Maharashtra

Gondia

CC/13/18

SMT. PARVATABAI CHHANNULAL TUMLAM - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI MOHAN DIGAMBAR LIMYE - Opp.Party(s)

MR. UDAY KSHIRSAGAR

27 May 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/13/18
 
1. SMT. PARVATABAI CHHANNULAL TUMLAM
R/O. MAKKITOLA, TAH. AMGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. THROUGH DIVISIONAL MANAGER SHRI MOHAN DIGAMBAR LIMYE
DIVISIONAL OFFICE NO. 130800, NEW INDIA CENTRE, 7TH FLOOR, 17-A, KUPREJ ROAD, MUMBAI-400 039.
MUMBAI
MAHARASHTRA
2. TALUKA KRUSHI ADHIKARI SHRI DHANRAJ LAXMANTUMDAM
TALUKA AMGAON
GONDIA
MAHARASHTRA
3. M/S. KABAL INSURANCE BROKING SERVICES LTD. THROUGH MR. SANDEEP VISHNUPANT KHAIRNAR
FLAT NO. 1, PARIJAT APARTMENT, PLOT NO. 135, SURENDRA NAGAR, NAGPUR-440 015
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. Geeta R. Badwaik MEMBER
 
For the Complainant:
NONE
 
For the Opp. Party:
NONE
 
ORDER

आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी

तक्रारकर्तीचे मयत पती श्री. छन्‍नुलाल तुमलाम यांच्‍या अपघाती विम्‍याचे पैसे विरूध्‍द पक्ष यांनी न दिल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरची तक्रार विद्यमान न्‍याय मंचात दाखल केलेली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्तीचे पती छन्‍नुलाल जगन तुमलाम यांच्‍या मालकीची शेती ही मक्‍कीटोला, ता. आमगांव, जिल्‍हा गोंदीया सर्व्‍हे नंबर 235, क्षेत्रफळ एकूण 1 एकर 2 आर. होती.   त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबाचे पालनपोषण हे शेती व्‍यवसायावर होत होते म्‍हणून ते शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये येतात.

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 2 ही विमा सल्‍लागार कंपनी आहे.  विरूध्‍द पक्ष 3 हे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचे प्रस्‍ताव अर्ज स्विकारतात.  तक्रारकर्तीच्‍या पतीचा विमा हा महाराष्‍ट्र शासनातर्फे काढण्‍यात आला होता.  

 

4.    दिनांक 15/05/2012 रोजी शेतातील विहिरीत पाय घसरून तक्रारकर्तीच्‍या पतीचे निधन झाले.  तक्रारकर्तीने दिनांक 03/08/2012 रोजी विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे विमा दावा कागदपत्रांसह सादर केला.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 यांनी दिनांक 08/11/2012 रोजी तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केला.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा खारीज करतांना तक्रारकर्तीचे पती अपघाताच्‍या वेळी विक्षिप्‍त बुध्‍दीचे असल्‍याचे कारण नमूद केले.  त्‍यामुळे तक्रारकर्तीने विम्‍याचे रू. 1,00,000/- मिळण्‍यासाठी तसेच नुकसानभरपाई रू. 20,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्‍यासाठी  सदर प्रकरण दिनांक 20/02/2013 रोजही मंचामध्‍ये दाखल केले.

 

6.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 28/22/2013 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी हजर होऊन त्‍यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.  

विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्यांचा जबाब दिनांक 09/05/2013 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी आपल्‍या जबाबामध्‍ये तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍याचे खंडन केले आहे.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी आपल्‍या जबाबात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा बाबुराव याने पोलीस स्‍टेशनमध्‍ये दिलेल्‍या रिपोर्टमध्‍ये मृतकाची मानसिक अवस्‍था बरी नव्‍हती व त्‍याचे मानसिक संतुलन बिघडल्‍यामुळे ते घरातून रात्री निघून गेले असे कबूल केल्‍यामुळे सदरहू घटना ही अपघात नसून आत्‍महत्‍या असल्यामुळे तक्रारकर्तीला महाराष्‍ट्र शासनाच्‍या धोरणानुसार अपघाती विम्याचे पैसे दिल्‍या जाऊ शकत नाही व त्‍यामुळे विमा दावा नामंजूर करणे ही सेवेतील त्रुटी नाही. 

विरूध्‍द पक्ष 2 यांनी आपल्‍या जबाबामध्‍ये असे म्‍हटले आहे की,  विरूध्‍द पक्ष 2 ही सल्‍लागार कंपनी असून कुठलाही मोबदला न घेता शासनाकरिता काम करीत आहे त्‍यांनी दिनांक 28/09/2012 रोजी विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे विमा दाव्‍याचा प्रस्‍ताव सादर केला व विरूध्‍द पक्ष 1 यांनी दिनांक 08/11/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्‍याचे तक्रारकर्तीस कळविले. 

विरूध्‍द पक्ष 3 यांनी त्‍यांचा जबाब दिनांक 23/04/2013 रोजी दाखल केला असून त्‍यात त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा पाण्‍यात बुडून झाला हे म्‍हणणे खरे आहे व दाव्‍याची रक्‍कम मंजूर करण्‍यायोग्‍य आहे.

 

7.    तक्रारकर्तीने तक्रारीसोबत कागदपत्रांची यादी पृष्‍ठ क्र. 13 वर दाखल केली असून विरूध्‍द पक्ष 1 यांचे दावा खारीज केल्‍याचे पत्र पृष्‍ठ क्र. 14 वर, विमा दावा अर्ज

 

पृष्‍ठ क्र. 15 वर, कलम 174 चा रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 21 वर, Crime Report पृष्‍ठ क्र. 23 वर, घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 26 वर, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा पृष्‍ठ क्र. 27 वर, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 29 वर, 7/12 चा उतारा पृष्‍ठ क्र. 39 वर, फेरफार नोंदवही पृष्‍ठ क्र. 41 व 42 वर तसेच ग्रामपंचायत सुरकुडा यांचे प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 46 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.           

 

8.    तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा दिनांक 15/05/2012 रोजी विहिरीत पाय घसरून पडल्‍यामुळे झाला हे सरंपच यांच्‍या प्रमाणपत्रावरून सिध्‍द होते.  तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज विहित मुदतीत दिला.  परंतु विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा फेटाळणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी होय.  तक्रारकर्तीच्‍या पतीचे मानसिक संतुलन बिघडलेले नसून व त्‍याबद्दल विरूध्‍द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात कुठलाही पुरावा सादर न करणे म्‍हणजे विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍यांच्‍याविरूध्‍द सदरहू प्रकरण मंजूर करण्‍यात यावे.

 

9.    विरूध्‍द पक्ष 1 च्‍या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्‍या मुलाने पोलीसांना दिलेल्‍या एफ.आय.आर. मध्‍ये कबूल केले आहे की, तक्रारकर्तीचे पती हे Mental Disorder या परिस्थितीत असल्‍यामुळे हा अपघात नसून आत्‍महत्‍या होय.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांनी दावा नामंजूर करणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी नाही.

 

10.   तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेले जबाब आणि दोन्‍ही पक्षाच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तकारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

- कारणमिमांसा

 

11.   विरूध्‍द पक्ष 3 यांनी त्‍यांच्‍या जबाबामध्‍ये मान्‍य केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा विहिरीतील पाण्‍यात पडल्‍याने झाला व तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर होण्‍यायोग्‍य आहे.  करिता प्रकरण विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍याकडे पाठविण्‍यात येत आहे.            

 

12.   विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचे पती हे Unsoundness of mind असल्‍याबद्दल कुठलाही वैद्यकीय पुरावा प्रतिज्ञापत्रासह सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी एफ.आय.आर. मध्‍ये तक्रारकर्तीच्‍या मुलाने जी घटना पोलीसांना सांगितली त्‍या एकमेव कारणामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केला.  तक्रारकर्तीचे पती Unsoundness of mind असल्‍याबद्दलचा कुठलाही पुरावा मिळविण्‍यासाठी विरूध्‍द पक्ष 1 यांनी प्रयत्‍न केल्‍याचे दिसत नाही.  महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकानुसार जर मृत्‍यु पावलेली व्‍यक्‍ती ही insense असेल तर तिला विमा दावा दिल्‍या जाऊ शकत नाही असे म्‍हटले आहे.  Insanity ही Unsoundness of mind च्‍या वरची स्थिती असून यामध्‍ये आपण जी कृती करीत आहो त्‍या कृतीबद्दल कुठल्‍याही प्रकारचे भान न राहणे व ही अवस्‍था ब-याच वर्षापासून सतत होणा-या कालावधीकरिता असते.  पोलीस स्‍टेशनच्‍या कागदपत्रानुसार तक्रारकर्तीचे पती संध्‍याकाळी जेवण करून व्‍यवस्थित झोपले म्‍हणजे तोपर्यंत त्‍यांची मानसिक स्थिती चांगली होती हे सिध्‍द होते.   माननीय राज्‍य आयोग, मुंबई यांनी III (2009) CPJ 290 -  NEW INDIA ASSURANCE COMPANY LIMITED versus SUCHITRA NANDKUMAR DHONDE & ANR. या प्रकरणात असे म्‍हटले आहे की, Insanity is the unsoundness of mind of highest degree.  Disturbance of mind even lasting for over some period which can be styled as chronic is not tantamount to insanity.  In the disturbed state of mind one may be temporarily not in a position to think rationally and reasonably, but his mind is always sound and it the burden lies on the Insurance company to prove degree of insanity to attract repudiation clause.    

      सदरहू प्रकरणामध्‍ये सुध्‍दा विरूध्‍द पक्ष 1 यांनी कुठलाही पुरावा Level of insanity बद्दल दाखल न केल्‍यामुळे ज्‍यावेळेस त्‍यांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला त्‍यावेळेस तक्रारकर्तीचे पती हे Insane होते ही बाब विरूध्‍द पक्ष 1 सिध्‍द करून शकले नाहीत.  त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु ही आत्‍महत्‍या नसून अपघाती मृत्‍यु आहे असे मंचाचे मत आहे.

 

13.   तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी दाखल केलेला माननीय राज्‍य आयोग, मुंबई यांच्‍या अपील क्रमांक A/05/387  Order dated 12/10/2012 – The United India Insurance Co. Ltd.  versus  Smt. Manali Mohan Kadam & Ors.  यामध्‍ये सुध्‍दा असे म्‍हटले आहे की, To justify the repudiation of the insurance claim the burden lies on the Insurance Company.  When the Insurance Company fails to adduce evidence of insnity the repudiation is against law.  माननीय राज्‍य आयोग, मुंबई यांच्‍या Appeal No. 788/2007 – Mst. Aditya Girish Pawaskar & Ors. versus Life Insurance Corporation Of  India  यामध्‍ये सुध्‍दा असे म्‍हटले आहे की,  “Heavy burden lies on the Insurance Company to prove that the life assured committed suicide.  No chit indicating commission of suicide is placed on record to show that the life assured committed suicide”.  

 

14.   वरील न्‍यायनिवाड्यांचे अवलोकन करता व तक्रारकर्तीच्‍या प्रकरणामधील असलेले मुद्दे हे सुसंगत असल्‍यामुळे तसेच विरूध्‍द पक्ष 1 यांनी दावा नामंजूर करण्‍याकरिता न सादर केलेले पुरावे व सदरहू प्रकरणामध्‍ये Burden of proof  योग्‍य रित्‍या सिध्‍द करण्‍याकरिता दाखल न केलेले पुरावे यावरून तक्रारकर्ती अपघाती विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.  करिता विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- द्यावे व या रकमेवर तक्रार दाखल झाल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 28/02/2013 पासून ते संपूर्ण पैसे मिळेपर्यंत द.सा.द.शे. 10% दराने व्‍याज द्यावे.  तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रू. 5,000/- व दाव्‍याच्‍या खर्चापोटी रू. 2,000/- विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला द्यावे असे देखील मंचाचे मत आहे.

      करिता खालील आदेश.             

 

-// अंतिम आदेश //-

 

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक पतीच्‍या व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर तक्रार दाखल झाल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 28/02/2013 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 10% दराने व्‍याज द्यावे. 

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.   

 

4.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्तीला रू. 2,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 2 व 3 च्‍या विरोधात ही तक्रार खारीज करण्‍यात येते.    

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Geeta R. Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.