Maharashtra

Gadchiroli

CC/29/2016

Shikha Sukdeo Sarkar - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Limited Through Divisional Manager, Mumbai & Other 2 - Opp.Party(s)

Shri.Uday P. Kshirsagar

23 Sep 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/29/2016
 
1. Shikha Sukdeo Sarkar
At- Bahadurpur, Tah - Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Company Limited Through Divisional Manager, Mumbai & Other 2
Divisional Office No. 130800, New India Center, 7th Floor, 17-A, Cooprej Road, Mumbai - 400001
Mumbai
Maharashtra
2. The New India Assurance Company Limited Through Regional Manager
M.E.C.L. Complex, Seminary Hills, Nagpur - 440018
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krishi Adhikari, Chamorshi
At-Post-Tah- Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Sep 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, गडचिरोली

 

ग्राहक तक्रार क्रमांक :-  29/2016            तक्रार नोंदणी दि. :-24/5/2016

                        तक्रार निकाली दि. :- 23/09/2016

                                          निकाल कालावधी :-  4 महिने

 

अर्जदार/तक्रारकर्ता      :-    श्रीमती शिखा सुकदेव सरकार,

                              वय 32 वर्षे, व्‍यवसाय-घरकाम, 

                              रा.बहादुरपूर, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.

                       

                        - विरुध्‍द -

गैरअर्जदार/विरुध्‍दपक्ष   :-   (1) द न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

   तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर,

         डिव्‍हीजनल ऑफीस नं.130800, न्‍यु इंडिया

   सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,

   मुंबई-400 001.

(2) द न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

   तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,

    एम.ई.सी.एल.कॉम्‍प्‍लेक्‍स, सेमिनरी हिल्‍स,

    नागपूर-440018.

(3)  तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,

     तालुका चामोर्शी, जिल्‍हा गडचिरोली.

                               

अर्जदार तर्फे वकील                :-  अधि.श्री.उदय क्षिरसागर    

गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील   :-    अधि.श्री.रमाकांत इंगळे

गैरअर्जदार क्र.3 तर्फे               :-   स्‍वतः

 

गणपूर्ती         :-    (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्‍यक्ष (प्र.)

                                      (2) श्री सादिक मो‍हसिनभाई झवेरी, सदस्‍य

 

आ दे श  -

(मंचाचे निर्णयान्‍वये, रोझा फु.खोब्रागडे, अध्‍यक्ष (प्र.))

(पारीत दिनांक : 23 सप्‍टेंबर 2016)

                                      

                              तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.          तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री. सुकदेव सत्‍येन सरकार हे दि.1.8.2012 रोजी विहिरीत पडून मृत्‍यु पावले.  शासनातर्फे तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्‍याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 व 2  कडून रुपये 1,00,000/- च्‍या विमा रकमेसाठी पाञ होती.  अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने गैरअर्जदार क्र.3  कडे विमा योजने अंतर्गत दि.13.10.2015 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्‍या दस्‍ताऐवजाची पुर्तता केली.  रितसर अर्ज केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्ती महिलेच्‍या पतीच्‍या दाव्‍याबाबत काही कागदपत्रे मागितले, परंतु सर्व कागदपत्रे देऊनही काहीही न कळविल्‍याने गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवला.  गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. शासनाने ज्‍या उद्देशाने मृत शेतक-याच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्‍ये ञृटी केली. त्‍यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि.13.10.2015 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली.

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3  हे अनुपस्थित राहीले.

 

3.          गैरअर्जदार क्र.1 व 2 ने  नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्‍यांना नाकबूल आहे.  गैरअर्जदाराने पुढे त्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक 1.8.2012 ला झाला व नियमाप्रमाणे तक्रार ही तालुका कृषि अधिका‍-याकडे मदुतीत उाखल करावयास पाहिजे होती. अर्जदाराने उपरोक्‍त तक्रार दिनांक 13.10.2015 ला म्‍हणजेच तीन वर्षे दोन महिने उशिराने दाखल केली. तक्रारकर्तीने मुंबई येथील ग्राहक तक्रार निवारण मंच येथे याअगोदरच तक्रार दाखल केली असून एकाच कारणासाठी तक्रारकर्तीस दुसरी तक्रार दाखल करण्‍याचा कायदेशिर अधिकार नाही. या कारणासाठी तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ची विमा सल्‍लागार कंपनी कबाल इन्‍शुरन्‍स यांना गैरअर्जदार म्‍हणून तक्रारीत जोडले नाही, या कारणास्‍तव सुध्‍दा तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच, तक्रारकर्तीने दाखल केलेले पोलीस कागदपत्र खोटे व बनावटी असून, पोलीस पेपरमध्‍ये अज्ञात व्‍यक्‍ती म्‍हणून नमुद असून, अर्जदाराने लाश पावती किंवा कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही व अन्‍य वारसांचे नांव तक्रारीत नमुद केलेले नाही. तक्रारकर्ती हिने दाखल केलेल्‍या 7/12    उता-यामध्‍ये कमीत कमी 8-10 लोकांची नावे आहे व मृतक हा शेती करीत नसून भोपाळ येथे राहत होता. या सर्व कारणाने अर्जदाराची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

4.          अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ, तोंडी व लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                       :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार ही गैरअर्जदाराचे विमा योजनेची लाभार्थी आहे काय ?     :  होय

2)    गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण         :  होय

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ    :   होय

मिळण्‍यास पाञ आहे काय ?

4)    आदेश काय ?                                       :अंतिम आदेशाप्रमाणे 

                                                      

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-    

 

5.    तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्तीचे पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, ही बाब गैरअर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.2 वरील दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते. शासनातर्फे काढण्‍यात आलेलया ‘शेतकरी अपघात विमा योजना’ ची शेतक-याच्‍या अपघाती मृत्‍युनंतर  अर्जदार ही त्‍या विमा योजनेची लाभार्थी असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 ची ग्राहक आहे. म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

 

मुद्दा क्रमांक 2  बाबत :-   

 

6.    गैरअर्जदार क्र.1 चे लेखी उत्‍तरात तसेच लेखी व तोंडी युक्‍तीवादामध्‍ये असे म्‍हणणे होते की, तक्रारकर्तीने तक्रार वेळेवर दाखल केलेली नाही, हे गैरअर्जदारांचे म्‍हणणे गृहीत धरण्‍यासारखे नाही, कारण शासनाच्‍या सदर योजनेची माहिती अर्जदारास उशिरा मिळाली. अर्जदार ही दुर्गम भागातील व अशिक्षित असल्‍यामुळे, तिला योजनेच्‍या कोणत्‍याही अटी व शर्तींची माहिती नसावी व शासनातर्फे योजनेची माहिती देण्‍याचे काम व्‍यवस्थित न झाल्‍यामुळे अर्जदार वेळेवर अर्ज करु शकली नसावी, त्‍यामुळे, या कारणाने दावा फेटाळणे चुकीचे आहे.

 

 

गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे की, सदर दाव्‍यात अर्जदाराने मृतकाचे दाखल

केलेले कागदपत्र खोटे व बनावटी आहे. परंतु, अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज व पोस्‍टमॉर्टेम रिपोर्टवरुन हे निदर्शनास येते की, गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे चुकीचे आहे व गैरअर्जदाराने अर्जदाराचे दस्‍तऐवज बनावट असल्‍याचे फक्‍त कथन केले आहे, त्‍याबाबत कुठलेही पुरावे किंवा साक्ष दाखल केलेली नाही. म्‍हणून साक्ष व पुराव्‍याअभावी गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा नाकारुन न्‍युनतापुर्ण सेवा दिली आहे, हे सिध्‍द होते. म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-    

 

7.    वरील विवेचनावरुन व शासनाच्‍या परिपत्रकावरुन अर्जदार ही या योजनेची लाभार्थी आहे, असे गृहित धरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

       - अंतिम आदेश

 

(1)

 

(2)

             1,00,000/- दिनांक 13.10.2015 पासून,  द.सा.द.शे. 9 टक्‍के

             व्‍याजासह, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांत द्यावे.

 

(3)

    त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची

    प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांत द्यावे.

 

(4)

 

(5)

 

गडचिरोली.

दिनांक –  23.9.2016.

 

 

 

 

        (सादिक मो.झवेरी)                             ( रोझा फु.खोब्रागडे ) 

            सदस्‍य                                      अध्‍यक्ष (प्र.)  

 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.