Maharashtra

Ahmednagar

CC/16/223

Sandip Raosaheb Kokate - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Ltd. - Opp.Party(s)

S.B. Gaykwad

04 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/223
( Date of Filing : 11 Jul 2016 )
 
1. Sandip Raosaheb Kokate
Chichondi Patil,Tal.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.Ltd.
Abbot Building,Near Ashoka Hotel, Kings Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Oct 2019
Final Order / Judgement

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

_______________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

 

२.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हे चिंचोडी पाटील, ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी असुन शेती  व  दुग्‍धव्‍यवसायाकरिता     दिनांक ०४-१०-२०१६ रोजी वाळकी ता.नगर येथील आठवडे बाजारामुधन रक्‍कम रूपये ६०,०००/- मात्रचे संकरीत गाय खरेदी केली होती. सदर गाय ही दिवसासाठी ३० लिटर दुध देणारी उत्‍तम गाय होती. सदर गायीपासुन   मिळणा-या दुधापासुन तक्रारदारास महिन्‍याकाठी भरघोस अत्‍पन्‍न मिळत होते व सदर उत्‍पन्‍नावरच तक्रारदाराचे संपुर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. सदर गाय ही पहिल्‍याच वेतानंतर दुधावर आलेली गाय होती व त्‍यापुढील काळात तिची दुध देणेची क्षमता आणखी वाढण्‍याची निश्चितच शक्‍यता होती व त्‍यामधुन तक्रारदारास आणखी वाढीव उत्‍पन्‍न मिळणार होते. तक्रारदाराने नव्‍यानेच खरेदी केलेली गाय व त्‍याचेकडील मुळच्‍या असलेल्‍या आणखी २ गायी असा एकुण ३ गाईचा विमा दिनांक ११-०४-२०१६ रोजी सामनेवाले यांचेकडे उतरविला होता व त्‍या विम्‍याबाबतचा प्रिमीयमदेखील तक्रारदार यांनी सामनेवाले कंपनीकडे रोख स्‍वरूपात भरलेला असुन सामनेवाले यांनादेखील सदर प्रिमीयमची रक्‍कम प्राप्‍त झालेली असून सदर पॉलिसीचा क्रमांक १५१८०४४७१६०४००००००३८ व पॉलिसीचा कालावधी ११-०४-२०१६ ते १०-०४-२०१६ असा आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या गाईच्‍या कानामध्‍ये विमा संरक्षीत असलेबाबतचा टॅगदेखील बसविला असुनत्‍याचा नंबर MLDBNIA 370011948220  असा आहे. दिनांक १८-०४-२०१६ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे विमा उतरवीलेल्‍या  गाईपैकी काळ्या-पांढ-या रंगाची १ गाय सर्पदंश होऊन मृत झालेली आहे. सदर गाय मृत झाल्‍यानंतर तिचे दिनांक १८-०४-२०१६ रोजी मा.पशुधन विकास अधिकारी, चिचोंडी पाटील ता.जि. अहमदनगर यांचेकडे शव विच्‍छेदन केले असता सदर गाय ही सर्पदंशामुळे विषबाधा होऊन मृत झाली असल्‍याचे मा.पशुधन विकास अधिकारी यांनी घोषित केले व तसा शवविच्‍छेदन अहवालदेखील मा.पशुधन विकास अधिकारी यांनी दिनांक २१-०४-२०१६ रोजी दिला आहे. सदर गाय मृत झाल्‍यानंतर पंचनामा करण्‍यात आलेला असुन सरपंच व ग्रामविकास अधिकारी चिचोंडी पाटील यांनीदेखील सदर गाय दिनांक   १८-०४-२०१६ रोजी सकाळी ७.०० वाजता मृत झाली असल्‍याबाबतचा दाखला दिलेला आहे. सदर गाय मृत झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे पॉलिसीमध्‍ये नमुद केलेल्‍या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करून त्‍यांची गाय सर्पदंशाने मृत झाल्याचे कळवुन क्‍लेम फॉर्म मिळणेबाबत विनंती अर्ज केला होता. सामनेवाले यांनी दिनांक १०-०५-२०१६ रोजी रजि.पोस्‍टाने नोटीस देऊन The death Due to diseased contracted prior to and within 15 days of commencement of risk is not payable  असे कळवुन विमा संरक्षण रक्‍कम देणेचे नाकारले आहे. वास्‍तविक पाहता तक्रारदाराची नमुद गाय ही कोणत्‍याही प्रकारच्‍या आजाराने मयत झाली नसुन ती सर्पदंशाने मृत झालेली आहे व सर्पदंश हा केवळ एक अपघात असुन अशा प्रकारचा अपघाती मृत्‍यु होणे ही न टाळता येण्‍याजोगी बाब आहे. सदर बाब ही विक्री पश्‍चात देणेत येणा-या सेवेमधील त्रुटी आहे व यामधुन सामनेवाले यांनी निश्‍चीतच अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.

 

     तक्रारदाराची विनंती अशी आहे की,  तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे उतरविलेल्‍या गाईचे विम्‍यापोटी मृत झालेल्‍य गाईची आरक्षीत विमा रक्‍कम रूपये ४०,०००/- ही सामनेवाले यांच्‍याकडुन तक्रारदारास मिळावी. तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रूपये ५,०००/- सामनेवालेकडुन मिळावे, सदर तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणुन रक्‍कम रूपये ५,०००/- सामनेवालेकडुन मिळावे.

 

३.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ५ वर दस्‍तऐवज यादीसोबत ११ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. त्‍यामध्‍ये तक्रारदाराचे गाय खरेदीची पावती, तक्रारदाराकडील वाळकी ता.जि. अहमदनगर येथील आठवडे बाजाराची विक्रीवरील नोंदीची पावती, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत चिचोंडी पाटील यांनी दिलेला दाखला व पचंनामा,  पशुधन विकास अधिकारी, चिचोंडी पाटील ता.जि. अहमदनगर यांचेकडे तक्रारदाराने भरलेल्‍या फी ची पावती, पशुधन विकास अधिकारी चिचोंडी पाटील ता.जि. अहमदनगर यांनी तक्रारदारास दिलेले पशुदावा पशुचिकित्‍सा  प्रमाणपत्र, तक्रारदाराने सामनेवालेकडे क्‍लेम फॉर्म मिळणेसाठीचा अर्ज,  तक्रारदाराने सामनेवालेकडे भरून दिलेला क्‍लेम फॉर्म, तक्रारदाराचा क्‍लेम फॉर्म नाकारलेबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारास दिलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे उतरविलेल्‍या इन्‍शुरन्‍स पॉलिसीची प्रत, तक्रारदाराच्‍या मृत गाईचे फोटो.  

 

४.   तक्रारदाराची तक्रार दाखल करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले हे मंचाची नोटीस मिळून हजर झाले व त्‍यांनी लेखी खुलासा नि.१३ वर दाखल केला. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, तक्रारदाराची तक्रार खरी व बरोबर नसून सामनेवाले यांना नाकबूल आहे. तक्रारदाराने क्‍लेम फॉर्म सादर केल्‍यावर कागदपत्रांची तपासणी केली असता असे दिसुन आले की, गायीचा मुत्‍यु दिनांक ११-०४-२०१६ रोजी म्‍हणजे पॉलिसी घेतल्‍यावर सात दिवसांच्‍या आत झाला आहे. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे पॉलिसी घेतल्‍यापासुन गायीचा मृत्‍यु झाल्‍यास त्‍याची जोखीम इन्‍शुरन्‍स कंपनीची राहत नाही. सदर अटीचे तक्रारदाराकडुन उल्‍लंघन झाल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार क्‍लेम देय होत नाही, असे तक्रारदाराला दिनांक १०-०५-२०१६ रोजीच्‍या पत्राने कळविले आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात कोणताही कसुर केला नाही. सबब तक्रारदाराकडुन कॉम्‍पनेसेटरी कॉस्‍ट रूपये १३,२००/- मिळावे व सदरची तक्रार रद्द करण्‍यात यावी. सामनेवाले यांनी नि.१४ वर विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती दाखल केलेल्‍या आहेत.  तसेच मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांचा पुढील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे.   [1997] 1 CPR 61/ [1996] 3 CPJ 370 – Appeal No.379 of 1994 Decided on 01-08-1996 - National Insurance Company Vs. S.M. Addul Karim.  

५.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यात दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ यांनी दाखल केलेली कागदपत्रे, खुलासा, लक्षात घेता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही  सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्‍यालायक आहे काय ?

 

 होय

(२)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

 

कारणमिमांसा

 

६.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदाराने यांनी एकुण ३ गाईचा विमा दिनांक ११-०४-२०१६ रोजी सामनेवाले यांचेकडे उतरविला होता व त्‍या विम्‍याबाबतचा प्रिमीयमदेखील तक्रारदार यांनी सामनेवाले कंपनीकडे रोख स्‍वरूपात भरलेला असुन सामनेवाले यांनादेखील सदर प्रिमीयमची रक्‍कम प्राप्‍त झालेली असून सदर पॉलिसीचा क्रमांक १५१८०४४७१६०४००००००३८ व पॉलिसीचा कालावधी ११-०४-२०१६ ते १०-०४-२०१६ असा आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या गाईच्‍या   कानामध्‍ये विमा संरक्षीत असलेबाबतचा टॅगदेखील बसविला असुन त्‍याचा नंबर MLDBNIA 370011948220  असा आहे. दिनांक १८-०४-२०१६ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे विमा उतरवीलेल्‍या  गाईपैकी काळ्या-पांढ-या रंगाची १ गाय सर्पदंश होऊन मृत झालेली आहे. सदर गाय मृत झाल्‍यानंतर तिचे दिनांक १८-०४-२०१६ रोजी मा.पशुधन विकास अधिकारी, चिचोंडी पाटील ता.जि. अहमदनगर यांचेकडे शव विच्‍छेदन केले होते व पंचनामा केला होता. याबाबत ग्रामपंचायत दाखला व पंचनामा तक्रारदार यांनी दाखल केला आहे.  सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीमध्‍ये मान्‍य केले आहे की, तक्रारदाराने ज्‍या गायीचा विमा उतरविलेला असून ती गाय सर्पदंशाने मयत झाली आहे. यावरून तक्रारदार आपल्‍या मयत गायीची विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे.

          तसेच मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांचा पुढील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे.   [1997] 1 CPR 61/ [1996] 3 CPJ 370 – Appeal No.379 of 1994 Decided on 01-08-1996 - National Insurance Company Vs. S.M. Addul Karim.  सदर न्‍यायनिवाडा या तक्रारीस लागु होत नाही, असे मंचाचे मत आहे.

     दुसरी गोष्‍ट अशी की तक्रारदाराने आपल्‍या मयत गायीची विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी सामनेवाले यांचेकडे वेळेतच आपला परिपूर्ण प्रस्‍ताव दाखल केला मात्र सामनेवाले यांनी थातुर मातूर कारण सांगुन तक्रारदाराला विमा रक्‍कम देण्‍याचे नाकारले यावरून प्रस्‍तुत कंपनीचा तक्रारदारास केवळ त्रास देण्‍याचाच हेतु दिसून येत आहे.  त्‍यामुळे तक्रारदारास त्रास झाला, त्‍याबद्दल भरपाई मिळणेस पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

  मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

१.

तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

 २.

सामनेवाले यांनी तक्रारदारास त्‍यांच्‍या मृत गायीची देय विमा रक्‍कम रूपये ४०,०००/- (अक्षरी रूपये चाळीस हजार) व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासुन संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ६ टक्‍के प्रमाणे व्‍याज द्यावे.

 

३.

सामनेवाले यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार) द्यावा.

 

४.

वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५.

या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६.

तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.