Maharashtra

Wardha

CC/99/2012

Smt. Bayanabai Ramaji Surpam - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co. Ltd - Opp.Party(s)

Adv. Udya Kshirsagar

18 Jun 2013

ORDER

DISTT.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHVANT COLLEGE
WARDHA 442001
MAHARASHTRA (PH.NO.0752-243550)
 
Complaint Case No. CC/99/2012
 
1. Smt. Bayanabai Ramaji Surpam
R/oThar, Ta. Ashti, Dist. Wardha
Wardha
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co. Ltd
Through its Divisional Manager, Divisional Office No. 130800, New India centre, 7 th Floor, 17 -A, cooperage Road,Mumbai-400039, Shri.B.K.Patnaik
Mumbai
Maharashtra
2. Kabal Insurance Broking Sevvices Ltd.
Flat No-1, Parijat Apartment Plot No.135, Surendra Nagar, Nagpur-440015, Shri. Sandip Khairnar
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krishi Adhikari
Ta. Ashti, Dist. Wardha
Wardha
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Milind B.Pawar PRESIDENT
 HONABLE MR. Shri Milind R. Kedar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र
( पारीत दिनांक :18/06/2013 )
( द्वारा मा. अध्‍यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे))
 
01.       अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
1.   गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा
   योजने अंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही
   18 टक्‍के व्‍याजदराने द्यावी.
2.  मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.20,000/-
3. तक्रारीचा खर्च रु. 10000/-
 
अर्जदाराच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे आहे.
 
 
अर्जदारांनी सदर तक्रार अर्जामध्‍ये नमुद केले आहे की, अर्जदार मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम याची पत्‍नी असून श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांचे नावे मौजा वाडी, ता. आष्‍टी ,जि. वर्धा येथे भुमापन क्र. 11/1 अंतर्गत शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्‍त शेतक-यांस व त्‍याच्‍या कुटुंबियास लाभ देण्‍याकरीता 15 जुलै 2006 ते 14 जुलै 2007 या कालावधीकरिता शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना काढली.
अर्जदार यांनी नमुद केले आहे की, मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम हे दिनांक 21/04/2012 रोजी पायी जात असतांना एका शासकीय वाहनाने धडक मारल्‍याने जखमी झाले होते व उपराचा दरम्‍यान त्‍याच दिवशी ते मरन पावले.
अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यानी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत राशी मिळण्‍याकरीता गैरअर्जदार क्र.3 यांचेतर्फे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला विमा दाव्‍यासोबत दिनांक 20/07/2012 रोजी सर्व कागतपत्रे सादर केले. त्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 08/11/2012 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवुन तिच्‍या मयत पतीचे वय हे 75 वर्षाच्‍या वर असल्‍यामुळे दावा नाकारत आहे असे कळविले. परंतु वास्‍तवीकतः तक्रारकर्तीच्‍या मयत पतीचे मृत्‍युच्‍या दिनांकास 67 होते असे तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रृटी असुन त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचामध्‍ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
02. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्‍यानुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.3 मार्फत जे दस्‍तावेज त्‍यांच्‍याकडे पाठविले त्‍याचे अवलोकन करुनच तक्रारकर्ती हिचा विमा दावा नाकारण्‍यात आलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने विमा दावा दाखल करते वेळी वयाचा दाखला म्‍हणुन निवडणुक ओळखपत्र दाखल केले आहे व त्‍यानुसार मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांचे मृत्‍यु झाला त्‍यावेळी 75 चे वर होते व विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्ती नुसार मृत्‍युसमयी 75 वर्ष वयापेक्षा जास्‍त असलेल्‍या वयाच्‍या व्‍यक्ति विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही. तसेच तक्रारकर्तीनेसुध्‍दा स्‍वतःचे वय कमी दाखविले आहे व सदर बाब ही गंभीर स्‍वरुपाची असल्‍यामुळे त्‍यामुळे अर्जदार हिची प्रस्‍तुत तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरातील म्‍हणणे हे शपथपत्रावर दिले नसल्‍यामुळे ग्राहय धरता येणार नाही, असे मा.मंचाचे मत आहे.
 
गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक आणी विकास प्राइज़ भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्‍त विमा सल्‍लागार कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ते महाराष्‍ट्र राज्‍य शासनाला सदरील विमा योजना राबवण्‍यासाठी विना मोबदला सहाय्य करतात. यामध्‍ये मुख्‍यत्‍वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार याच्‍यामार्फत आल्‍यानंतर त्‍याची सहानिशा व तपासणी केल्‍यानंतर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडुन दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे ऐवढेच काम गैरअर्जदार क्र.2 यांचे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, वरील सर्व कामांकरीता ते राज्‍य शासन किंवा शेतकरी यांच्‍याकडुन कोणताही मोबदला घेत नाही तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमीअम घेतलेला नाही. सदर बाब ही मा.राज्‍य ग्राहक आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांनी आमचे म्‍हणणे ग्राहय धरले असुन तसा आदेशही पारीत केलेला असल्‍याचे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे सदरची अर्जदाराची त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरातील म्‍हणणे हे शपथपत्रावर दिले नसल्‍यामुळे ग्राहय धरता येणार नाही, असे मा.मंचाचे मत आहे.
 
गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्तीने दिनांक 20/07/2012 रोजी त्‍यांच्‍याकडे विमा दावा अर्ज सादर केला होता. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने विमा दाव्‍यासोबत सादर केलेल्‍या मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांच्‍या वयाच्‍या पुराव्‍यानुसार दिनांक 1/1/1994 रोजी 60 वर्ष असल्‍याची नोंद आहे तसेच अर्जासोबत जोडलेल्‍या रेशन कार्ड मध्‍ये वयाबाबतची स्‍पष्‍ट नोंद नाही व हॉस्‍पीटल डिस्‍चार्ज कार्ड व इंजुरी प्रमाणपत्रात त्‍यांचे वय 65 आल्‍याचे नमुद केलेले आहे. त्‍यामुळे मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांच्‍या वयाचा योग्‍य बोध होत नसल्‍यामुळे सदर दावा अर्ज पुढील कार्यावाहीस व
निर्णयास्‍तव मा.जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांना सादर करण्‍यात आला व मा.जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांनी दिनांक 15/12/2012 रोजीच्‍या पत्राद्वारे मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम याचे वय हे 75 वर्षापेक्षा जास्‍त असल्‍याचे कळविले व त्‍यामुळे दि न्‍यु इंडिया एन्‍सुरन्‍स कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर केलेला आहे. त्‍यामुळे सदरची अर्जदाराची त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.     
03.       अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत मृत्‍यू प्रमाणपत्र, घटनास्‍थळ पंचनामा, एफ.आय.आर, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, गाव नमुना 7/12,गांव, इत्‍यादी एकुण 15 दस्‍तावेंजांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहे तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांनी त्‍यांचा लेखी जवाब दाखल केला आहे.
 
-: कारणे व निष्‍कर्ष :-
      
      प्रस्‍तुत प्रकरणात दोन्‍ही पक्षांतर्फे दाखल करण्‍यात आलेले सर्व दस्‍तावेज व प्रतिज्ञालेखाचे बारकाईने अवलोकन करण्‍यात आले.
     सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्‍यू किंवा अपंगत्‍व आल्‍यास शेतकरी व त्‍यांच्‍या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्‍त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.
          अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्‍तावेजांवरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांचे वारसदार या नात्‍याने, विमाधारक मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांचा दिनांक 21/04/2012 रोजी पायी जात असतांना एका शासकीय वाहनाने धडक मारल्‍याने ते जखमी झाले होते व उपराचा दरम्‍यान त्‍याच दिवशी ते मरन पावले व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे दाखल दस्‍तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांचा दिनांक 21/04/2012 रोजी पायी जात असतांना एका शासकीय वाहनाने धडक मारल्‍याने ते जखमी झाले होते व उपराचा दरम्‍यान त्‍याच दिवशी ते मरन पावले. गैरअर्जदार क्र. 1 यांचा असा आक्षेप आहे की, मयत श्री रामाजी लोडबाजी सुरपाम यांचे मृत्‍यु झाला त्‍यावेळी 75 चे वर होते व विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्ती नुसार मृत्‍युसमयी 75 वर्ष वयापेक्षा जास्‍त असलेल्‍या वयाच्‍या व्‍यक्ति विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही.
          प्रस्‍तुत प्रकरणात दोन्‍ही पक्षांतर्फे दाखल दस्‍तवेजांचे बारकाईने अवलोकन केले असता, असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, अर्जदाराने विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 3 कडे विमा दावा सादर केला. गैरअर्जदार क्र. 3 यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावरुन अर्जदाराचा दावा गैरअर्जदार क्र. 1 कडे सादर केलेला होता. परंतु निशानी क्र.9/2 कडे पोस्‍ट मॉर्टेन अहवालानुसार मयताचे वय 65 वर्ष नमुद केल आहे तसेच निशानी 2/15 कडे ग्राम पंचायतीने दिलेल्‍या दाखल्‍यावर मयताचे वय 67 वर्ष दाखविलेले आहे. निशानी 15/1 कडे तक्रारकर्तीचे दिर म्‍हणजेच मयताचे लहान भाऊ शामराव ओडबाजी सुरपाम यांचे शपथपत्र तर निशानी 15/5 कडे  त्‍योचे शाळा बदल्‍याचे प्रमाणपत्र (टिसी) दाखल केले आहे, त्‍यामध्‍ये त्‍यांची जन्‍म दारीख 15/06/1950 नमुद आहे. म्‍हणजेच ते 2012 साली 62 वर्षाचे होते व त्‍यांचे शपथपत्रान्‍वये मयत रामाजी हे त्‍यांच्‍या दोन वर्षानी मोठे होते म्‍हणजेच मयत रामाजी यांचे वय 64 वर्षाचे असणार. निशानी 15/4 कडे मध्‍ये मयत रामाजी यांच्‍या मुलाचे नौकरीच्‍या ठिकाणचे म्‍हणजेच महाराष्‍ट्र पोलीसांचे कुटूंब आरोग्‍य योजनेअंतर्गत असलेल्‍या मयत रामाजी यांच्‍या ओळखपत्रावर त्‍यांची जन्‍मतारीख 4/10/1940 आहे म्‍हणजेच मृत्‍यु समयी मयत रामाजी यांचे वय 72 वर्षाचे होते असे दिसुन येते.  त्‍यामुळे वरील सर्व कागादोपत्री पुराव्‍यावरुन मयत रामाजी यांचे वय सर्वसाधारपणे 64 - 72 चे दरम्‍यान होते हे स्‍पष्‍ट होते. म्‍हणजेच मृत्‍युवेळी त्‍यांचे वय 75 किंवा त्‍यापेक्षा जास्‍त नव्‍हते हे सिध्‍द होते. निवडणुक ओळखपत्रावर असलेले वय हे मोघम असते कारण सामान्‍यतः सदर ओळखपत्र तयार करतांना वय, नाव व राहण्‍याचा पत्‍ता यामध्‍ये किरकोळ चुका झालेल्‍या असतात त्‍यामुळे निवडणुक ओळखपत्र हे वयाचा अंतीम पुरावा म्‍हणुन ग्राहय धरता येत नाही,
या बाबत मा. राष्‍ट्रीय आयोगाने II (2011) CPJ 7 (NC) यामध्‍ये
 
“ Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(d), 21(b) – Insurance (Life) – Endowment Assurance Policy with Profits – Suppression of material facts – Dispute in age – Claim repudiated – Forum allowed complaint – State Commission dismissed appeal – Hence revision – Contention, assured had given his age incorrectly while filling proposal form on basis of voters list—Not accepted – Age given in voters list cannot be taken as a sure test to determine exact age of a person – It is a common knowledge that frequently small mistakes regarding residence, age, parentage do occur while preparing voters list – No conclusive evidence on record to show that assured had mentioned his age incorrectly with malafide intention with any ulterior motive – Assured has correctly mentioned age in proposal form.”
 
त्‍यामुळे सदर निवडणुक ओळखपत्र हे वयाचा अंतीम पुरावा म्‍हणुन ग्राहय धरता येवु शकत नाही. त्‍यामुळे वर नमुद केल्‍याप्रमाणे मयत रामाजी यांचे मृत्‍युचे वेळी वय64 ते 72 चे दरम्‍यान असल्‍यामुळे शेतकरी कृषी योजनेचा लाभ मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहे असे मा.न्‍यायमंचास वाटते. 
   
          म्‍हणुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून दरसाल दरशेकडा 15 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रार खर्च रुपये 500/- मिळण्‍यास पात्र आहे.
          उपरोक्‍त सर्व विवेचनावरुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
// आदेश //
 
1)     अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.
2)        गैरअर्जदार क्र. 1 द न्‍यु इंडीया अँसुरन्‍स कंपनी लिमिटेडयांनी निकाल प्राप्‍ती पासून 30 दिवसांचे आंत, अर्जदार यांना विमा रक्‍कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्‍त ) द्यावे. तसेच   या रक्‍कमेवर दिनांक 15/12/2012 पासून ( तक्रार दाखल दिनांक ) ते पुर्ण रक्‍कम अदा करे पर्यंत दरसाल दरशेकडा 15 टक्‍के दराने होणा-या व्‍याजाची रक्‍कम अर्जदार यांना देण्‍यात यावी. अन्‍यथा मुदतीनंतर उपरोक्‍त रुपये  1,00,000/- व या रक्‍कमेवर दिनांक 15/12/2012 पासून ते पुर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत दरसाल दरशेकडा 18 टक्‍के दराने दंडणिय व्‍याजासह रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार क्र. 1 जवाबदार राहतील.                                
3)     अर्जदार यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास रुपये 1000/- ( रुपये एक हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 500/- ( रुपये पाचशे फक्‍त) सदर निकाल प्राप्‍ती पासून तीस दिवसांचे आंत द्यावे.
4)     मा.सदस्‍यांसाठीच्‍या फाईल्‍स संबंधीतांनी परत घेवुन जाव्‍यात.
5)     निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्‍तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्‍यात याव्‍यात. 
6)     गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्‍द आदेश नाही.
 
 
[HON'ABLE MR. Milind B.Pawar]
PRESIDENT
 
[HONABLE MR. Shri Milind R. Kedar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.