Maharashtra

Kolhapur

CC/19/798

Pradeep Baburao Teli - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.LTD And Other - Opp.Party(s)

D.A.Benlaki

30 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/19/798
( Date of Filing : 28 Nov 2019 )
 
1. Pradeep Baburao Teli
At Ganeshwadi, Tel Shirol, Dist.Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.LTD And Other
Ichalkarnji, Tel.Hatkangale, Dist.Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Nov 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदार यांनी स्‍वतःचे उपजिविकेसाठी ट्रक नं. एमएच 12-डीटी 3169 हा खरेदी केला.  सदर ट्रकवर त्‍यांनी ड्रायव्‍हर म्‍हणून वि.प.क्र.2 यांना नेमले होते.  सदरचा वाहनाचा विमा तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे उतरविला होता.  सदर पॉलिसीचा क्र. 15230631170100001735 असा असून कालावधी दि. 31/1/2018 ते 29/1/2019 असा आहे.  दि. 5/7/2016 रोजी तक्रारदार यांनी सदरचा ट्रक वि.प. क्र.2 यांना खरेदी देणेबाबत करार केला व ट्रकची किंमत रु. 6,51,000/- इतकी ठरली व करारानुसार रु. 1,91,000/- इतकी रक्‍कम तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडून घेतली.  करारात ठरलेप्रमाणे उरलेली रक्‍कम रु. 4 लाख वि.प. क्र.2 यांनी भागवून व फायनान्‍स कंपनीचा बोजा पूर्ण फेडल्‍यानंतर सदरचे वाहन वि.प.क्र.2 यांचे नावे वर्ग करणेचे ठरले होते.  सदरच्‍या ट्रकची मालकी व कब्‍जा तक्रारदार यांचेकडेच होता.  दि. 7/7/2018 ते 8/7/2019 या कालावधीत रात्री कोणत्‍यातरी अज्ञात इसमाने सदरचा ट्रक चोरुन नेला.  सदरची बाब तक्रारदारांनी पोलिस स्‍टेशनला कळविली.  सदर वाहनाचा तक्रारदार यांनी शोध घेणेचा प्रयत्‍न केला परंतु ते मिळून आले नाही. सदरची बाब वि.प.क्र.1 यांना कळविलेनंतर त्‍यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटरची नेमणूक केली.  त्‍यांनी तक्रारदारांना पूर्णपणे अंधारात ठेवून खोटे रिपोर्ट दिले.  तदनंतर वि.प. विमा कंपनीने त्‍यांचे दि. 4/09/2019 रोजीचे पत्राने, तक्रारदार यांनी ट्रकची विक्री वि.प. क्र.2 यांना केली असल्‍याने तक्रारदार यांचे सदर ट्रकमध्‍ये विमा हितसंबंध राहिले नाहीत या कारणास्‍तव विमादावा नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्‍लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम रु. 4,50,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याज व तक्रार अर्जाचा खर्च रु.50,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 9 कडे अनुक्रमे एफ.आय.आर., वाहन चोरीस गेलेल्‍या जागेचा पंचनामा, वादातील वाहनाचे आर.सी.बुक, विमा पॉलिसी, क्‍लेम नामंजूरीचे पत्र, फायनान्‍स कंपनीचा खातेउतारा, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोचपावती, तक्रारदार यांचे आधारकार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे दाखल केला आहे.

 

4.    वि.प.क्र.1 यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, तक्रारदार यांचा जबाब, वि.प.क्र.2 यांचा जबाब, श्री संभाजी गणपती चौगुले यांचा जबाब, नोटरी दस्‍त, वि.प.क्र.2 यांनी दिलेली फिर्याद वगैरे कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  वि.प.क्र.1 ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. 

 

iii)    वादातील वाहन हे दि. 5/7/2016 रोजी नोटरी दस्‍ताद्वारे तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांना विक्री केले आहे व त्‍यानुसार सदरचे वाहन वि.प. क्र.2 यांचे ताब्‍यात दिले आहे.  सदची व्‍यवहाराची बाब तक्रारदारयांनी वि.प.क्र.1 पासून लपवून ठेवली आहे.  वि.प. यांनी याकामी नेमलेल्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटर सौ मृणाल माने यांनी तक्रारदार वि.प. क्र.2 व साक्षीदार संभाजी चौगुले यांचे जबाब नोंदविले आहेत.  त्‍यामध्‍ये वाहन खरेदीच्‍या व्‍यवहाराबाबत सदर साक्षीदारांनी नमूद केले आहे.  सदरची बाब पाहता सदर ट्रकवर दि. 5/7/2016 नंतर कोणतेही विमा हितसंबंध तक्रारदारांचे राहिलेले नाहीत. 

 

iv)    सदर वाहनाची काळजी घेण्‍यासठी कोणतही व्‍यवस्‍था न करता सदरचे वाहन मोकळया जागेत ठेवले होते.  त्‍यामुळे सदरची चोरीची घटना ही तक्रारदार व वि.प. क्र.2 यांचे निष्‍काळजीपणामुळे घडलेली आहे.  सबब, वि.प. यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदार विमा क्‍लेम मिळण्‍यास पात्र नाही.  सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. क्र.1 यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.    वि.प.क्र.2 यांनी याकामी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील कथने मान्‍य केली आहेत.  तक्रारदार व वि.प. क्र.2 यांचेमध्‍ये झालेला ट्रक खरेदी व्‍यवहार वि.प. क्र.2 यांनी मान्‍य केला आहे.  परंतु वि.प. क्र.2 यांना ठरलेप्रमाणे कर्ज परतफेड करणे न जमलेने दि. 10/10/2016 पासून सदरचा करार रद्द झालेला आहे.  मात्र वि.प. क्र.2 हे पूर्वीप्रमाणेच तक्रारदार यांचेकडे ड्रायव्‍हर म्‍हणून काम करीत होते.  ट्रक चोरीला गेला त्‍यावेळी ट्रकची मालकी व ताबा तक्रारदार यांचेकडेच होता.  तक्रारदार व वि.प. क्र.2 यांचेमधील खरेदी व्‍यवहार हा विमा पॉलिसी घेण्‍यापूर्वीच संपुष्‍टात आला आहे.  वि.प. क्र.2 यांनी तक्रारदारास दिलेली अॅडव्‍हान्‍स रक्‍कम तक्रारदारांनी परत केली आहे.  सदर करार रद्द झालेनंतर वि.प.क्र.2 यांचा सदर वाहनामध्‍ये कसलाही हितसंबंध राहिलेला नाही.  सबब, वि.प.क्र.2 यांचे नांव सदर तक्रारीतून कमी करण्‍यात यावे अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे. 

 

6.    वि.प.क्र.2 यांनी म्‍हणणे हाच पुरावा व लेखी युक्तिवाद म्‍हणून वाचावा अशी पुरसीस दिली आहे.

 

7.    वि.प.क्र.3 यांना या प्रकरणातून या आयोगाचे दि. 25/10/2021 चे आदेशानुसार वगळणेत आले आहे.

 

8.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प.क्र.1 हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. क्र.1 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. क्र.1 यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

वि वे च न

 

9.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी स्‍वतःचे उपजिविकेसाठी ट्रक नं. एम.एच.12-डीटी 3169 हा खरेदी केला.    सदरचा वाहनाचा विमा तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे उतरविला होता.  सदर पॉलिसीचा क्र. 15230631170100001735 असा असून कालावधी दि. 31/1/2018 ते 29/1/2019 असा आहे. सदर पॉलिसीची प्रत याकामी दाखल आहे.  सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

10.   प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 यांनी विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदाराने वादातील ट्रक हा दयानंद आनुरे यांना दि. 5/7/2016 रोजी खरेदी देवून ट्रकचा ताबा दयानंद आनुरे यांना दिला आणि सदर खरेदी व्यवहाराचा लेख त्‍याचदिवशी नोटरी पुढे नोंदविला.  त्‍या दिवसापासून ट्रक दयानंद आनुरे यांचे ताब्‍यात होता.  सदर दयानंदर आनुरे हाच ट्रकचा वापर माल वाहतुकीसाठी करत होता. तसेच ट्रकची चोरी खरेदीदाराच्‍या ताब्‍यातून झाली आहे.  या गोष्‍टी तक्रारदाराने लपविल्‍या आहेत.  सदरचा ट्रक तक्रारदाराने दयानंद आनुरे यांना विकला असलेने कायद्यातील तरतुदीप्रमाणे दि. 5/7/2016 पासून सदर ट्रक बाबत असलेली मालकी व विम्‍यासाठीचे हितसंबंध संपुष्‍टात आले आहेत.  त्‍यामुळे विमाक्‍लेम देय होत नाही असे नमूद करुन तक्रारदाराचा विमाक्‍लेम नाकारला आहे.  परंतु खालील नमूद न्‍यायनिवाडयातील दंडकानुसार वादातील ट्रक आजतागायत तक्रारदार यांचेच नावावर आहे.  आर.सी.टी.सी. बुकला तक्रारदाराचेच नाव नमूद आहे.  मालकी हक्‍क अद्याप वर्ग झालेला नाही. विमा हप्‍ता तक्रारदाराने भरला आहे हे स्‍पष्‍ट होते.  सदर बाबतीत तक्रारदाराने मे. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा खालील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे.

     

      2020 ACJ 1904

            CA.No.2632 of 2020 decided on 18/6/2020.

 

            Surendra Kumak Bhilawe    

                               Vs.

             New India Assurance Co.Ltd.

 

            Head Notes : Motor Insurance – Damage to vehicle – Repudiation of claim on the ground that insured had sold the truck 3½ years prior to the accident – Insured filed complaint contending that he had entered into sale agreement with purchaser but the truck could not be transferred to him as he had not been paid full consideration for the truck by the purchaser even upto the date of accident, insured had been paying instalments to the bank which had financed the truck, he had paid premium and taken out the policy and permit for operating the truck also stood in his name – District Forum found that no evidence has been produced to show that premium was paid by the purchaser or driver was employed by him, purchaser had not objected to release of compensation to the insured and truck stood registered in the name of the insured – District Forum allowed the complaint which was upheld by the State Commission – National Commission rejected the concurrent factual findings of both fora and dismissed the complaint on the ground that insured had sold the vehicle and ownership in the vehicle passed to the purchaser on execution of sale letter – Registration of truck remained in the name of insured even three years after the alleged sale – Whether National Commission was justified in reversing the factual findings of the two fora overlooking the definition of ‘owner’ in section 2(30 of Motor Vehicle Act, 1988 – Held-No. - Order of National Commission set aside -  Insurance company directed to Rs. 4,93,500/- to the insured by withholding his legitimate claim.

 

            सदर न्‍यायनिवाडा व त्‍यातील दंडकचा आधार आम्‍ही घेतला आहे.   तक्रारदाराचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असत वादातील वाहनाची मालकी अद्याप तक्रारदारांकडेच आहे.  सर्व कागदपत्रांवर तक्रारदाराचेच मालक म्‍हणून नाव आहे.  विमा हप्‍ता तक्रारदाराने भरला आहे.  विमा पॉलिसीही तक्रारदाराचेच नावावर आहे हे स्‍पष्‍ट आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमाक्‍लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

11.   याकामी तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचेकडून वादातील ट्रकची आय.डी.व्‍ही. रक्‍कम रु.4,50,000/- मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्‍लेम नाकारलेचे तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- वि.प.क्र.1 यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

आदेश

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प.क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 4,50,000/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प.क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    वि.प.क्र.2 यांचेविरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

 

6)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

7)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.