शवविच्‍छेदन अहवाल, रासायनिक विश्‍लेषण अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे शपथपत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतींचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीने ग्राहक मंच दक्षीण मुंबई येथे दाखल केलेली तक्रार मागे घेतल्‍या बाबत ग्राहक मंचाचे आदेशाची प्रत तसेच तक्रारकर्तीने तक्रार मागे घेण्‍या बाबत केलेल्‍या अर्जाची प्रत दाखल केली. तसेच आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी अपिल क्रं-A/06/231- THE BRANCH MANAGER, UNITED INDIA INSURANCE COMPANY LTD.-VERSUS-SMT. SUBHADRABAI SAHEBRAO GAIKE+01  मध्‍ये पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली. तसेच लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

06.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) क्रं-2)  दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी तर्फे लेखी उत्‍तरा सोबत तक्रारकर्तीने दक्षीण मुंबई ग्राहक मंचात दाखल केलेल्‍या तक्रारीची प्रत दाखल केली.

 

 

07.   तक्रारकर्तीची तक्रार, लेखी दस्‍तऐवज आणि विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीचे  लेखी उत्‍तर, विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे उत्‍तर व दाखल दस्‍तऐवज तसेच उभय पक्षांचे अधिवक्‍ता यांचा युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

::निष्‍कर्ष::

 

08.   तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या गाव नमुना 7/12 वर्ष-2010-2011 चे उता-याचे प्रतीवरुन गाव अरोली, तालुका मौदा, जिल्‍हा नागपूर येथील भूमापन क्रं-28 या शेतीचे मालकी हक्‍का मध्‍ये तक्रारकर्तीचे मृतक पती  श्री चंद्रभान भाऊराव निमकर यांचे नावाची नोंद आहे, तसेच इतरही शेतीचे दस्‍तऐवज गावनमुना-8-अ, फेरफारपत्रक,गावनमुना-6क यावरुनही मृतकाचे नावे शेती असल्‍याची नोंद आहे त्‍यामुळे तक्रारकर्तीचे पती हे अपघाताचे वेळी शेतकरी होते, ही बाब सिध्‍द होते.

 

09.  तक्रारकर्ती तर्फे दाखल पोलीस दस्‍तऐवज ज्‍यामध्‍ये मरणान्‍वेशन इतिवृत्‍ता मध्‍ये मृतक श्री चंद्रभान निमकर हा  शेतात फवारणी करीत असता पोटात विषारी औषध जाऊन उपचारा दरम्‍यान मृत्‍यू असे पोलीस स्‍टेशन अधिकारी, अरोली यांनी नमुद केलेले आहे. तसेच घटनास्‍थळ पंचनाम्‍या मध्‍ये सुध्‍दा मृतक श्री चंद्रभान निमकर याचा विषारी औषध पोटात गेल्‍याने मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये  “Opinion reserved pending for chemical analysis report and gastric lavage report” असे नमुद केलेले आहे. शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांनी दिलेल्‍या मृत्‍यू प्रमाणपत्रात  मृतक श्री चंद्रभान निमकर याचा “Insecticidal poisoning”  मुळे मृत्‍यू झाल्‍याचे   नमुद केलेले आहे.

 

10.     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा मुख्‍य विवाद असा आहे की, व्‍हीसेरा रिपोर्ट मध्‍ये मृतकाचे शरीरात विष आढळून आलेले नाही, त्‍यामुळे अपघाती विमा दावा मंजूर होण्‍यास पात्र नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे जे दिनांक-15.05.2014 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीला पाठविण्‍यात आले आहे त्‍यामध्‍ये व्‍हीसेरा रिपोर्ट मध्‍ये मृतकाच्‍या शरिरात विष आढळून आलेले नाही त्‍यामुळे हा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे. किटक नाशकाच्‍या फवारणीचे अंश दिसून आले नाही असे नमुद केलेले आहे, त्‍यामुळे व्हिसेरा अहवाल पाहणे आवश्‍यक आहे.

       न्‍यायवैज्ञानिक रासायनिक विश्‍लेषक प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory, State of Maharashtra Nagpur) नागपूर यांचे अहवाला मध्‍ये पुढील प्रमाणे नमुद केलेले आहे-

 

1.   Viscera in a plastic jar labeled-Stomach with it contents, large

    & small  intestineoe with its contents.

 

2.  Viscera in a plastic jar labeled-Pieces of lungs, liver, spleen

    and kidney each.

 

          3.   Blood in a small plastic jar labeled-Blood.

 

             Chandrabhan Bhaurao Nimkar.

 

 

 

        Result of Analysis.

                General and specific chemical testing does not reveal any

        poison in exhibit nos. (1) (2) & (3)

 

11    तक्रारकर्तीने आपल्‍या विमा दाव्‍याच्‍या पुष्‍टयर्थ आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी अपिल क्रं-A/06/231- THE BRANCH MANAGER, UNITED INDIA INSURANCE COMPANY LTD.-VERSUS- SMT. SUBHADRABAI SAHEBRAO GAIKE+01 Order dated-21st September, 2011 मध्‍ये दिलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली.

     सदर निकालपत्राचे आम्‍ही वाचन केले असता त्‍यामधील मृतकाचा मृत्‍यू हा शेतात किटकनाशक औषधी फवारणी करीत असताना झाल्‍याचे पोलीस दस्‍तऐवज तसेच शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये नमुद केलेले असल्‍याने व मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही पुरावा समोर आलेला नसल्‍याने विमा कंपनीने केलेले अपिल नामंजूर केलेले आहे.

      आमचे समोरील प्रकरणात सुध्‍दा मृतक हा घटनेच्‍या दिवशी शेतात किटकनाशकाची फवारणी करीत असताना उपचारा दरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू दिनांक-16/12/2011 रोजी झाल्‍याचे सर्व पोलीस दस्‍तऐवजां मध्‍ये नमुद आहे. तसेच मृतकाचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये  “Opinion reserved pending for chemical analysis report and gastric lavage report” असे नमुद केलेले आहे थोडक्‍यात शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृतकाचा मृत्‍यू  विष बाधे व्‍यतिरिक्‍त अन्‍य कारणामुळे झाल्‍याचे नमुद नाही तसेच शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांनी दिलेल्‍या मृत्‍यू प्रमाणपत्रात  मृतक श्री चंद्रभान निमकर याचा “Insecticidal poisoning”  मुळे मृत्‍यू झाल्‍याचे   नमुद केलेले आहे. फक्‍त न्‍यायवैज्ञानिक प्रयोग शाळा नागपूर न्‍यायवैज्ञानिक रासायनिक विश्‍लेषक प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory, State of Maharashtra Nagpur) नागपूर यांचे व्हिसेरा अहवाला मध्‍ये-    General and specific chemical testing does not reveal any poison in exhibit nos. (1) (2) & (3) असे नमुद केलेले आहे.

      उपरोक्‍त नमुद आदरणीय ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी दिलेल्‍या अपिलीय आदेशामध्‍ये मृतकाचा मृत्‍यू हा आत्‍महत्‍येमुळे झाला हा आरोप सिध्‍द करण्‍या  ईतपत पुरावा विमा कंपनी दाखल करु शकली नसल्‍याचे नमुद करुन विमा कंपनीचे अपिल नामंजूर केलेले आहे.

    आमचे समोरील प्रकरणात सुध्‍दा मृतक श्री चंद्रभान निमकर याचा मृत्‍यू हा व्हिसेरा अहवाला प्रमाणे विषबाधेमुळे झालेला नाही असे गृहीत धरले तर अन्‍य कोणत्‍या कारणामुळे त्‍याचा मृत्‍यू झाला हे दाखविण्‍या ईतपत कोणताही दस्‍तऐवजी पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेला नाही.

12.   व्‍हीसेरा अहवाला व्‍यतिरिक्‍त अन्‍य सर्व पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये मृतक श्री चंद्रभान निमकर याचा मृत्‍यू हा शेतात किटकनाशकाची फवारणी करीत असताना झाल्‍याची बाब नमुद आहे तसेच अन्‍य वैद्दकीय दस्‍तऐवज ज्‍यामध्‍ये शवविच्‍छेदन आणि शासकीय वैद्दकीय महाविद्दालय नागपूर यांनी दिलेल्‍या मृत्‍यू प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजां मध्‍ये मृतक श्री चंद्रभान निमकर याचा मृत्‍यू  विषबाधेने झाल्‍याचे नमुद आहे आणि या सर्व दस्‍तऐवजां मधील मृतकाचे नमुद केलेले मृत्‍यूचे कारण आणि मृतकाचा मृत्‍यू ज्‍या अवस्‍थेत आणि ज्‍या कारणामुळे झालेला आहे त्‍या संबधी नमुद केलेली वस्‍तुस्थिती ही एकमेकांशी पुरक आणि ताळमेळ खाणारी असून तक्रारकर्तीचे तक्रारीतील विधानांना पुष्‍टी देणारी आहे.

13.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीने विहित मुदतीत ग्राहक मंचा समक्ष तक्रार दाखल केली नसल्‍याने तक्रार खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे उत्‍तरात नमुद केले आहे.

         मुदतीचे या आक्षेपाचे संदर्भात वि.ग्राहक मंच खालील निवाडयावर आपली भिस्‍त ठेवीत आहे-

 NATIONAL INSURANCE CO.LTD.-Versus-ASHA JAMDAR PRASAD”- I (2009) CPJ-147 या प्रकरणा मध्‍ये                  आदरणीय महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी मुदती संबधी खालील प्रमाणे भाष्‍य केलेले आहे-

 

         आदरणीय महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक आयोग यांनी दिलेल्‍या उपरोक्‍त नमुद निवाडया मध्‍ये  सुध्‍दा विलंबाचे कारणास्‍तव विमा दावा फेटाळण्यात आला होता, तक्रारकर्तीला विलंबाच्या कारणाचे स्‍पष्‍टीकरण देण्याची संधी देण्यात आली नव्‍ह‍ती आणि ती पतीच्‍या मृत्यू नंतर शोकमग्‍न होती, अशा परिस्थितीत तिने ताबडतोब विमा कंपनीकडे दावा दाखल करणे अपेक्षीत नाही, सबब तिचा विमा दावा मंजूर करण्‍यात आला होता.

          

 

14.    प्रकरणातील पोलीस दस्‍तऐवज, शवविच्‍छेदन अहवाल आणि शासकीय वैद्दकीय महाविद्दालय नागपूर यांचे मृत्‍यू प्रमाणपत्रात मृतक श्री चंद्रभान निमकर याचा मृत्‍यू हा विषबाधेमुळे झाला आणि सदर विषबाधा ही तो शेतात किटकनाशकाची फवारणी करीत असताना झालेली असल्‍याची बाब दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन सिध्‍द होते. एवढे सर्व एकमेकाशीं पुरक दस्‍तऐवज असताना आणि दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन सत्‍य वस्‍तुस्थिती विषद होत असताना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने निष्‍कारण तक्रारकर्तीचा विमा दावा योग्‍य असूनही (Genuine Claim)  नामंजूर करुन तिला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे तिला निष्‍कारण शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी कडून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा राशी रुपये-1,00,000/- आणि त्‍यावर सर्व प्रथम विमा प्रस्‍ताव दाखल दिनांक-13/03/2012 पासून 60 दिवस (महाराष्‍ट्र शासन परिपत्रका नुसार विमा दावा निर्णयाचा कालावधी) सोडून येणारा  दिनांक-13/05/2012 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्‍याजासह रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/-विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, त्‍यावरुन मंच तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                 ::आदेश::

 

(01)   तक्रारकर्ती श्रीमती रेखा चंद्रभान निमकर यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1) दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, मुंबई आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्‍यवस्‍थापक, नागपूर यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या  (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2)  विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) आणि त्‍यावर दिनांक-13/05/2012 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्‍याज यासह मिळून येणारी रक्‍कम द्दावी.

 

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्तीस द्दावेत.

 

(04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1)  व क्रं-2) विमा कंपनी तर्फे संबधित अधिका-यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या  निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(05)  विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, मौदा, तालुका मौदा, जिल्‍हा नागपूर यांनी त्‍यांचे कार्य व्‍यवस्थित पार पाडल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत त्‍यांना या तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

       

(06)  प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती  सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन  देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.