तक्रार क्र. CC/ 15/ 98 दाखल दि. 06.11.2015
आदेश दि. 11.05.2016
तक्रारकर्ता :- 1. श्री निकेश डोमाजी उके
वय – 29 वर्षे, धंदा – शेती
2. श्री दिक्षीत डोमाजी उके
दोघे रा.पांढराबोडी, पो.वरळी
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. द न्यु इंडीया अॅश्युरन्स कंपनी लिमीटेड
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑर्फीस नं 130800
न्यु इंडीया सेंटर, 7 वा माळा 17-ए,
कुपरेज रोड, मुंबई
2. द न्यु इंडीया अॅश्युरन्स कंपनी लिमीटेड तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,
एम.ई.सी.एल. कॉम्प्लेक्स,
सेमीनरी हिल्स, नागपुर
3. तालुका कृषी अधिकारी,
भंडारा ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा.सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.उदय क्षिरसागर.
वि.प.1 व 2 तर्फे अॅड.निला नशीने.
वि.प.3 तर्फे अॅड.तालुका कृषी अधिकारी
(आदेश पारित द्वारा मा.सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 11 मे 2016)
1. तक्रारकर्त्याची आई श्रीमती चंद्रकांता डोमाजी उके यांच्या अपघाताची शेतकरी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- विरुध्द पक्षांनी न दिल्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
तक्रारकर्त्याची आई यांची मौजा पिंगळाई ता.जि.भंडारा येथे शेतजमीन भुमापन क्र.328/2 असून ती व्यवसायाने शेतकरी होती.
तक्रारकर्त्याच्या आईचा मृत्यु दिनांक 22/05/2013 रोजी रेल्वे गाडीने धडक दिल्याने जखमी होऊन झाला.
तक्रारकर्ते हे मृतकाचे वारस असल्यामुळे त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्याबाबत दिनांक 20/09/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे रितसर अर्ज केला.
तक्रारकर्त्यांनी तक्रारीच्या पृष्ठर्थ्य दस्तऐवज यादीप्रमाणे नऊ दस्तऐवज दाखल केले आहेत. ते पान क्र. 13 ते 34 वर दाखल आहेत. तक्रारीच्या अर्जासोबत तलाठयाचे प्रमाणपत्र पान क्र.14 वर, 7/12 उतारा पान क्र.18 वर, गांव नमुना सहा क पान क्र. 21 , फेरफार नोंदवही पान क्र. 22 वर, इन्क्वेस्ट रिर्पोट पान क्र.23 वर, घटनास्थळ पंचनामा पान क्र. 25 वर, पोस्टमार्टम रिपोर्ट पान क्र.26 ते 33, मृत्यु प्रमाणपत्र पान क्र.34 इत्यादीसह प्रस्ताव सादर केलेला आहे.
3. सदर दावा मिळण्याकरीता तक्रारकर्त्यांनी दिनांक 27/10/2015 रोजी वकिला मार्फत विरुध्द पक्षांना नोटीस पाठविली. परंतु नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षाने नोटीसचे उत्तर दिलेले नाही किंवा तक्रारकर्त्यांना विमा दाव्याची रक्कम ही दिलेली नाही. त्यामुळे सदरहू प्रकरण विमा दाव्याची रक्कम तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंचासमोर तक्रार दाखल केली आहे.
4. तक्रारकर्त्यांची तक्रार मंचात दाखल होवून विरुध्द पक्षास दिनांक 23/11/2015 ला नोटीस पाठविण्यात आल्या.
5. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी उत्तर दिनांक 26/02/2016 रोजी दाखल केले आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी बयान व अॅड.निला नशीने यांनी युक्तीवादात म्हटले आहे की तक्रारकर्त्यांच्या आईचा मृत्यु दिनांक 22/5/2013 ला झाला हे मान्य आहे. परंतु तक्रारीसोबत प्रथम खबरी अहवाल (FIR) तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. FIR न सादर केल्यामुळे मृतकाचा मृत्यु रेल्वेगाडीने धडक दिल्याने झाला हे मान्य नाही. म्हणुन विरुध्द पक्षाची सेवेतील त्रृटी नाही.
7. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी जबाब दिनांक 25/1/2016 रोजी दाखल केला आहे.
8. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी जबाबामध्ये असे म्हटले आहे की दिनांक 20/09/2013 रोजी तक्रारकर्त्यांकडून प्राप्त झालेला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा प्रस्ताव पाहणी करुन दिनांक 23/09/2013 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे सादर करण्यात आला. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 यांचे सेवेतील कोणतीही त्रृटी नाही. सबब विरुध्द पक्ष क्र.3 विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
9. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तऐवज, लेखी बयाण व अॅड.उदय क्षिरसागर यांचा युकतीवाद तसेच विरुध्द पक्षाचे लेखी उत्तरे व अॅड.निला नशीने यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
1) तक्रारकर्त्यांच्या आईचा मृत्यु अपघाती मृत्यु आहे काय? – होय
2) तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर होण्यास पात्र आहे का? - होय.
3) अंतीम आदेश काय – कारणमिमांसेनुसार
कारणमिमांसा
10. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला इन्क्वेस्ट पंचनामा (Inquest Panchnama) वरुन स्पष्ट होते की ‘सदर मयत स्त्री जातीची असून उजव्या कडेवर पडलेली दिसत आहे. मृतकाचे वय अंदाजे 48 वर्षे असून रेल्वे गेटजवळील डाऊन लाईन जवळ पडलेली आहे. मृतकाचे डोक्याचे केस काळे असून अजवी कडील डोक्यापासून हनुवटी पर्यंतचा भाग गाडीचा जबर मार लागुन फुटलेला दिसत आहे.’
‘डोक्यातील मेंदु 2 फुटावर बाहेर जमीनीवर पडलेला दिसत आहे’. मृतकाजवळ भंडारा ते इतवारी रेल्वे तिकीट नं.38705625 दिनांक 22/05/2013 चे आहे. एकंदरीत सदर मयत स्त्री ही फाटक ओलांडून असतांना कोणत्यातरी धावत्या मालगाडीने धडक लागुन जबर जखमी होऊन मरण पावली आहे.
दिनांक 23/05/2013 रोजीचे पोस्टमार्टम रिर्पोट प्रमाणे Probale cause of Death – Probable cause of death is due to injury to vital organ & crush injury over head. यावरुन स्पष्ट होते की मृतकाचा मृत्यु अपघातामुळे झाला आहे.
महाराष्ट्र शासन निर्णयान्वये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित होण्याकरीता मार्गदर्शक सुचना दर्शविली आहे. मार्गदर्शक सुचना मध्ये प्रपत्र ड अपघाताचे पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे रस्ता/रेल्वे अपघाताकरीता प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, मृत्यु दाखला आवश्यक आहे.
उपरोक्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तक्रारकर्त्याने स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, मृत्यु दाखला दावाच्या प्रस्तावा सोबत दाखल केले आहे. प्रथम माहिती अहवाल प्रस्तावामध्ये दाखल केले नाही.
अपघात झाल्याबद्दल FIR हाच फक्त एकमेव पुरावा अपघात सिध्द् करण्यासाठी होऊ शकत नाही. Circumstantial evidence द्वारे जर अपघात झाल्याचे निष्पन्न होत असल्यास FIR असणे ही Manadatory requirement राहत नाही.
महाराष्ट्र शासन निर्णयान्वये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित होण्याकरीता योजनेची कार्यपध्दती व संबंधितांची कर्तव्ये आणि जबाबदा-या दर्शविलेली आहे. त्यानुसार (इ) विमा कंपनी(5) द्वारे प्रपत्र ड मध्ये नमुद केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच विम्याची रक्कम अदा करावी. दुर्घटना सिध्द् होत असेल व अपवादात्मक परिस्थितीत एखादया कागदपत्राची पुर्तता होवू शकत नसेल तर पर्यायी दाखल्याबाबत आयुक्त कृषी/जिल्हाधिकारी यांचेशी विचार विनिमय करुन पुर्तता करुन घेऊन विम्याची रक्कम अदा करावी.
उपरोक्त कथनानुसार स्पष्ट होते की तक्रारकर्त्याच्या आईचा मृत्यु हा अपघात आहे व तो नैसर्गिक मृत्यु नाही.
तक्रारकर्त्यांचा विमा दावा प्रस्ताव नामंजुर करणे ही विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांची कृती त्यांचे सेवेतील त्रृटी दर्शविते. त्यामुळे तक्रारकर्त्याचयी तक्रार मान्य होण्यास पात्र आहे.
करीता खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
-
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला संयुक्तपणे किंवा वैयक्तिकपणे तक्रारकर्त्याची विमा रक्कम रुपये 1,00,000/-(एक लाख) तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजेच दिनांक 06/11/2015 पासुन ते तक्रारकर्त्यांच्या हातात पडेपर्यंत 9% व्याजासह दयावी.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासासाठी नुकसान रुपये 5,000/-(पाच हजार) दयावे.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-(पाच हजार) दयावेत.
- विरुध्द पक्ष क्र.3 यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारित नाहीत.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाची अंमलबजावणी प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
- प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.