Maharashtra

Nanded

CC/09/68

Shvidas Narayanrao Latkar - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Lit - Opp.Party(s)

ADV.Dinkar Nagapurkar

16 Jul 2009

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.

 

प्रकरण क्रमांक:-2011/68

 

प्रकरण दाखल तारीख- 21/03/2011

प्रकरण निकाल तारीख /span> 25/08/2011

 

समक्ष /span>मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,-अध्‍यक्ष

मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.- सदस्‍या

 

/span> हरपालसिंघ ठेकेदार पि. अंतरसिंग

/span> वय 52 वर्षे,धंदा व्‍यवसाय,

/span> रा.पांडूरंग नगर, पांडूरंग मंगल कार्यालया

/span> जवळ, नांदेड तालुकाव जि.नांदेड.अर्जदार.

 

विरुध्‍द

/span>

1. व्‍यवस्‍थापक,

/span> चोलामंडळम इन्‍व्‍हेस्‍टमेंट अड/span> फायनान्‍स

/span> कं.लि. नांदेड

2.मुख्‍य व्‍यवस्‍थापक,

/span> चोलामंडळम इन्‍व्‍हेस्‍टमेंट अड/span> फायनान्‍स

/span> लि., देअर हाऊस, पहिला मजला, नं,2, एन.एस.सी.

/span> बोस रोड, चेन्‍नई- 600 001 गैरअर्जदार

/span>

 

अर्जदारा तर्फे/span>- .ए.व्‍ही.चौधरी

गैरअर्जदार क्रं. 1 व 2तर्फे /span>span style='mso-spacerun:yes'> /span>.व्‍ही.एम.कदन व एस.ए.नेवरकर

 

/span>/span>निकालपत्र/span>/span>

(द्वारा- श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्‍यक्ष )

 

1. अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदार यांचे महिंद्रा मॅक्‍स हे मालकीचे वाहन असुन ज्‍याचा रजिस्‍ट्रेषन क्रमांक एमएच 26/व्‍ही-373 असा आहे. हे वाहन त्‍यांनी त्‍यांचे कुटुंब व स्‍वतःचे उदर्निवाहाकरीता खरेदी केलेले आहे.सदरील वाहन खरेदी करण्‍याकरीता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून कर्ज घेतलेले आहे.सदरील वाहनाची किंमत रक्‍कम रुपये 5,11,000/- इतकी होती, त्‍यामध्‍ये अर्जदार यांनी रक्‍कम रुपये 1,35,000/- इतके डाऊन पेमेंट भरुन रक्‍कम रुपये 3,60,000/- इतक्‍या रक्‍कमेची उचल केली आहे.अर्जदार यांनी सदरील कर्जाची परतफेड रक्‍कम रुपये 10,496/- प्रतिमाह प्रमाणे एकुण 47 हप्‍त्‍यात करावयाची होती.अर्जदार सदरील कर्जाचा हप्‍ता नियमीतपणे भरीत होता.

2.दिनांक 28.12.2009 रोजी अर्जदार यांचे सदरील वाहनास अपघात झाला त्‍याबाबत अपघाताची नोंद गुन्‍हा क्रं. 36/2009 पो. स्‍टे. किनवट /span>यांनी केलेली आहे.सदरील अपघातात गाडीचे रक्‍कम रुपये 80,000/- चे नुकसान झाले व अपघातात मरण पावलेल्‍या गाईबाबत अर्जदार यांना रक्‍कम रुपये 30,000/- नुकसान भरपाई द्यावी लागली.अपघाताबाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना कल्‍पना दिलेली होती व आहे.कर्ज परतफेड करणेस मुदत द्यावी बाबतअर्जदार यांनी गैरअर्जदार यांना विनंती केली परंतु कोणतीही नोटीस न देता गैरअर्जदार यांचे कर्मचा-यांनी अर्जदार यांचे ताब्‍यातुन सदरील वाहन ओढुन नेले.अर्जदार यांनी काही काळ लोटल्‍यानंतर अपेक्षा होती की, गैरअर्जदार यांचे अधिकारी किंवा कर्मचारी अर्जदार यांचेकडे सदर वाहनाच्‍या व्‍यवहारासबंधी किती रक्‍कम जमा व किती बाकी आहे याबद्दल हिशोब करुन बाकी रक्‍कम भरण्‍यास संधी देतील या प्रयत्‍नात व या विचारात अर्जदार असतांना अचानक 19 जुलै 2010 रोजी पाठविलेली लिलावाची नोटीस अर्जदार यास प्राप्‍त झाली, त्‍यामध्‍ये अर्जदार यांचे वाहन लिलाव व्‍दारे विक्री केल्‍याबाबत माहिती पत्रात दिली होती.ती वाचुन अर्जदार प्रचंड भयभीत व चिंतीत झाला.

3.अर्जदार यांनी सदर वाहन हप्‍त्‍याने घेतेवेळी रक्‍कम रुपये 1,35,000/- इतके डाऊन पेमेंट भरलेले आहे व सदर वाहनाच्‍या परतफेडीच्‍या हप्‍त्‍यापोटी रक्‍कम रु. 1,72,448/- असे एकुण रक्‍कम रु. 3,16,448/- इतके गैरअर्जदार यांना अदा केलेले आहे.सदर वाहनाच्‍या दुरुस्‍तीसाठी अर्जदार यांना रक्‍कम रु. 80,000/- खर्च आलेला आहे. अर्जदार यांनी त्‍याच्‍या वाहनाच्‍या फायनान्‍सपैकी एकुण कर्जाच्‍या अर्ध्‍याहुन अधिक रक्‍कम परतफेड केलेली असतांना, /span>गैरअर्जदार यांनी दुष्‍ट हेतुने अर्जदार यांचे वाहन दिनांक 07.03.2010 रोजी जप्‍त केले त्‍यावेळेस अर्जदार यांचेकडे कर्जापोटी फक्‍त रक्‍कम रु. 79,354/- थकबाकी होती.सदरील थकबाकी भरण्‍यास गैरअर्जदार यांनी त्‍यांना नोटीस अगर सुचना दिली नाही.अर्जदार यांनी सदरील वाहन रक्‍कम रु. 5,11,000/- मध्‍ये विकत घेतले आहे.परंतु गैरअर्जदार यांनी ते वाहन रक्‍कम रु. 2,05,000/- मध्‍येच विकले. गैरअर्जदार यांनी याप्रकारे अर्जदार यांचे 60 टक्‍के नुकसान केलेले आहे.गैरअर्जदार यांची सदरील बाब अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे./span>गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिनांक 11.01.2010 रोजीची जी नोटीस पाठविलेली आहे त्‍यात रक्‍कम रु. 1,32,520/- इतकी रक्‍कम अर्जदार यांचेकडे चुकीच्‍या पध्‍दतीने थकबाकी दाखविलेली आहे ती अयोग्‍य आहे./span>गैरअर्जदार यांचे सदरील कृत्‍यामुळे अर्जदार यांना प्रचंड मानसिक त्रास व आर्थिक नुकसान झालेले आहे.सबब गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन विक्री केले त्‍या वाहनाची किंमत अर्जदार यास परत मिळावी तसेच त्‍यांना झालेल्‍या मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्‍हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.

4. गैरअर्जदार /span>यांना तक्रारीची नोटीस लागून ते तक्रारीत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे तक्रारीत दाखल केलेले आहे.गैरअर्जदार यांचे म्‍हणणे प्रमाणे अर्जदार यांना त्‍यांनी लोन कम हायपोथीकेशन एग्रीमेंट( करार) /span>प्रमाणे कर्ज दिलेले असल्‍याने अर्जदार व गैरअर्जदार यांचेत नाते हे धनको व ऋणको असे आहे. सबब अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक होऊ शकत नाही.अर्जदार यांनी घेतलेल्‍या कर्जाची परतफेड नियमीत न केल्‍याने तो थकबाकीदार झाला. अर्जदार यांचे गाडीस अपघात झाला म्‍हणुन ते डिफाल्‍टर होऊ शकत नाही.अर्जदार यांचे वाहन जप्‍त करण्‍यापुर्वी त्‍यांचेकडे थकबाकी असल्‍याची नोटीस गैरअर्जदार यांनी पाठविली होती तसेच सदरील नोटीसीव्‍दारे व उभयपक्षात झालेल्‍या कराराप्रमाणे अर्जदार थकबाकीदार झाला तर वाहन जप्‍तीचे त्‍यांना अधिकार असल्‍याबाबत नोटीसमध्‍ये कळविले होते.अर्जदार यांचेकडे थकबाकी असलेली रक्‍कम रु. 79,354/- भरण्‍याचे अर्जदार यांना सांगितले होते. त्‍यानंतर देखील दिनांक 05.06.2010 रोजी वाहन विक्री करण्‍याच्‍या अगोदर गैरअर्जदार याने अर्जदार यास नोटीस पाठवुन त्‍यांचेकडे थकीत असलेली रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे जमा करण्‍याचे सांगितले होते.परंतु अर्जदार यांनी थकीत रक्‍कम भरली नाही.त्‍यानंतरच गैरअर्जदार यांनी सदरील वाहनाचा लिलाव करुन आलेल्‍या उच्‍च किंमती रक्‍कम रु. 2,05,000/- किंमतीस श्री. संजय सामंत यांना विकले.विक्रीनंतर आलेली रक्‍कम अर्जदार यांचें थकीत कर्ज रक्‍कमेतुन वजा केल्‍यानंतर देखील रु. 1,32,520/- अर्जदार यांचेकडे थकीत/ बाकी आहे व ही रक्‍कम परतफेड करण्‍याची पुर्ण जबाबदारी आजही अर्जदार यांचीच आहे.सबब अर्जदार हा थकबाकीदार असल्‍याने अर्जात केलेली कोणतीही मागणी मागणेस तो हक्‍कदार नाही. सबब अर्जदार यांची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंतीगैरअर्जदार यांनी केलेली आहे./span>

5. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ, गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे तसेच त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र /span>पाहून व त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकुण जे मुद्ये उप‍स्थित होतात ते मुद्दे व त्‍यावरील सकारण उत्‍तरे खालील प्रमाणे

 

मुददेउत्‍तरे

1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? /span>/span>होय .

2. अर्जदार /span>यांनी गैरअर्जदार यांचेकडे कर्जाचे हप्‍ते

नियमीत भरलेले आहेत काय?नाही.

3. गैरअर्जदार यांचे सेवेतील तथाकथीत त्रुटी सिध्‍द झाली

/span> आहे काय ? नाही

4.गैरअर्जदार यांनी बळजबरीने वाहन जप्‍त करुन कसलीही

/span> सुचना नणी देता अर्जदार यांचे वाहन लिलाव केले केले

/span> आहे काय ? नाही

5.अर्जदार हे आता ते वाहन किंवा त्‍याची किंमत मागणेस

/span> हक्‍कदार आहे काय ? नाही

6. काय आदेश ? /span> अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणे

मुददा नं. 1-

6.अर्जदार यांनी सदरील वाहन क्रमांक एमएच 26/व्‍ही-373 मॅक्‍स फिक्‍सट्राखरेदी करणेसाठी गैरअर्जदार यांचेकडून कर्ज घेतलेले होते हे गैरअर्जदार यांनी मान्‍य केलेले आहे.अर्जदार यांनी सदरील कर्ज घेतेवेळेस रक्‍कम रुपये 1,35,000/- इतके डाऊन पेमेंट भरुन व ते वाहन खरेदी करणेसाठी बाकीचे रक्‍कम रु. 3,76,000/- गैरअर्जदार यांचेकडून घेतले होते असे गैरअर्जदार यांचे म्‍हणणे आहे व त्‍याप्रमाणे करारनामा लिहुन देण्‍यात आला होता व अर्जदार याने सदरील कर्ज फेडण्‍यासाठी हप्‍ता रु. 10,496/- गैरअर्जदार यंना नियमीत देण्‍याचे कबूल केले होते.वरील सर्व कथनाबद्दल व सदरील कराराबद्दल दोन्‍ही पक्षकारांचे एकमत आहे त्‍यावरुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे हे सिध्‍द होते म्‍हणुन मुद्या क्रं. 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक 2 ते 4

7.वरील सर्व मुद्दे एकमेकाशी पुरक असल्‍यामुळे ते सर्व मुद्दे /span>एकत्रितपणे चर्चेला घेण्‍यात येत आहेत. अर्जदार यांचे कथनावरुन त्‍यांनी नियमीतपणे कर्ज फेडीचे हप्‍ते भरलेले नव्‍हते हे तक्रारीत कबुल केलेले आहे.अर्जदार यांचे असेही म्‍हणणे आहे की, दिनांक 28.12.2009 रोजी अर्जदार हे त्‍यांचे सदरील वाहन घेऊन हिंगणवाडी शिवारातील बोधडी ते किनवट मार्गावर जात असतांना अचानक समोरुन गाय आल्‍यामुळे सदरील वाहनाचा अपघात झाला व ती गाय मरण पावली त्‍यासाठी किनवट पोलीस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा क्रं. 136/2009 दाखल झाला होता.त्‍या अपघातामुळे अर्जदार यास त्‍या गायीची किंमत नुकसान भरपाई म्‍हणुन रु. 30,000/- द्यावे लागले व वाहनाचे दुरुस्‍तीला रक्‍कम रु. 80,000/- खर्च करावा लागला.सदरील कारणामुळे अर्जदार हे नियमीतपणे कर्जाचे हप्‍ते भरु शकले नाही.वाहनास अपघात झाला म्‍हणजे अर्जदार कर्जाचा हप्‍ता न भरणेस हक्‍कदार झाले असे म्‍हणता येणार नाही.त्‍यामुळे एक गोष्‍ट निश्चित सिध्‍दहोते की अर्जदार याने नियमीतपणे कर्जाचे हप्‍ते भरलेले नाहीत व त्‍यामुळे ते थकबाकीदार झालेले आहे.

8.एकंदरीत कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदार याने एकुण 47 हप्‍त्‍यापैकी फक्‍त 10 हप्‍ते प्रत्‍येकी रक्‍कम रु. 10,496/- चे गैरअर्जदार यांचेकडे भरलेले आहेत. अशाप्रकारे अर्जदार याने एकुण रक्‍कम रु. 1,04,960/- भरलेले आहेत.कागदपत्रावरुन असे दिसते की, त्‍याशिवाय अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रक्‍कम रु. 11,090/-,रु.18,000/- ,रु.10,000/- व रु. 14,000/- अशा वेगवेगळया तारखेला रक्‍कमा भरलेल्‍या आहेत.त्‍याबद्दल वेगवेगळया पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत.अशाप्रकारे त्‍या चार पावत्‍यांची एकुण रक्‍कम रु. 53,090/- व वरील कर्जाचे परतफेडीबद्दले रक्‍कम रु. 1,04,960/- अशी दोन्‍ही मिळुन एकुण रक्‍कम रु. 1,58,050/- अर्जदार याने गैरअर्जदार यास दिलेले आहे.बाकी रक्‍कम त्‍यांनी गैरअर्जदार यांना दिलेली नाही.अर्जदार यांचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यांनी सुरुवातीला वाहन खरेदी करतेवेळेस रक्‍कम रु. 1,35,000/- भरले होते. गैरअर्जदार यांचे असे म्‍हणणे आहे की, ते रक्‍कम रु. 1,35,000/- अर्जदार यांनी वाहनाचे खरेदीला दिलेले आहे.त्‍या रक्‍कमेशी या कर्जाचा काही एक संबंध नाही.गैरअर्जदार यांचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यांनी सदीरल लोन कर्ज प्रमाणे रु. 3,76,000/- चे कर्ज अर्जदार यास दिले होते.अशाप्रकारे अर्जदार यांनी कर्जाचे हप्‍ते नियमीत न भरुन चुक केलेली आहे व त्‍यांचीच चुकीबद्दल ते गैरअर्जदार यांना दोषी ठरविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. अर्जदार यांनी ही खोटी केस केलेली आहे. अर्जदार याने काही चेक दिले होते त्‍यापैकी काही चेक बाऊंस झालेले आहेत व ते हप्‍ते सुध्‍दा अर्जदार यांनी थकीत ठेवलेले आहेत. वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे अर्जदार यांनी पंजाब नॅशनल बँकेचा खाते उता-याची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे. त्‍यावरुन त्‍यांनी वरील फक्‍त 10 हप्‍ते भरल्‍याचे दिसुन येत नाही.

8.अर्जदार यांचे असेही म्‍हणणे आहे की, गैरअर्जदार यांनी कसलीही सुचना अथवा नोटीस न देता अचानक सदीरल वाहन त्‍यांचेकडून जप्‍त करुन नेले व त्‍यानंतर कसलीही सुचना न देता ते वाहन लिलावामध्‍ये विकुन टाकलेले आहे ? गैरअर्जदार यांचे असे कथन आहे की, अर्जदार याला अनेकवेळेला संधी देऊनहीत्‍यांनी सदरील कर्जाचे परतफेडीचे हप्‍ते नियमीतपणे भरलेले नाही.करारातील तरतुदीप्रमाणे गैरअर्जदार हे कागदोपत्री त्‍या वाहनाचे मालक होते व जेव्‍हा अर्जदार डिफॉल्‍टर होतो तेव्‍हा गैरअर्जदार यांना ते वाहन जप्‍त करण्‍याचा अधिकारआहे.अर्जदार याला अनेक संधी देऊनही त्‍यांनी हप्‍ता भरलेला नाही, अनेकवेळेला पैशांची मागणी करुनही हप्‍ते भरण्‍यास टाळाटाळ केल्‍यामुळे नाईलाजाने ते वाहन जप्‍त करावे लागले.

9.गैरअर्जदार यांचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यानंतर सुमारे 3-4 महिने वाट पाहुन देखील अर्जदार हा त्‍यांचेकडे फिरकला नाही व नोटीस घेऊनही त्‍यांनी हप्‍ते भरलेले नाहीत. म्‍हणुन दिनांक 31.03.2008 रोजी करारानुसार अर्जदार हे हप्‍ते भरण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍यामुळे नियमाप्रमाणे त्‍यांनी सदरील वाहनाचा लिलाव केला व जास्‍तीत जास्‍त बोली बोलणा-या संजय सामंत यांना ते वाहन रक्‍कम रु. 2,05,000/- मध्‍ये लिलावात विकण्‍यात आलेले आहे.अशाप्रकारे सदरील वाहन अर्जदार यांना सुचना देऊन नियमाप्रमाणे जप्‍त करण्‍यात आले व पोलीस स्‍टेशनला लेखी सुचना देऊन वाहनाचा लिलाव करण्‍यात आला व नियमाप्रमाणे कार्यवाही करण्‍यात आलेली आहे.अर्जदार याने हप्‍ताही भरलेला नाही व त्‍यांचेकडे येण्‍याची तसदीही घेतलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांना ही केस करणेचा अधिकार नाही.

10. गैरअर्जदार यांचे सविस्‍तर कथन पाहता असे दिसते की, अर्जदारयांनी हप्‍ते भरण्‍यामध्‍ये कसुर केलेला आहे व वारंवार संधी देऊनही त्‍यांनी हप्‍त्‍यांची परतफेड केलेली नाही.त्‍यामुळे गैरअर्जदार याने सदरील वाहन जप्‍त करुन ते लिलावात विक्री केलेले आहे. गैरअर्जदार याने लिलावापुर्वी व लिलावा नंतर संबधीत पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या नोटीसीच्‍या नक्‍कला त्‍यांनी तक्रारीत दाखल केलेल्‍या आहेत.त्‍यांनी सदरील लोन एग्रीमेंटची नक्‍कल देखील दाखल केलेली आहे.गैरअर्जदार यांचे असे कथन आहे की, सदरील लिलावातील वाहनाची जी किंमत आलेली आहे ती वाहन कर्जाच्‍या रक्‍कमेतून वजा करुन देखील अर्जदार यांचेकडे आणखी रक्‍कम रु. 1,32,520/- ची थकबाकी निघत आहे व अर्जदार हा ती रक्‍कम देणेस बाध्‍य आहे त्‍यामुळे अर्जदार याला सदरील ट्रक मागणेचा किंवा त्‍यांची किंमत मागणेचा अधिकार मुळीच नाही.म्‍हणुन ही केस खारीज करण्‍यास योग्‍य आहे.गैरअर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्राचे अवलोकन करता असे दिसते की, अर्जदार याने हप्‍ते भरण्‍यास कसुर केल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी नाईलाजाने सदरील कर्ज करारातील अटीप्रमाणे कार्यवाही करावी लागली त्‍यामध्‍ये गैरअर्जदार यांन गैर कायदेशीर कोणतेही कृत्‍य केले असे आढळून येत नाही.अर्जदार हा गैरअर्जदार यांचे तथाकथीत सेवेतील त्रुटी सिध्‍द करु शकला नाही.त्‍यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचकडून सदरील लिलावात विकलेला ट्रक वापस मागणेस किंवा त्‍यांची किंमत मागणेस हक्‍कदार नाही.गैरअर्जदार यांचे कथनावरुन असे दिसते की, सदरील लिलावात विकलेल्‍या वाहनाची किंमत गृहीत धरुन देखील आणखी अर्जदार यांचेकडेच रक्‍कम रु. 1,32,520/- येणे आहे ते बुडविण्‍यासाठी अर्जदार याने ही खोटी केस केलेली आहे असे गैरअर्जदार यांचे कथन आहे.एकंदरीत कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदार हा त्‍याचे अर्जातील केलेल्‍या मागणीसाठी हक्‍कदार नाही.म्‍हणुन मुद्या क्रं. 2 ते 5 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

मुद्दा नं. 6 -

11.वरील चर्चेवरुन अर्जदार यांची ही केस खारीज करणे योग्‍य आहे.सदरील वाहन किंवा त्‍यांची किंमत मागणेचा हक्‍क अर्जदार याने त्‍याचे निष्‍क्रीयतेमुळे गमावला आहे.कर्जाची परतफेड करणे हे त्‍याचेवर बंधनकारक होते.वाहनाला अपघात झाला म्‍हणुन ते त्‍यांची सदरील जिम्‍मेदारी टाळु शकत नाही.गैरअर्जदार यांचे कागदपत्र पाहता अर्जदार यांचेकडून आणखी रक्‍कम येणे निघते.सदरील तथाकथीत येणे असलेल्‍या रक्‍कमे बद्दल अर्जदार यांनी जर गैरअर्जदार यांचेकडे परस्‍पर विनंती केली तर एकंदरीत परिस्थिती पाहता गैरअर्जदार हे सदरील अर्जदार यांची विनंती माणुसकीच्‍या अधिकारामुळे मंजुर करु शकतील. एकंदरीत अर्जदार यांचे अर्जातील केलेली विनंती मान्‍य करता येत नसल्‍यामुळे सदरील तक्रार खारीज करणे योग्‍य आहे असे आम्‍हास वाटते.वरील सर्व कारणामुळे आम्‍ही खालील आदेशपारीत करीत आहोत.

आ दे श

1. अर्जदार यांची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.

3. पक्षकारांना निकाल कळविण्‍यात यावा.

 

 

/span>

(श्री.बी.टी.नरवाडे पाटील )(श्रीमती सुवर्णा देशमूख)

/span>अध्‍यक्षसदस्‍या

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोळी लघुलेखक(नि.श्रे.)

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.