निकालपत्र :- (दि.25/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन आपल्या वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-यातील तक्रारदार यांचे कोल्हापूर एस.टी.स्टॅन्डसमोर हॉटेल सहया्द्रीच्या इमारतीमध्ये सुरभी या नावाने हॉटेल. सदर व्यवसाय तक्रारदार स्वत: पाहत आहेत. सदर हॉटेल व्यवसायातील दररोज जमा होणा-या रक्कमेचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे (BURGLARY AND HOUSEBREAKING POLICY) (BUSINESS PREMISES) केबीन कौन्टरचा विमा रक्कम रु.1,50,000/-चा पॉलीसी क्र.151203/46/09/04/00000252अन्वयेदि.28/12/2009 ते 27/12/2010 या कालावधी करिता उतरविलेला होता. दि.07/08/2010 रोजी मध्यरात्री तक्रारदार यांच्या हॉटेलमध्ये चोरी होऊन हॉटेलच्या कौन्टरचे ड्रॉवरमधील कुलूपमध्ये ठेवलेली रक्कम रु.1,43,220/-अज्ञात चोरटयाने सहयाद्री हॉटेल इमारतीमधील असलेल्या बंद स्वरुपीय रेस्टॉरंटच्या पूर्वेस असलेल्या सावन डायनिंग हॉलच्या मांडणीजवळील खिडकीतून येऊन कॅश ड्रॉवरचे कुलूप उचकटून व मोडून आत असणारी वरील नमुद रक्कम चोरुन नेलेली आहे. सदर घरफोडी करुन झालेल्या चोरीची कल्पना तक्रारदार यांना दि.08/08/2010 रोजी समजलेने तक्रारदार यांनी शाहुपूरी पोलीस स्टेशन, कोल्हापूर येथे जाऊन सदर चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे तपास होऊन तक्रारदार यांच्या हॉटेलमधील कॅश कौन्टरचे कुलूप तोडून त्यातील रक्कम चोरी झाल्याचा निष्कर्ष पोलीसांनी दिलेला आहे. तक्रारदार हे आपल्या रेस्टॉरंटकरिता दैनंदिन लागणा-या माल मटेरिअल खरेदीकरिता लागणा-या मालाची खरेदी करणेकरिता व कर्मचा-यांचे पगार भागविणेकरिता लागणारी रक्कम हॉटेलच्या कौन्टरमधील मजबूत कुलूप असलेल्या ड्रॉवरमध्ये रक्कम सुरक्षित ठेवली होती. सदर कौन्टरमधील रक्कमेचा तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा उतरविलेला होता. त्यानुसार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम मंजूर करणे आवश्यक होते. परंतु जवळजवळ 6 महिने कागदपत्रे देऊनही विमा कंपनीने क्लेम मंजूर केला नाही. पॉलीसीमध्ये ‘कॅश इन कौन्टर’ चा विमा उतरविलेसंबंधी स्पष्टपणे नमुद केले असताही व सदर तक्रारदार यांच्या हॉटेलमध्ये झालेल्या रक्कम रु.1,43,220/- च्या चोरीच्या विम्याची रक्कम मागणी केली असता सामनेवाला यांनी “ Cash is to be placed in a strong room or Burglary proof safe after business hours. However we find that the cash was kept in a locked drawer of cash counter.” अशा चुकीच्या कारणाने तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारला आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराची चोरीला गेलेली रक्कम रु.1,43,220/- त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.23,650/-,मानसिक व शारिरीक त्रासापोटीची रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.7,000/- असे एकूण रक्कम रु.1,83,870/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ इन्शुरन्स पॉलीसी, प्राथमिक माहितीचा अहवाल, पंचनामा, सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, कौन्टरचे ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या रक्कमेचा तपशील, तपास बंद केलेबाबतचे पोलीसांचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारीतील कथने परिच्छेदनिहाय नाकारलेली आहेत. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. प्रस्तुतची तक्रार चालविणेचा अधिकार मे. मंचास नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे (BURGLARY AND HOUSEBREAKING POLICY) (BUSINESS PREMISES) केबीन कौन्टरचा विमा उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी क्र.151203/46/09/04/00000252अन्वयेदि.28/12/2009 ते 27/12/2010 या कालावधी करिता उतरविलेला होता. पॉलीसीच्या अटी व शर्ती, एक्सक्लूजन्स व अनेक्शर प्रमाणे लागू होत्या व आहेत. पॉलीसीच्या क्लॉजप्रमाणे दैनंदिन व्यवसाय झालेनंतर रोख रक्कम स्ट्रॉंग रुम अथवा बर्ग्लरी प्रुफ सेफ मध्ये ठेवणे क्रमप्राप्त असताना कॅश कौन्टरच्या लॉक्ड ड्रॉवरमध्ये ठेवली. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. यात सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज कॉम्पेंसेंटरी कॉस्टसह नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ पॉलीसीची सहीशिक्क्याची नक्कल व शहापुरकर सर्व्हेअर यांचा सर्व्हे रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे सदर कामी दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2) तक्रारदार उर्वरित विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय? --- होय. 3) काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क.1 व 2 :- सामनेवाला यांनी तक्रारदाराची पॉलीसी मान्य केलेली आहे. त्याचा पॉलीसी क्र.151203/46/09/04/00000252अन्वयेदि.28/12/2009 ते 27/12/2010 या कालावधी करिता उतरविलेला होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. पॉलीसी कालावधीत तक्रारदाराचे हॉटेलमध्ये चोरी होऊन हॉटेलच्या कौन्टरच्या ड्रॉवरमधील कुलूपामध्ये ठेवलेली रक्कम रु.1,43,220/- चोरीस गेलेली आहे. दाखल पोलीस पेपर्सवरुन चोरी झालेचे निर्विवाद आहे. सदर चोरीस गेलेल्या रक्कमेबाबत वाद नसलेचे सामनेवाला वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस मान्य केले आहे. वादाचा मुद्दा आहे तो दि.25/4/2011 रोजी सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम हा We refer to your theft claim & inform you that, as per Burglary Policy clause cash is to be placed in a strong room or Burglary proof Safe after business hours. However we find that the cash was kept in a locked drawer of cash counter. So we regret to inform you that we cannot consider your claim which please be noted.कारणास्तव नाकारलेला आहे. पॉलीसीच्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी स्पेशल कंडीशन क्र.2 Maintenance of Books & Keys:- The insured shall keep a daily record of he amount of cash contained in the Safe or Strong-room and such record shall be deposited in a secure place other than the Safe or Strong room and produced as documentary evidence in support of a claim under this policy. The keys of the Safe of Strong room shall not be left on the premises out of business hours unless the premises are occupied by the insured or any other authorized employee of the insured in which case such keys if left on the premises shall be deposited in a secure place not in the vicinity of the Safe or Strong room.चा आधार घेऊन क्लेम नाकारलेला आहे. याचा विचार करता प्रस्तुत धंदयातील रोख रक्कम ही सेफ किंवा स्ट्रॉंग रुम व्यतिरिक्त अन्य सुरक्षीत ठिकाणी ठेवणेबाबत नमुद केलेले आहे. तसेच ज्या ठिकाणी रक्कम ठेवली असेल तिच्या किल्ल्या सदर ठिकाणी ठेवल्या नसल्या पाहिजेत असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने प्रस्तुत रक्कम सेफ किंवा स्ट्रॉग रुम ऐवजी कॅश कौन्टरच्या कुलूपबंद ड्रॉवरमध्ये ठेवली होती व त्याच्या किल्ल्या तक्रारदाराकडे होत्या. तसेच नमुद पॉलीसीचे अवलोकन केले असता सदर पॉलीसीच्या डिस्क्रीप्शन्स ऑफ आयटम्समध्ये कॅश इन कौन्टर असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. सदर बाबींसाठीच विमा संरक्षण दिलेले आहे. या बाबींचा विचार करता तक्रारदार चोरीस गेलेली रक्कम मिळणेस पात्र असतानाही पॉलीसीच्या अटी व शर्तीचा योग्य अर्थ न लावता केवळ तांत्रिक कारणास्तव क्लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे तक्रारदार हा चोरीस गेलेली रक्कम रु.1,43,220/- दि.25/04/2011 द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.3:- सामनेवाला यांनी क्लेमची योग्य रक्कम अदा न केलेने तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागलेने तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास रक्कम रु.1,43,220/-(रु.एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे वीस फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.25/04/2011 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजा सहीत दयावी. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |