Maharashtra

Sangli

CC/09/2203

Ashok Annasaheb Upadhye - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Ltd., - Opp.Party(s)

19 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/2203
 
1. Ashok Annasaheb Upadhye
Aarag,Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.Ltd.,
Balkrishna Complex, Shivaji Rd., Miraj, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                            नि. ३३
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्‍या श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २२०३/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    २७/१०/२००९
तक्रार दाखल तारीख   ०५/११/२००९
निकाल तारीख       १९/११/२०११
----------------------------------------------------------------
अशोक आण्‍णासाहेब उपाध्‍ये
वय ५४ वर्षे, धंदा वाहतूक व्‍यवसाय,
रा.आरग, ता.मिरज जि.सांगली                                        ..... तक्रारदारú
          
 विरुध्‍दù
 
दी न्‍यू इंडिया श्‍युरन्‍स कं.लि.
बाळकृष्‍ण कॉम्‍प्‍लेक्‍स, शिवाजी रोड,
मिरज, जि.सांगली
(समन्‍सची बजावणी मा‍ता बिल्‍डींग,
आंबेडकर रोड, सांगली यांचेवर करण्‍यात यावी.)             .....जाबदारúö
                               
                                      तक्रारदारतर्फेò     : +ìb÷.श्री.एम.डी.पवार
   जाबदार तर्फे           : +ìb÷. श्री एस.एस.पाटील
                          
नि का ल प त्र
 
द्वारा- अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
.     तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्‍या वाहनाच्‍या अपघात विमा दाव्‍याबाबत दाखल केला आहे.
 
२.    सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
तक्रारदार यांच्‍या टाटा टेंपो या वाहनाचा जाबदार यांचेकडे विमा उतरविला होता. सदर वाहनाचा विम्‍याचा कालावधी हा दि.१५/२/०८ ते १४/२/०९ असा होता. सदर वाहनास दि.१/५/०८ रोजी अपघात झाला. तक्रारदार यांनी तात्‍काळ जाबदार यांचेकडे विमादावा दाखल केला. जाबदार यांनी पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग झाला या कारणास्‍तव तक्रारदार यांचा विमादावा दि.१४/१/०९ रोजी फेटाळला. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्‍य कारणास्‍तव नाकारला तसेच विमादाव्‍याबाबत निर्णय घेण्‍यास विलंब केला. जाबदार यांनी दिलेल्‍या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी वाहनाच्‍या विमादाव्‍याची रक्‍कम व्‍याजासह मिळावी तसेच जाबदार यांनी दिलेल्‍या सदोष सेवेमुळे शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी तसेच इतर तदनु‍षंगिक मागण्‍यांसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ८ कागद दाखल केले आहेत. 
 
३.    जाबदार यांनी याकामी नि.१५ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे.  तक्रारदार यांच्‍या वाहनासाठी देण्‍यात आलेली विमा पॉलिसी ही Goods Carrying Commercial Transport Vehicle या स्‍वरुपाची आहे. सदर वाहनातून मालवाहतूक करण्‍यासाठी परवाना देण्‍यात आला आहे. अपघाताचेवेळेस सदर वाहनातून प्रवासी वाहतूक करत असल्‍याचे पोलिस तपासातून निष्‍पन्‍न झाले आहे. त्‍यामुळे पॉलिसीमधील अटी व शर्तीचा तक्रारदार यांनी भंग केला आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे विमादाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत.  तक्रारदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेला वाहनाच्‍या दुरुस्‍तीस आलेला खर्च जाबदार यांनी अमान्‍य केला आहे. तक्रारदार यांनी अपघाताबाबत सूचना दिल्‍यानंतर जाबदार यांनी तात्‍काळ सर्व्‍हेअरची नेमणूक केली होती. सर्व्‍हेअर यांनी त्‍यांचा अहवाल याकामी दाखल केला आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी योग्‍य कारणास्‍तव नाकारला आहे. त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ नि.१६ ला प्रतिज्ञापत्र व नि.१७ च्‍या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
 
४.    तक्रारदार यांनी नि.१८ ला शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.२० ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२३ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२७ चे यादीने ८ कागद व नि.२९ चे यादीने ९ कागद दाखल केले आहेत व नि.३१ च्‍या यादीने १ कागद दाखल केला आहे.
 
५.    तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले. दोन्‍ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांच्‍या वाहनाचा जाबदार यांचेकडे विमा उतरविला आहे ही बाब उभयपक्षी मान्‍य आहे. सदर वाहनाचा अपघात विमा मुदतीत झाला ही बाबही जाबदार यांनी अमान्‍य केलेली नाही. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी ज्‍या कारणास्‍तव नाकारला ते दि.१४/१/२००९ चे पत्र तक्रारदार यांनी नि.५/३ वर दाखल केले आहे. सदर विमादावा नाकारण्‍यासाठी जे कारण नमूद केले आहे ते अपघातसमयी सदर वाहनातून प्रवासी वाहतूक करण्‍यात येत होती. तक्रारदार यांनी अपघातसमयी सदर वाहनातून प्रवास करणारे लोक हे बाजारला माल घेवून निघालेले लोक होते असे नमूद केले आहे. अपघातसमयी सदर वाहनातून लोक प्रवास करत होते ही बाब याठिकाणी स्‍पष्‍ट होते. वाहनातून प्रवासी वाहतूक केली तर पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग होईल काय याबाबत दोन्‍ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. दोन्‍ही विधिज्ञांनी याबाबत अनेक निवाडे दाखल केले आहेत. जाबदार यांनी याकामी IV (2011) CPJ 71 हा न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कंपनी विरुध्‍द प्रकाश वाघमारे हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्‍ये The policy covers use of the vehicle for any purpose other than (a) hire or reward असे नमूद आहे व सदर निवाडयामध्‍ये वाहनातून प्रवासी वाहतूक केली असल्‍यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग होतो असे नमूद आहे. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील पॉलिसीचे अवलोकन केले असता सदर पॉलिसीची प्रत नि.५/१ वर दाखल आहे. सदर पॉलिसीवर Certificate of insurance of goods carrying (other than 3-wh) – public carriers असे शिर्षक नमूद आहे. तसेच सदर पॉलिसीवर पुढे असेही नमूद केले आहे The policy does not cover use for (a) Organised racing (b) Pace making (c) Reliability Trials (d) Speed testing only under a permit असे नमूद आहे. सदर पॉलिसीमध्‍ये does not cover hire or reward असे कुठेही नमूद नाही. त्‍यामुळे त्‍याबाबतची अट पॉलिसीमध्‍ये असल्‍याचे दिसून येत नाही. पॉलिसी ही Goods carrier public carrier या स्‍वरुपाची आहे. त्‍यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग होतो या जाबदारांच्‍या कथनामध्‍ये तथ्‍य दिसून येत नाही. जाबदार यांनी पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग झाला या कारणास्‍तव तक्रारदार यांचा विमादावा नाकारला ते कारण योग्‍य व संयुक्तिक नाही त्‍यामुळे तक्रारदार यांचा विमादावा अयोग्‍य कारणाने नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे तात्‍काळ विमाप्रस्‍ताव पाठवूनही विमादाव्‍याबाबत निर्णय घेण्‍यास जाबदार यांनी विलंब केला हेही जाबदार यांच्‍या सदोष सेवेचे द्योतक आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
६.    तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जामध्‍ये वाहनाच्‍या दुरुस्‍तीसाठी आलेला खर्च रक्‍कम रु.१,००,०००/- तसेच अयोग्‍य कारणास्‍तव विमादावा नाकारल्‍यामुळे नुकसान भरपाई रु.१,००,०००/-, विमादाव्‍याबाबत निर्णय घेण्‍यास विलंब केल्‍यामुळे नुकसान भरपाई म्‍हणून रु.५०,०००/- व टोईंग चार्जेस रु.२,५००/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.९,५००/- ची मागणी केली आहे. तक्रारदार यांच्‍या प्रस्‍तुत प्रकरणातील पॉलिसीचे अवलोकन केले असता सदर पॉलिसीमध्‍ये वाहनाची I.D.V. रक्‍कम रु.६५,०००/- दर्शविण्‍यात आली आहे. जाबदार यांनी याकामी नि.१७/५ ला सर्व्‍हेअर यांचा अहवाल दाखल केला आहे. सर्व्‍हेअर यांनी आपल्‍या अहवालामध्‍ये विमादाव्‍यापोटी Net Liability रु. १६,६००/- दर्शविली आहे. सर्व्‍हेअर यांचा अहवाल अमान्‍य करण्‍यास कोणतेही संयुक्तिक कारण तक्रारदार देवू शकलेले नाहीत. जाबदार यांनी याकामी सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांचा 2005 (1) CPR 96 हा युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं. विरुध्‍द जाधव किराणा स्‍टोअर्स हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयाचे कामी सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी पुढील निष्‍कर्ष नोंदविला आहे. Report of Surveyor in insurance claim is an important document and should not be shunned without sufficient reasons असे नमूद केले आहे. सदर निष्‍कर्षाचे अवलोकन केले असता सर्व्‍हेअर यांनी मान्‍य केलेली रक्‍कम मंजूर करणे योग्‍य ठरेल असे या मंचाचे मत आहे. सदरचे विमादाव्‍याबाबत निर्णय घेण्‍यास जाबदार यांनी केलेला विलंब लक्षात घेता सदरची रक्‍कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे.९ टक्‍के व्‍याजासह मंजूर करण्‍यात येत आहे. तक्रारदार यांनी इतर केलेल्‍या अन्‍य नुकसान भरपाईच्‍या मागण्‍या अमान्‍य करण्‍यात येत आहेत. तक्रारदार यांनी टोइंग चार्जेस म्‍हणून रक्‍कम रु.२,५००/- ची केलेली मागणी विचारात घेता टोइंग चार्जेस सर्व्‍हेअर यांनी त्‍यांच्‍या रिपोर्टमध्‍ये नमूद केले असल्‍याने सदरची मागणी विचारात घेण्‍यात येत नाही. 
 
७.    तक्रारदार यांनी तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.९,५००/- ची मागणी केली आहे.   तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारला तसेच विमादाव्‍याबाबत निर्णय घेण्‍यास विलंब केला, त्‍यामुळे तक्रारदार यांना या न्‍याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्‍य ठरेल असे या मंचाचे मत आहे. 
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                        आदेश
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
 
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रुपये १६,६००/-(अक्षरी रुपये
   सोळा हजार सहाशे फक्‍त) दि.१/५/२००८ पासून द.सा.द.शे.९% दराने व्‍याजासह अदा
   करावेत.
 
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये ३,०००/- (अक्षरी रुपये तीन   
   हजार माञ) अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक ४/१२/२०११ पर्यंत करणेची आहे.
 
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द
   ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली                                             
दिनांकò: १९/११/२०११                          
 
 (सुरेखा बिचकर)                (गीता सु.घाटगे)                        (अनिल य.गोडसे÷)
       सदस्‍या                       सदस्‍या                                 अध्‍यक्ष           
जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  
 
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्‍टाने दि.//२०११
       जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्‍टाने दि.//२०११
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.