जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 8/2017 तक्रार नोंदणी दि. :- 10/4/2017
तक्रार निकाली दि. :- 14/7/2017
निकाल कालावधी :- 3 महिने 4 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.आबाजी कान्हु सुर्जागडे,
वय 48 वर्ष, व्यवसाय – शेती,
रा.जाम तुकूम, ता.पोंभुर्णा, जि.चंद्रपूर.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.130800, न्यु इंडिया
सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,
मुंबई-400 001.
(2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स,
नागपूर-440018.
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री.रमाकांत इंगळे
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 14 जुलै 2017)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दिनांक 10.4.2017 ला गैरअर्जदाराविरुध्द दाखल केली.
सदर प्रकरण या मंचामध्ये सुरु असतांना आज दिनांक 14.7.2017 रोजी मंचासमोर सुनावणीकरीता आले असता अर्जदार व गैरअर्जदार यांनी संयुक्त पुरशिस दाखल करुन अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात आपसी समझौता झाला असून, त्यानुसार गैरअर्जदार अर्जदारास रुपये 1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्याचे तारखेपासून 60 दिवसांचे आंत विद्यमान मंचात जमा करेल, असे कथन पुरशिसमध्ये केले. तसेच, गैरअर्जदार यांनी 60 दिवसांचे आंत रक्कम जमा न केल्यास, गैरअर्जदार द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास पात्र राहील. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये आपसी समझौता दोन्ही पक्षांना मान्य आहे, असेही कथन पुरशिसमध्ये केलेले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात आपसी समझौता झालेला असल्यामुळे, सदर प्रकरण पुढे चालविणे योग्य नाही, असे या मंचाचे मत आहे. सबब, सदर प्रकरण निकाली काढण्यात येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
प्रकरण नस्तीबध्द करण्यात येत आहे.
(2)
गडचिरोली.
दिनांक – 14.7.2017.