::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 21/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, त्याचे पती मय्यत श्री. राजु नागो बोधाने याच्या मालकीचे मौजा दादापूर ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे शेतीची जमिन आहे. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्यांचे कुटुंबाचे पालनपोषण शेतीच्या उत्पन्नावर करीत होते. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे पती दि. 7/6/12 रोजी मिञासोबत मोटारसायकलवर मागे बसून जात असतांना टाटा सुमोने धडक दिल्याने जखमी होवून मृत्यु पावले. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 2 व 3 मार्फत गैरअर्जदार क्रं. 1 कडून महाराष्ट्र शासनाचे शेतकरी अपघातविमा योंजने अंतर्गत अर्जदाराचे पतीचे शेतकरी विमा उतरविण्यात आले होते. अर्जदाराचे मृत्यु झाल्यानंतर दि. 4/9/12 रोजी अर्जदाराने रितसर दस्ताऐवजाची पुर्तता करुन गैरअर्जदाराकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा क्लेम सादर केला. दि. 1/11/12 रोजी अर्जदाराचे पतीचा वाहन परवाना नसल्यामुळे अर्जदाराचा विमा दावा नाकारण्यात आले असे अर्जदाराला पञाव्दारे कळविण्यात आले. अर्जदाराचे पती अपघाताच्या वेळी मोटार सायकलवर मागे बसल्यामुळे वाहन परवानाची आवश्यकता नव्हती तरी सुध्दा गैरअर्जदाराने त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा फेटाळून अर्जदाराप्रति सेवेत ञुटी दिली आहे सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम 1,00,000/- रु. व्याजासह देण्याचे आदेश दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 हे हजर होवून त्यांनी नि. क्रं. 17 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे मृतक पती विनापरवाना गेअर असलेली मोटार सायकल चालवित होता अशा परिस्थितीत अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार कंपनीचे शर्ती व अटीचे उल्लंघन केले आहे. याच कारणाने गैरअर्जदार क्रं. 1 कंपनीने अर्जदाराचा विमा दावा फेटाळून कोणतीही चूक केलेली नाही. अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार क्रं. 1 चे विरुध्द केलेले आरोप हे खोटे असून नाकबुल केले आहे. सबब अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार क्रं. 3 ने लेखीउत्तर नि. क्रं. 7 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 3 ने लेखीउत्तरात असे सांगितले आहे कि, अर्जदाराने सादर केलेला विमा क्लेम मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर येथे 90 दिवसाचे आत सादर केलेला आहे.
गैरअर्जदार क्रं. 2 ने त्याचे लेखीउत्तर नि. क्रं. 24 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 2ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 2 राज्य शासन किंवा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेतला नाही तसेच कोणतेही विमा प्रिमियम घेतले नाही. अर्जदाराचा विमा क्लेम जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यामार्फत गैरअर्जदार क्रं. 2 चे नागपूर कार्यालय येथे प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्रं. 1 कडे पाठविण्यात आले व गैरअर्जदार क्रं.1 ने सदर विमा दावा दि. 1/11/12 ला नामंजूर करुन पञाव्दारे अर्जदाराला कळविण्यात आले.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदारांचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय
(3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराचे पती मय्यत श्री. राजु नागो बोधाने याच्या मालकीचे मौजा दादापूर ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे शेतीची जमिन आहे. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्यांचे कुटुंबाचे पालनपोषण शेतीच्या उत्पन्नावर करीत होते. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 मार्फत गैरअर्जदार क्रं. 1 कडून महाराष्ट्र शासनाचे शेतकरी अपघातविमा योंजने अंतर्गत अर्जदाराचे पतीचे शेतकरी विमा उतरविण्यात आले होते. अर्जदार ही तीचे पती मय्यत श्री. राजु नागो बोधाने यांची वारसदार आहे ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराचे मय्यत पती श्री. राजु नागो बोधाने हे दि. 7/6/12 रोजी मोटारसायकल विना वाहन परवाना शिवाय चालवित होते ही बाब गैरअर्जदार क्रं. 1 ने सिध्द करायचे होते परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने या संदर्भात कोणतेही दस्ताऐवज किंवा साक्षिदार मंचासमक्ष सादर केलेला नाही याउलट अर्जदाराचे असे म्हणणे कि, मय्यत राजु नागो बोधाने घटनेच्या दिवशी मोटार सायकलवर मागे बसलेले होते असे ग्राहय धरुन मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराचा विमा दावा कोणत्याही ठोस कारणाशिवाय नाकबुल करुन अर्जदाराप्रति न्युनतम सेवा दिली आहे असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 ने महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेच्या अंतर्गत शेतक-यांचा विमा काढण्याकरीता सहायता केली व कोणताही मोबदला घेतला नसून गैरअर्जदार क्रं. 2 व 3 च्या विरुध्द कोणताही आदेश पारीत करता येत नाही.मुद्दा क्रं. 1 ते 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशत मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रु.
1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(3) गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराला, अर्जदारास झालेल्या शारीरिक मानसिक
ञासापोटी रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2,500/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करुन दयावे.
(4) गैरअर्जदार क्रं. 2 व 3 च्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
(5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/01/2015