Maharashtra

Gondia

CC/14/57

SMT.SHANTA RAJENDRA GHASALE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI. MOHAN DIGAMBER LIMYE - Opp.Party(s)

MR.UDAY KSHIRSAGAR

27 Feb 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/14/57
 
1. SMT.SHANTA RAJENDRA GHASALE
R/O.RENGEPAR POST-PANDHARI, TAH.SADAK ARJUNI
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI. MOHAN DIGAMBER LIMYE
R/O.DIVISIONAL OFFICE NO. 130800,NEW INDIA CENTER, 7 TH FLOOR, 17-A,KUPREJ ROAD, MUMBAI-400001
MUMBAI
MAHARASHTRA
2. THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD., THROUGH REGIONAL MANAGER SHRI. GURUNATH REDDY PATIL
R/O.M.E.C.L.COMPLEX, SEMINARI HILLS, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI , SADAK ARJUNI
R/O.SADAK ARJUNI, TAH.SADAK ARJUNI
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. सदस्‍या, कु. वर्षा ओ. पाटील)

 

- आदेश -

(पारित दि. 27 फेब्रुवारी, 2015)

 

तक्रारकर्तीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्‍द पक्ष 1 यांनी रासायनिक विश्‍लेषण अहवाल नसल्‍यामुळे फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्ती ही रा. रेगेंपार पो. पांढरी ता. सडक अर्जुनी, जिल्‍हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. राजेंद्र मोहन घासले यांच्‍या मालकीची मौजा रेगेंपार पो. पांढरी ता. सडक अर्जुनी, जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्र. 316/2 व 174 ही शेतजमीन असल्‍यामुळे ते शेतकरी अपघात विम्‍याचे लाभधारक आहेत.      

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 3 हे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्‍याचे काम करतात.

 

4.    तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक 16/10/2011 रोजी आपल्‍या शेतात कामाला गेला असता विषारी साप चावल्‍याने उपचारा दरम्‍यान दिनांक 27/10/2011 रोजी झाला. 

 

5.    तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्‍याने तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 3 यांचेकडे दिनांक 17/01/2012 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह विमा दावा सादर केला.  परंतु  विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या दाव्‍याबाबत दिनांक 09/11/2012 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या रासायनिक विश्‍लेषण अहवालाची मागणी केली आणि तो अहवाल लवकर उपलब्‍ध न झाल्‍याने विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा फेटाळला.  म्‍हणून तक्रारकर्तीने विमा दाव्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- मिळण्‍यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रू. 30,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- मिळण्‍यासाठी दिनांक 08/09/2014 रोजी न्‍याय मंचात तक्रार दाखल केली आहे.

 

6.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍यायमंचाने दिनांक 16/09/2014 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 25/09/2014 ला मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला.   विरुध्‍द पक्ष 3 यांना संधी देऊनही ते सदर प्रकरणांत हजर झाले नाहीत म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 20/02/2015 रोजी न्‍यायमंचाने पारीत केला.  

 

7.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब दिनांक 12/12/2014 रोजी  दाखल केला असून तो पृष्‍ठ क्र. 55 वर आहे.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या जबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने आवश्‍यक असलेले दस्‍ताऐवज C. A. Report दाखल केले नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा दावा फेटाळला. विरुध्‍द पक्ष 1 यांनी दिनांक 09/11/2012 रोजी तक्रारकर्तीला रासायनिक विश्‍लेषण अहवाल सादर करण्‍याबाबत लेखी पत्र दिले आणि तसा वेळसुध्‍दा दिला.  परंतु तक्रारकर्तीने ते संबंधीत दस्‍ताऐवज विरुध्‍द पक्ष 1 यांचेकडे सादर केले नाही आणि शासन निर्णयानुसार ते आवश्‍यक दस्‍ताऐवज आहे असे विरुध्‍द पक्ष 1 यांनी आपल्‍या लेखी जबाबात सांगितले.  तसेच त्रिपक्षीय करार आणि M.O.U. यांच्‍या CL.I च्‍या अटी व शर्तीनुसार जर सर्पदंशाने मृत्‍यु झाल्‍यास एफ.आय.आर., पोलीस अहवाल, इंक्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, फोरेंसीक लॅब रिपोर्ट, व्हिसेरा रिपोर्ट हे आवश्‍यक दस्‍ताऐवज आहे.  तसेच मृत्‍युचे कारण काय हे कुठेच रेकॉर्डवर नसल्‍यामुळे आणि विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपल्‍या सेवेमध्‍ये कुठलीही त्रुटी न केल्‍यामुळे तक्रारकर्तीचा दावा खारीज करण्‍यात यावा असे विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपल्‍या लेखी जबाबात सांगितले आहे.. 

 

8.    विरूध्‍द पक्ष 3 हे सदरहु प्रकरणांत हजर न झाल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश विद्यमान न्‍यायमंचाने दिनांक 20/02/2015 रोजी पारीत केला.

 

9.    तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना सन 2011-2012 चा शासन निर्णय पृष्‍ठ क्र. 12 वर, शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना क्‍लेम फॉर्म- भाग 1 पृष्‍ठ क्र. 18, 19 वर, गाव नमुना 7/12 उतारा पृष्‍ठ क्र. 24 ते 28 वर, धारण जमीनीची नोंदवही पृष्‍ठ क्र. 29 वर, मर्ग सुचना पृष्‍ठ क्र. 30 वर, घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 32 वर, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 36 वर, मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 44 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्‍ठ क्र. 58 वर, तक्रारकर्तीच्‍या वकीलांचा लेखी युक्तिवाद पृष्‍ठ क्र. 67 वर, याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.

  

10.   तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी दिनांक 23/12/2014 रोजी पृष्‍ठ क्र. 61 वर लेखी युक्तिवाद सादर केलेला आहे आणि त्‍यांनी तोंडी युक्तिवाद देखील केलेला आहे.  त्‍यात त्‍यांनी असे सांगितले की, विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचा सुर्पदंशाने झालेल्‍या मृत्‍युबाबत रासायनिक विश्‍लेषण अहवाल दिले नसल्‍याचे नमूद करुन नामंजूर केला.  तक्रारकर्तीचा पती संर्पदंशाने मरण पावला असून पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्टमध्‍ये मृत्‍युचे कारण स्‍पष्‍ट नमूद नसले तरी पोलीस चौकशी दस्‍ताऐवज व पोलीस पाटील यांचे प्रमाणपत्रावरुन तक्रारकर्तीचा पती हा संर्पदंशाने मरण पावला हे स्‍पष्‍ट नमूद केलेले आहे आणि असे असूनही तक्रारकर्तीला रासायनिक विश्‍लेषण अहवालाची मागणी करणे गैर आहे असे त्‍यांनी आपल्‍या लेखी व तोंडी युक्तिवादात सांगितले आहे.  तसेच तक्रारकर्तीचा दावा वि‍हीत मुदतीत आहे असून तक्रारकर्तीच्‍या पतीचा संर्पदंश होण्‍याच्‍या व मृत्‍युच्‍या वेळेस  विरुध्‍द पक्ष 1 यांचेच विमा संरक्षण लागू होते.  विरुध्‍द पक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे म्‍हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे.

 

11.   विरूध्‍द पक्ष 1 व 2 तर्फे ऍड. इंदिरा बघेले यांनी दिनांक 16/01/2015 रोजी शपथपत्रावरील पुरावा द्यावयाचा नाही अशा आशयाची पुरसिस सदरहू प्रकरणांत पृष्‍ठ क्र. 63 वर दाखल केली आहे. तसेच त्‍यांनी आपला लेखी युक्तिवाद दिनांक 20/02/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्‍ट क्र. 64 वर आहे. तसेच तोंडी युक्तिवाद देखील केला.  त्‍यांनी आपल्‍या लेखी युक्तिवादात सांगितले की, तक्रारकर्तीने रासायनिक विश्‍लेषण अहवालाविषयी आवश्‍यक दस्‍ताऐवज सदरहू प्रकरणात दाखल केले नाही.  दिनांक 09/11/2012 रोजी विरुध्‍द 1 यांनी एक लेखी पत्र तक्रारकर्तीला रासायनिक विश्‍लेषण अहवाल सादर करण्‍यासाठी दिले आणि त्‍याकरीता लागणारा वेळसुध्‍दा दिला परंतु तक्रारकर्तीने सदर दस्‍ताऐवज दाखल केले नाही आणि विमा दावा सिध्‍द करण्‍याकरीता शासन निर्णयानुसार ते आवश्‍यक दस्‍ताऐवज आहे. त्रिपक्षीय करार व M.O.U. यांच्‍या CL.I च्‍या अटी व शर्तीनुसार जर सर्पदंशाने मृत्‍यु झाल्‍यास एफ.आय.आर., पोलीस अहवाल, इंक्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, फोरेंसीक लॅब रिपोर्ट, व्हिसेरा रिपोर्ट हे आवश्‍यक दस्‍ताऐवज तसेच मृत्‍युचे कारण रेकॉर्डवर कुठेच आले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपल्‍या सेवेत कुठल्‍याही प्रकारचा कसूर केलेला नाही म्‍हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

12.   तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच, दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

- कारणमिमांसा

13.   तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक 16/10/2011 रोजी आपले शेतात कामाला गेला असता विषारी साप चावल्‍याने उपचारा दरम्‍यान दिनांक 27/10/2011 रोजी झाला आणि तक्रारकर्तीच्‍या पतीची मौजा रेगेंपार, पो. पांढरी ता. सडक अर्जुनी येथे भूमापन क्र. 316/2 व 174 ही शेतजमीन असल्‍यामुळे ते शेतकरी जनता अपघात विम्‍याचे लाभधारक आहेत आणि तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असल्‍याने तक्रारकर्तीने विमा दावा मिळण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे संपूर्ण कागदपत्रासह रितसर अर्ज सादर केला.

 

14.   विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीने रासायनिक विश्‍लेषण अहवाल सादर केलेला नाही व मृत्‍युच्‍या कारणाविषयी कुठलेही दस्‍तऐवज सदरहू प्रकरणांत दाखल केले नाही म्‍हणून दावा फेटाळून लावला.  परंतु पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्ट Clause-5 - Substance of accompanying Report from Police Officer or Magistrate together with the date of death if known. Supposed cause of death or reason for examination यामध्‍ये As per police inquest and requisition deceased had snake bite on 16/10/2011. Admitted at G.M.C. Nagpur.  He died during treatment on 27/10/2011 at 6.30 p.m.  असे नमूद करण्‍यात आले आहे.  तसेच पोलीस पाटील यांनी दिलेला दाखला पृष्‍ठ क्र. 67 वर असून त्‍यात तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु सर्पदंशाने झाला असे नमूद करण्‍यात आले आहे.  तक्रारकर्तीच्‍या वकीलांनी तक्रारकर्तीच्‍या बाजूने असलेले मा. राज्‍य आयोगाचे न्‍यायनिवाडे सदरहू प्रकरणांत सादर केलेले आहेत.

 

(1)        III (2011) CPR 107 – NEW INDIA ASSURANCE CO. LTD. versus SAU. CHANDA SUNIL SAWANT

            Consumer Protection Act, 1986 – Sections 2 (1) (g) – Deficiency in service – Repudiation of insurance claim – On ground that complainant did not file any evidence to prove that deceased died by accident and no FIR, police panchnama or hospital certificate has been filed – Death certificate issued by the local authority available on record – Shows death due to accident – Such death covered by the insurance policy – Interference with the order passed by the Forum declined.

 

(2)        III (2005) CPJ 224 – LAXMAN MANIKRAO GAWHANE & ORS. versus  UNITED INDIA INSURANCE CO.LTD.

            Consumer Protection Act, 1986 – Sections  15 – Group insurance policy – Deceased member of group insurance policy, died due to snake bite – Death due to electric shock and snake bite, covered under policy – Claim repudiated – Complaint dismissed due to negative finding recorded by chemical Analyzer –Hence – Consumer jurisprudence altogether different from criminal jurisprudence  – Consumer complaints cannot be dismissed by adopting too technical view – Poison may not be detected during analysis due to many reasons – Judge is required to take into consideration symptoms, Post-mortem report and other relevant documents – Death due to snake bite successfully established – Order of Forum se aside – Company liable under Policy.   

            या न्‍यायनिवाडयानुसार तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.  

      करिता खालील आदेश.             

-// अंतिम आदेश //-

 

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक पतीच्‍या अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर विमा दावा दाखल केल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 17/01/2012 पासून ते संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्‍याज द्यावे. 

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.   

 

4.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्‍यांनी उपरोक्‍त आदेशाचे पालन संयुक्‍तरित्‍या अथवा वैयक्तिकरित्‍या करावे. 

 

7.    विरूध्‍द पक्ष 3 च्‍या विरोधात ही तक्रार खारीज करण्‍यात येते.    

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.