नि.क्र. ३०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र.६७०/२००८
-------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १२/१०/२००९
तक्रार दाखल तारीख : २४/१०/२००९
निकाल तारीख : २०/१०/२०११
-----------------------------------------
मे.पूजा कटलरी
तर्फे प्रोप्रा. श्री.मेथाराम नारायणदास मेघाणी
गाळा नं.१०, गणेश मार्केट, जि.सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. डिव्हीजनल मॅनेजर,
दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लि.,
डिव्हीजनल ऑफिस, पहिला मजला,
बाळकृष्ण कॉम्प्लेक्स, शिवाजी रोड,
मिरज, ता.मिरज, जि.सांगली.
२. जनरल मॅनेजर,
दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लि.,
मुख्य कार्यालय – न्यू इंडिया ऍश्युरन्स बिल्डींग,
८७, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई – १.
(दि.१३/०४/२०१० च्या आदेशानुसार वगळले.)
३. श्री.सच्चिदानंद बापूराव पूजारी
इन्शुरन्स सर्व्हेअर, आशिर्वाद, राजवाडा,
सांगली, जि.सांगली. ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
जाबदारक्र.१ तर्फे :+ìb÷.एस.एस.पाटील
जाबदार क्र.२ :वगळले
जाबदार क्र.३ : स्वत:
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपले दुकानाच्या विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
तक्रारदार याचे मौजे सांगली येथे पूजा कटलरी नावचे दुकान आहे. सदर दुकानाचा व त्यातील वस्तूंचा तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विमा उतरविला होता. विमा कालावधीमध्ये दि.२२/६/२००७ रोजी प्रचंड पाऊस आल्यामुळे तक्रारदार याच्या दुकानातील वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर जाबदार यांचेकडील काही व्यक्तींनी दि.२३/६/२००७ रोजी तक्रारदार यांचे दुकानाची पाहणी केली व सर्व्हेअरची नेमणूक करतो असे सांगितले. तक्रारदार यांनी अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर जाबदार यांनी सर्व्हेअरची नेमणूक केली. दि.७/७/२००७ रोजी सर्व्हेअर श्री एस.बी.पुजारी यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून त्यांनी तक्रारदार यांचे दुकानाचा सर्व्हे केला असल्याचे नमूद केले व काही कागदपत्रांची मागणी केली. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी कागदपत्रे सर्व्हेअर यांना अदा केली. सर्व कागदपत्रे अदा करुनही सर्व्हेअर यांनी कोणताही रिपोर्ट दिला नाही. दि.१४/१२/२००७ रोजी जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांची फाईल बंद केली असल्याचे कळविले. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज विम्याची रक्कम मिळावी तसेच इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने २० कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी नि.१३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना सूचना दिल्यानंतर जाबदार यांनी तात्काळ सर्व्हेअर यांची नेमणूक केली आहे. सर्व्हेअर यांनी तक्रारदार यांच्या दुकानात दि.२३/६/२००७ व ७/७/२००७ रोजी भेट दिली व सर्व्हे करुन रिपोर्ट दिला आहे. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारदार यांचे दुकानातील नुकसान हे मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे झाले आहे व सदरचे नुकसान पॉलिसीअंतर्गत येत नसल्याने जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना त्याप्रमाणे कळविले आहे. तक्रारदार मागणी प्रमाणे रक्कम मिळणेस पात्र नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा. जाबदार यांनी नि.१४ ला शपथपत्र व नि.१५ चे यादीने २ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार क्र.३ यांनी नि.१६ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. परंतु मूळ तक्रारअर्जाच्या आदेशाचे अवलोकन केले असता प्रस्तुतचा तक्रारअर्ज केवळ जाबदार क्र.१ व २ यांचेविरुध्द दाखल करुन घेण्यात आला आहे. त्यामुळे जाबदार क्र.३ यांनी म्हणणे देणेची आवश्यकता नाही व सदरचे म्हणणे विचारात घेण्यात येत नाही.
५. तक्रारदार यांनी नि.२६ वर प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी नि.२७ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२८ च्या अर्जाने काही निवाडे दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी याकामी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. तक्रारदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
६. तक्रारदाराचा यांचा विमादावा जाबदार यांनी ज्या कारणास्तव नाकारला ते विमादावा नाकारलेचे पत्र नि.५/१२ वर दाखल आहे. त्यामध्ये विमादावा नाकारणेसाठी जे कारण दिले आहे ते Since the loss is due to rainfall, is not an insured peril which is not covered under our policy. Hence, claim is repudiated. या कारणास्तव तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. सदरचे कारण योग्य व संयुक्तिक आहे का हे ठरविणे गरजेचे आहे व त्यासाठी दाखल असलेल्या नि.१५ सोबतच्या पॉलिसीचे अवलोकन करणे गरजेचे आहे. सदरची पॉलिसी ही Shopkeepers insurance या सदराखाली देण्यात आली आहे. सदर पॉलिसीमध्ये Fire and allied perils असे नमूद आहे. सदर पॉलिसीच्या अटी व शर्ती काय आहेत हे दाखवण्यासाठी जाबदार यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीची प्रत दाखल केली आहे. त्यामधील पान २ मध्ये BUILDING / CONTENTS या शीर्षकाखाली कलम एफ मध्ये Flood चा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे Flood ही बाब पॉलिसीमध्ये समाविष्ट आहे. मोठया प्रमाणात पाऊस येणे ही बाब Flood या सदराखाली येईल का हे या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. Flood या शब्दाचा अर्थ विरकर डिक्शनरीमध्ये पूर, जलप्रलय, मोठा प्रवाह असा दिला आहे तर ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये (1) An overflowing or influx of water beyond its normal confinements especially over land, (2) an outpouring of water a torrent (a flood of rain) असा नमूद केला आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस येवून त्याचा प्रवाह दुकानात शिरणे ही बाब flood या सदराखाली येईल त्यामुळे विमा पॉलिसीअंतर्गत येईल असे या मंचाचे मत झाले आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी ज्या कारणासाठी नाकारला, ते कारण संयुक्तिक वाटत नाही. तक्रारदार यांचा विमादावा अयोग्य कारणाने नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
७. तक्रारदार यांनी नुकसानीची भरपाई म्हणून रक्कम रु.१,५०,०४३/- ची मागणी केली आहे. त्याच्या पुष्ठयर्थ दुकानाचे स्टॉक स्टेटमेंट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. प्रस्तुत प्रकरणी जाबदार यांच्या सर्व्हेअर यांनी सर्व्हे केला असून सर्व्हे रिपोर्ट नि.१५/२ वर दाखल आहे. सर्व्हेअर यांनी आपल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये विमा दायित्व रु.६०,०००/- निश्चित केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांपेक्षा सर्व्हेअर यांनी दिलेला रिपोर्ट ग्राहय धरणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे, त्यामुळे सर्व्हेअर यांनी निश्चित केलेली रक्कम मंजूर करणे योग्य होईल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. सदरची रक्कम विमा दावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.१४/१२/२००७ पासून द.सा.द.शे.९ टक्के व्याजासह मंजूर करणेत येत आहे.
८. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांच्या विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्याने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये ६०,०००/- (अक्षरी रुपये साठ हजार माञ) दि.१४/१२/२००७ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक ५/१२/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २०/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११