Maharashtra

Bhandara

CC/17/7

Smt.Bhagrata Ramchandra Ambedare - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv Uday Kshirsagar

24 Aug 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/7
( Date of Filing : 12 Jan 2017 )
 
1. Smt.Bhagrata Ramchandra Ambedare
R/o Zadgaon Tah Sakoli
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.Ltd through Divisional Manager
Divisional Office No.130800,New India Centre,7th floor,17-A,Kuprej Road
Mumbai 400001
Maharashtra
2. The New India Assurance Co.Ltd through Area Manager
MECL Complex,Seminary Hills ,
Nagpur 440018
Maharashtra
3. Taluka Agricultural Officer
Sakoli Tah Sakoli
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Aug 2018
Final Order / Judgement

(मंचाचा निर्णयः- श्रीमती स्मिता नि. चांदेकर – सदस्‍या यांचे आदेशान्‍वये)

 आदेश 

(आदेश पारीत दिनांक – 24/08/2018)

 

01.    तक्रारकर्तीने  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे.

02.   तक्रारकर्तीची  संक्षिप्‍त तक्रार  पुढील प्रमाणे

      तक्रारकर्ती श्रीमती भागरता रामचंद्र आंबेडारे हिचे मृतक पती रामचंद्र आडकु आंबेडारे  व्‍यवसायाने शेतकरी होते व त्‍यांच्‍या मालकीची मौजा-झाडगाव, ता. साकोली, जि.भंडारा येथे भूमापन क्र. 449 ही शेतजमीन होती. महाराष्‍ट्र शासनाने सन 2011-2012 करिता शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत विरुद्ध पक्ष द न्‍यु इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड कडे सर्व शेतक-यांचा अपघात विमा काढला होता व मृतक रामचंद्र आडकु आंबेडारे हे शेतकरी असल्‍याने  तसेच तक्रारकर्ती ही मृतकाची पत्‍नी असल्‍याने सदर विम्‍याचे लाभ धारक होते. तक्रारकर्तीचे पती मृतक श्री रामचंद्र आंबेडारे हे दि.07.01.2012 रोजी श्री. सुखदेव लांजेवार यांच्‍या शेतात विद्युत तारेचा झटका लागुन मरण पावले.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत विमा रक्‍कम मिळण्‍या करीता आवश्‍यक दस्‍तऐवजांसह वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांच्‍याकडे दिनांक 13/08/2012 रोजी रितसर अर्ज सादर केला.  तसेच विरुध्‍द पक्षाने वेळोवेळी मागणी केल्‍याप्रमाणे जे जे दस्‍ताऐवज मागीतले त्‍यांची पुर्तता तक्रारकर्तीने केली. तक्रारकर्तीने अर्ज व आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता केल्‍यानंतरही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दाव्‍याबाबत काहीही कळविले नसल्‍याने तक्रारकर्तीने वकीलामार्फत दिनांक 26/12/2016 रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांना कायदेशीर नोटीस पाठविल्‍यानंतरही विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करीत असल्‍याचे कळविले नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर न करता प्रलंबित ठेवल्‍याने तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. तसेच विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारकर्तीला न  देऊन ज्‍या उद्देशाने शासनाने मृत शेतक-यांची पत्‍नी व मुलांसाठी फायदा व्‍हावा म्‍हणून ही योजना सुरु केली त्‍या उद्देशालाच विरुध्‍द पक्षाने तडा दिलेला असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षांनी सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे. तसेच तक्रार दाखल करे पर्यंत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर न केल्‍याने तक्रारीचे कारण सतत सुरु असल्‍याने विमा कंपनीची कृती ही सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे, म्‍हणून तक्रारकर्तीने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 

      1.    अपघात विमा दाव्‍याची रक्कम रु.1,00,000/- दि. 13/08/2012 पासुन द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज देण्‍याचा विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेश व्‍हावा.

      2.    शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.30,000/- मिळावी.

      3.    तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्‍याचा विरुध्‍द पक्षास आदेश व्‍हावा.

03.   तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 शासन निर्णय, विमादाव्‍याची प्रत, 7/12 चा उतारा व इतर कागदपत्रे, तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या अपघाताबाबत आकस्मिक मृत्‍यु खबर व पोलीस दस्‍तऐवज, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यु प्रमाणपत्र, वारसान प्रमाणपत्र, वकीलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस इ. दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

04.   विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 विमा कंपनीने लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्तीच्‍या तक्रारअर्जास सक्‍त विरोध केला आहे. विरुध्‍दपक्षाने त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरात असे नमुद केले आहे की,  दिनांक 26/12/2016 रोजी वकीलामार्फत पाठविलेली नोटीस ही कालबाह्य आहे व ती विरुध्‍द पक्षाला बंधनकारक नाही. विरुध्‍द पक्षाने दिनांक 13/05/2014 च्‍या पत्रा नुसार तक्रारकर्तीला कळविले होते की, विमादावा प्रस्‍तावा सोबत दिलेल्‍या कागदपत्रानुसार (घटनास्‍थळ पंचनामा) मृतक हा शेत बांधीला लागून असलेल्‍या झुडपी जंगलातुन येणा-या प्राण्‍यांची शिकारीसाठी, शेजारील विद्युत तारावरुन अर्थिंग वायरद्वारे करंट लावत असतानां अपघात झाला.  जंगली प्राण्‍याची शिकार करणे कायद्याने गुन्‍हा आहे, म्‍हणून हा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे. तक्रारकर्तीचा दावा दिनांक 13/05/2014 ला नामंजूर करण्‍यात आला होता व त्‍यानंतर तक्रारकर्तीने दोन वर्षाच्‍या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. त्‍यामुळे तक्रारकर्तीचा सदर दावा कालबाह्य ठरतो.

     विरुध्‍दपक्षाने पुढे असे नमुद केले आहे की,  तक्रारकर्तीने दावा फेटाळल्‍याचे कारण मंचापासून लपवून ठेवले आहे व मंचाची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.  यास्‍तव तक्रारकर्तीचा दावा फेटाळून लावण्‍यात यावा. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीच्‍या अर्जातील इतर परिच्‍छेद निहाय कथन नामंजूर केले असून तक्रारकर्तीचा दावा खर्चासह खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

05.   वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांना नोटीस मिळाल्‍यावर त्‍यांनी  लेखी जवाब दाखल करुन कळविले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु दि.07.01.2012 रोजी झाल्‍यावर त्‍याबाबत विमा प्रस्‍ताव दि.13.08.2012 रोजी त्‍यांच्‍या कार्यालयास प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी तो दिनांक 14.08.2012 रोजी पुढील कार्यवाहीसाठी जिल्‍हा कृषी अधिक्षक अधिकारी, कार्यालय भंडारा यांचेकडे पाठविला. सदर प्रकरण मंजूर किंवा नामंजूर करणे ही बाब विरुध्‍द पक्ष क्रमांक 3 च्‍या कक्षेत येत नाही. करीता खुलासा मान्‍य करण्‍यात यावा.

06.   तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्रा वरील पुरावा, दोन्‍ही पक्षाचा लेखी युक्तिवाद तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

अ.क्रं.

मुद्दे

निष्‍कर्ष

1

वि.प.क्रं.1 व 2  यांनी सेवेत त्रुटीपूर्ण व्‍यवहार व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?     

होय.

 

 

 

2

तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास     पात्र आहे काय ?                                        

अंशतः

3

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

                                              

                                                                      - कारण मिमांसा

 

मुद्दा क्र. 1 ते 3 बाबत

07.         विरुध्‍दपक्ष क्रं-1)  व क्रं-2) विमा कंपनी तर्फे असा आक्षेप घेण्‍यात आलेला आहे की, ही तक्रार तक्रारीचे कारण घडल्‍या पासून म्‍हणजे तक्रारकर्तीचा विमा दावा हा दिनांक-13/05/2014 रोजी नामंजूर करण्‍यात आला होता  तेंव्‍हा पासून दोन वर्षाच्‍या आत मंचा समक्ष दाखल करणे आवश्‍यक होते परंतु तक्रारकर्तीने मंचा समक्ष तक्रार उशिराने  02 वर्षा नंतर दाखल केलेली असल्‍याने ती मुदतबाहय आहे. आपले या म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीचे नावे असलेले विमा दावा बंद करण्‍या बाबतचे दिनांक-13/05/2014 रोजीचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल करण्‍यात आली परंतु सदर पत्र हे तक्रारकर्तीला मिळाल्‍या बाबत पुराव्‍यार्थ पोस्‍टाची पोच दाखल केलेली नाही, त्‍यामुळे या पत्राचा उपयोग विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला होणार नाही, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्तीने तिला विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे तिचा दावा नामंजूर केल्‍या बाबत दिनांक-13/05/2014 रोजीचे पत्र मिळाले नसल्‍या बाबतची बाब पुराव्‍यार्थ दाखल केलेल्‍या तिच्‍या शपथपत्रात नमुद केलेली आहे.  तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने घेतलेल्‍या या मुद्दावरील आक्षेपावर तक्रारकर्तीचे वकीलानीं प्रत्‍युत्‍तर देताना असे सांगितले की, तिच्‍या विमा दावा प्रस्‍तावावर काय निर्णय झाला या संबधी तिला आज पर्यंत काहीही कळविलेले नाही आणि जो पर्यंत तिचा विमा दावा प्रस्‍ताव खारीज झाला असल्‍याचे तिला लेखी कळविल्‍या जात नाही, तो पर्यंत तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण (Continuing cause of action) घडत असते. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा रद्द केला होता त्‍या बाबतचे पत्र प्राप्‍त झाले होते ही बाब योग्‍य त्‍या पुराव्‍याच्‍या अभावी मंजूर करता येणार नाही, त्‍यामुळे तक्रारकर्तीला तिच्‍या विमा दाव्‍या संबधी कुठलीही माहिती न मिळाल्‍याने तक्रारीस कारण सतत घडत असल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार उशिराने मंचा समक्ष दाखल केली असा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने घेतलेला आक्षेप निरस्‍त ठरतो.  

08.   सदरच्‍या प्रकरणात महाराष्‍ट्र शासनाने वि.प.क्र. 1 व 2 द न्‍यु इंडिया इंन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांचेकडे सन 2011-2012 या कालावधीसाठी भंडारा जिल्‍ह्यातील शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा’ उतरविला होता ही बाब उभय पक्षांना मान्‍य आहे. तक्रारकर्तीचे पती रामचंद्र आडकु आंबेडारे यांच्‍या नावाने मौजा झाडगाव त.सा.क्र. झाडगाव 25, ता. साकोली, जि. भंडारा येथे भू.क्र.449 क्षेत्रफळ 1.16 हे. एकूण 2.05 हे. शेतजमीन असल्‍याबाबत 7/12 चा उतारा, गाव नमुना सहा-क इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केलेले आहेत.  त्‍यावरुन मृतक रामचंद्र आडकु आंबेडारे हे नोंदणीकृत शेतकरी होते व शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते हे सिध्‍द होते. तक्रारकर्तीचे पती शेतकरी होते आणि त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाला होता या बाबी विवादास्‍पद नाहीत. या प्रकरणामध्‍ये विवाद फक्‍त एवढाच आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उत्‍तरा नुसार दिनांक-13/05/2014 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्तीला कळविले होते की, घटनास्‍थळ पंचनाम्‍या वरुन मृतक हा शेत बांधीला लागून असलेल्‍या झुडपी जंगलातून येणा-या प्राण्‍यांच्‍या शिकारीसाठी, शेजारील विद्दुत तारा वरुन अर्थिंग वायरव्‍दारे करंट लावत असताना अपघात झाला.जंगली प्राण्‍यांची शिकार करणे कायद्दाने गुन्‍हा आहे, म्‍हणून विमा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे.

09.     या संदर्भात विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने तक्रारकर्तीचे नावे असलेल्‍या आणि तिचा विमा दावा बंद केल्‍या बाबतच्‍या पत्राचे मंचा तर्फे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये उपरोक्‍त नमुद कारण दर्शविलेले आहे. मंचा तर्फे दाखल पोलीस दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले. अकस्‍मात मृत्‍यू सुचना मध्‍ये दिनांक-08/01/2012 रोजी पोलीस पाटील श्री मारोती चंभरु झोडे यांना माहिती मिळाली की, मृतक रामचंद्र आडकू आंबेडारे हा श्री सुखदेव रामदास लांजेवार, राहणार झाडगाव यांच्‍या शेतात करंट लागून मरण पावला असल्‍याचे नमुद आहे. इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍यात सुध्‍दा अशाच प्रकारचा मजकूर नमुद आहे. घटनास्‍थळ पंचनाम्‍या मध्‍ये असे नमुद आहे की,  मृतक रामचंद्र आडकू आंबेडारे हा काल दिनांक-07/01/2012 ला रात्री 6.30 वाजताचे सुमारास घरुन कुठेतरी जातो असे म्‍हणून निघून गेला असता आज (दिनांक-08/01/2012) सकाळी 8.00 वाजताचे सुमारास तो सुखदेव लांजेवार हयांच्‍या शेत बांधीत करंट लागून मृत अवस्‍थेत असल्‍याचे फीर्यादी श्री मारोती झोडे यांना आढळून आले, त्‍याने शेतबांधीला लागून असलेल्‍या झुडपी जंगलातून येणा-या जंगल प्राण्‍यांची शिकारीसाठी शेजारील विद्दुत तारा वरुन अर्थिंगतार व्‍दारे करंट लावीत असता स्‍वतःच त्‍या करंटच्‍या संपर्कात येऊन करंट लागून तो मरण पावला असल्‍याचे फीर्यादी पंचा समोर सांगत आहे.

10.   उपरोक्‍त नमुद पोलीस दस्‍तऐवजांचे मंचा तर्फे सुक्ष्‍मरितीने अवलोकन केले असता मृतक हा श्री सुखदेव लांजेवार यांचे शेतात विद्दुत शॉक लागून मृत झाल्‍याचे दिनांक-08/01/2012 रोजी फीर्यादी श्री मारोती झोडे यांना दिसून आले परंतु प्रत्‍यक्ष्‍य घटना घडत असताना, ती घटना पाहिल्‍याचे कोणीही प्रत्‍यक्ष्‍यदर्शी साक्षीदार नाहीत आणि घटना ही मृतकाचे शेतातील नसून ती श्री सुखदेव लांजेवार यांचे शेतातील आहे. जंगल प्राण्‍यांचे शिकारीसाठी विद्दुत तारांमध्‍ये विद्दुत प्रवाह लावताना मृतकाचा मृत्‍यू झाला होता ही बाब पोलीसांनी फीर्यादी श्री मारोती झोडे यांनी पोलीसांना दिलेल्‍या जबाबा वरुन नोंदविलेली असल्‍याने या बाबी मध्‍ये मंचाला विश्‍वासर्हता दिसून येत नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने घेतलेला बचाव की, मृतक हा अपघाताचे वेळी जंगली प्राण्‍यांची शिकार करण्‍यासाठी गेला होता आणि तो कायद्दाने गुन्‍हा आहे यामध्‍ये तथ्‍य उरत नाही कारण अपघाताचे घटनेच्‍या वेळी मोक्‍यावर  प्रत्‍यक्ष्‍यदर्शी साक्षीदार कोणीही नाही. मृतकाचा मृत्‍यू हा विद्दुत प्रवाहामुळे अपघाती झाला होता ही बाब वैद्दकीय अधिकारी, उपजिल्‍हा रुग्‍णालय, साकोली यांनी दिनांक-08/01/2012 रोजीच्‍या मृतकाचे शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये सुध्‍दा नमुद केलेली आहे त्‍यामध्‍ये “ Most probable cause of death may be due to High Voltage electric shock” असे नमुद केलेले आहे.  दाखल मृत्‍यू प्रमाणपत्रावरुन मृतकश्री रामचंद्र आडकु आंबेडारे याचा मृत्‍यू हा दिनांक-07/01/2012 रोजी झालेला आहे. सदर पोलीस आणि वैद्दकीय दस्‍तऐवजां वरुन एवढाच निष्‍कर्ष निघतो की, मृतकाचा मृत्‍यू हा विद्दुत शॉक मुळे अपघाती झालेला आहे परंतु तो जंगली प्राण्‍यांची शिकार करण्‍यासाठी गेला होता ही बाब योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी मान्‍य करता येणार नाही.

11.    तक्रारकर्तीचे वकीलांनी खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्रांवर आपली भिस्‍त ठेवली-

         (1) मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने 2011 (4) CPR-23 (NC) “ The New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu” या प्रकरणात पारीत केलेल्‍या आदेशावर ठेवली. त्‍यामध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने खालील प्रमाणे आपले मत नोंदविले आहे-“ State Commission very rightly  refused to rely on FIR and statements recorded by police and placed reliance on affidavits filed before District Forum, which were not subjected to any cross-examination”  सदर अपिलीय आदेशा मध्‍ये सुध्‍दा पोलीसांनी नोंदविलेला एफ.आय.आर. आणि जाब-जबाब यावर विश्‍वास ठेवता येणार नाही, याउलट प्रतिज्ञालेखावरील पुरावा हा जास्‍त विश्‍वासार्ह असल्‍याचे नमुद केलेले आहे. पोलीस दस्‍तऐवजांवरुन अपघाताचे घटनेच्‍या वेळी वैयक्तिक उपयोगासाठी नोंद असलेल्‍या वाहनाचा उपयोग हा व्‍यवसायिक कारणासाठी होत असलेला विमा कंपनीचा निष्‍कर्ष हा निरस्‍त ठरविलेला आहे. आमचे समोरील प्रकरणात सुध्‍दा मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या निवाडयातील वस्‍तुस्थिती जरी भिन्‍न असली तरी त्‍यातील पोलीस दस्‍तऐवज आणि दाखल पुराव्‍या संबधी दिलेले तत्‍व (Ratio) लागू होते.

         (2) मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई, परिक्रमा खंडपिठ औरंगाबाद यांनी 2007 (3) CPR 142 “The New India Assurance Co.Ltd.-Versus-Smt. Hausabai Panalal Dhoka” या अपिलीय आदेशामध्‍ये “Statement of Witness recorded by police during investigation of criminal case would not be evidence unless such person was examined before forum” वरील तत्‍वाचा विचार केल्‍यास आमचे समोरील प्रकरणात सुध्‍दा मृतकाचे मृत्‍यू संबधी ज्‍याने पोलीसां समोर फीर्याद दिलेली आहे त्‍या फीर्यादीला विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तपासलेले नाही त्‍यामुळे आमचे समोरील प्रकरणात सुध्‍दा मा.राज्‍य आयोग, मुंबई परिक्रमा खंडपिठ औरंगाबाद  यांचे समोरील निवाडयातील वस्‍तुस्थिती जरी भिन्‍न असली तरी आदेशातील पुराव्‍या संबधी दिलेले तत्‍व लागू होते.

          (3) मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई, परिक्रमा खंडपिठ नागपूर यांनी प्रथम अपिल क्रं-A/10/355 “The Oriental Insurance Co.Ltd.-Versus-Smt. Rekha Ashokrao Maske and ohters” या दिनांक-03/12/2014 रोजी पारीत केलेल्‍या अपिलीय आदेशामध्‍ये खालील निरिक्षणे नोंदविलीत- “ Spot Pnachanama proved that deceased had illegally connected the wire fencing of the land to the electric pole and therefore, the electric current which was supplied to the wire fencing of the land, spread into the wet land of deceased and therefore the deceased sustained electric shock. The learned advocate of the appellant (Insurance Company) also invited our attention to the policy terms & conditions and submitted that as per exclusion clause of the policy , no amount assured under the policy, can be paid if the death is caused due to breach of law or misfeasance. Spot Panchanama is not sufficient to prove that the electric connection was given to the wire fencing of the land from the electric pole. Hence, there was no breach of law or misfeasance on the part of deceased life assured inviting the death by himself due to electric shock. Even, if it is accepted on the basis of that Panchanama that some electric line was connected to wire fencing from electric pole, there is no evidence to show that the deceased life assured had knowledge about the same”. मा.राज्‍य आयोग, परिक्रमा खंडपिठ, नागपूर यांचे समोरील अपिलीय आदेशातील वस्‍तुस्थिती ही आमचे समोरील प्रकरणातील वस्‍तुस्थितीशी तंतोतंत लागेू होते. मा.राज्‍य ग्राहक आयोगाने आदेशात पंचनामा हा पुरेसा पुरावा नसल्‍याचे नमुद करुन मृतकाचे स्‍वतःचे कृतीमुळे तो विद्दुत शॉक लागून मृत्‍यू पावल्‍याने मरण पावल्‍याने विमा दावा देय नसल्‍याची विमा कंपनीची भूमीका चुकीची असल्‍याने नमुद करुन विमाधारकाचे वारसांना  विमा राशी देय असल्‍याचा यवतमाळ जिल्‍हा ग्राहक मंचाचा निवाडा कायम ठेऊन विमा कंपनीचे अपिल फेटाळलेले आहे.

     उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयातील निवाडयांचे पुराव्‍या संबधीचे नोंदविलेले तत्‍व (Ratio) लक्षात घेता विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीची तक्रारकर्तीचा विमा दावा चुकीचे कारण नमुद करुन फेटाळल्‍याची कृती अयोग्‍य असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे मुद्दा क्रं-1) ते 3)  चे उत्‍तर “होकारार्थी” देण्‍यात येते.

12.     शासनाने शेतकरी अपघात विमा योजना ज्‍या उदात्‍त हेतूने म्‍हणजे शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍या नंतर त्‍याचे कायदेशीर वारसदारांना नुकसान भरपाई मिळावी या हेतूने सुरु केलेली आहे परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीची कारणे नमुद करुन तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळून तिला दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्तीचा पती हा अपघाताचे वेळी शेतकरी होता व त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे तक्रारकर्ती ही त्‍याची कायदेशीर वारसदार असल्‍याने विमा दावा रक्‍कम रुपये-1,00,000/-  तक्रार दाखल दिनांक-12/01/2017 पासून ते प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केला या बाबत कळविले नसल्‍यामुळे सदरची तक्रार तिला मंचा समक्ष दाखल करावी लागली, त्‍यामुळे तिला साहजिकच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे  करीता तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा  कंपनी कडून तिला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.  विरुध्‍दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा  यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. त्‍यामुळे मुद्दा क्रं-1) ते क्रं-3) चे उत्‍तर “होकारार्थी” देण्‍यात येते.

  13.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                ::आदेश::

         (01)  तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) तक्रार दाखल दिनांक-12/01/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत अदा करावी. विहित मुदतीत आदेशित रक्‍कम रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीला न दिल्‍यास नंतरचे कालावधी पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.- 12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला रक्‍कम देण्‍यास विरुध्‍दपक्ष विमा कंपनी जबाबदार राहिल.

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2)  विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीला देण्‍यात यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे संबधित विभागीय व्‍यवस्‍थापक/क्षेत्रीय व्‍यवस्‍थापकानीं निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

(05)  विरुध्‍दपक्ष क्रं-(3) यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(06)  निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.