जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 26/2016 तक्रार नोंदणी दि. :-24/5/2016
तक्रार निकाली दि. :-23/09/2016
निकाल कालावधी :- 4 महिने
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्रीमती हेमलता मुरलीधर येरेवार,
वय 33 वर्षे, व्यवसाय-घरकाम,
रा.पेठ(नवेगांव),पो.घोट, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.130800, न्यु इंडिया
सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,
मुंबई-400 001.
(2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स,
नागपूर-440018.
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री.रमाकांत इंगळे
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु.खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.))
(पारीत दिनांक : 23 सप्टेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री. मुरलीधर लचमा येरेवार हे दि.7.10.2011 रोजी ट्रॅक्टर मधून प्रवास करीत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने मृत्यु पावले. शासनातर्फे तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होती. अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत दि.24.2.2012 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. रितसर अर्ज केल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्ती महिलेच्या पतीच्या दाव्याबाबत काही कागदपत्रे मागितले, परंतु सर्व कागदपत्रे देऊनही काहीही न कळविल्याने गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवला. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.24.2.2012 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 7 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 हे अनुपस्थित राहीले.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 7.10.2011 ला झाला व नियमाप्रमाणे तक्रार ही तालुका कृषि अधिका-याकडे मुदतीत दाखल करावयास पाहिजे होती. अर्जदाराने कृषि अधिका-याकडे उपरोक्त तक्रार 90 दिवसांचे आंत दाखल करावयास पाहिजे होती, परंतु अर्जदाराने तक्रार उशिराने दाखल केली व उशिराने तक्रार दाखल करण्याबाबत कोणतेही कारण दिलेले नाही. तक्रारकर्तीने मुंबई येथील ग्राहक तक्रार निवारण मंच येथे याअगोदरच तक्रार दाखल केली असून एकाच कारणासाठी तक्रारकर्तीस दुसरी तक्रार दाखल करण्याचा कायदेशिर अधिकार नाही. या कारणासाठी तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ची विमा सल्लागार कंपनी कबाल इन्शुरन्स यांना गैरअर्जदार म्हणून तक्रारीत जोडले नाही, या कारणास्तव सुध्दा तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तसेच, तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तऐवज, 7/12 यावरुन सिध्द होते की, सदर जमीन ही मृतकाला शासनाकडून फक्त वहीवाटीकरीता दिलेली असून सदर जमिनीवर फक्त शासनाचा अधिकार आहे व शासनाचे परवानगीशिवाय सदर शेतकरी कोणालाही हस्तांतरण करु शकत नाही म्हणजे मृतक हा सदर शेतजमीनीची पुर्ण मालक नाही म्हणून तक्रारकर्तीला सदर शेतजमीनीच्या विषयी कोणतीही नुकसान भरपाई मागण्याचा कारदेशिर अधिकार नाही. तक्रारकर्तीने मृतकाच्या नावाचा कोणताही 7/12 रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. या सर्व कारणाने अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, तोंडी व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराचे पती हे शेतीचा व्यवसाय करीत होते व शेतातील उत्पन्नावर अर्जदाराचे पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्र.2 वरील दस्तऐवजावरुन सिध्द होते. शासनातर्फे काढण्यात येणा-या शेतकरी अपघात विमा योजनेची शेतक-याच्या अपघाती मृत्युनंतर अर्जदार ही त्या लाभार्थी असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ची ग्राहक आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने दाखल केलेले लेखी उत्तर तसेच तोंडी व लेखी युक्तीवादामध्ये असे म्हणणे आहे की, तक्रार वेळेवर दाखल करण्यात आली नाही. गैरअर्जदाराचे हे म्हणणे गृहीत धरण्यासारखे नाही. कारण अर्जदाराच्या पतीचे निधन दिनांक 7.10.2011 रोजी झाले व दावा दाखल करण्याची मुदत दिनांक 14.10.2012 पर्यंत होती. परंतु, अर्जदाराने तिचा दावा दिनांक 24.2.2012 ला म्हणजेचे मुदतीच्या आंतच गैरअर्जदार क्र.3 कडे दाखल केला आहे.
गैरअर्जदाराचे हे म्हणणे गृहीत धरण्यासारखे नाही की, कबाल इन्शुरन्स यांना गैरअर्जदार म्हणून तक्रारीत जोडण्यात आलेले नाही. कारण शासनाच्या परिपत्रकामध्ये असे कुठेही नमुद नाही की, कबाल इन्शुरन्समार्फत दावा दाखल केला तरच निकाली काढला पाहिजे. तसेच, गैरअर्जदार क्र.2 चे हे म्हणणे गृहीत धरण्यासारखे नाही की, शासनाने मृतकाला जमीन वहीवाटासाठी दिलेली असल्यामुळे मृतक हा जमिनीचा मालक नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे मृतक पतीच्या नावाची गाव नमुना सात वर नोंद असल्यामुळे ती ‘शेतकरी अपघात विमा योजना’ ची लाभार्थी आहे. तसेच, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदार बाईचा विमा दावा नाकारल्याबाबत कोणतेही पत्र अर्जदारास दिलेले नाही व गैरअर्जदाराने आपल्या लेखी व तोंडी युक्तीवादात या मुद्दयाबाबत कोणतेही पुरावे दाखल केलेले नाही. गैरअर्जदारातर्फे पुराव्याअभावी व वरील कारण मिमांसावरुन मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- दिनांक 24.02.2012 पासून, द.सा.द.शे. 9 टक्के
व्याजासह, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 23.9.2016.
(सादिक मो.झवेरी) ( रोझा फु.खोब्रागडे )
सदस्य अध्यक्ष (प्र.)