जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 48/2016 तक्रार नोंदणी दि. :- 10/11/2016
तक्रार निकाली दि. :- 21/02/2017
निकाल कालावधी :- 3 म.11 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्रीमती कमलाबाई सुकरु ठाकूर,
वय 50 वर्षे, व्यवसाय-घरकाम,
रा.पो.मारोडा, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.130800, न्यु इंडिया
सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,
मुंबई-400 001.
(2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स,
नागपूर-440018.
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री.मंगेश देशपांडे
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 21 फेब्रुवारी 2017)
तक्रारकर्तीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री.सुकरु श्रावण ठाकूर हे दि.30.08.2012 रोजी शेतात कामाला गेला असता अंगवार आकाशातुन वीज पडून मृत्यु पावले. शासनातर्फे तक्रारकर्त्याचे वडील शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने तक्रारकर्ती मृत शेतक-याची वारसदार म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होती. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत दि.23.3.2016 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. तक्रारकर्तीचे पतीच्या दाव्याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने अर्जदाराने तिच्या वकीलामार्फत दिनांक 20.10.2016 ला कायदेशिर नोटीस पाठविला. सदर नोटीसला गैरअर्जदार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्याचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.23.3.2016 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 7 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.10 नुसार लेखी उत्तर दाखल केले व गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील प्राथमिक आक्षेपामध्ये असे नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत नमुद केले आहे की, तिने वकीलामार्फत दिनांक 20.10.2016 ला कायदेशिर नोटीस पाठविला. परंतु, सदर नोटीसची प्रत तक्रारीसोबत दाखल केली नाही किंवा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना देखील पुरविली नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.3 कडून अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 ला प्राप्त झालेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा कधीही नाकारला नाही. अर्जदाराचा दावा अपरिपक्व असल्याने अयोग्य आहे. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
गैरअर्जदार यांनी पुढे असे नमुद केले की, शेतकरी अपघात विमा पॉलीसीमध्ये नमुद त्रिपक्षीय करारानुसार 90 दिवसाच्या आंत दावा गैरअर्जदार क्र.3 कडे दाखल करणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी अर्जदाराचे पती मयत झालयानंतर विहित मुदतीत दावा दाखल करणे आवश्यक होते, परंतु, अर्जदाराने विहित मुदतीत दावा दाखल न केल्याने अर्जदाराची तक्रार मुदतबाहय असल्यामुळे, खारीज होण्यास पात्र आहे. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र.3 कडे विमा दावा दिनांक 23.3.2016 ला दाखल केला व तक्रार दिनांक 30.10.2016 ला विद्यमान मंचासमोर दाखल केली. सदर तक्रारीस कारण दिनांक 30.8.2012 रोजी घडले आहे. शेतकरी अपघात विमा पॉलीसीच्या अटी व शर्ती दोन्ही पक्षास बंधनकारक आहेत. अर्जदार यांनी घटना घडल्यापासून विहित मुदतीचे आंत विमा दावा दाखल करणे आवश्यक होते. सदरची तक्रार मुदतबाहय असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.3 कडे दिनांक 23.3.2016 ला प्राप्त झालेला होता. सदर प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांचेकडे दिनांक 2.4.2016 ला सादर करण्यात आला. जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी वारसदाराकडून विलंबाबाबत खुलासा सादर करण्याचे पत्र दिनांक 22.4.2016 अन्वये, गैरअर्जदार क्र.3 ला पाठविला. त्याबाबतचे पत्र अर्जदारास दिनांक 30.4.2016 ला पत्र देण्यात आले, त्यांचेकडून खुलासा दिनांक 3.6.2016 ला प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांना दिनांक 20.6.2016 ला खुलासा पत्र पाठविण्यात आले होते. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 यांना सदर तक्रारीतून दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली.
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराचे पतीचे नावाने नि.क्र.2 नुसार दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते की, मृतकाचे वडीलांची शेतजमीन होती व आहे. तसेच, अर्जदार ही पतीच्या आकस्मिक मृत्युनंतर शेतकरी जनता अपघात विमा दाव्याचा लाभार्थी आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
7. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 कडे दावा दाखल केला आहे, हे अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन दिसून येते गैरअर्जदार क्र.1 व 2 चे हे म्हणणे की, अर्जदाराने दावा दाखल करण्यास विलंब झाल्या कारणामुळे फेटाळण्यात येत आहे. परंतु, अर्जदाराने विलंब झाले असल्याचे कारण त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवज क्र.19 वर तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी तसेच दस्तऐवज क्र.20 नुसार न्यु इंडिया इंशुरन्स कंपनी लि. यांना पाठविलेल्या पत्रामध्ये अर्जदाराने नमुद केले आहे की, ती अशिक्षित असल्यामुळे, तसेच दुर्गम भागात राहात असल्यामुळे या योजनेची माहिती उशिरा मिळाली, त्यामुळे, दावा उशिरा दाखल करण्यात आलेला आहे.
गैरअर्जदार क्र.1 चे हे म्हणणे गृहीत धरण्यासारखे नाही की, सदर तक्रार मुदतबाहय आहे. कारण अर्जदाराने विमा दावा दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र.3 व्दारा विमा दावा उशिरा दाखल करण्याचे कारण विचारल्याचे पत्रावरुन अर्जदाराने दस्तऐवज क्र.19 व 20 नुसार गैरअर्जदार क्र.3 व 1 ला पत्र देवून उशिर झाल्याचे कारण स्पष्ट केलेले आहे. तसेच, अर्जदाराने विमा दावा क्लेम फॉर्म सोबत आवश्यक सर्व दस्तऐवज सुध्दा दाखल केलेले होते, तरी गैरअर्जदार क्र.1 ने विमा दावा निकाली काढलेला नाही व अर्जदारास दावा फेटाळलेला आहे किंवा काय ? असे कोणतेही पत्रसुध्दा दिलेले नाही. तसेच, अर्जदाराच्या वकीलामार्फत दिनांक 20.10.2016 नुसार गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस दिलेली आहे व गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे उत्तर सुध्दा दिलेले नाही.
एकंदरीत, गैरअर्जदारक्र.1 ने विमा दावा निकाली न काढता अर्जदारास त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या उत्तरामध्ये उल्लेखित न्यायनिवाडे या तक्रारीस लागू पडत नाही, कारण, सदर तक्रार गैरअर्जदार क्र.1 ने विमा दावा निकाली न काढल्यामुळे व कोणतेही पत्र अर्जदारास न दिल्यामुळे सदर तक्रार मुदतीत आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
गैरअर्जदार क्र.1 ते 3 कडून अर्जदाराचा दावा फेटाळल्याबाबतचे कोणतेही पत्र प्रत्यक्ष तक्रारकर्तीला मिळालेले नाही. त्यामुळे, हा दावा नाकारण्याचे कारणच उद्भवत नाही. गैरअर्जदाराचे सदर कृत्य हे अर्जदाराप्रती अनुचित व्यापार व न्युनतापुर्ण सेवा आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- प्रस्ताव दाखल केल्यापासून म्हणजेच दिनांक 23.03.2016
पासून, द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह, आदेशाची प्रत मिळाल्यापासून
45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 21.2.2017.