Maharashtra

Nanded

CC/08/315

Anil sahebrao Sirsat - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Lit - Opp.Party(s)

ADV.S.M.Pund

21 Apr 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/315
1. Anil sahebrao Sirsat Didharth Nagar,Basmat Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. The New India Assurance Co.Lit NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 21 Apr 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.315/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  25/09/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 23/04/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                     मा. श्री.सतीश सामते.              सदस्‍य.
 
अनिल पि. साहेबराव शिरसाठ                           
वय वर्षे 47, व्‍यवसाय वाहनचालक,
रा. सिध्‍दार्थ नगर, वसमत ता. वसमत
जि.हिंगोली.                                              अर्जदार
 
विरुध्‍द
 
न्‍यु इंडिया इंशोरन्‍स कंपनी लि.
नांदेड मंडल कार्यालय, लाहोटी कॉम्‍प्‍लेक्‍स,                   गैरअर्जदार
वजिराबाद, नांदेड, मार्फत व्‍यवस्‍थापक.
अर्जदारा तर्फे.            - अड.एस.एम. पूंड.
गैरअर्जदारा तर्फे          - अड.एस.व्‍ही.राहेरकर.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
         गैरअर्जदार न्‍यू इंडिया इंशोरन्‍स कंपनी मर्यादित यांच्‍या ञूटीच्‍या सेवे बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
          प्रकरणाची थोडक्‍यात हकीकत खालील प्रमाणे, अर्जदार यांचे स्‍वतःचे मालकीचे महिंदा सवारी जिप ज्‍यांचा नोंदणी क्र.एम.एच.-38-एफ-0151 असा आहे.  वाहनाचा सूरक्षेसाठी गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी नंबर 160900/31/06/01/00006461 द्वारे विमा काढला, विम्‍याचा कालावधी दि.27.10.2006 ते 26.10.2007 असून यासाठी विमा घेतला होता. दि.18.12.2006 रोजी अर्जदार आपल्‍या जिपने प्रवासी वाहतूक करीत असताना तामसा ते वसमत रोडवर वानवाडी या गावाजवळ घाटामध्‍ये अचानक जिपचे स्‍टेंरिग लॉक झाल्‍यामूळे जिप रोडच्‍या खाली पलटी झाली व त्‍या अपघातात जिपचे बरेच नूकसान झाले. अर्जदार स्‍वतः जिप चालवित होते. एकूण पाच माणसे जिपमध्‍ये होती. त्‍या घटनेची सूचना दि.21.12.2006 रोजी तामसा पोलिस स्‍टेशनला दिली. यावरुन अपघात नोंद क्र.09/06 नोंदविण्‍यात येऊन पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. विमा पॉलिसीतील तरतूदीनुसार अपघातामूळे जिपचे नूकसान झाल्‍याची  भरपाई गैरअर्जदारास देण्‍याची विनंती केली असताना त्‍यांनी नमून्‍यात अर्ज दाखल करण्‍याची सूचना अर्जदारास केली. त्‍यानुसार क्‍लेम फार्म नंबर 060909/31/06/01/0000152  गैरअर्जदाराकडे दिला, परंतु गैरअर्जदार यांनी अपघाताचे वेळेस यशवंत टोपाजी मोरे हा वाहन चालवित होता व त्‍यांचेकडे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता असे कारण देऊन दि.31.03.2008 रोजी अर्जदाराचा क्‍लेम नामंजूर केला. गैरअर्जदाराने खोटे कारण दिलेले आहे. अर्जदार यांचेकडे जिप चालविण्‍याचा परवाना आहे. अर्जदाराची जिप दूरुस्‍त न झाल्‍यामूळे ते व्‍यवसाय करु शकले नाही व बँकेचे कर्ज परतफेड करु शकले नाही. त्‍यामूळे त्‍यांचे बरेच नूकसान झाले म्‍हणून अर्जदारास वाहनाची नूकसानपोटी रक्‍कम रु.60,000/- व माहे 2007 पासून 12 टक्‍के व्‍याजासह रक्‍कम मिळावी तसेच मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.1,00,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍यासाठी आदेश व्‍हावा असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार हे   वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारास प्रस्‍ताव अर्ज करण्‍याचा अधिकार नाही. प्रथमतः अर्जदाराने कंपनीस दिलेल्‍या प्रस्‍ताव अर्जामध्‍ये अपघातग्रस्‍त वाहन हे यशवंत टोपाजी मोरे हे चालवित होते असा उल्‍लेख केलेला आहे व अर्जदाराने दाखल केलेलया क्‍लेममध्‍ये ते स्‍वतःच वाहन चालवित होते असा उल्‍लेख केलेला आहे. त्‍यामूळै अर्जदार हा स्‍वच्‍छ हेतूने समोर आलेला नाही. गैरअर्जदाराने घेतलेला निर्णय योग्‍य आहे व तो कायम ठेवण्‍या योग्‍य आहे. अर्जदाराला देण्‍यात आलेली पॉलिसी गैरअर्जदारांना मान्‍य आहे. पॉलिसी ही प्रवासी वाहन करणारे वाहन म्‍हणून दिली होती. सदरील पॉलिसीचे माहीती व मूळ अट अशी आहे की, वाहनास अपघात झाला त्‍यावेळेस वाहन चालवीणा-या वाहकाकडे परवाना असला पाहिजे. प्रस्‍तूतचे प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार कंपनीने चौकशी करण्‍यासाठी श्री. मं.भ. खोमणे  यांची नियुक्‍ती केली. सदरील चौकशी अधिकारी यांनी त्‍यांचे अहवालात ही बाब स्‍पष्‍ट केली आहे की, अपघाताचे वेळेस सर्व्‍हे हा श्री.प्रशांत तांदळे या सर्व्‍हेअरनी केलेला आहे. त्‍यांनी वाहनाचे नेमके नूकसान बिल चेक करुन रु.34,619/- चे सांगितले आहे. गैरअर्जदारांनी ज्‍या मूददयावर  अर्जदाराचा क्‍लेम नाकारला आहे तो योग्‍य आहे. म्‍हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                               उत्‍तर
   1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द       नाही.
करतात काय ?                         
2.    काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
                          कारणे
मूददा क्र.1 ः-
              गैरअर्जदार यांनी दिलेली पॉलिसी नंबर 160900/31/06/01/00006461 ही गैरअर्जदारांना मान्‍य आहे या बददल वाद नाही. तसेच अर्जदार यांचे वाहन महिंद्रा सवारी जिप ज्‍याचा नोंदणी क्रमांक एम.एच.-38-एफ-0151 असा असून यांचा दि.11.12.2006 रोजी अपघात झाला हे ही मान्‍य आहे. या बददल अर्जदाराने एफ.आय.आर, पोलिस स्‍टेशन तामसा यांनी दि.21.12.2006 रोजी दिली आहे. म्‍हणजे अपघातानंतर तिन दिवसांनी एफ.आय.आर.दाखल झालेला आहे. यात अर्जदार हे वाहनाच्‍या अपघाताच्‍या वेळेस स्‍वतः वाहन चालवित होते असे म्‍हटले आहे. घटनास्‍थळ पंचनामा दि.21.12.2006 रोजीचा आहे. यात गाडी नंबर एम.एच.-38-एफ-0151 हिचे स्‍टेंअरिग लॉक होऊन अपघात झाला असे म्‍हटले आहे. यात देखील अर्जदार स्‍वतः वाहन चालवित होता असा उल्‍लेख आलेला आहे. अर्जदाराच्‍या वाहनाचा अपघात झाल्‍यानंतर त्‍यांनी गैरअर्जदार यांना सूचना दिली व दि.19.12.2006 रोजी स्‍वतःचे सहीने क्‍लेम प्रपोजल लिहून भरुन दिले. यात अपघातचा दि.18.12.2006 व वाहन चालक नामे यशवंत टोपाजी मोरे  असे स्‍पष्‍टपणे लिहीलेले आहे. क्‍लेम फॉर्म अर्जदाराने स्‍वतःच्‍या इंग्रजी सहीमध्‍ये भरुन दिला असताना व त्‍यात वाहन चालक म्‍हणून यशवंत टोपाजी मोरे यांचा उल्‍लेख केलेला असताना नंतर अर्जदानराने एफ.आय.आर. व पंचनाम्‍यामध्‍हये वाहन आपण स्‍वतः चालवित होतो असे म्‍हटले आहे व एफ.आय.आर. हा अपघाताचे नंतर तिन दिवसांनी म्‍हणजे दि.21.12.2006 रोजी  व घटनास्‍थळ पंचनामा हा दि.21.12.2006 रोजी करण्‍यात आलेला आहे. क्‍लेम फॉर्म सोबत अर्जदाराने यशवंत टोपाजी मोरे यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स गैरअर्जदार यांना दिले होते. हे ड्रायव्‍हींग लायसन्‍स्‍ तपासले असता असे दिसून येते की, यात ड्रायव्‍हींग लायसन्‍स वर MH-38 C एवढेच लिहीलेले आहे व L.M.V.N.T.  असे असून त्‍यामधील N.T. खोडून Tr असे लिहीलेले आहे. म्‍हणजे ड्रायव्‍हींग लायसन्‍स मध्‍ये खाडाखोड करण्‍यात आलेली आहे. गैरअर्जदारांनी आर.टी.ओ. कार्यालय हिंगोली यांना पञ लिहील्‍यावर त्‍यांनी जी माहीती दिली त्‍यात यशवंत टोपाजी मोरे यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स वर LMVNT व अर्जदाराने जे मूळ लायसन्‍स नंतर कोर्टाचे आदेशानुसार दाखल केले त्‍यात LMVNT  असा स्‍पष्‍ट उल्‍लेख केलेला आहे. यांचा अर्थ अर्जदाराने यशवंत मोरे यांचे लायसन्‍समध्‍ये खाडाखोड केली व गैरअर्जदार यांची दीशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला असे स्‍पष्‍ट दिसून येते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे क्‍लेम फॉर्म भरुन दिला व नंतर त्‍यांचे लक्षात आले की, यशवंत टोपाजी मोरे यांचेकडे ड्रायव्‍हींग लायसन्‍स नाही. त्‍यामूळे त्‍यांनी एफ.आय.आर. व घटनास्‍थळ पंचनामा देताना वाहन चालक म्‍हणून स्‍वतःचे नांवाचा उल्‍लेख केला व स्‍वतःचे लायसन्‍स दाखल केले. परंतु हे सर्व कागदपञ नंतरचे आहेत. अर्जदार हे सूशिक्षीत दिसतात. त्‍यामूळे त्‍यांनी क्‍लेम फॉर्म वाचला नाही असे शक्‍य नाही. अर्जदार यांचे दूहेरी वागणूकीचा गैरअज्रदार यांना संशय आल्‍यामूळे  व त्‍यांनी स्‍पष्‍ट शब्‍दात यशवंत मोरे यांनी आपल्‍या ड्रायव्‍हींग लायसन्‍स वर खाडाखोड केल्‍याचे म्‍हटले आहे व अपघाताचे वेळी त्‍यांचे वाहन चालवित होता. तो रिपोर्ट या प्रकरणात दाखल आहे. याशिवाय प्रशांत तांदळे या सर्व्‍हेअरनी सर्व्‍हे करुन वाहनाचे नूकसान रु.34,,619/- असे ठरविले आहे व या सर्व रिपोर्टमध्‍ये वाहन चालकाचे नांव स्‍पॉट सर्व्‍हेवरुन श्री. यशवंत टोपाजी मोरे असेच लिहीलेले आहे. सर्व्‍हे रिपोर्टसाठी जास्‍त खोलात जाण्‍याची गरज नाही. उपलब्‍ध कागदपञावरुन आम्‍ही जवळ जवळ या निर्णयास आलो आहोत की, अर्जदाराने विमा क्‍लेम फॉर्म दाखल करताना नामी यूक्‍ती शोधून हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे व यात वाहन चालकाचे नांव अनिल शिरसाठ  म्‍हणजे ते स्‍वतः होते असे केलेले आहे. गैरअर्जदारा तर्फे अड.एस.व्‍ही.राहेरकर यांनी प्रभावी यूक्‍तीवाद करुन प्रकरणातील सत्‍यतेवर प्रकाश टाकला आहे.
              गैरअर्जदाराने 2008 (1) सीपीआर 163 पश्चिम बंगाल राज्‍य आयोग कोलकत्‍ता यात CHNHB Association Vs   Subodh Ch. Sarkar हे दाखल केलेले आहे. यात ग्राहक मंचाने क्‍लेम दिला होता परंतु तो नंतर रदद बातल झाला.
              सूप्रिम कोर्ट व नॅशनल कमीशन  2005 ते 2008 पान नंबर 541 यामध्‍ये न्‍यू इंडिया अश्‍योरन्‍स कंपनी लि. विरुध्‍द प्रभू लाल    यामध्‍ये
          (i)      Motor Vehicles Act, 1988 Sections 2 (14), 2(47), 3 and 147- Central Motor Vehicles Rule, 1989, Rule 16 – Driving Licnece- Light Motor Vehicle – Transport vehicle – Vehicle was a   goods carrier - It was a transport vehicle falling under clause (47) of Section 2 – Driver of vehicle having licence for Light Motor Vehicles - Licence was not endorsed as required under section 3 – In absence of endorsement Insurer could not held liable. - (Paras 29 and 33)
 
          (ii)      Motor Vehicles Act, 1988, sections 2921),(47), 3 and 147 – Driving Licence – Light Motor Vehicle – Transport vehicle – Liability of insurer - Vehicle was a luxury taxi passenger carrying commercial vehicle – Driver was having licence for Light Motor Vehicles - No endorsement on it as required by section 3 – Insurer held not liable – (para 44)
 
·                                    (iii)     Motor Vehicles Act, 1988, Sections 2(21),(47),3 and 147 – Driving licnece – Light Motor Vehicle – Transport vehicle – Driving of – Liability of insurer – Vehicle involved in accident was jeep commander made by Mahindra and Mahindra, a passenger carrying commercial vehicle – Driver was having licence for Light Motor Vehicles – No endorsement on it as required by sections 3 – Insurer held not liable.—(para 45)
 
आता हे स्‍पष्‍ट झाले आहे की, अपघातग्रस्‍त वाहन हे चालविण्‍याचा वैध परवाना यशवंत टोपाजी मोरे यांचेकडे नव्‍हता. म्‍हणजे पॉलिसीच्‍या नियम व अटीचा भंग झालेला आहे. त्‍यामूळे क्‍लेम नाकारताना गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी स्‍पष्‍ट होत नाही. म्‍हणून गैरअर्जदार यांचेवर क्‍लेम देण्‍याची जबाबदारी ही येत नाही, परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे नियोजनबध्‍द दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला म्‍हणून गैरअर्जदार हे कॉम्‍पेन्‍सेटरीं कॉस्‍ट मिळण्‍यास पाञ आहेत.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत कॉम्‍पेन्‍सेंटरी कॉस्‍ट म्‍हणून रु.5,000/- दयावेत.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)                                                     (श्री.सतीश सामते)    
           अध्यक्ष.                                                                    सदस्‍य
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.