नि. २४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३८१/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ४/८/२०१०
तक्रार दाखल तारीख : ५/८/२०१०
निकाल तारीख : १५/१०/२०११
---------------------------------------------------------------
सागर राजाराम घस्ते
वय वर्षे २६, धंदा – ड्रायव्हर
रा.आष्टा ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.
सिव्हील हॉस्पीटल रोड, माता बिल्डींग,
सांगली ता.मिरज जि. सांगली तर्फे शाखाधिकारी .....जाबदारúö
तक्रारदार तर्फे : +ìb÷. श्री डी.एम.धावते
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री जे.एस.कुलकर्णी
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या अपघात विमादाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांच्या मालकीचा एमएच १०/झेड ६५८ हा टेम्पो असून सदरच्या टेम्पोचा विमा तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे उतरविला आहे. तक्रारदार यांचे वाहनाचा विमा कालावधीत दि.२४/१०/२००८ रोजी अपघात झाला. अपघातानंतर तक्रारदार यांनी सदरचे वाहन टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस सेंटर पंडीत ऑटोमोबाईल्स, तुंग ता.मिरज यांचेकडे नेऊन सोडले. पंडीत ऑटोमोबाईल्स यांनी वाहनाचे दुरुस्तीसाठी रु.२,७२,६३२/- चे कोटेशन दिले. त्यानंतर सर्व कागदपत्रांसह तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे क्लेम फॉर्म भरुन दिला. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांच्या ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नाही या कारणास्तव विमादावा मंजूर करण्यास नकार दिला. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज कोटेशनप्रमाणे रक्कम मिळणेसाठी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचे वाहन हे लाईट मोटर व्हेईकल या प्रकारात मोडत नसून सदरचे वाहन हे इंटरमेडिएट कमर्शिअल व्हेईकल या प्रकारचे असून तक्रारदार यांच्या ड्रायव्हरकडे एल.एम.व्ही. ट्रान्स्पोर्ट या प्रकारचे वाहन चालविण्याचा परवाना आहे. तो प्रस्तुतचे वाहन चालविण्यास वैध नसल्याने तक्रारदार याने पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तक्रारदार हा विमादाव्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार यांचे वाहनास दुरुस्तीस रु.२,७२,६३२/- इतका खर्च आल्याचे तक्रारदार यांचे कथन पूर्णपणे चुकीचे आहे. तक्रारदार यांनी पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे तक्रारदार कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१३ च्या यादीने २ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१४ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी प्रतिउत्तरामध्ये तक्रारदार यांचे वाहनाचे unladen weight हे ७५०० किलोग्रॅमपेक्षा जास्त नसल्याने तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवाना हा वैध आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी पॉलिसीमधील कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केलेला नाही असे प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी नि.१६ चे यादीने ३ कागद दाखल केले आहेत. जाबदार यांनी नि.१९ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले व दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता या कारणासाठी नाकारला आहे. जाबदार यांचे हे कारण योग्य आहे का ? हा महत्वाचा मुद्दा प्रस्तुत प्रकरणी उपस्थित झाला आहे. तक्रारदार यांच्या पॉलिसीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची पॉलिसी ही Goods Carrying commercial vehicle या प्रकारची आहे. सदर वाहनाच्या नोंदणी पुस्तकाची झेरॉक्सप्रत याकामी नि.५/३ वर दाखल आहे. सदर नोंदणी पुस्तकावरुन वाहनाचे unladen weight २९७५ किलोग्रॅम तर Gross vehicle weight हे ९६०० किलोग्रॅम असल्याचे दिसून येते. सदरच्या आर.सी.बुकवर Additional particulars in the case of all transport vehicles other than motor cabs या शिर्षकाखाली वाहनाचे gross vehicle weight दिले आहे. त्यामुळे तक्रारदारांचे वाहन हे Transport vehicle प्रकारचे आहे असे दिसून येते. Transport vehicle ची व्याख्या मोटार वाहन कायद्यातील कलम २(४७) मध्ये दिली आहे, ती पुढीलप्रमाणे –
कलम २(४७)–Transport vehicle means a public service vehicle, a goods carriage and educational institution bus or a private service vehicle.
सदर व्याख्या, पॉलिसी व आर.सी.बुक या तिन्हींचे अवलोकन केले असता प्रस्तुतचे वाहन हे Goods carriage या प्रकारचे असलेने Transport vehicle या प्रकारामध्ये मोडते.
६. मोटार वाहन कायद्यामध्ये वाहनाच्या वजनावर वाहनाचे वर्गीकरण केले असल्याचे दिसून येते. सदर कायद्यातील कलम २(२१) मध्ये Light motor vehicle, कलम २(२३) मध्ये Medium goods vehicle, कलम २(१६) मध्ये Heavy goods vehicle हे प्रकार केले आहेत. असे प्रकार करताना ज्या वाहनाचे वजन ७५०० किलोग्रॅमपेक्षा कमी आहे, ते वाहन Light motor vehicle, ज्या वाहनाचे वजन १२००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे, ते वाहन Heavy goods vehicle व ७५०० ते १२००० किलोग्रॅम या दरम्यान वजन असलेले वाहन हे Medium goods vehicle या प्रकारामध्ये वर्ग केले आहे. असे वर्गीकरण करताना सदर वाहनाचे नेमके कोणते वजन ग्राहय धरावयाचे हेही सदर व्याख्येमध्ये नमूद केले आहे. त्यामध्ये Unladen weight व gross vehicle weight हे कधी ग्राहय मानायचे हे वाहनाच्या प्रकारानुसार व्याख्येमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे. एखादे वाहन Transport vehicle या प्रकारातील असेल, तर सदर वाहनाचे gross vehicle weight विचारात घेणे आवश्यक ठरते. तक्रारअर्जातील वाहनाचा प्रकार हा Transport vehicle या प्रकारात येत असल्याने सदर वाहनाचे gross vehicle weight विचारात घेणे गरजेचे आहे. सदर वाहनाचे gross vehicle weight हे ९६०० किलोग्रॅम इतके आहे. त्यामुळे सदरचे वाहन हे Light motor vehicle या प्रकारामध्ये निश्चितच मोडत नाही. तक्रारदार यांनी याकामी वाहन चालक समाधान तुकाराम पडोळे यांच्या लायसेन्सची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. सदरच्या लायसेन्स कोणकोणते वाहन चालविण्यास वैध आहे ही बाब स्पष्टपणे निदर्शनास येत नसलेमुळे नि.१ वर आदेश करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यांचेतर्फे माहितगार इसम यांना साक्षीसमन्स काढण्यात आले त्याप्रमाणे नि.२३ वर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपला अहवाल दाखल केला आहे. सदर अहवालावरुन सदरच्या वाहनचालकास ट्रान्स्पोर्ट वाहन चालविणेचा परवाना दि.२०/९/२००८ रोजी देणेत आला आहे ही बाब स्पष्ट झाली आहे.
७. तक्रारदाराचे वाहनाचा अपघात दि.२४/१०/२००८ रोजी झाला आहे. सदर अपघाताचे वेळेस नेमके वाहन कोण चालवित होते याबाबत तक्रारदार यांनी तक्रारअर्जात कोणतीही गोष्ट नमूद केलेली नाही. अपघाताचे वेळेस सदरचे वाहन हे समाधान तुकाराम पडोळे चालवित होते असे तक्रारदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेले नाही. केवळ समाधान पडोळे यांचे वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत दाखल केली आहे व सदरची प्रत जाबदार यांनाही दिली असल्याचे दिसून येते. सदर अपघाताबाबतचा अन्य कोणताही पुरावा याकामी दाखल नाही. अपघाताची नोंद पोलिस स्टेशनला करण्यात आली का ? याबाबत तक्रारअर्जामध्ये कोणतेही भाष्य नाही. तक्रारदार यांनी नि.१४ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. सदर प्रतिउत्तराच्या परिच्छेद २ मध्ये सदर वाहनाचा अपघात ब्रेकफेल झाले कारणाने झाला आहे. अर्जदारने त्याचे वाहन योग्य ती सर्व काळजी घेवून चालवित होता असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी प्रतिउत्तरामध्ये सदरचे वाहन तक्रारदार हे योग्य काळजी घेवून चालवित होते, असे शपथपत्रावर नमूद केले आहे. सदर प्रतिउत्तरामध्ये तक्रारदार यांनी त्यांचा व्यवसाय ड्रायव्हर असा नमूद केला आहे. तक्रारदार यांचे तक्रारअर्जामधील कथनावरुन व प्रतिउत्तरातील कथनावरुन सदरचे वाहन नेमके कोण चालवत होते याबाबत साशंकता निर्माण होते. तक्रारदार यांनी याबाबत कोणताही सबळ पुरावा मंचासमोर आणलेला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १५/१०/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११