जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 36/2016 तक्रार नोंदणी दि. :- 15/6/2016
तक्रार निकाली दि. :- 27/10/2016
निकाल कालावधी :- 4 म.12 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्रीमती सुनिता किशोर मोगरे,
वय 40 वर्षे, व्यवसाय-घरकाम,
रा.मार्कंडादेव, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.130800, न्यु इंडिया
सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,
मुंबई-400 001.
(2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स,
नागपूर-440018.
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री.राजेश ठाकूर व अन्य
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- गैरहजर
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 27 ऑक्टोंबर 2016)
तक्रारकर्तीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री.किशोर दिनकर मोगरे हे दि.7.9.2013 रोजी विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यु पावले. शासनातर्फे तक्रारकर्तीचे पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने तक्रारकर्ता मृत शेतक-याची वारसदार म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होती. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत दि.17.2.2014 ला रितसर अर्ज केला, तथापि, गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 15.12.2014 रोजी तक्रारर्तीचा दावा ‘अपघातग्रस्ताच्या शल्यविश्लेषण अहवालानुसार मृत्युचे कारण राखून ठेवलेले आहे व व्हिसेरा रिपोर्टनुसार मृतकाच्या शरीरात विष नाही तर मृत्युचे कारण शल्यविश्लेषण ज्या दवाखान्यात झाले त्याच्याकडून न दिल्याने हा दावा नामंजूर करण्यात येत आहे’’ या शे-यानिशी फेटाळला. वास्तविक, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु विषबाधेने झाला नसून पाण्यात बुडून झाला आहे व सर्व पोलीस पेपर्समध्येही मृत्युचे कारण विहिरीच्या पाण्यात बुडून असे दिले आहे, असे असतांनाही गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा दावा फेटाळन फसवणूक केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा फेटाळून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.17.2.2014 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 11 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार लेखी उत्तर दाखल केले व गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्द लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 मार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात. मात्र, गैरअर्जदार क्र.3 तर्फे अर्जदाराच्या पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा उतरविला होता, हे अमान्य आहे. याबाबत वाद नाही की, रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्ताऐवज दिल्यानंतरही गैरअर्जदार क्र.1 ने 15.12.2014 रोजी तक्रारकर्तीचा दावा ‘अपघातग्रस्ताच्या शल्यविश्लेषण अहवालानुसार मृत्युचे कारण राखून ठेवलेले आहे व व्हिसेरा रिपोर्टनुसार मृतकाच्या शरीरात विष नाही तर मृत्युचे कारण शल्यविश्लेषण ज्या दवाखान्यात झाले त्याच्याकडून न दिल्याचे हा दावा नामंजूर करण्यात येत आहे’’ हया शे-याने फेटाळला. गैरअर्जदार क्र.1 यांनी, विशेष कथनामध्ये असे नमुद केले की, अर्जदार यांनी दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्युचे नेमके कारण नमुद केलेले नाही व वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी यांनी मृत्युचे नेमके कारण देण्याकरीता मृतकाचा व्हिेसेरा रासायनिक विश्लेषनाकरीता पाठवून अहवाल मागितला असता कुठलेही विष निष्पन्न न झाल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा दावा फेटाळला. तसेच, दिनांक 6.8.2014 चे पत्राप्रमाणे अपघातग्रस्ताची जुने फेरफार नोंदवही, फेरफार पत्रक व सहा-ड ची मागणी करुनही अर्जदाराने सादर न केल्याने दावा नामंजूर झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराचे पती हे शेतीचा व्यवसाय करीत होते व शेतातील उत्पन्नावर कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्र.2 वरील दस्तऐवजावरुन सिध्द होते. शासनातर्फे काढण्यात येणा-या शेतकरी अपघात विमा योजनेची शेतक-याच्या अपघाती मृत्युनंतर अर्जदार ही लाभार्थी असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने दाखल केलेले लेखी युक्तीवाद तसेच तोंडी युक्तीवादावरुन हे म्हणणे की, अर्जदाराने दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्युचे नेमके कारण नमुद केलेले नाही, या कारणावरुन दावा फेटाळण्यात येत आहे.परंतु, नि.क्र.2 वर अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र.6 वरुन निदर्शनास येते की, मयत शेतक-याचा मृत्यु हा पाण्यात बुडुन झालेला आहे. तसेच, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुध्दा पोटात पाणी भरुन असल्याचे नमुद असल्यामुळे शेतक-याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असावा, हे नाकारता येत नाही.
गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, अर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे दस्तऐवज पुरविले नाही, हे गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राहय धरण्यासारखे नाही. कारण, गैरअर्जदाराने तशी मागणी केलेले कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. तसेच, अर्जदाराने दावा विहित कालावधीत दाखल केलेला असल्यामुळे उशीराचे कारणही ग्राहय धरता येत नाही. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचा दावा नामंजूर करुन अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दती व न्युनतापुर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे, मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. वरील विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- प्रस्ताव दाखल केल्यापासून म्हणजेच दिनांक 17.02.2014
पासून, द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह, आदेशाची प्रत मिळाल्यापासून
45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 27.10.2016.
(सादिक मो.झवेरी) ( रोझा फु.खोब्रागडे )
सदस्य अध्यक्ष (प्र.)