Maharashtra

Gondia

CC/13/4

SMT. KESHARBAI RAVINDRA KATRE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD THROUGH DIVISIONAL MANAGER MR. H. L. GOUR - Opp.Party(s)

MR. UDAY KSHIRSAGAR

30 Jul 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/13/4
 
1. SMT. KESHARBAI RAVINDRA KATRE
R/o. PO. SUKHATOLA-PIPRIYA, TAH. SALEKASA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD THROUGH DIVISIONAL MANAGER MR. H. L. GOUR
DIVISIONAL OFFICE NO. 130800, NEW INDIA CENTRE, 7TH FLOOR, 17-A, KUPREJ ROAD, MUMBAI-400 039
MUMBAI
MAHARASHTRA
2. M/S. KABAL INSURANCE BROKING SERVICES LTD. THROUGH MR. SANDEEP KHAIRNAR
FLAT NO. 1, PARIJAT APARTMENT, PLOT NO. 135, SURENDRA NAGAR, NAGPUR-440 015
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI MR. PREMESH YUVRAJ POTDUKHE
TALUKA SALEKASA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. सदस्‍या, कु. वर्षा ओ. पाटील)

(पारित दि. 30 जुलै, 2014)

     

तक्रारकर्तीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्‍द पक्ष 1 यांनी फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्ती ही मौजा सुखाटोला-पिपरिया, तालुका सालेकसा, जिल्‍हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचा मुलगा लेखराम रविन्‍द्र कटरे याच्‍या मालकीचे मौजा पिपरिया, ता. सालेकसा, जिल्‍हा गोंदीया येथे सर्व्‍हे नंबर 677/1, 687/1, 678/2 ह्या वर्णनाची शेती असल्‍यामुळे ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचे लाभधारक आहेत.    

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 2 ही विमा सल्‍लागार कंपनी आहे.  विरूध्‍द पक्ष 3 हे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्‍याचे काम करतात.

 

4.    तक्रारकर्तीचा मुलगा लेखराम रविन्‍द्र कटरे दिनांक 15/08/2011 रोजी शेतात लघुशंकेला गेला असतांना साप चावल्‍याने विषबाधा होऊन मरण पावला.

 

5.    तक्रारकर्तीचा मुलगा शेतकरी असल्‍याने तक्रारकर्तीने विमा दावा मिळण्‍यासाठी विरूध्‍द पक्ष 3 याच्‍याकडे दिनांक 24/10/2011 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला.  परंतु विरूध्‍द पक्ष 1 यांनी दिनांक 13/02/2012 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवून तक्रारकर्तीच्‍या मुलाच्‍या नावाने विमा पॉलीसी जारी झाल्‍याच्‍या दिवशी रेकॉर्डवर नाव नव्‍हते त्‍यामुळे तक्रारकर्तीचा दावा खारीज केल्‍याचे कळविले.  

 

6.    विरूध्‍द पक्षांनी विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारकर्तीला आवश्‍यक ती सेवा प्रदान करण्‍यामध्‍ये कसूर केल्‍याने तक्रारकर्तीने विमा दाव्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/-  तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रू. 20,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- असे एकूण रू. 1,30,000/- मिळण्‍याकरिता दिनांक 01/01/2013 रोजी न्‍याय मंचात तक्रार दाखल केली आहे. 

 

7.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 18/01/2013 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 24/01/2013 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1, 2 व 3 यांनी हजर होऊन त्‍यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. 

विरूध्‍द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा जबाब दिनांक 22/03/2013 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या जबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले असून ज्‍यावेळेस आणि ज्‍या दिवशी तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु साप चावल्‍यामुळे झाला त्‍यावेळेस त्‍याची विमा पॉलीसी नव्‍हती, आणि तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु दिनांक 15/08/2011 रोजी सकाळी 6 ते 8 च्‍या दरम्‍यान झाला आणि विमा पॉलीसी 11.59 वाजता सुरू झाली असे आपल्‍या लेखी जबाबात म्‍हटले आहे.  पुढे विरूध्‍द पक्ष 1 यांनी खंडन केले आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा शेतकरी होता आणि त्‍यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजना पॉलीसी उतरविली होती.  म्‍हणून विरूध्‍द पक्ष 1 कडून रू. 1,00,000/- रक्‍कम घेण्‍यास तक्रारकर्ती पात्र नाही. 

विरूध्‍द पक्ष 2 यांनी सदरहू प्रकरणात आपला जबाब  दाखल केला असून तो पृष्‍ठ क्र. 41 वर आहे.  विरूध्‍द पक्ष 2 यांनी त्‍यांच्‍या जबाबामध्‍ये असे म्‍हटले आहे की,  विरूध्‍द पक्ष 2 ही सल्‍लागार कंपनी असून शासनाकडून कुठलाही मोबदला न घेता ते काम करतात.  विरूध्‍द पक्ष 2 यांनी त्‍यांच्‍या जबाबातील परिच्‍छेद क्र. 4 मध्‍ये असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीचा प्रस्‍ताव कबाल नागपूर मार्फत न्‍यू इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनीला दिनांक 16/01/2012 ला पाठविला असता सदरील दावा अर्ज न्‍यु इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनीने मयत व्‍यक्‍तीचे नावावर शेती विमा पॉलीसी सुरू झाल्‍यानंतर फेरफारात नमूद झाल्‍या कारणाने पॉलीसी नियमात बसत नसल्‍याचे कारण नमूद करून दावा नामंजूर केला असून तसे वारसदारास दिनांक 13/02/2012 च्‍या पत्रान्‍वये कळविण्‍यात आले.  करिता सदरहू प्रकरण त्‍यांच्‍याविरूध्‍द खारीज करण्‍यात यावे.

विरूध्‍द पक्ष 3 यांनी त्‍यांचा जबाब दिनांक 28/02/2013 रोजी दाखल केला असून त्‍यात त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेचा प्रस्‍ताव त्‍यांच्‍या कार्यालयास दिनांक 24/10/2011 रोजी प्राप्‍त झाला व सदर प्रस्‍ताव त्‍यांनी दिनांक 24/10/2011 रोजीच्‍या पत्र क्रमांक 1025 प्रमाणे जिल्‍हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांना पाठविण्‍यात आला. 

 

6.    तक्रारकर्तीने  तक्रारीसोबत  विमा दावा नामंजूर केलेले पत्र पृष्‍ठ क्र. 13 वर दाखल केलेले असून मर्ग खबरी पृष्‍ठ क्र. 19 वर, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा पृष्‍ठ क्र. 21 वर, घटनास्‍थळ पंचनामा पृष्‍ठ क्र. 22 वर, पोस्‍टमार्टेम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 23 ते 26 वर, तक्रारकर्तीच्‍या मयत मुलाचे मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 27 वर, शेतीचा 7/12 पृष्‍ठ क्र. 28 वर, फेरफाराची नोंद पृष्‍ठ क्र. 29 वर, वारसांन प्रकरणाची नोंदवही पृष्‍ठ क्र. 30, 31 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत शासन निर्णय 2010-2011 पृष्‍ठ क्र. 62 वर, शासन निर्णय 2011-12 पृष्‍ठ क्र. 65 वर तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीचे मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 57 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.           

 

7.    तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने 90 दिवसांच्‍या आंत विमा दावा विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे सादर केला होता.  तक्रारकर्तीने सर्व कागदपत्र देऊन सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांनी विमा दावा मंजूर केला नाही.  तरी तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर करण्‍यात यावे.  तक्रारकर्तीचे पती श्री. रविन्‍द्र कटरे हे दिनांक 08/10/2007 रोजी मरण पावल्‍यानंतर त्‍याचे वारस म्‍हणून तक्रारकर्तीचा मुलगा लेखराम रविन्‍द्र कटरे याला दिनांक 03/08/2011 च्‍या फेरफाराद्वारे त्‍याच्‍या वडिलांच्‍या शेतावर मालकी हक्‍क प्राप्त झाला.  तक्रारकर्तीचा मुलगा लेखराम रविन्‍द्र कटरे ह्याचा मृत्‍यु दिनाक 15/08/2011 रोजी झाला व त्‍याचे नाव दिनांक 03/08/2011 रोजीच सदर शेतीच्‍या 7/12 वर चढले असल्‍याने अपघाताच्‍या वेळेला तो शेतकरी होता आणि उशीरा entry झाली तरी Immediate वारस होतात.  त्‍यावर National Commission  चे Citation त्‍यांनी केसमध्‍ये दाखल केलेले आहे ते पृष्‍ठ क्र. 69 वर आहे. 

 

IV (2012) CPJ 51 (NC) – Reliance General Insurance Co. Ltd. Versus Sakorba Hetubha Jadeja & Ors.

 

Death of farmer – Legal heirs – Entitlement – District Forum allowed complaint – State Commission dismissed appeal – Hence revision – Death of ‘BJ’ was nearly five months before the date of entry, i.e. 12.04.2002 – All his legal heirs became registered farmers immediately after death of their father – It was the only statutory process of registration of legal heirs in village record – ‘HJ’ became registered farmer in December, 2001, i.e. well before 26.01.2002, the date of inception of insurance policy – Complainants entitled to receive the sum insured – Repudiation not justified. 

 

      तसेच शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना दिनांक 15/08/2011 रोजी सकाळी 00.00.01 वाजता सुरू झाली असल्‍याने तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु पॉलीसी सुरू झाल्‍याच्‍या दिवशी झाला व तो शेतकरी होता.  तरी तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर करण्‍यात यावे.

 

8.    विरूध्‍द पक्ष 1 च्‍या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी लिखित युक्तिवाद सादर केला आणि तोंडीही सांगितले की, तक्रारकर्तीचा मयत मुलगा दिनांक 15/08/2011 रोजी साप चावून मरण पावला त्‍या दिवशी तो रजिस्‍टर्ड शेतकरी नव्‍हता.  तसेच मयत लेखराम रविन्‍द्र कटरे यांच्‍या मृत्‍युचे वेळेस त्‍याचे वडील श्री. रविन्‍द्र कटरे हे जीवंत होते.  दिनांक 13/10/2011 च्‍या फेरफार पत्रकानुसार आणि श्री. रविन्‍द्र कटरे यांचा मृत्‍यु दिनांक 08/10/2011 ला झाला आणि तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु दिनांक 15/08/2011 रोजी साप चावल्‍यामुळे झाला तेव्‍हा तो शेतकरी नव्‍हता.  7/12 चा उतारा दिनांक 30/07/2011 नुसार आणि ती वडिलोपार्जित मालमत्‍ता नव्‍हती म्‍हणून तो शेतकरी नव्‍हता.  तसेच इन्‍शुरन्‍स पॉलीसी 11.59 वाजता पासून सुरू झाली आणि मृत्‍यु दिनांक 15/08/2011 रोजी सकाळी 6 ते 8 च्‍या दरम्‍यान झाला.  त्‍यावर त्‍यांनी आंध्र प्रदेश, हैद्राबाद उच्‍च न्‍यायालय यांचे Citation दिले.  2013 ACJ 1154. म्‍हणून तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विमा योजनेस पात्र नाही.   

 

9.    तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेला तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

- कारणमिमांसा

 

10.   तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु दिनांक 15/08/2011 रोजी झाला.  तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज कागदपत्रासह विरूध्‍द पक्ष क्र. 3 यांच्‍याकडे सादर केला.  तक्रारकर्तीची त्‍यावेळची मानसिक स्थिती आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्‍यासाठी तिला लागलेला वेळ व घरातील एकमेव सज्ञान व्‍यक्‍ती या बाबींचा विचार करता तक्रारकर्तीस विमा दावा अर्ज दाखल करण्‍यासाठी विलंब लागल्‍याचे संयुक्तिक कारण आहे.  त्‍यामुळे महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसानंतर सुध्‍दा विमा दावा संयुक्तिक कारण असल्‍यास दाखल केल्‍या जाऊ शकतो व तो मंजूर होण्‍यास पात्र आहे.  तक्रारकर्तीचा मुलगा श्री. लेखराम रविन्‍द्र कटरे याच्‍या मालकीचे मौजा पिपरिया, ता. सालेकसा, जिल्‍हा गोंदीया येथे सर्व्‍हे नंबर 677/1, 687/1, 678/2 ह्या वर्णनाची शेती असल्‍यामुळे ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचे लाभधारक आहेत.  म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 होकारार्थी दर्शविण्‍यात येत आहे.            

 

11.   महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकानुसार शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 ही योजना 15 ऑगस्‍ट 2011 पासून कार्यान्वित झाली असून 15 ऑगस्‍ट ही तारीख रात्री 12.01 मिनीटांनी चालू झाल्‍यापासून अस्तित्‍वात आलेली आहे.  तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु हा दिनांक 15/08/2011 रोजी सकाळी 6.00 वाजता झाल्‍यामुळे तक्रारकर्ती वारस या नात्‍याने शेतकरी जनता अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे.

 

12.   विरूध्‍द पक्ष 1 यांनी असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा हा शेतकरी होत नाही आणि त्‍याच्‍या मृत्‍युच्‍या वेळेस त्‍याचे वडील जीवंत होते आणि त्‍याचे फेरफार मध्‍ये नाव चढलेले नव्‍हते.  म्‍हणून तो शेतकरी होत नाही.  तसेच विमा पॉलीसी 11.59 वाजता सुरू झाली आणि मृत्‍यु दिनांक 15/08/2011 रोजी सकाळी 6 ते 8 च्‍या दरम्‍यान झाला. 

 

13.   मृतकाचे वारस हे मृत्‍युनंतर लगेचच वारस ठरतात.  फक्‍त कागदोपत्री किंवा दप्‍तरी त्‍याच्‍या नावाची नोंद होणे म्‍हणजे तांत्रिक बाब होय.  त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विमा दाव्‍याची नुकसानभरपाई मिळण्‍यास वारस म्‍हणून पात्र आहे.  तक्रारकर्तीने 7/12 चा उतारा सदरहू प्रकरणात दाखल केलेला असून फेरफार नोंद दाखल केली आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचा मुलगा शेतकरी होते व तक्रारकर्ती ही वारस म्‍हणून शेतकरी अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास लाभधारक या नात्‍याने पात्र ठरते.  तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु दिनांक 15/08/2011 रोजी झाला,  तक्रारकर्तीच्‍या मुलाच्‍या मृत्‍युबाबत मर्ग खबरी, क्राईम डिटेल, पोस्‍टमार्टेम रिपोर्ट, मृत्‍यु प्रमाणपत्र, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा  सदर प्रकरणात दाखल केलेला आहे.  त्‍यामुळे संपूर्ण कागदपत्रांचा विचार करता तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे हे सिध्‍द होते. 

 

14.   विरूध्‍द पक्ष यांनी सदरहू शेतकरी जनता अपघात विमा योजना ही सकाळी 11.59 वाजता सुरू झाली याबद्दल कुठलाही लेखी पुरावा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही.  तसेच तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, पुरावे, शपथपत्र यांना ग्राह्य धरून तक्रारकर्ती ही महाराष्‍ट्र शासनामार्फत राबविण्‍यात येणा-या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्‍यास लाभधारक आहे आणि विरूध्‍द पक्ष 1 यांची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.  

      करिता खालील आदेश. 

- अंतिम आदेश -

 

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक मुलाच्‍या अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर विमा दावा दाखल केल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 24/10/2011 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्‍याज द्यावे. 

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.   

 

4.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 2 व 3 च्‍या विरोधात ही तक्रार खारीज करण्‍यात येते.    

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.