Maharashtra

Nanded

CC/08/321

The Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank.Lit - Complainant(s)

Versus

The New India Assurance Com.Lit. - Opp.Party(s)

ADV.B.P.Ambekar

21 Apr 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/321
1. The Bhagyalakshmi Mahila Sahakari Bank.Lit Mahavir chowk] NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. The New India Assurance Com.Lit. MumbaiNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 21 Apr 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2008/321
                    प्रकरण दाखल तारीख -   26/09/2008     
                    प्रकरण निकाल तारीख    21/04/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
              मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
दि.भाग्‍यलक्ष्‍मी महिला सहकारी बँक लि,
मार्फत सरव्‍यवस्‍थापक,
भाग्‍यलक्ष्‍मी भवन,महावीर चौक,नांदेड
वय वर्षे 45, व्‍यवसाय शेती,                                अर्जदार.
 
      विरुध्‍द.
 
1.   सरव्‍यवस्‍थापक,
न्‍यु.इंडिया एशुरन्‍स कंपनी लि,
87,एम.जी.रोड,फोर्ट,मुंबई,                           गैरअर्जदार.
(ग्रिवन्‍स सेल)
2.   न्‍यु इंडिया एशुरन्‍स कंपनी लि,
     शाखा नांदेड मार्फत- वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक.
 
अर्जदारा तर्फे वकील - अड. बी.पी.अंबेकर.
गैरअर्जदार           - अड.एस.व्‍ही.राहेरकर.
 
निकालपञ
(द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्‍य)
 
     गैरअर्जदार न्‍यु इंडिया एशुरन्‍स कंपनी लि, यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार हे आपल्‍या दाखल केलेल्‍या तक्रारीत म्‍हणतात, अर्जदार यांचा बॅंकेचा व्‍यवहार हा नांदेड जिल्‍हयात दहा शाखे मार्फत चालतो व यापैकी एक शाखा सराफा भागात कार्यरत असुन त्‍याचा अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी क्र.4615240101049 ही इंडेमिटी पॉलिसी घेतली, ज्‍याचा कालावधी 17/09/1997 ते 30/06/1998 असा होता. विमा कंपनीने बॅकेचे कोणत्‍याही कारणाने व्‍यवहारातुन काही आर्थीक नुकसान झाल्‍यास त्‍याची भरपाई गैरअर्जदार करुन देतील. अर्जदाराच्‍या सराफा शाखेत दि.08/05/1998 रोजी पारसेवार सिडस अण्‍ड फर्टिलायझर,जुना मोंढा नांदेड या नांवाने प्रोप्रायटर विजय गणेशराव पारसेवार यांचे चालु खाते क्र.197 उघडण्‍यात आले या खात्‍यास बँकेच्‍या अन्‍य खातेदाराची ओळख देण्‍यात आली यानंतर या खात्‍यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया नांदेड या शाखेवर काढलेला डिमांड ड्राप्‍ट क्र. 17846 दि.06/05/1998 रु.3,65,000/- वसुलीसाठी सराफा शाखेत सादर करण्‍यात आले, ही रक्‍कम वसुल करुन नवीन खात्‍यात जमा केली त्‍यानंतर हे खाते संतोष देशमुख रा.टिळकनगर, नांदेड व अन्‍य व्‍यक्ति यांनी एकमेकाशी संगनमत करुन ते पारसेवार सिडस अण्‍ड फर्टिलायझर असल्‍याचे भासवून खाते उघडविण्‍यात आले व याच खात्‍यातील रक्‍कम उचलले व अपहार केला व बॅकेचे आर्थीक नुकसान झाले. गैरअर्जदार कंपनीकडे दि.28/05/1998 रोजी नुकसानी बाबत दावा दाखल केला त्‍याच वेळी पोलिस स्‍टेशन इतवारा यांचेकडे गुन्‍हा क्र.72/1998 नोंदविण्‍यात आला. याच दरम्‍यान पारसेवार सिडस अण्‍ड फर्टीलाझर नांदेड यांनी सिव्‍हील कोर्ट नांदेड येथे सिटी लॅण्‍ड कुरिअर आणि इतर पाच विरुध्‍द रक्‍कम वसुलीसाठी दावा क्र.132/1999 दाखल केला.  सदरील दाव्‍यात दि.06/11/2006 रोजी निकाल लागला असुन, अर्जदारास दोषी ठरविले आहे व निकालाचा आदर राखुन बॅकेने कोर्टात रु.3,61,278/- रोजी पे ऑर्डर क्र.27170 दि.04/08/2007 रोजी भरणा केलेला आहे. याप्रमाणे बँकेचे आर्थीक नुकसान झाले आहे, वर नमुद केल्‍याप्रमाणे व्‍यवहारातील नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदार विमा कंपनीकडे क्‍लेम दाखल केल्‍यानंतर विमा कंपनीचे सर्व्‍हेअर डी.एल.सिसोदिया यांनी बँकेस भेट दिली व घटनाक्रमाचा पुर्ण सर्व्‍हे करुन अहवाल दिला या अहवालात काय नमुद केले याबद्यल बँकेस माहीती नाही. अहवालाच्‍या आधारे बँकेस पत्र दि.20/12/1999 द्वारे कळविण्‍यात आले की, प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट असल्‍यामुळे बँकेवर कुठलेही दायित्‍व नाही. त्‍यामुळे बँकेने दि.15/10/2007 रोजी वकीला मार्फत कायदेशिर नोटीस दिली, ज्‍याचे उत्‍तर गैरअर्जदार विमा कंपनीने दि.26/10/2007 रोजी दिले. त्‍यात व्‍यवहारामध्‍ये कर्मचा-याचे निष्‍काळजीपणा असल्‍याने हा क्‍लेम मंजुर करण्‍यात येत नाही, असे कळविले व व्‍यवहारामध्‍ये पारसेवार सिडस अण्‍ड फर्टीलायझर यांचे खाते उघडण्‍यात बँकेचे कर्मचा-याकडुन कोणत्‍याही प्रकारचे निष्‍काळजीपणा झालेले नाही. वस्‍तुस्थिती अशी आहे की, व्‍यवहारामध्‍ये तिस-या व्‍यक्तिने बँकेची फसवणुक केली. त्‍यामुळे बँकेचे आर्थीक नुकसान झाले असुन विमा क्‍लेम मिळण्‍यास बॅक पात्र आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, रु.3,61,278/- वर द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज व खर्च रु.10,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत.
          गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले, त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचा प्रथम आक्षेप असा की, दावा मुदतीत नाही. अर्जदार यांनी जी बँक इंडेमिटी इंशुरन्‍स पॉलिसी घेतली ही अटी ,नियम व अपवाद याला बांधील आहे. पॉलिसीच्‍या नियमाप्रमाणे सर्वात महत्‍वाची बाब अशी की, Negligent act of the employee is not covered under the scope of policy या प्रस्‍तुतच्‍या प्रकरणामध्‍ये जी काही घटना घडलेली आहे. त्‍यासाठी अर्जदार बँकेचे कर्मचारी यांचा निष्‍काळजीपणा कारणीभुत आहे. या संदर्भात पॉलिसीच्‍या अपवादामध्‍ये असे सांगितले आहे की, Exceptions -   The company shall not be liable in respect of
(a)                 Any loss or damage occasioned or through or in consequence whether directly or indirectly of any of the following occurrences.
(b)           Losses resulting wholly or partially from any negligent act or omission of the insured employee. However, this exception does not apply to section B i.e. in Transit cover. एवढेच नाही तर दिवाणीन्‍यायाधीश यांनी मे.पारसेवार सिडस अण्‍ड फर्टीलायझर यांचे भागीदार राजाराम कुरणवार अर्जदार बँकेच्‍या विरुध्‍द दाखल केलेल्‍या दाव्‍यामध्‍ये दिवाणी न्‍यायालयाने त्‍यांच्‍या निकालपत्रातील परिच्‍छेद क्र.16,17,18,1920 यामध्‍ये नमुद केले आहे की, अर्जदार बँकेच्‍या कर्मचा-याच्‍या निष्‍काळजीपणामुळे घटना घडलेली आहे दिवाणी न्‍यायालयाने वरील बाब सिध्‍द केल्‍याने कर्मचा-यांचा निष्‍काळजीपणा पॉलिसीमध्‍ये नमुद केले नसल्‍यामुळे प्रकरण रद्य करावा.गैरअर्जदाराकडुन सेवेत कुठेही त्रुटी नाही. सदरील घटनामध्‍ये संगनमत झाल्‍यामुळे सदरील घटना घडलेली आहे, ही वस्‍तुस्थिती असतांना कर्मचा-यांनी खाते उघडते वेळेस योग्‍य ती काळजी घेतली नाही त्‍यामुळे बॅकंची ही घटना घडली आहे. दिवाणी न्‍यायालयाने दिलेला निकाल अर्जदारांना मान्‍य झाल्‍यामुळे आता पुन्‍हा बँकेला सदरील बाबी विषयी काही म्‍हणावयाचे कारण नाही. त्‍यामुळे अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करावा असे म्‍हटले आहे.
अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐजव बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   गैरअर्जदार यांच्‍यो सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय ?          नाही.
2.   काय आदेश ?                                            अंतीम आदेशा प्रमाणे.
                                                कारणे
मुद्या क्र. 1.
     अर्जदार यांनी सुरुवातीसच आपल्‍या तक्रारीत त्‍यांचे नांदेड येथे दहा शाखा असल्‍याचे नमुद केले आहे. दि.08/05/1998 रोजी पारसेवार अण्‍ड सिडस फर्टीलायझर जुना मोंढा यांनी त्‍यांचे प्रोप्रायटर विजय गणेशराव पारसेवार यांचे चालु खाते अर्जदार यांच्‍या सराफा येथील शाखेत उघडले, यावर बारकाईने प्रकाश टाकले असता, अर्जदार यांचे जुन्‍या मोंढयाच्‍या आसपास किंवा जवळ भागात शाखा असतांना दुस-या टोकास म्‍हणजे सराफा येथे पारसेवार का खाते उघडत आहेत, यावर खोल जाऊन चौकशी अर्जदारांनी केलेली नाही याचा अर्थ खाते हे खरेच बोगस नव्‍हते का ? असा प्रश्‍न निर्माण होतो. यानंतर प्रोप्रायटर विजय गणेशराव पारसेवार हे असतांना संतोष देशमुख रा.टिळकनगर व अन्‍य व्‍यक्तिच्‍या नांवाने दिलेले नाही, यांनी संगनतम करुन खात्‍यातील रक्‍कम काढली असे स्‍वतःच म्‍हटलेले आहे म्‍हणजे ही रक्‍कम कशा प्रकारे खात्‍यातुन गेली याचा उलगडा अर्जदार यांनी केलेला नाही व सरळसरळ डिमांड ड्राप्‍टची रक्‍कम खात्‍यात जमा असलेली रक्‍कम विषेश चौकशी न करता त्‍यांना देण्‍यात आली, यात बँकेच्‍या कर्मचा-यांनी रक्‍कम अदा करते वेळी विषेश काळजी घेतली नाही, असे दिसुन येते. या प्रकरणांत गुन्‍हा क्र.72/98 नोंदविण्‍यात आला. दिवाणी न्‍यायालयात दावा क्र. 132/99 दाखल केलेला आहे व याचा निकाल दि.06211/2006 रोजी लागला असुन अर्जदार यांनी नंतर दि.04/08/2007 रोजी रु.3,61,278/- कोर्टात भरलेले आहेत. आता अर्जदाराची तक्रार अशी आहे की, बँकेच्‍या कर्मचा-यांनी केलेली कार्यवाही विषयी विमा कंपनीने जबाबदारी घेतल्‍या कारणांने त्‍यांचे जे आर्थीक नुकसान झाले ते गैरअर्जदारांनी भरुन द्यावे असे म्‍हटलेले आहे. दिवाणी न्‍यायालयाने निकाल पत्रात अर्जदार बँकेस दोषी ठरविले आहे व याचे कारण त्‍यांचे कर्मचा-यांनी निष्‍काळजीपणाने व्‍यवहार हाताळले म्‍हणुन ही घटना घडली आहे. आता अर्जदारांनीच स्‍वतः संतोष देशमुख व अन्‍य व्‍यक्ति यांनी संगणमत केलेले आहे, असे म्‍हटले आहे. संगनमत म्‍हणजे काय व अन्‍य व्‍यक्ती म्‍हणजे बँकेचे कर्मचारी त्‍यात सामील होते काय व रक्‍कम कशी काढली गेली त्‍यावर सही वैगरे चुकीची होती काय? असे अनेक प्रश्‍न उभारतात. यात अर्जदार हे त्‍यांचे बँकेचे कर्मचा-यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे ही घटना घडली असे कधीच म्‍हणत नाही किंवा बोगस धनादेश दिले होते व ते पास केले असे कुठेच म्‍हणत नाहीत. पॉलिसीतील नियम क्र. C मध्‍ये फॉरजरी ऑर अल्‍टरेशन यामध्‍ये बोगस ऑर फॉल्‍सेसिस ऑर फोरज्‍ड चेक्‍स असतील व रक्‍कम दिली गेली असेल तर विमा कंपनी जबाबदार आहे किंवा त्‍यांचे कर्मचारीकडुन एखादी क्रिमीनल अक्‍ट अप्रमाणीकपणा कोणत्‍याही व्‍यक्तीने केलेले होते तरी विमा कंपनी जबाबदार आहे. परंतु अर्जदाराने स्‍वतः त्‍यांचे कर्मचारी कुठे निष्‍काळजीपणा केली नाही किंवा संगमतात ते सामील आहेत असे आपल्‍या तक्रार अर्जात म्‍हटलेले नाही. गैरअर्जदार यांनी पॉलिसीच्‍या Exceptions (b) मध्‍ये losses resulting wholly or partially from any negligent act or omission of the insured employee. However, this exception does not apply of section B i.e. in transit Cover. म्‍हणुन वस्‍तुस्थितीत पारसेवार अण्‍ड सिडस फर्टीलायझर कंपनीने चालु खाते उघडतांना बॅंकेच्‍या कर्मचा-यांनी योग्‍य काळजी घेतली नाही व ओळख घेण्‍यात व खाते उघडण्‍यात निष्‍काळजीपणा दाखविला म्‍हणुन पुढील संभाव्‍य घटना घडली व दिवाणी न्‍यायालयाने निकालपत्रात नमुद केलेले आहे. त्‍यामुळे उहापोह करण्‍याची आवश्‍यकता नाही. बॅंकेचे कर्मचा-यांचा निष्‍काळजीपणा पॉलिसीच्‍या जबाबदारीत समाविष्‍ट होत नसल्‍यामुळे गैरअर्जदारांनी जो दावा नामंजुर केला तो योग्‍य आहे म्‍हणुन त्‍यांनी सेवेत त्रुटी केली ही बाब सिध्‍द होत नाही.
     यावर राष्‍ट्रीय आयोग पी.मार्वा विरुध्‍द न्‍यु इंडिया अशुरन्‍स कंपनी कं.लि फायनल अपील क्र.73/99,  summary jurisdiction- Disputed questions of fact-Insurance claim- Complaint- Maintainability of- No authenticated records as to which items were stolen on which date and what was the loss- Such disputed question cannot be adjudicated in the summary jurisdiction- Remedy to approach civil Court- (para 4 and 5) याप्रमाणे दिवाणी न्‍यायालयातही प्रकरण चालले आहे.
     या विषयी 1997 आणि 1998 चे रेकार्ड असल्‍यामुळे त्‍यावेळेस नेमलेले सर्व्‍हेअर डी.एल.सिसोदिया यांचेकडेही रेकॉर्ड दाखल नाही त्‍यांनी तसे शपथपत्र दिलेले आहे. परंतु या प्रकरणांत सर्व्‍हेअर रिपोर्टची आवश्‍यकता नाही कारण रक्‍कम देण्‍याचे यात आदेश नाही. यावर या प्रकरणांत निकाल दि.06/11/2006 रोजी दिवाणी न्‍यायालयाने दिलेले आहे व गैरअर्जदाराना 1999 रोजी क्‍लेम मागीतले आहे व गैरअर्जदारांनी दि.26/10/2007 रोजी अर्जदाराच्‍या नोटीसला उत्‍तर दिलेले आहे व ही बाब पाहीले असता, अर्जदाराचा दावा हा मुदतीत आहे.
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश.
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्‍यात येतो.
2.   दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                        (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                  सदस्‍य