Complaint Case No. CC/266/2017 | ( Date of Filing : 29 Jun 2017 ) |
| | 1. Arya Associates, Through ilts Authorised Partner Shri Sanjay Sudhakar Labhsetwar | Offoce- F-5, Plot No. 285, Hariom Complex, Tawakkal Layout, Wadi, Nagpur 440023 | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. The New India Assurance Co.Ltd., Through its Regional Manager | Nagpur Regional Office Dr. Ambedkar Bhawan, MECL Premises, 4th floor, High Land Drive, Seminary Hills, Nagpur 440006 | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | . आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये- - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याची आर्या असोसिएटस या नावाने पार्टनर शिप फर्म असून त्यांचा Medical Equipments (वैद्यकीय उपकरणे) विक्रीचा व्यवसाय असून ते वेगवेगळया हॉस्पीटल मध्ये ऑपरेशन व सर्जरीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी Medical Equipments पुरवठा करीत असतात. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून दि. 28.05.2015 ते 27.05.2016 या कालावधीकरिता रुपये 50,00,000/- इतक्या रक्कमेच्या विमामुल्याकरिता विमा प्रिमियम रक्कम रुपये 9,551/- अदा करुन विमाकृत केले होते.
- दि. 21 व 22.06.2015 च्या दरम्यान नागपूर शहरात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने नागपूर येथील धंतोली हा संपूर्ण भाग 6-7 फुट पाण्याखाली होता, त्यामुळे तक्रारकर्त्याचे गोडाऊन मध्ये पावसाचे गाळयुक्त पाणी शिरल्याने तक्रारकर्त्याच्या गोडाऊनमधील संपूर्ण स्टॉक मधील मशिनरी व इक्विप्मेंट हे पाण्यात बुडाल्याने पूर्णपणे निकामी होऊन रक्कम रुपये 12,12,510/- इतक्या रक्कमेचे नुकसान झाले. तक्रारकर्त्याला सुमारे 2-3 दिवस गोडाऊन मधील संपूर्ण गाळयुक्त पाणी काढण्यास लागले. त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना 23 ते 24.06.2015 च्या दरम्यान कळविले. त्यानुसार दि. 25.06.2015 रोजी विरुध्द पक्षाचे सर्व्हेअर जी.जी. खुशलानी यांनी प्रत्यक्ष गोडाऊनची पाहणी करुन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार केला. सर्व्हेअर यांना Meteorological Department यांचा रिपोर्ट तसेच News Paper Articles इत्यादी कागदपत्रे देण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व्हेअर यांनी तक्रारकर्त्याच्या गोडाऊन मधील मालाचे रक्कम रुपये 12,12,510/- इतके रक्कमेचे नुकसान झाल्याबाबतचा अहवाल तयार केला, परंतु या सर्व्हे अहवालाची कोणतीही प्रत तक्रारकर्त्याला देण्यात आली नव्हती. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे विमा दावा सादर करुन झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रक्कमेची मागणी केली असता, विरुध्द पक्षाने दि. 29.03.2017 रोजी तक्रारकर्त्याचा कायदेशीररित्या देय असलेला विमा दावा नाकारला. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअरचा दि. 25.06.2015 रोजीचा अहवाल प्राप्त केला असता त्यानुसार सर्व्हेअर यांनी विमा रक्कमेतून 35.5 टक्के एवढी रक्कम वजावट करुन रुपये 4,30,496/- इतकी नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला.
- Meteorological Department व सर्व्हेअर यांच्या अहवालामध्ये दि.21.06.2015 ते 22.06.2015 रोजी मोठया प्रमाणात पाऊस झाल्याची बाब नमूद आहे. सदरच्या पाऊसामुळे गोडाऊन मधील संपूर्ण मालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून तो माल मेडिकल सर्जिकल कामासाठी विक्री योग्य नसल्यामुळे त्या मालाचे रुपये 12,12,510/- इतके नुकसान झालेले असतांना देखील त्यामधून 35.5 टक्के रक्कम बेकायदेशीररित्या विरुध्द पक्षाने वजावट केली. तक्रारकर्त्याचे प्रत्यक्षात रुपये 12,12,510/- इतके नुकसान झाले असतांना देखील विरुध्द पक्षाने ती रक्कम दिली नाही, सदरची बाब ही सेवेतील कमतरता असल्याने तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन विमा दावा रक्कम रुपये रुपये 12,12,510/- व्याजासह मिळण्याची, तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्याची मागणी केली आहे.
- विरुध्द पक्षाने लेखी जबाब दाखल करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याने व्यावसायिक हेतूने सदरची पॉलिसी घेतली असल्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत येत नाही. तसेच तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान हे Seepages मुळे झालेले असून पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे Seepage मुळे झालेल्या नुकसानीची रक्कम देय नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत सदरच्या वस्तु हॉस्पीटलमध्ये विक्री करता घेतले असल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याने व्यवसायाच्या अनुषंगाने सदरची पॉलिसी घेतली आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सर्व्हे रिपोर्ट हा विमा कंपनीवर बंधनकारक नाही. विरुध्द पक्षाने पॉलिसीतील अटी शर्ती प्रमाणे तक्रारकर्त्याचा विमा दावा योग्य त्या कारणाने नाकारला असल्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय.
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे प्रिमियम रक्कम अदा करुन Medical Equipments साठी विमा उतरविला होता हे नि.क्रं. 2 (2) वर दाखल पॉलिसीवरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते.
- तक्रारकर्त्याच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, तक्रारकर्त्याच्या संपूर्ण मालाचे रुपये 12,12,510/- इतक्या रक्कमेचे नुकसान झालेले असतांना विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअर यांनी 35.5 टक्के एवढी रक्कम वजावट करुन रुपये 4,30,496/- इतकी नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला व त्यानंतर पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे Seepage मुळे झालेल्या नुकसानीसाठी रक्कम देय नाही असे कारण सांगून विरुध्द पक्षाने विमा दावा नाकारला. विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअरने 35.5 टक्के रक्कम कोणत्या आधारावर वजावट केली याबाबतचा कोणताही खुलासा केला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून संभावित नुकसानभरपाईच्या अनुषंगाने पॉलिसी घेतली असून ती व्यावसायिक कारणाकरिता घेतलेली नाही. तक्रारकर्त्याने युक्तिवाद करतांना मा. राष्ट्रीय आयोगाच्या M/s. Harsolia Motors VS M/s National Insurance Co. Ltd. & Ors. 2005 (1) CPR 1 (NC) तसेच New INDIA ASURANCE CO. LTD. VS R.N.PANDEY IV (2011) CPJ 478 (NC) या प्रकरणात पारित केलेल्या न्यायनिवाडाचा आधार घेतलेला आहे.
- विरुध्द पक्षाने युक्तिवाद करतांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या CIVIL APPEAL NO 7289 OF 2009 THE CHAIRMAN & MANAGING DIRECTOR, CITY UNION BANK LTD. & ANR. VS. R CHANDRAMOHAN या प्रकरणातील न्यायनिवाडयाचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की, प्रस्तुत प्रकरणातील तथ्य विचारात घेता, प्रस्तुत तक्रार चालविण्याचा या आयोगास अधिकार नाही. तक्रारकर्त्याच्या मालाचे नुकसान हे Seepage मुळे झालेले असून पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे तक्रारकर्त्याचा विमा दावा देय नसल्याने नाकारलेला आहे.
- उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने त्याच्या संपूर्ण मालाच्या अनुषंगाने रक्कम रुपये 50,00,000/- विमा विरुध्द पक्षाकडून घेतला होता ही बाब नि.क्रं. 2(2) वर दाखल पॉलिसीवरुन दिसून येते. तक्रारकर्ते हे पार्टनरशिप फर्म असून त्या अनुषंगाने पार्टनरशिप फर्मनोंदणीबाबचे दस्तावेज नि.क्रं. 2(2) वर दाखल केले आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (m) मध्ये person – includes या व्याख्येत a firm whether registered or not असे स्पष्टपणे नमूद केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2 1(d) व 2 (m) मधील तरतुद विचारात घेता तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरतो. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या मा. राष्ट्रीय आयोगाच्या M/s. Harsolia Motors VS M/s National Insurance Co. Ltd. & Ors. 2005 (1) CPR 1 (NC) तसेच New INDIA ASURANCE CO. LTD. VS R.N.PANDEY IV (2011) CPJ 478 (NC) या प्रकरणात पारित केलेल्या न्यायनिवाडानुसार Contract of Insurance is contract of indemnity असून तक्रारकर्त्याने घेतलेली पॉलिसी ही व्यावसायिक कामाकरिता घेतली होती असे म्हणता येणार नाही ही बाब स्पष्ट केली आहे.
- तक्रारकर्त्याच्या गोडाऊन मधील मालाचे दि. 21 व 22.06.2015 रोजीच्या दरम्यान मोठया प्रमाणात झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले असल्याने ही बाब शाबीत करण्याकरिता तक्रारकर्त्याने Meteorological Department चा दि. 07.08.2015 रोजीचा अहवाल नि.क्रं. 2(9) वर दाखल केला आहे. तसेच वर नमूद तारखेच्या दिवशी मोठया प्रमाणात पाऊस झाल्याची बाब सर्व्हेअर यांच्या नि.क्रं. 2(5) वर दाखल रिर्पोट मध्ये देखील नमूद आहे.
- सर्व्हेअर यांनी दिलेल्या नि.क्रं. 2(6) च्या रिपोर्ट मध्ये झालेल्या नुकसानीचे असेसमेन्ट (मूल्यमापन) करतांना असे नमूद केले आहे की, ASSESSMENT - After prolong negotiation with Insured I assessed the loss on % basis considering the fact that to make the stock in saleble condition insured has to get the stock repacked and also resterlise the same and same has to be discounted to Drs performing the surgery.
- वर नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्षाचे सर्व्हेअर जी.जी. खुशलानी यांनी नुकसान झालेल्या मालाची प्रत्यक्ष पाहणी करुन रुपये 12,12,510/- इतक्या रक्कमेचे नुकसान झाले असून त्यामधून सरासरी 35.5 टक्के इतकी रक्कम वजावट करुन रुपये 4,30,496/- इतकी रक्कम देय असल्याबाबतचा अहवाल तयार केला आहे. विरुध्द पक्ष यांनीच सर्व्हेअर नियुक्त केला असून त्या सर्व्हे रिपोर्ट मध्ये Seepage मूळ नुकसान झाल्याचे कुठेही नमूद नाही. तसेच Seepage मुळ नुकसान झाल्यास ती रक्कम देय नाही ही बाब दर्शविण्याकरिता विरुध्द पक्षाने पॉलिसीतील ज्या अटी शर्तींचा आधार घेतला आहे, त्या अटी शर्ती विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला पुरविल्याबाबतचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही अथवा त्या अटी शर्ती देखील आयोगा समक्ष दाखल केल्या नाहीत.
- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या Civil Appeal No. 8249/2022, SLP Civil No. 25457/2019, M/S TEXCO MARKETING PVT. LTD. VS. TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LTD. & ORS. या प्रकरणात पारित केलेल्या न्यायनिवाडयानुसार कोणत्याही विमा कंपनीस पॉलिसीच्या अटी शर्ती तसेच Exclusion clause विषयी पॉलिसीधारकास पॉलिसी देतांना माहिती न दिल्यास अथवा अटी-शर्ती समजावून न सांगितल्यास त्या कारणास्तव विमा दावा नाकारता येणार नाही असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. तक्रारकर्त्याला न दिलेल्या अटी शर्ती व Exclusion clause च्या आधारावर तक्रारकर्त्याचा कायदेशीरिरित्या देय असलेला विमा दावा विरुध्द पक्षाने नाकारणे ही बाब अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी असून दोषपूर्ण सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
- मुद्दा क्रमांक 3 बाबत – मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे व विरुध्द पक्षाने वर नमूद केल्याप्रमाणे दोषपूर्ण सेवा दिली आहे. तक्रारकर्त्याने सर्व्हेअरच्या सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे रक्कम रुपये 12,12,510/- इतक्या रक्कमेची मागणी केली आहे. परंतु सर्व्हे रिपोर्ट मध्ये सरासरी 35.5 टक्के रक्कम वजावट करुन 4,30,496/- देय असल्याबाबत सर्व्हेअर यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने तक्रारकर्त्याने मा. राष्ट्रीय आयोग यांच्या New INDIA ASURANCE CO. LTD. VS R.N.PANDEY IV (2011) CPJ 478 (NC) या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की, 40 टक्के रक्कम वजावट करतांना सर्व्हेअर यांनी कोणते निकष लावले याबाबत सर्व्हेअर यांनी कोणतेही स्पष्टीकरण नमूद केले नाही. विरुध्द पक्षाने दि. 15.02.2024 रोजी गोडाऊन मधील नुकसान झालेल्या मालाचे फोटोग्राफ अभिलेखावर दाखल केले आहे. सदरचे फोटोग्राफ वरुन नेमके किती रक्कमेचे नुकसान झाले ही बाब स्पष्ट होत नाही. विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअरने रुपये 4,30,496/- इतके नुकसान झाल्याची बाब स्पष्ट केलेली असतांना सर्व्हे रिपोर्ट मधील झालेले नुकसान चुकिचे आहे असा जरी तक्रारकर्त्याचा दावा असला तरी ही सर्व्हेअरने केलेले असेसमेन्ट (मुल्यमापन) चुकिचे असल्याबाबतचे त्यांचे खंडण करणारा पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. तर सर्व्हेअर यांनी असेसमेन्ट करतांना कोणत्या बाबींचा आधार घेतला ही बाब नि.क्रं. 2(6) वरील रिपोर्टच्या असेसमेन्ट या सदरात नमूद केली आहे. 2023 NCJ 351 (NC) मा. राष्ट्रीय आयोग यांच्या United India Insurance Co. Ltd. & Anr. VS. M/s. Goel Spinning And Weaving Mills, First Appeal No. 516 of 2022 या न्यायनिर्णयानुसार सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे रक्कम देण्याची विमा कंपनीची जबाबदारी आहे, ही बाब स्पष्ट नमूद केली आहे. परिणामी तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून सर्व्हेअरने दि. 25.06.2015 रोजी दिलेल्या रिपोर्टनुसार रक्कम रुपये 4,30,496/- व त्यावर विमा दावा नाकारल्याचा दि. 29.03.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे तक्रारकर्त्याला विमा दावा रक्कम रुपये 4,30,496/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख 29.03.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- अदा करावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |