Maharashtra

Raigad

CC/08/2

Deepika Jayawant Thakur - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Limited - Opp.Party(s)

Adv.D.B.Vadkar

07 Jul 2008

ORDER


District Forum Raigad, Alibag
District Consumer Disputes Redressal Forum, Block No 6 and 8,Patil Sadan,New by pass road,Chendhare, Alibag
consumer case(CC) No. CC/08/2

Deepika Jayawant Thakur
...........Appellant(s)

Vs.

The New India Assurance Company Limited
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

           रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
 
                                                                                                तक्रार क्रमांक 2/2008.
                                                तक्रार दाखल दि. 28/1/2008
                                           निकालपत्र दि. - 18/7/2008   
 
 
श्रीमती दिपीका जयंवत ठाकुर,
रा. भेडकल, ता. उरण, जि. रायगड.                        .... तक्रारदार
 
 
विरुध्‍द
न्‍यू इंडिया इन्‍शुरन्‍स कं.,
शाखा अलिबाग, ता. अलिबाग,
जि. रायगड.                                           .... विरुध्‍दपक्ष
 
 
               उपस्थिती :-     मा.श्री.आर.डी.म्‍हेत्रस, अध्‍यक्ष
                            मा.श्री. बी.एम.कानिटकर, सदस्‍य
                            मा. सौ. ज्‍योती अभय मांधळे, सदस्‍या
 
               तक्रारदारातर्फे :-    अड. डी.बी. वाडकर
                              विरुध्‍दपक्षातर्फे :- अड. आर.व्‍ही. ओक.
 
 
-ः नि का ल प त्र ः-
द्वारा मा. सदस्‍य श्री. कानिटकर.
         तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे.
         तक्रारकर्ती श्रीमती दिपीका ठाकुर यांचे मालकीची सुमो जीप क्र. MH- 43/N 388  होती. सदर जीपचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विमा उतरविला होता व विमा पॉलिसीचा क्रमांक 141800/31/05/01/00011538 असा असून सदर पॉलिसीचा कालावधी दि. 10/10/2005 ते 9/10/2006 असा होता. तक्रारकर्ती स्‍वतः व स्‍वतःच्‍या कुटुंबाच्‍या कामाकरीता सदर जीपचा वापर करीत असत. सदरची जीप तक्रारकर्तीने कधीही कोणत्‍याही कंपनीस व्‍यावसायिक कारणासाठी भाडेतत्‍वावर दिली नव्‍हती. श्री. अमित पिंपळनाथ विळणकर रा. वरळी कोळीवाडा, मुं‍बई हे तक्रारकर्ती यांचेकडे ड्रायव्‍हर म्‍हणून काम करीत होते. 
 
2.       दि. 25/2/06 रोजी तक्रारकर्तीने ड्रायव्‍हरला सदर गाडी सर्विसिंगसाठी घेऊन जायला सांगितले होते.   संध्‍याकाळी ड्रायव्‍हरने गाडी त्‍याचे घराजवळ पार्क करुन लॉक करुन ठेवली होती. परंतु दुस-या दिवशी ड्रायव्‍हर गाडीजवळ गेला असता त्‍याला पार्क केलेल्‍या ठिकाणी सदर गाडी आढळून आली नाही. म्‍हणून त्‍याने दि. 26/2/08 रोजी दादर पोलिस स्‍टेशनमध्‍ये जीप चोरी झाल्‍याबाबत फिर्याद नोंदविली. उरणहून मुंबईस जीप आणतेवेळी ड्रायव्‍हर बरोबर न्‍हावाशेवा येथील जे.एन.पी.टी. कंपनी उरण येथील श्री. नित्‍यानंद विश्‍वनाथ वेंगुर्लेकर हे अधिकारी होते. हे अधिकारी तक्रारकर्तीच्‍या ओळखीचे होते. सदर जीप चोरी झाल्‍याची माहिती तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षाला कळविली व वाहन चोरी झाल्‍याबद्दल नुकसान भरपाई दावा विरुध्‍दपक्षाकडे करताना आवश्‍यक ती सर्व कागदपत्रेही विरुध्‍दपक्षाकडे दाखल केली होती. परंतु विरुध्‍दपक्षाने दि. 26/9/07 रोजी एवढया प्रदीर्घ कालावधी नंतर तक्रारकर्तीचा विमा नुकसान भरपाईचा दावा तक्रारकर्तीने विमाच्‍या अटी व शर्तींचा भंग झाल्‍याने नामंजूर करण्‍यात आल्‍याचे कळविले. सदर वाहन तक्रारकर्ती व्‍यावसायिक वापरासाठी उपयोगात आणीत असल्‍याचा विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळण्‍यासाठी काढलेला निष्‍कर्ष सबळ कारणाच्‍या आधाराशिवाय काढलेला आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे हे वर्तन सेवेतील त्रुटी या सदरात मोडते.  त्‍यामुळे तक्रारकर्तीला ग्राहक मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. 
 
3.       चोरीस गेलेल्‍या जीपची किंमत रु. 4,15,200/- इतकी होती व तक्रारकर्तीने विम्‍याच्‍या प्रिमियम पोटी रक्‍कम रु. 16,729/- भरले होते. सदर वाहनाच्‍या खरेदीसाठी त्‍यांनी टाटा मोटर्स फायनान्‍स या कंपनीकडून वित्‍तीय सहाय घेतले होते. सदर कर्ज दरमहा रु. 12,800/- प्रमाणे फेडण्‍याचे असून त्‍यावर दर साल दर शेकडा 12 %  दराने व्‍याज आकारले जाणार होते. विरुध्‍दपक्षाने उचित वेळी नुकसान भरपाईची रक्‍कम न दिल्‍यामुळे तसेच विमा नुकसान दावा प्रदीर्घ विलंबाने नाकारल्‍याने तक्रारकर्तीला कर्ज रकमेवर दंड व्‍याज देखील भरावे लागत होते. त्‍यामुळे तक्रारकर्तीला फार मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून ज्‍या वित्‍तीय कंपनीकडून त्‍यांनी गाडी खरेदीसाठी कर्ज घेतले होते त्‍या कंपनीकडून सातत्‍याने कर्ज वसूलीसाठी वकीलांच्‍या नोटीसा येत असून त्‍या नोटीसींच्‍या खर्चाचा भार तक्रारकर्तीवर पडत होता. त्‍यामुळे त्‍याचा तक्रारकर्तीला फार मोठया प्रमाणात मानसिक त्रास होत होता. त्‍याचप्रमाणे विरुध्‍दपक्षाने उचित वेळेत त्‍यांना विमा नुकसानीचा दावा निकाली न काढल्‍याने जीपची विमा कराराप्रमाणे हानी रक्‍कम रु. 4,93,050/- विरुध्‍दपक्षाकडून मिळावे तसेच सदर रक्‍कम मुदतीत न मिळाल्‍याने तक्रारकर्ती हया कर्ज रकमेच्‍या फेडीमध्‍ये थकबाकीदार झाल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍यांना व्‍याज, दंडव्‍याज व अनुषंगिक खर्चापोटी रकमा भराव्‍या लागत आहेत‍. त्‍यामुळे त्‍यांना रु. 4,93,050/- वर दर साल दर शेकडा 12 %  दराने वित्‍तीय फायनान्‍स कंपनीकडून आकारले जाणारे व्‍याज व 2 % प्रमाणे दंड व्‍याज मिळावे. ही सर्व रक्‍कम विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीला द्यावी तसेच त्‍यांना झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु. 30,000/- मिळावे व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु. 20,000/- मिळावेत अशी तक्रारकर्तीची मंचाला विनंती आहे. 
 
4.       नि. 1 अन्‍वये तक्रारकर्तीने आपला तक्रार अर्ज दाखल केला आहे. नि. 2 अन्‍वये प्रतिज्ञापत्र , नि. 3 अन्‍वये परवानगी अर्ज, नि. 4 अन्‍वये तक्रारकर्ती तर्फे अ‍ड. डी.बी.वाडकर यांनी आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 5 वर तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांची यादी दाखल केली आहे. त्‍यात मुख्‍यतः  R.C. book,  विमा पॉलिसी व कव्‍हर नोट, बँकेचे हप्‍ते भरल्‍याचे स्‍टेटमेंट, ड्रायव्‍हरचे जबाबाची प्रत, प्रथम खबर (F.I.R.), मोटर फायनान्‍स कंपनीकडून आलेल्‍या नोटीसा, विमा दावा नाकारल्‍याचे पत्र इत्‍यादींचा समावेश आहे. नि. 8 अन्‍वये मंचाने विरुध्‍दपक्षाला नोटीस पाठवून आपला लेखी जबाब दाखल करण्‍याचे निर्देश दिले. त्‍या नोटीसीची पोच नि. 9 अन्‍वये अभिलेखात उपलब्‍ध आहे.
 
5.      नि. 10 अन्‍वये अड. आर.व्‍ही.ओक यांनी विरुध्‍दपक्षातर्फे आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 11 अन्‍वये पत्‍ता पुरसिस दाखल केली आहे. नि. 14 अन्‍वये विरुध्‍दपक्षाने आपला लेखी जबाब दाखल केला आहे. आपल्‍या लेखी जबाबात विरुध्‍दपक्ष असे म्‍हणतात की, सदरची विमा पॉलिसी ही प्रायव्‍हेट कार पॉलिसी पॅकेज बी प्रकारातील असून सदर पॉलिसी अंतर्गत वाहनाच्‍या भाडयाने अथवा व्‍यापारी उपयोगाकरीता विमा संरक्षण दिलेले नाही व तसे पॉलिसीमध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे. तक्रारकर्तीच्‍या ड्रायव्‍हरने दादर पोलिस स्‍टेशनला दिलेल्‍या (F.I.R.), मध्‍ये सदर जीप युनायटेड लायनर इं. प्रा.लि. यांचेकडे भाडयाने लावली आहे असे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे. घटनेच्‍या दिवशी देखील त्‍याने सदर गाडीचा वापर त्‍या कंपनीचे अधिका-यांना मुंबई येथे नेण्‍यासाठी केला असल्‍याचे नमूद केले आहे.   चौकशी अधिकारी मे. व्‍ही.बी.असोसिएटस यांनी दिलेल्‍या तपास अहवाल व तपासकामी गोळा केलेल्‍या कागदपत्रांवरुन तक्रारकर्ती ही श्री. रुपेश देवीदास भगत यांची बहीण आहे. श्री.भगत हे तक्रारकर्तीची जीप त्‍यांचे कामासाठी वापरीत असत. श्री. भगत हे मे.पी.डी.भगत अड. ब्रदर्सचे प्रोप्रायटर असून त्‍यांनी युनायटेड लायनर इं.प्रा.लि. या कंपनीकडे जीप भाडयाने देण्‍याचे कंत्राट घेतलेले आहे.  युनायटेड लायनर इं.प्रा.लि. कंपनीचे ऑफिसर श्री. प्रॅग्‍मासिओ अफोन्‍सो यांनी त्‍या कोटेशनची प्रत चौकशी अधिका-यांना दिलेली आहे. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीचे सर्व आरोप अमान्‍य केले असून विमा पॉलिसीच्‍या अ‍टी व शर्तींचा तक्रारकर्तीने जाणूनबुजून भंग केला आहे व म्‍हणून विरुध्‍दपक्षाची मंचाला विनंती आहे की, सदर तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
6.       दि. 7/7/2008 रोजी सदर तक्रार अंतिम सुनावणीस मंचासमोर आली असता तक्रारकर्ती व त्‍यांचे वकील, विरुध्‍दपक्षाचे वकील हजर होते. तक्रारकर्तीचे तर्फे त्‍यांचे वकीलांनी युक्‍तीवाद केला तसेच विरुध्‍दपक्षातर्फे त्‍यांचे वकीलांनी युक्‍तीवाद केला. मंचाने उभयपक्षांनी केलेला तोंडी व लेखी युक्‍तीवाद ऐकून घेतला व तक्रारीची सुनावणी अंतिम आदेशासाठी स्‍थगित केली.
7.       तक्रारकर्तीचा तक्रार अर्ज, दाखल दस्‍तऐवज, पुरावे, तसेच विरुध्‍दपक्षाचा लेखी जबाब यांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारीच्‍या निराकरणार्थ मंचाने खालील प्रमुख मुद्दे विचारात घेतले.
मुद्दा क्रमांक 1 :-             विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीला दिलेल्‍या सेवेला त्रुटीपूर्ण सेवा
                      असे संबोधता येईल काय ?
उत्‍तर          :-       होय. 
 
मुद्दा क्रमांक 2  :-      तक्रारकर्ती विरुध्‍दपक्षाकडून नुकसान भरपाई व न्‍यायिक
                      खर्च मिळण्‍यास पात्र आहेत काय ?
उत्‍तर          :-       अंतिम आदेशात नमूद केल्‍याप्रमाणे.
 
स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 1 :-        मुद्दा क्रमांक 1 बाबत मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने घेतलेले वाहन त्‍यांचे स्‍वतःचे उपयोगासाठी घेतले असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतु सदरच्‍या वाहनाच्‍या आर.सी.बुकाच्‍या प्रतीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीचा रहाण्‍याचा पत्‍ता भेडकल, ता. उरण, नवी मुंबई असा देण्‍यात आला आहे. परंतु सदर वाहनाच्‍या ड्रायव्‍हरने विरुध्‍दपक्षाला लिहिलेल्‍या पत्राच्‍या प्रतीवरुन असे दिसून येते की, सदर वाहन हे तक्रारकर्तीच्‍या भावाकडे न्‍हावाशेवा येथे ठेवले जात होते. तसेच दादर पोलिस स्‍टेशनमध्‍ये नोंदविल्‍या गेलेल्‍या प्रथम खबरी मध्‍ये सदर ड्रायव्‍हरने असे स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे की, सदर वाहन हे युनायटेड लायनर कंपनीकडे भाडयाने होती व ती गाडी मुंबई मधील वरळी भागात पार्क करुन ठेवण्‍यात येत असे. ज्‍या दिवशी वाहन चोरीस गेले त्‍या दिवशी देखील मुंबईस वाहन तक्रारकर्तीने म्‍हटल्‍याप्रमाणे सर्विसिंगसाठी पाठविण्‍यात आले होते. त्‍या दिवशी सुध्‍दा युनायटेड लायनर इं.प्रा.लि. कंपनीचे अधिकारी श्री. नित्‍यानंद वेंगुर्लेकर हे त्‍या गाडीने मुंबईला गेले होते. विरुध्‍दपक्षाने सदर वाहनाचा विमा हा वैयक्तिक वापरासाठीच उतरविलेला होता व ही विमा करारामधील प्रमुख अट असल्‍याचे आपल्‍या लेखी जबाबात म्‍हटले आहे.   त्‍यांच्‍या लेखी जबाबामध्‍ये त्‍यांनी प्रथम खबर (F.I.R.) चा मु्द्दा उपस्थित केला असून त्‍यांनी दाखल केलेल्‍या इनव्‍हेस्‍टीगेटरच्‍या अहवालामध्‍येही हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्‍यात त्‍यांनी सदर वाहन हे श्री. रुपेश भगत (तक्रारकर्तीचे भाऊ) जे मे. पी.डी.भगत या व्‍यवसायाचे मालक आहेत त्‍यांनी युनायटेड लायनर इं.प्रा.लि. कंपनीला भाडेतत्‍वावर दि. 8/12/05 रोजी देण्‍यात आले असल्‍याचे नमूद केले आहे. यावरुन तक्रारकर्ती सदर वाहन हे व्‍यावसायिक हेतूसाठी वापरीत असल्‍याचे कथन केले आहे.  यावरुन विरुध्‍दपक्षाने विम्‍याच्‍या प्रमुख अटी व शर्तींचा तक्रारकर्तीने भंग केल्‍याने त्‍यांचा दावा अमान्‍य केल्‍याने झालेल्‍या नुकसानीला विरुध्‍दपक्ष हे जबाबदार नाहीत म्‍हणून त्‍यांची तक्रार नामंजूर करावी असे म्‍हटले आहे. अभिलेखात दाखल असलेल्‍या दस्‍तऐवजांवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ती हया सदर वाहन हे व्‍यावसायिक हेतुसाठी वापरीत असल्‍याची सक्‍त शाबिती विरुध्‍दपक्षाला करता आलेली नाही असे मंचाचे मत आहे. विमा कंपनीने त्‍यांनी नेमलेल्‍या इनव्‍हेस्‍टीगेटरने दाखल केलेल्‍या पुरावे व इतर दस्‍तऐवजांवरुन हे शपथपत्राद्वारे दाखल केलेले नसल्‍याने ते पुरावा म्‍हणून वाचता येणार नाही. मा.ओरिसा उच्‍च न्‍यायालयाने आपल्‍या केस क्र. 2007 (4) T.A.C. 372 (Ori.)Divisional Manager, Oriental Insurance Co. Ltd., V/s. Iswar Mohapatra alias Nayak and Othersमध्‍ये असे म्‍हटले आहे की, विमा कंपनीचा इनव्‍हेस्‍टीगेटर/सर्व्‍हेअरने दाखल केलेले दस्‍तऐवज पुरावा म्‍हणून मानता येत नाहीत. तसेच विमा कंपनीने सदर वाहन ड्रायव्‍हरचा जबाब हा सबळ पुरावा हा  “ सदर वाहन भाडयाने दिले जात होते हा पुरावा प्रमुख मानला. परंतु ड्रायव्‍हरला वाहन मालकाच्‍या इतकी सर्व व्‍यवहारांची माहिती असल्‍याचे गृहित धरता येणार नाही. शिवाय गाडी ज्‍यावेळी व ज्‍या ठिकाणाहून चोरीस गेली त्‍यावेळी तिचा ताबा ड्रायव्‍हरकडेच होता. त्‍याशिवाय तक्रारकर्तीने खालील प्रमाणे काही निवाडे दाखल केले आहेत. त्‍याचा मंचाने आधार घेतला आहे.
2007 (3) 163 CPR  The Branch Manager, National Insurance Co. Ltd., V/s. Mr. Sardar Lachmansingh  या निवाडयात मा. राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी खालील प्रमाणे नमूद केले आहे.
                                                     IMPORTANT  POINT
---- “ When insurance company repudiates the claim ground of breach of policy condition, burden lies on insurance company to prove the same.” -----
 
तसेच मा. ओरिसा राज्‍य आयोग यांनी दिलेल्‍या निवाडयात खालील प्रमाणे नमूद केले आहे.
2001 (2) CPR 503 Bikram Keshari Singh V/s. Oriental Insurance Co. Ltd., and others  
---- “ If the vehicle was hired in violation of the conditions of the R.C. or any law it is for the driver/owner to be proceeded under the law. But that, would not be a cogent reason not to satisfy the claim under the policy if the vehicle in fact is lost or is the subject matter of theft etc. ”-----
        
         मा. ओरिसा उच्‍च न्‍यायालयाच्‍या 2007 (4) T.A.C. 372 (Ori.)Divisional Manager, Oriental Insurance Co. Ltd., V/s. Iswar Mohapatra alias Nayak and Others यानिवाडयाप्रमाणे ,   ---- “ The Tribunal rightly did not take note of the said documents, (papers submitted by insurance company of their investigator)and refused to admit the same into evidence. ”-----
 
13.   In the case in hand, the vehicle has been snatched or stolen. In the case of theft of vehicle breach of condition is not germane. The appellant Insurance Company is liable to indemnify the owner of the vehicle when the insurer has obtained comprehensive policy for the loss caused to the insurer. The respondent submitted that even assuming that there was a breach of condition of the insurance policy, the appelant Insurance Company ought to have settled the claim on non-standard basis. The Insurance Company cannot repudiate the claim in toto in case of loss of vehicle due to theft.
 
         वरील सर्व मुद्यांचा साकल्‍याने विचार करता मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होय असे आहे असे मंचाचे मत आहे.
 
स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्रमांक 2  :-               मुद्दा क्रमांक 2 बाबत मंचाचे असे निदर्शनास येते की, आतापर्यंत सदर तक्रारीमध्‍ये दाखल केलेल्‍या निवाडयांचा विचार करता विरुध्‍दपक्ष हे तक्रारकर्तीने विमा पॉलिसीच्‍या प्रमुख अटी व शर्तींचा भंग केल्‍याची सक्‍त शाबिती करु शकलेले नाहीत. हे विचारात घेता मंच या निष्‍कर्षाप्रत आला आहे की, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीला मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या उपरोक्‍त निवाडयाप्रमाणे चोरीस गेलेल्‍या वाहनाची रक्‍कम रु. 3,70,000/- (वाहनाच्‍या रकमेच्‍या 75%) “ Non Standard Claim ” रक्‍कम द्यावी. सदर वाहन हे दि. 26/2/06 रोजी चोरीस गेले परंतु विरुध्‍दपक्षाने दि. 26/9/07 रोजीच्‍या पत्राने तक्रारकर्तीला त्‍यांचा विमा दावा नामंजूर केल्‍याचे पत्राने कळविले. इतक्‍या प्रदीर्घ विलंबाने म्‍हणजे सुमारे 11/2 वर्षांनी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीला विमा दावा नामंजूर केल्‍याचे कळविले म्‍हणून सदर रकमेवर रक्‍कम देईपर्यंत दि. 26/2/06 पासून दर साल दर शेकडा 6 % दराने तक्रारकर्तीला व्‍याजासहीत द्यावेत असे मंचाचे मत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी रु. 10,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु. 5,000/- द्यावेत असे मंचाचे मत आहे. 
         सबब, आदेश पारीत करण्‍यात येतो की,
                       -:  अंतिम आदेश  :-
आदेश पारीत तारखेच्‍या 45 दिवसांचे आत विरुध्‍दपक्षाने खालील आदेशाचे पालन करावे.
1.     वाहनाच्‍या नुकसानापोटी रक्‍कम रु. 3,70,000/- (रु. तीन लाख सत्‍तर हजार) दर साल दर शेकडा 6 % दराने दि. 26/2/06 पासून ते रक्‍कम अदा करेपर्यंत द्यावेत.
2.     मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु. 10,000/- (रु. दहा हजार मात्र) व न्‍यायिक खर्चापोटी रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) द्यावेत.
3.   उपरोक्‍त आदेशाचे पालन विहीत मुदतीत विरुध्‍दपक्षाने न केल्‍यास तक्रारकर्तीला उपरोक्‍त कलम 1 मधील रक्‍कमेवर ती रक्‍कम वसूल होईपर्यंत दर साल दर शेकडा 6 % दराने वसूल करण्‍याचा अधिकार राहील. तसेच कलम 2 व 3 मधील रकमा वसूल करण्‍याचा अधिकार राहील.
4.       या आदेशाच्‍या सत्‍यप्रती नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्‍यात याव्‍यात.
दिनांक :-    18/7/2008.
ठिकाण :- रायगड अलिबाग.
 
 
 
 (बी.एम.कानिटकर)            (आर.डी.म्‍हेत्रस)           (ज्‍योती अभय मांधळे)
      सदस्‍य                     अध्‍यक्ष                     सदस्‍या
               रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.