Maharashtra

Chandrapur

CC/17/99

Smt Maya Komdeo bhoyar At Haladi - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv. Kshirsagar

30 Jan 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/17/99
 
1. Smt Maya Komdeo bhoyar At Haladi
At Halddi Tah Mul
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Company Ltd through Divisional Manager
Diviosnal office No 130800 New India Center & th floor 17 A Kurez marg Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Jan 2018
Final Order / Judgement

::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये,  कल्पना किशोर जांगडे मा.सदस्य

१.     विरुद्ध पक्षांनी, तक्रारकर्तीस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.     तक्रारकर्तीचे पती श्री. कोमदेव लक्ष्मण भोयर यांच्यामालकीची मौजावेडी (रिठ) ता.मुल, जि. चंद्रपूर येथे भूमापन क्र. १९४ शेतजमीन आहे.सदर शेतजमीन ते करत होते.  महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णय  दिनांक ११.०९.२०१३ मधील अटी व शर्ती प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा विमा काढलेला होता. तक्रारकर्तीचे पती श्री. कोमदेव लक्ष्मण भोयर  यांचे दिनांक १४.१०.२०१३ रोजी अपघाती निधन झाल्याने तक्रारकर्तीनेशेतकरी अपघात विमा दावादस्तावेजासह दिनांक ३१.०१.२०१४ रोजी विरुद्ध पक्ष क्र. ३ यांच्याकडे सादर केला. विरुद्ध पक्ष क्र. १व २ यांनी तक्रारकर्तीचे पतीचा विमा दावा मंजुर अथवा नामंजुर असे न कळविल्याने त्याबाबत तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल करून  विरुद्ध पक्षानी विम्याची रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्‍मक रक्‍कम तक्रारकर्तीस अदा करावी अशी विनंती तक्रारकर्तीने केली आहे.

३. विरुद्ध पक्ष क्र.१ व २ यांना मंचाची नोटीस पाठविली असताहजर होऊन  त्यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारकर्तीने ९० दिवसात विमा दावा सादर केला नाही. तसेच ६-क वारस दस्तावेज, मृतकाचा जन्माचा दाखला, राशन कार्ड दाखल केले नाही. कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीला विरुध्द पक्ष बनविले नाही असे आक्षेप घेऊन तक्रारकर्तीने   विहित मुदतीत तक्रार दाखल केली नाही, असे कथन केले. तक्रारकर्तीने  विरूद्ध पक्ष क्र.१ व २ यांच्याकडे विमा दावा मुदतीत दाखल न केल्याने व वि.प.क्र.१व२ यांनी  तक्रारकर्तीस सेवा सुविधा देण्यास कसूर केला नसून,तक्रारकर्तीर्ने  विमा करारातील अटी व शर्तीचा भंग केला. सदर आक्षेपामुळे विम्याची रक्कम अदा करणे न्यायोचित नसल्याने, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती विरूद्ध पक्ष  क्र. १ व २  यांनी केली आहे.

४.     विरुध्‍द पक्ष क्र. ३ यांना मंचाची नोटीस पाठविली असता,विरूद्ध पक्ष क्र. ३ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन,तक्रारकर्तीचे मयत पती यांचा विमा दावातक्रारकर्ती  यांनी दिनांक ०३.०२.२०१४ रोजी वि.प.क्र. ३ यांचे कार्यालयात सादर केला. त्यानंतर वि.प.क्र. ३ यांनी सदर दावा दिनांक ११.०२.२०१४ रोजी मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांना सादर केला. मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांनी सदर दावा दिनांक २६.०२.२०१४ रोजी वि.प. क्र. २ यांना विहित मुदतीत सादर केला. सबब, वि.प.क्र. ३ यांनी तक्रारकर्तीस सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केला नसून  तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंतीवि.प. क्र. ३ यांनी केली आहे.  

५.तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच विरुद्ध पक्ष  क्र. १ व २ यांचा लेखी जवाब, दि. २४.११.२०१७रोजी लेखी उत्तरालाच शपथपत्र समजन्यात यावा अशी पुर्सीस  दाखल तसेच लेखी युक्तिवाद व विरुद्ध पक्ष  क्र. ३ यांचा लेखी जवाब, दस्तावेज  व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येतात.  

 

 

 

               मुद्दे                                                             निष्‍कर्ष

 

१.   विरुद्ध पक्ष क्र. १व२ यांनी तक्रारकर्तीस विमा कराराप्रमाणे

     सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब

      सिद्ध करतात काय ?                                       होय    

२.      विरुद्ध पक्ष क्र.१व२ तक्रारकर्तीस नुकसानभरपाई अदा

     करण्यास पात्र आहेत काय ?                          होय      

 ३.आदेश काय ?                                            अंशतः मान्‍य  

                   

कारण मिमांसा

६.   विरुद्ध पक्ष क्र. ३ यांनी वि.प.क्र.१व२ यांच्याकडे विमा दावा विहित मुदतीत सादर केल्याबाबत दस्तावेज विरुद्ध पक्ष क्र. ३ यांनी दाखल केली आहेत. सदर दस्तावेजावरून दिनांक 14/10/2013 रोजी तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यु झाल्‍यानंतर तक्रारकर्तीने दिनांक ३.२.२०१४ ला विमादावा अर्ज वि.प.क्र. ३ कडे सादर केला व वि.प.क्र.३ने दिनाक ११.०२.२०१४ रोजी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे पाठविला व नंतर दि २६.2.२०१४ रोजी विरुद्ध पक्ष क्र. १ यांच्याकडे विमा दावा प्राप्त आहे असे निदर्शनांस येते. महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ११.०९.२०१३ मधील अटी व शर्ती प्रमाणे शेतकरी अपघात योजने अंतर्गत विमा दावा केवळ विलंबाने सादर केला या तांत्रिक बाबीमुळे नामंजूर करता येणार नाही, असे नमुद केले आहे. शेतकरी अपघात विमा योजना विशेष विमा संरक्षण असून व्यक्तिगत विमा दावा तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्र. ३ यांच्याकडे पाठविल्यानंतर त्‍यांनी तो विहित मुदतीत विरुद्ध पक्ष क्र. 1व 2 यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. शासन निर्णयाप्रमाणे, विमा दावा विरुद्ध पक्ष क्र. ३ यांच्याकडे सादर केल्याचा दिनांक विरुद्ध पक्ष क्र. १ यांना विमा दावा प्राप्त झाल्याचा दिनांक समजण्यात यावा, असे नमूद आहे. जर अपघाती मृत्यु झाला तर केवळ अपघात झाला या कारणास्तव विमा दावा मान्य करावा, असेही नमूद आहे. विरूध्‍द पक्ष क्र.3 यांनी शासन निर्णयानुसार विनामोबदला सल्ला व सहाय्य केले असून तक्रारकर्तीच्या पतीकडून कोणतेही शुल्क घेतलेले नाही.  तक्रारकर्तीच्या पतीचा विमा वि.प. क्र. 1 व 2 यांना महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता रक्कम अदा करुन घेतल्याची बाब सिद्ध होते. तसेच विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ११.०९.२०१३ मधील अटी व शर्ती प्रमाणे न्यायोचीत कारणाशिवाय तक्रारकर्तीच्या पतीचा विमा दावा अमान्य केल्याची बाब सिद्ध होते. विरुद्ध पक्ष  क्र. 1 व 2 यांनी, न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याची तक्रारकर्तीने दस्‍तावेजासह सिद्ध केले आहे. वि.प. क्र. 1 व 2 यांनी विहीत मुदतीत विमा दावा मंजुर न केल्याने तक्रारकर्तीस मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला ही बाब दस्तावेजावरून सिद्ध होते. यावरून वि.प.क्र. १व२  यांनी तक्रारकर्तीप्रती सेवेत हेतुतः निष्काळजीपणा करुन तसेच अटी व शर्तीचे पालन न करून न्‍युनता केल्याची बाब सिद्ध होते. विरुद्ध पक्ष  क्र. १व २  यांनी  तक्रारकर्तीने कबाल इंशुरन्स  यांना विरुद्ध पक्ष म्हणून समाविष्ट न केल्याने तक्रार अमान्य करावी असे वाद्कथन केले असले तरी तक्रारकर्ती ला विमा दावा रक्कम देण्याची जबाबदारी हि त्यांची नसून वि.प.क्र.1 व 2 विमा कंपनीची असल्‍याने व कबाल इन्‍श्‍युरन्‍स हे तक्रारीत पक्ष नसल्याने या तांत्रिक कारणास्तव अमान्य करणे उचीत नाही असे मंचाचे मत आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्‍वये “सेवा” या संज्ञेची व्‍याप्‍ती पाहता वैध विमा दावा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्‍यायतत्‍व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्‍कर्षावरून, तक्रारदारांनी सदर तक्रार विमा दावा करार सेवेबाबत दाखल केल्‍याने व ही बाब दस्‍तावेजासह सिध्‍द झाल्‍याने, वि.प.क्र.1व 2 यांनी तक्रारदारास विमा दावा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब सिध्‍द झाल्‍याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्‍द झाल्‍याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

 

 

मुद्दा क्र. ३ : 

 

७.          मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

आदेश

 

      १. ग्राहक तक्रार क्र. ९९/२०१७ अंशतः मंजूर करण्‍यात येते.

           २.  विरूद्ध पक्षक्र. १  व २ यांनी, तक्रारकर्तीस यांना शेतकरी अपघात विमा दावा             कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार, सेवासुविधा  

         पुरविण्‍यात कसुर केल्‍याची बाब जाहीर करण्यात येते.

      ३. विरूद्ध पक्ष क्र.१ व २ यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरीत्‍या शेतकरी अपघात विमा

         दावा रक्कम रुपये १,००,०००/- दिनांक 27/6/2017 पासून अदा करेपर्यंत

         द.सा.द.से. १०% व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी.

      ४. विरूद्ध पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरीत्‍या तक्रारकर्तीला मानसिक,

        शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम

        रु. ३०,०००/- तक्रारकर्ती यांना अदा करावे.

      ५. वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनाकापासून 30 दिवसांचे आंत

        करण्‍यांत यावे.

      6.  वि.प. क्रं. 3 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

      7.  उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

           

चंद्रपूर

दिनांक -  30/01/2018

 

 

 

          श्रीमती. कल्‍पना जांगडे   श्रीमती. किर्ती गाडगीळ    श्री. उमेश वि. जावळीकर  

         (सदस्‍या)             (सदस्‍या)                  (अध्‍यक्ष)  

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.