निकालपत्र :- (दि.10/08/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदारचा लेखी युक्तीवाद दाखल. सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे भागीदारी कायदयानुसार नोंदणीकृत भागीदारी संस्था आहे. तक्रारदार हे सदर संस्थेचे भागीदार आहेत. तक्रारदाराचे मालकीचा टाटा 1109 (डी व्हॅन) ट्रक क्र.MH-09-L-4672 चा विमा सामनेवाला क्र.1 कडे असून सामनेवाला क्र.2 बँकेकडून कर्ज घेतले होते. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 बँकेचे संपूर्ण कर्ज भागवून नो ऑब्जेक्शन सर्टीफिकेट मिळणेकरिता 5, 13, 22 ऑगस्ट-09 मध्ये पत्र व्यवहार केला होता. सदर ट्रकच्या परमिटची मुदत संपत आली असले कारणाने आरटीओ च्या नियमाप्रमाणे एनओसी शिवाय परमिट रिन्य केले जात नसलेने मुदत संपण्याअगोदर दि.03/07/2009 रोजी परमिट रिन्युची फी रु.400/- आरटीओ ऑफिस कोल्हापूर येथे भरणा करुन सामनेवाला क्र.2 यांचेकडे एनओसी साठी तगादा लावला होता. दरम्यानचे काळात 10/09/2009 रोजी मध्यरात्री दिड ते दोन वाजणेचे सुमारास सदर ट्रक कोल्हापूर बेंगलोर हायवे रोडवरुन गोकूळ शिरगावं एमआयडीसीकडून कोल्हापूरकडे येत असता सुदर्शन पेट्रोल पंपासमोर पेट्रोल भरणेकरिता दुसरा ट्रक पाठीमागे रिव्हर्स घेऊन तक्रारदाराचे ट्रकचे केबीनला ठोकरून अपघात झाला. अपघातानंतर दुसरा ट्रक न थांबता पुण्याचे दिशेने पळून गेला. सदर अपघाताची ताबडतोब वर्दी देणेकरिता तक्रारदार करवीर पोलीस ठाणेत गेले असता सदर वेळी इचलकरंजी येथे हिंदू मुस्लीम जातीय दंगल उडाल्याने पोलीस कुमक पोलीस ठाण्यात उपलब्ध नव्हती. तसेच दुसरा ट्रक ठोकरून पळून गेलेने अपघाताची नोंद घेऊन स्पॉट पंचनामा केला नाही. मात्र सदर अपघाताबाबत ताबडतोब विमा कंपनीस कळवले असता त्यांनी ताबडतोब अपघात स्थळी येऊन अपघाताचे ठिकाणचा व ट्रकचा स्पॉट सवर्हे केला आहे. तयाचे रितसर पेपर्स व फोटो सामनेवाला क्र.1 यांचेकडे आहे. अपघातामध्ये ट्रकचे केबीनचे नुकसान व मोडतोड झालेने चेतन मोटर्स हुपरी रोड, कोल्हापूर विजयलक्ष्मी मोटर गॅरेज आणि बॉडी बिल्डर्स कात्रज, संतोष नगर पुणे तसेच गणेश क्रेन सर्व्हीस गोकूळ शॉप एमआयडीसी गोकूळ शिरगांव यांचेकडून ट्रक दुरुस्त करुन घेतला आहे. त्यासाठी एकूण खर्चाचे बिल रु.2,38,697/- इतके झाले. सदरचा अपघात हा दि.06/5/2009 ते 05/05/2010 या विमा कालावधीत दि.10/09/2009 रोजी झालेला आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडे क्लेम मागणी केला असता अपघातावेळी परमीट रिन्यू नव्हते असा बनाव करुन क्लेम नामंजूर केला आहे. सामनेवाला क्र.2 बँकेकडून मुदतीत एनओसी न मिळालेने सदर परमीट रिन्यू करता आले नाही यामध्ये तक्रारदाराचा दोष नाही. सबब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सेवात्रुटी केलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन विमा क्लेम रक्कम रु.2,38,697/- सामनेवाला क्र.1 यांचेकडून मिळणेबाबत आदेश व्हावा व सामनेवाला क्र.1 व 2 कडून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ विमा पॉलीसी, एनओसी मागणीकरिताचे तीन पत्रे, परमिट रिन्यू केलेची पावती, एनओसी, परमीट मागणीकरताचा अर्ज, क्लेम नाकारलेचे पत्र, चेतन मोटर्स विजयलक्ष्मी मोटर गॅरेज, गणेश क्रेन सर्व्हीसेस यांची बीले, आरटीओ परमीट इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. (04) सामनेवाला क्र.1यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराने सामनेवालांकडे क्लेमची मागणी केलेली होती. मात्र तक्रारदाराचे नमुद वाहनाचा अपघात हा दि.10/09/2009 रोजी झालेला आहे. तर सदर वाहनाचे परमिट हे दि.23/12/2009 ते 22/12/2014 या कालावधीसाठी अदा केलेले आहे. सबब अपघातावेळी नमुद वाहनाचे वैध परमिट नव्हते. त्यामुळे प्रस्तुतचा क्लेम नाकारलेला आहे. केवळ वाहनाचे परमिट रिन्यू करणेसाठी रक्कम भरली म्हणजे परमीट मिळाले असे कंपनीस समजता येणार नाही. कारण त्यावेळी परमीट अस्थित्वात नव्हते. सबब सामनेवाला यांनी पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार क्लेम नाकारला असलेने योग्य कारणास्तव क्लेम नाकारला असलेने कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराचा बेजबाबदार वर्तन आणि सामनेवाला क्र.2 यांचे दोषासाठी सामनेवाला क्र.1 यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 कडून नुकसान भरपाई मागावी. तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करुन तक्रारदारास सामनेवाला यांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे. (05) सामनेवाला क्र.1 यांनी लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ दिघे असोसिएटस यांचे सर्व्हे रिपोर्टची सत्यप्रत दाखल केली आहे. (06) सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराने सामनेवालाकडून कर्ज घेतलेले होते व सदर कर्ज हे वाणिज्य हेतूने घेतलेले आहे.त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1)(डी) नुसार ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारदाराचे तक्रार व त्यातील कथने यावरुन सामनेवाला क्र.2 कडून घेतलेली सेवा ही तक्रारदाराचे व्यवसायातून आलेल्या उत्पन्नावर चालणा-या उपजिवीकेसाठी नाही. तक्रारदाराचे नमुद वाहनासाठी हायपोथीकेशन कर्ज दिलेले होते व त्यासाठी निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे तक्रारदाराने दिलेले चेकचा अनादर झालेला आहे. त्यामुळे चेक बाऊन्स चार्जेस त्यावर लावलेले होते. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार रक्कम देय असलेमुळे एनओसी दिलेली नव्हती. तसेच तक्रारदाराने कधीही परमीट रिन्यूसाठी सदर एनओसी अत्यावश्यक असलेने प्रतिपादन केले नव्हते तसेच तशी मागणीही पत्रात केलेली नव्हती. हे तक्रारदाराने 5, 13, 22ऑगस्ट-09 रोजी पाठविलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. यामध्ये तक्रारदाराचा निष्काळजीपणा आहे. सामनेवाला बॅकेने दि.11/12/2009 रोजी एनओसी दिलेली आहे. त्यामुळे दि.26/02/2010 रोजी परमीट मिळाले नाही यासाठी तक्रारदार जबाबदार आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नांमजूर करणेत यावी व तक्रारदारास सामनेवाला यांना रक्कम रु.10,000/- कॉम्पेंसेंटरी कॉस्ट देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती केलेली आहे. (07) सामनेवाला क्र.2 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदाराचे कर्ज खातेचा उतारा दाखला केला आहे. (08) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 बॅंकेकडून टाटा 1109 (डी व्हॅन) ट्रक क्र.MH-09-L-4672 या नमुदवाहनासाठी हायपोथीकेशन कर्ज घेतलेले होते. सदर कर्ज एलव्हीकेपीआर या 00002162074 हा तक्रारदाराचे नांवे असून तसेच 00002161840 हा विजय महादेवराव बुधले यांचे नांवे कर्ज घेतलेचे दाखल खातेउता-यावरुन दिसून येते. सदर खातेवर अनुक्रमे दि.07/05/2007 रोजी चेक क्र.474300 अन्वये रक्कम रु.13,652/- तसेच चेक क्र.473000 रु.13,652/- भरलेचे दिसून येते व सदर खातेवर अनुक्रमे रु.431/- व रु.805/- शिल्लक देय रक्कम दिसून येते. सदर देय रक्कमा अनुक्रमे दि.11/09/2009रोजी व दि.14/12/2009 रोजी वेव ऑफ केलेल्या आहेत. तक्रारदाराने दाखल केलेले दि.5, 13, व 22 ऑगस्ट-09 चे पत्राचे अवलोकन केले असता दि.5ऑगस्ट चे पत्रामध्ये अकौन्ट खाते उता-यासाठी रक्कम रु.100/- ची मागणी केलेचे दिसून येते. तसेच रक्कम रु.805/- व रु.431/- या रक्कमेचे कधीही स्टेटमेंट दिलेले नाही. सबब नो पेमेंट सर्टीफिकेट देऊन हायपोथीकेशन काढून घ्यावे असे स्पष्टपणे कळवलेचे दिसून येते. दि.13/08/2009 रोजीचे पत्रामध्ये सामनेवाला यांनी ओव्हर डयू चार्जेस व बाऊन्स चार्जेस अनुक्रमे रक्कम रु.210/- व रु.221/- ची नोंद खातेउता-यात केली आहे. मात्र सदरचे चेक वेळेवेर अदा केले असलेने सदरचे चार्जेस रद्द करुन नोऑब्जेक्शन लेटरची मागणी केलेचे दिसून येते. तसेच प्रस्तुत वाहनाचे कर्ज पूर्णत: फेड झाले असलेमुळे नो ऑब्जेक्शन लेटर हे आरटीओ ऑफिस कोल्हापूर यांना दयावयाचे असलेने तातडीने दयावे असे स्पष्टपणे कळवलेचे दिसून येते. तदनंतर दि.22/08/09 चे पत्राचे अवलोकन केले असता पीडीसी चेक्स यापूर्वीच घेतले असलेमुळे सामनेवाला यांनी वेळेत वटवले नसेल तर त्यापोटीचे रक्कम रु.431/- देणेसाठी तक्रारदार बांधील नसलेचे कळवलेले आहे. तसेच एनओसीची मागणी केलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. मात्र सामनेवाला क्र.2 यांनी विलंबाने एनओसी देणे तसेच आरटीओ कोल्हापूर यांनी दि.03/07/2009 रोजी रु.400/- परमीट फी घेऊनही सदर परमीट हे दि.23/12/2009 ते 21/12/2014 कालावधीसाठी दिलेले आहे. वस्तुत: सामनेवाला बँकेने तसेच नमुद आरटीओ कार्यालयाने सेवात्रुटी केली असेल तर तो स्वतंत्र वाद विषय आहे. सदर वाद विषय हा सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द न्याययोग्य क्लेम नाकारलेबाबत असलेने सदर वादविषय (mixing of facts & subject matter ) एकत्रित करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर वाहनाचा अपघात हा दि.10/9/2009 रोजी झालेला आहे. नमुद अपघाताचा स्पॉट सर्व्हे सामनेवालांचे सर्व्हेअर दिघे यांनी केलेला आहे. त्यासाठी वाहनाचे नुकसानीचे रक्कम रु. 93,891.30/- इतकी निश्चित केलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सदर अपघातावेळी नमुद वाहनास वैध परमीट मिळालेले नव्हते ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब नमुद पॉलीसीच्या Action as to use : - Policy coversuse only under a permit within the meaning of the Motor VehicleAct, 1988 or such a carriage falling Sub-section 3 of Section 66 of the Motor Vehicle Act 1988. पॉलीसीच्या मुलभूत अटीचा भंग झालेमुळे सामनेवाला यांनी क्लेम नाकारला आहे. यामध्ये सामनेवाला क्र.1 यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेशपारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाविषयी कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |