Maharashtra

Bhandara

CC/18/9

Sandhya Uttam Vairagade - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv. Kailash Ramteke

01 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/18/9
( Date of Filing : 08 Feb 2018 )
 
1. Sandhya Uttam Vairagade
R/o Civil Line, Bhandara Tah.Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.Ltd through Divisional Manager
Division Office 4, Laxmi Nagar Square Nagpur, Tah.Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Oct 2021
Final Order / Judgement

                         (पारीत व्‍दारा श्री  भास्‍कर बी. योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                               (पारीत दिनांक–01 ऑक्‍टोंबर, 2021)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी विभागीय कार्यालय, नागपूर आणि शाखा कार्यालय भंडारा आणि ईतर एक यांचे विरुध्‍द समूह बीमा योजना/गट विमा योजना (Group Insurance Scheme) योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

   

       यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 अनुक्रमे दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीचे विभागीय कार्यालय, नागपूर आणि शाखा कार्यालय, भंडारा आहे. तक्रारकर्तीचा पती श्री उत्‍तम नत्‍थू वैरागडे हा सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी लिमिटेड, भंडारा रोड वरठी येथे ऑपरेटर-1 या पदावर कायमस्‍वरुपी नौकरीत होता आणि त्‍याचा वैयक्तिक क्रं-11213 असा होता थोडक्‍यात सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी  ही नियोक्‍ता  (Employer Company) कंपनी आहे आणि तिने कंपनी मध्‍ये ऑपरेटर-1 या पदावरील कार्यरत एकूण 62 कर्मचा-यांचा समूह बीमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडे विमा काढला होता, त्‍या विमा पॉलिसीचा क्रं-1611004215010000002 असा असून विमा कालावधी हा दिनांक-03.04.2015 ते दिनांक-02.04.2016 असा होता आणि एकूण विमित राशी रुपये-4,78,00016/- एवढी होती. (निकालपत्रात या नंतर विरुध्‍दपक्ष सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी यांचा उल्‍लेख “नियोक्‍ता कंपनी” असा करण्‍यात येईल)

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा  पती श्री उत्‍तम नत्‍थू वैरागडे हा दिनांक-16 जून, 2015 रोजी सकाळी-10.00 वाजता नागपूर येथे कामा निमित्‍य गेला होता आणि नागपूर वरुन भंडारा येथे त्‍याचे अॅक्‍टीव्‍हा मोटर सायकलने परत येत असताना त्‍याची मोटरसायकल रस्‍त्‍यावर घसरल्‍याने  तो खाली पडता  आणि त्‍याला गंभिर दुखापत झाली, त्‍याचे उजव्‍या खांदयास दुखापत झाली त्‍यामुळे त्‍याचेवर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे वैद्दकीय उपचार करण्‍यात आले परंतु गंभीर दुखापत झाल्‍याने  त्‍याच दिवशी भंडारा येथील डॉ. दिनेश कुथे यांचेकडे त्‍याचेवर वैद्दकीय उपचार करण्‍यात आलेत, तेथे त्‍याचेवर दिनांक-25 जून,2015 ला ऑपरेशन करण्‍यात आले. पुढे डॉक्‍टर    श्री दिनेश कुथे  यांनी रेफर केल्‍या वरुन  त्‍याला वैद्दकीय उपचारार्थ जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे दिनांक-26.06.2015 रोजी  रात्री अंदाजे 1.10 वाजता वैद्दकीय उपचारार्थ आणले असता तेथील डॉक्‍टरांनी तपासणी केली असता तो मृत आढळून आला, त्‍यावरुन पोलीसांनी दस्‍तऐवज तयार करुन त्‍याचे शव विच्‍छेदन करण्‍यात आले.  

      तिचे पतीचे मृत्‍यू नंतर तिने  पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने आवश्‍यक दस्‍तऐवज तिचे पतीचे नियोक्‍ता कंपनी मध्‍ये दाखल केले होते.  तिचे पतीचे मृत्‍यू संबधात  नियोक्‍ता कंपनीने विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीला दिनांक-27 जून, 2015 रोजी ई मेल पाठवून तिचे पतीचे पर्सनल अॅक्‍सीडेंट क्‍लेम बाबत विमा दावा फॉर्मची मागणी केली होती. विमा दाव्‍या सोबत तिने डॉ. दिनेश कुथे यांचे  रेफर सर्टीफीकेट, सामान्‍य रुग्‍णालय ओ.पी.डी.कार्ड, मर्ग फॉर्म, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल आणि मृत्‍यू प्रमाणपत्र विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्‍ये सादर केले होते. तिला असेही समजले होते की, वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत मृतकाचे वारसास रुपये-7,70,968/- विमा राशी देय आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिचे पतीचे नियोक्‍ता कंपनीला  दिनांक-02 मे, 2017 रोजी ई मेल पाठवून कळविले की, श्री उत्‍तम वैरागडे याचे मृत्‍यू संबधाने एफ.आय.आर, शवविच्‍छेदन अहवाल दस्‍तऐवज पाहिले असता त्‍याचा मृत्‍यू हा हदयरोगा (Heart Attack)  मुळे झालेला असल्‍याचे दिसून येते आणि त्‍यामुळे विमा दावा रक्‍कम देय नाही. वस्‍तुतः जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय यांचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृत्‍यूचे कारण हे “Pulmonary embolism” असे नमुद आहे परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने चुकीचा अर्थ काढून विमा दावा नामंजूर केला. शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृत्‍यूचे कारण हदयरोगामुळे झाल्‍याचे नमुद नाही. तसेच डॉ. दिनेश कुथे यांनी जे डिसचॉर्ज कॉर्ड दिले त्‍यामध्‍ये सुध्‍दा हार्ट अॅटेकचा कुठेही उल्‍लेख नाही. शव विच्‍छेदन अहवालामध्‍ये मृत्‍यूचे कारण हे “Asphyxia due to pulmonary embolism” (फुफ्फुसीय एम्‍बोलीझम मुळे श्‍वासोसास) असे नमुद आहे. “pulmonary embolism” चा अर्थ Due to blood clots lungs respiration block असा आहे. शव विच्‍छेदन अहवाल हा जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयातील तज्ञ डॉक्‍टरांनी दिलेला आहे आणि पुराव्‍याचे दृष्‍टीने त्‍याला अत्‍यंत महत्‍व आहे. अशाप्रकारे शवविच्‍छेदन अहवालातील मृत्‍यूचे कारणाचा चुकीचा अर्थ काढून विमा दाव्‍याच्‍या रकमे पासून तिला विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वंचित ठेवले. तिचा  मृतक पती  हा मोटर सायकल वरुन पडून गंभीर जख्‍मी झाल्‍याने “pulmonary embolism” ने ग्रस्‍त होता आणि अपघातातील गंभिर दुखापती मुळे त्‍याचा मृत्‍यू झाला होता. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने चुकीचा अर्थ लावून मृतकाचा मृत्‍यू हा हॉर्ट अॅटेक मुळे झालेला असल्‍याचे नमुद करुन   दिनांक-03 मे, 2017 रोजीचे पत्रान्‍वये तिचा विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती ही दोषपूर्ण सेवा आहे आणि त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिला दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे ठरविण्‍यात यावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात समूह अपघात बीमा योजने अंतर्गत रुपये-7,70,968/- देण्‍याचे आदेशित करावे आणि सदर रकमेवर विमाधारक श्री उत्‍तम वैरागडे याचे मृत्‍यू दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1.  तिला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-2,00,000/- विरुध्‍दपक्षानी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-25,000/- तिला विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1.  या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी,वरिष्‍ठ विभागीय कार्यालय, नागपूर यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रारकर्तीचा मृतक पती हा सनफ्लॅगआर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी लिमिटेड, वरठी, भंडारा येथे ऑपरेटर-1 या पदावर नौकरीत होता ही बाब मान्‍य केली. तथापी सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील या नियोक्‍ता कंपनीने तिचे नौकरीत असलेल्‍या  कर्मचा-यांसाठी समूह बीमा पॉलिसी  क्रं-1611004215010000002 काढली होती. सदर  नियोक्‍ता कंपनीने कंपनी मधील विविध संवर्गातील एकूण 1396 कर्मचा-यांसाठी ही विमा पॉलिसी काढली होती. परंतु प्रत्‍येक कर्मचा-याचा रुपये-7,70,968/- रकमेचा विमा काढला होता ही बाब नामंजूर केली. मृतक उत्‍तम वैरागडे याचा अपघात आणि मृत्‍यू हा रेकॉर्डचा एक भाग आहे तथापी त्‍याचेवर डॉ. दिनेश कुथे यांचे कडून वैद्दकीय उपचार करण्‍यात आलेत आणि दिनांक-25.06.2015 रोजी त्‍याचेवर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती ही बाब मंजूर केली. दिनांक-26.06.2015 रोजी डॉ. दिनेश कुथे यांनी त्‍याला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे पुढील उपचारा करीता रेफर केले होते आणि सामान्‍य रुग्‍णालयात तो मृत आढळला या बाबी मान्‍य केल्‍यात. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने नियोक्‍ता कंपनीशी केलेल्‍या पत्र व्‍यवहाराशी तक्रारकर्तीचा संबध नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजासह दाखल केला होता ही बाब नामंजूर केली. मृतक उत्‍तम वैरागडे याचा मृत्‍यू अपघातामुळे झाला होता ही बाब नामंजूर केली. विमा दावा प्रपत्र नियोक्‍ता कंपनीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे दाखल केले होते, तक्रारकर्तीशी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कोणताही पत्रव्‍यवहार केलेला नाही तसेच त्‍यांचा तिचेशी कोणताही संबध नसल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने नियोक्‍ता कंपनीला मृतक उत्‍तम वैरागडे याचा हॉर्ट अॅटेक मुळे मृत्‍यू झालेला असल्‍याने विमा दावा देय नाही असे कळविल्‍याची बाब मंजूर केली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने शव विच्‍छेदन अहवालाचा चुकीचा अर्थ लावून विमा दावा नामंजूर केला हा तक्रारकर्तीचा आरोप नामंजूर केला. मृतक उत्‍तम वैरागडे याचा अपघात झाल्‍यामुळे तो “Pulmonary Embolism” या आजाराने ग्रस्‍त होता ही बाब नामंजूर केली. सन फलॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी लिमिटेड, वरठी यांनी समूह बीमा योजना पॉलिसी त्‍यांचे कडून काढलेली असल्‍याने त्‍यांना या प्रकरणात प्रतिपक्ष करणे जरुरीचे आहे परंतु  तक्रारकर्तीने दुषीत हेतूने त्‍यांना प्रतिपक्ष केलेले नाही, आवश्‍यक प्रतीपक्षाचे अभावी तक्रार खारीज करण्‍यात यावी. सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी कडून विमा दावा आणि आवश्‍यक दस्‍तऐवज विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर वकील व्‍ही.व्‍ही.मसराम यांना चौकशीसाठी नेमले असता त्‍यांनी चौकशी अहवाल दाखल केला व त्‍या चौकशी अहवाला मध्‍ये  डॉक्‍टरांचे मता प्रमाणे मृतक उत्‍तम वैरागडे याचा मृत्‍यू हॉर्ट अॅटेक मुळे झालेला आहे. पोलीसांचे अकस्‍मात मृत्‍यू सुचना अहवाला मध्‍ये मृतकास अपघाताचे वेळी हॉर्टचा त्रास  असल्‍याचे नमुद आहे, त्‍यामुळे सर्व दस्‍तऐवजा वरुन त्‍यांनी विमा दावा नामंजूर केला, त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही त्‍यामुळे तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे नमुद केले.

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी, शाखा कार्यालय, भंडारा यांनी पुरसिस दाखल करुन, विरुध्‍दपक्ष क्रं 1 न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी, वरिष्‍ठ विभागीय कार्यालय, नागपूर यांचे लेखी उत्‍तर हेच त्‍यांचे लेखी उत्‍तर समजण्‍यात यावे असे नमुद केले.

 

05.    विरुध्‍दपक्ष क्रं 3 सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी, वरठी भंडारा या नियोक्‍ता कंपनीने आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. सदर नियोक्‍ता कंपनीने लेखी उत्‍तरा मध्‍ये मृतक उत्‍तम वैरागडे हा त्‍यांचे कंपनीत नौकरीत होता ही बाब मान्‍य केली. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीने तिचे कर्मचा-यां करीता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून तथाकथीत समूह बीमा योजना पॉलिसी काढल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्ती ही मृतक उत्‍तम वैरागडे याची पत्‍नी व कायदेशीर वारसदार असल्‍याने तिने  विमा दाव्‍या संबधात सदरची तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली परंतु मृतक कर्मचारी उत्‍तम वैरागडे याने वि.प.क्रं 3 नियोक्‍ता कंपनी कडून कोणतीही सेवा घेतलेली नाही त्‍यामुळे मृतक आणि त्‍याची पत्‍नी ही  वि.प.क्रं 3 ची “ग्राहक” होत नाही. श्री उत्‍तम वैरागडे याचा मृत्‍यू दिनांक-26.06.2015 रोजी झालेला असल्‍याने तक्रारीचे कारण हे मृत्‍यू दिनांका पासून घडलेले असून तेथून दोन वर्षाचे आत म्‍हणजे   दिनांक-25.06.2017 पर्यंत जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल करणे आवश्‍यक होते परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे विरुध्‍द तक्रार फेब्रुवारी, 2019 मध्‍ये दाखल केली असल्‍याने ती मुदतबाहय आहे. तथाकथीत नमुद समूह बीमा पॉलिसी ही विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीने विमा प्रिमीयम भरुन दिनांक-03.04.2015 ते 02.04.2016 या कालावधीसाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून काढली होती व सदर पॉलिसीची प्रत ते दाखल करीत आहे. मृतकाने विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीला कोणताही मोबदला तसेच विमा प्रिमियमची रक्‍कम दिलेली नाही त्‍यामुळे तो “ग्राहक” होत नसल्‍याने सदर तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 3 कंपनी विरुध्‍द चालू शकत नाही. श्री उत्‍तम वैरागडे हा स्‍वतःचे कामा करीता भंडारा येथे त्‍याचे अॅक्‍टीव्‍हा मोटर सायकलने जात असताना मोटर सायकल घसरल्‍याने तो पडून जख्‍मी झाला होता. वैद्कीय दस्‍तऐवजा वरुन मृतक श्री उत्‍तम वैरागडे यास हॉर्टचा आजार होता आणि हॉर्ट अॅटेकमुळे त्‍याचा मृत्‍यू झालेला आहे असे दिसून येते आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती योग्‍य आहे. मृतक उत्‍तम वैरागडे हा विरुध्‍दपक्ष क्रं 3 कंपनी मध्‍ये नौकरीत होता आणि त्‍याचे मृत्‍यू नंतर उपदान, भविष्‍य निर्वाह निधी आणि अन्‍य लाभ त्‍यांनी दिलेले आहेत. दिनांक-16.06.2015 रोजी श्री उत्‍तम याचे अपघाताची माहिती कळलयावर त्‍यांनी त्‍वरीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीला माहिती दिली आणि विमा दावा प्रपत्र आवश्‍यक दस्‍तऐवजा सह सादर केले परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनी विरुध्‍दची तक्रार उपरोक्‍त नमुद कारणास्‍तव जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष चालू शकत नसल्‍याने  तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे नमुद केले.

 

06.   उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज, साक्षी पुरावे आणि लेखी युक्‍तीवादाचे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे सुक्ष्‍म अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन न्‍या‍यनिवारणार्थ आयोगा समक्ष खालील  मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीची ग्राहक आहे काय?

-होय-

 

 

 

 

02

सदर तक्रार मुदतीत आहे काय?

होय

03

विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीचे मार्फतीने तक्रारकर्तीचे मृतक पतीचे मृत्‍यू संबधात दाखल केलेला विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

04

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

 

                                                                           ::कारणे व मिमांसा::

मुद्दा क्रं-1

07.      तक्रारकर्तीचा मृतक पती श्री उत्‍तम वैरागडे हा विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनी मध्‍ये नौकरीत होता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीने कंपनीतील कार्यरत विविध सवंर्गातील एकूण 1396 कर्मचा-यांसाठी समूह बीमा पॉलिसी  क्रं-1611004215010000002 काढली होती. विमा कालावधी हा दिनांक-03.04.2015 ते दिनांक-02.04.2016 असा होता या बाबी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीला मान्‍य आहेत. दिनांक-16.06.2015 रोजी श्री उत्‍तम वैरागडे याला झालेल्‍या अपघाताची माहिती कळल्‍यावर विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीने त्‍वरीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीला माहिती दिली आणि विमा दावा प्रपत्र आवश्‍यक दस्‍तऐवजा सह सादर केले परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीने लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली आहे. समूह बीमा योजना (Group Insurance Scheme) ही नौकरीत असलेल्‍या कर्मचा-यांना अपघाती मृत्‍यू आल्‍यास त्‍याचे वारसदारांना विमा रक्‍कम मदत स्‍वरुपात मिळावी यासाठीची आहे. सर्वसाधारण व्‍यवहारात समूह बीमा योजनेच्‍या वर्गणीची कपात संबधित कर्मचा-याचे मासिक वेतनातून कपात करण्‍यात येते. मृतक उत्‍तम वैरागडे हा वि.प.क्रं 3 नियोक्‍ता कंपनीचे नौकरीत असल्‍यामुळे साहजिकच त्‍याचे मासिक वेतनातून सदर समूह बीमा योजनेच्‍या रकमेची कपात झालेली असणार आणि त्‍यामुळे तो विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीचा ग्राहक ठरीत असल्‍याने त्‍याचे मृत्‍यू नंतर कायदेशीर वारसदार या नात्‍याने त्‍याची पत्‍नी तक्रारकर्ती   ही “लाभार्थी ग्राहक” (Beneficiary consumer) आहे आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.  

 

मुद्दा क्रं 2

 

08.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीला तक्रारकर्तीचे मृतक पती श्री उत्‍तम वैरागडे याचे मृत्‍यू संबधीचा विमा दावा हा “AS PER DOCUMENTS i.e. FIR, P.M.REPORT DEATH DUE TO HEART ATTACK असे कारण नमुद करुन  दिनांक-02 मे, 2017 रोजीचे ई मेल व्‍दारे कळवून नामंजूर केला. विमा दावा नामंजूरीचे दिनांका पासून सदर तक्रारीचे कारण घडलेले असून जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दिनांक-08.02.2018 रोजी दाखल केलेली असल्‍यामुळे तक्रार मुदतीत आहे आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

 

मुद्दा क्रं-3

 

09    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मृतकाचा विमा दावा  जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा यांनी  शव विच्‍छेदन अहवालात दिलेले  मृत्‍यूचे कारण हे “Asphyxia due to pulmonary embolism”  असल्‍याने नाकारला असा युक्‍तीवाद केलेला आहे. सदर वैद्दकीय शब्‍दाचा अर्थ फुफुसाचे रक्‍तवाहिनी
ढकलली गेल्‍याने किंवा रक्‍तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्‍याने श्‍वासोश्‍वास  गुदमरुन मृत्‍यू असा होतो असे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे म्‍हणणे आहे. तथापी मृतक उत्‍तम वैरागडे याचा अपघात त्‍याचेवर डॉ. दिनेश कुथे यांचे कडून केलेले वैद्दकीय उपचार तेथे दिनांक-25.06.2015 रोजी त्‍याचेवर झालेली शस्‍त्रक्रिया   तसेच दिनांक-26.06.2015 रोजी डॉ. दिनेश कुथे यांनी त्‍याला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे पुढील उपचारा करीता रेफर केले होते आणि सामान्‍य रुग्‍णालयात तो मृत आढळला या बाबी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरात मान्‍य केलेल्‍या आहेत. आम्‍ही डॉ. दिनेश कुथे यांचे अमेय फ्रॅक्‍चर अॅक्‍सीडेंट आणि जनरल हॉस्‍पीटल यांचे दिनांक-26.06.2015 रोजीचे रेफर प्रमाणपत्र पाहिले त्‍यामध्‍ये  उत्‍तम वैरागडे याचे उजव्‍या Treatment-“ Operated for right side humerus” (उजव्‍या बाहूचे हाड) खांदयाची शस्‍त्रक्रिया केल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद आहे व ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली आहे. तसेच डॉ. दिनेश कुथे यांनी  जे प्रमाणपत्र दिलेले आहे त्‍यामध्‍ये सुध्‍दा उत्‍तम वैरागडे हा त्‍यांचे दवाखान्‍यात दिनांक-16.06.2015 ते 26.06.2015 या कालावधीत भरती होता व त्‍याचे वर दिनांक-25.06.2015 रोजी त्‍यांनी शस्‍त्रक्रिया केल्‍याचे नमुद आहे. आम्‍ही जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाने मृतक उत्‍तम वैरागडे याचा जो शवविच्‍छेदन अहवाल दिलेला आहे त्‍याचे अवलोकन केले त्‍यामधील Sr. No. -17 Surface wounds and injuries- “Right Shoulder stitches” & Sr. No. 18-Other injuries discovered by external examination or palpation as fractures etc.- “Fracture right side humerus” असे स्‍पष्‍ट नमुद  आहे.  डॉ. श्रीदिनेश कुथे आर्थोपेडीक तज्ञ भंडारा आणि जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा यांनी दिलेला शवविच्‍छेदन अहवाल पाहता मृतक विमाधारक उत्‍तम वैरागडे याला जो अपघात झाला होता, त्‍या अपघाता मध्‍ये त्‍याचे शरीराचे वरील भागात गंभिर ईजा/दुखापत झालेली होती आणि त्‍यामुळेच त्‍याचे उजव्‍या खांदयावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आलेली होती. यावरुन असे दिसून येते की,  मृतकास अपघातामुळे गंभीर जखमा झालेल्‍या असल्‍यामुळे त्‍याचे शरिरा अंतर्गत अवयांना गंभीर दुखापती झालेल्‍या असल्‍यामुळे त्‍याचे फुफ्फुसातील रक्‍तभिसरणात अडथळा निर्माण होऊन त्‍याचा गुदमरुन मृत्‍यू झालेला आहे असा निष्‍कर्ष काढण्‍यास कोणतीही अडचण जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही. मृतकास अपघाताचे पूर्वी पासून  हॉर्ट अॅटेकचा त्रास होता तसेच त्‍याला हॉर्ट अॅटेकची लक्षणे जसे रक्‍तदाब वाढणे वा त्‍याचेवर फार पूर्वी पासून हॉर्ट अॅटेक संबधी वैद्दकीय उपचार चालू होते असे दर्शविणारा कोणताही दसतऐवजी पुरावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने या प्रकरणात दाखल केलेला नाही. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये कुठेही नमुद नाही की, मृतकाचा मृत्‍यू हा नेमका हॉर्ट अॅटेक मुळेच झालेला आहे. शवविच्‍छेदन अहवालातील नमुद मृत्‍यूचे कारण “Asphyxia due to pulmonary embolism” याचा चुकीचा अर्थ लावून मृतकाचा मृत्‍यू हा अपघाती नसून तो हॉर्ट अॅटेकमुळे झालेला आहे असा काढून तक्रारकर्तीला विनाकारण तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू विमा दाव्‍याचे रकमे पासून विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वंचित ठेवले आणि अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे निश्चितच तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आणि प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 03 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 ते 3 चे उत्‍तर “होकारार्थी” आल्‍याने आम्‍ही मुद्दा क्रं-4 अनुसार तक्रारकर्तीची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2  विमा कंपनी विरुध्‍द अंशतः मंजूर  करीत आहोत. विरुध्‍दपक्ष क्रं 3 सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी लिमिटेड, वरठी, भंडारा या नियोक्‍ता कंपनीने त्‍वरीत मृतकाचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे तत्‍परतेने  पाठविला त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याचे तसेच त्‍यांचे विरुध्‍द कोणतीही प्रार्थना केली नसल्‍याने  त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. आम्‍ही विरुध्‍दपक्ष क्रं 3 नियोक्‍ता कंपनीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे कार्यरत विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे साठी ग्रुप समूह बीमा योजनेच्‍या पॉलिसीचे अवलोकन केले त्‍यामध्‍ये अनुक्रमांक-54 वर ऑपरेटर -1 या पदाच्‍या एकूण 62 पदा करीता विमा काढलेला असून प्रती विमित व्‍यक्‍तीस रुपये-7,70,968/- एवढी विमा राशी देय असल्‍याने नमुद आहे, त्‍यामुळे तक्रारकर्तीला तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात  देय विमा रक्‍कम रुपये-7,70,968/- आणि त्‍यावर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-02 मे, 2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल तसेच तिला झालेल्‍या शारिरीक मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.   

 

10.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

 

                                                                        :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 अनुक्रमे  दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स  कंपनी लिमिटेड तर्फे वरिष्‍ठ विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय नागपूर आणि शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय, भंडारा यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने समूह बीमा योजने अंतर्गत वैयक्तिक अपघात मृत्‍यू संबधात देय विमा रक्‍कम रुपये-7,70,968/- (अक्षरी रुपये सात लक्ष सत्‍तर हजार नऊशे अडूसष्‍ट फक्‍त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-02.05.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला दयावे.

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं.-1 व क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी  रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 3 सनफ्लॅग आर्यन अॅन्‍ड स्‍टील कंपनी लिमिटेड, वरठी, भंडारा यांनी तक्रारकर्तीला कोणतेही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने  त्‍यांचे  विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व क्रं 2  विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास अंतिम आदेशातील अक्रं-2 मध्‍ये नमुद देय विमा रक्‍कम मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 एैवजी द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल. 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1.  उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या अतिरिक्‍त फाईल्‍स जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.              

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.