::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 18/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे पती पुरुषोत्तम हरबाजी लाडे यांची तालुका नागभिड जिल्हा चंद्रपूर येथे सर्व्हे क्रं. 140 ही शेतजमीन आहे व ते शेतीचा व्यवसाय करीत होते. त्या शेतातील उत्पन्नावर अर्जदाराचे पती कुटूंबाचे पालन पोषण करीत होते. म्हणजे थोडक्यात शेतकरी होते. अर्जदाराचे पती शेतकरी असून गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून गैरअर्जदार क्रं. 3 च्या मार्फत शासनाच्या वतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा अंतर्गत विमा काढण्यात आला होता. अर्जदाराचे पती दि. 25/09/12 रोजी त्यांची ओमीनी गाडी रेल्वे क्रॉसीगवरुन येत असतांना रेल्वे गाडी रेल्वे गाडीशी टक्कर झाल्याने घटनास्थळीच मृत्यु झाला. अर्जदाराचे पती शेतकरी असल्याने सदर विमा योजनेच्या अंतर्गत दि. 22/11/12 ला अर्जदाराने गैरअर्जदारांकडे रितसर दस्ताऐवजासोबत विमा क्लेमचा अर्ज केला. गैरअर्जदार क्रं. 1 ने दि. 11/12/13 ला अर्जदाराचे पती आपले वाहन निष्काळजी पणे चालविल्यामुळे अपघात झाला म्हणून अर्जदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला असे पञाव्दारे कळविले. गैरअर्जदाराने अर्जदाराचे विमा क्लेमला नाकारुन अर्जदाराचे प्रति सेवेत ञुटी व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली असून सदर तक्रार अर्जदाराने मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे हजर होवून नि. क्रं. 11 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप हे सर्व खोटे असून नाकबुल आहे. अर्जदाराचे पतीने ओमीनी गाडी रेल्वे क्रॉसिंगवरुन निष्काळजीपणे व बेजबाबदारीने नेवून स्वतः अपघात कारण घडलेले आहे. वास्तविक करारातील अट क्रं. 3 अपवादमधील अनुक्रमांक 2 व 12 अनुसार अर्जदाराचे पतीचा अपघात हा ‘’ अपवाद ‘’ या संज्ञेत मोडत असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा योग्य व कायदेशिर कारणाकरीता फेटाळला आाहे. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच गैरअर्जदार क्रं. 3 हजर होवून आपले लेखीउत्तर हे नि. क्रं.12 नुसार दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 3 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराचा विमा अर्ज गैरअर्जदार क्रं. 3 नी गैरअर्जदार क्रं. 1व 2 कडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची छानबिन विमा कंपनी करते व त्याचा विमा मंजूर करण्याचा अधिकार विमा कंपनीकडे असून व गैरअर्जदार क्रं. 3 ला विमा प्रस्ताव संदर्भात कोणताही अधिकार नाही आहे. सबब माहीती करीता लेखीउत्तर दाखल.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदारांचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराचे पती पुरुषोत्तम हरबाजी लाडे यांची तालुका नागभिड जिल्हा चंद्रपूर येथे सर्व्हे क्रं. 140 ही शेतजमीन आहे व ते शेतीचा व्यवसाय करीत होते. त्या शेतातील उत्पन्नावर अर्जदाराचे पती कुटूंबाचे पालन पोषण करीत होते. म्हणजे थोडक्यात शेतकरी होते. अर्जदाराचे पती शेतकरी असून गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून गैरअर्जदार क्रं. 3 च्या मार्फत शासनाच्या वतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा अंतर्गत विमा काढण्यात आला होता ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 1 वर दस्त क्रं. 5 ते 7 व नि. क्रं. 20 वर दाखल महाराष्ट्र शासनाचे निर्णय वरुन सिध्द होत आहे. अर्जदार ही मय्यतची पत्नी असून व त्याची वारसदार असून गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ची ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराची तक्रार व गैरअर्जदाराचे जवाबाची पडताळणी करतांना असे दिसले कि, दोघाही पक्षांना ही बाब मान्य आहे कि अर्जदाराचे पती दि. 25/09/12 रोजी त्यांची ओमीनी गाडी रेल्वे क्रॉसीगवरुन येत असतांना रेल्वे गाडी रेल्वे गाडीशी टक्कर झाल्याने घटनास्थळीच मृत्यु झाला.
मा.ग्राहक राज्य आयोग, मुंबई यांनी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार
BEFORE THE HON'BLE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL | COMMISSION, MAHARASHTRA, MUMBAI |
|
|
Complaint Case No. CC/01/326 Smt. Mangal Ramesh Sontakke and others V/s. National Insurance Co. Ltd. Pronounced on 8th September, 2011 |
|
|
Unfortunately on 26.10.1999 said Ramesh Ramchandra Sontakke suddenly died due to dash given by railway engine and claim was lodged through the Society forwarding all the requisite documents. Opponent Insurance Company repudiated the claim by letter dated 18.08.2000 on the ground that deceased was walking on railway track which was a trespass on railway property and therefore, it is criminal act. It was not on account of accident as alleged by the Complainants.
All these facts clearly support Complainant’s contention that Ramesh Ramchandra Sontakke who was husband of Complainant No.1 and father of Complainant Nos.2 and 3 had died due to accidental death and it was not criminal act as mentioned by Insurance Company in its letter dated 18.08.2000. We are finding that despite there being accidental insurance cover given to the Complainant through Pune District Central Co-operative Bank Ltd., the claim was erroneously rejected by National Insurance Company on flimsy grounds. If a person is walking along the railway track and he is given dash by moving railway engine that cannot be a criminal act on the part of a person moving along the railway line. No criminal act is involved. The Insurance Company had not registered any offence under Indian Railway Act against the deceased and therefore, on that ground insurance Company cannot be permitted to say that it was not an accidental death but it was death due to criminal act of the deceased himself. There is no merit in the contention made in that behalf by Advocate Mr.Milind Mahajan, for the Opponent Insurance Company.
It is pertinent to note that Janata Personal Accident Group Insurance Policy or conditions were not circulated individually to the persons. Conditions were only known to Pune District Central Cooperative Bank Ltd. and not to anybody else. Insurance Company has failed to establish that these conditions were directly delivered to said Ramesh Ramchandra Sontakke when he was covered under the policy. If the conditions were not circulated to the person who is likely to be affected for those conditions then insurance company cannot be heard to say that those conditions are binding on him or his relatives who had lodged claim for insurance amount.
In any view of the matter, we are of the view that the Complainants are legal heirs of deceased Ramesh Ramchandra Sontakke, have been unnecessarily deprived of the benefits of policy available to Ramesh Ramchandra Sontakke who had died in an accident which was pure and simple. He was given dash by the railway engine and he died after sustaining head injury. So, this was purely an accidental death and for accidental death he was covered under Janata Personal Accident Group Insurance Policy
सदर प्रकरणात सुध्दा गैरअर्जदाराने मंचासमक्ष कोणतेही साक्षि पुरावा वरुन हे सिध्द करु शकले नाही कि, अर्जदाराचे पती रेल्वे क्रॉसिंग करते वेळी बेजबाबदार होते व त्यांच्या निष्काळजीपणामुळे स्वतः अपघातास कारण ठरले. तसेच अर्जदाराचे पती शेतकरी असल्यामुळे त्यांचे शासनाचे वतीने गैरअर्जदाराकडून शेतकरी अपघात विमा काढण्यात आला होता व त्यासंदर्भात अर्जदाराचे पतीला कोणतेही शर्त व अटीचे कागदपञ पुरविण्यात आले नव्हते सबब वरील नमुद असलेल्या न्यायनिर्णयाचा आधार घेतांना मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचा विमा क्लेम नाकारुन अर्जदाराप्रति न्युनतापूर्ण सेवा दर्शविली आहे व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
7
. गैरअर्जदार क्रं. 3 ने महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेच्या अंतर्गत शेतक-यांचा विमा काढण्याकरीता सहायता केली व कोणताही मोबदला घेतला नसून गैरअर्जदार क्रं. 3 च्या विरुध्द कोणताही आदेश पारीत करता येत नाही. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशत मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रु.
1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला, अर्जदारास झालेल्या शारीरिक मानसिक
ञासापोटी रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2,500/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करुन दयावे.
(4) गैरअर्जदार क्रं. 3 च्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
(5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 18/12/2014