Maharashtra

Aurangabad

CC/12/405

Satyaprabha Upendra Astpure - Complainant(s)

Versus

The new India Assurance Co ltd,Through its Divisional Manager - Opp.Party(s)

Adv R B Bagul

06 Jan 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

_____________________________________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-405/2012          

तक्रार दाखल तारीख :-25/10/2012

निकाल तारीख :- 06/01/2015

______________________________________________________________________________________________________________________

  श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                 श्री.के.आर.ठोले,सदस्‍य

____________________________________________________________________________________________________________________

                                                                                                                                                                                                                                

सत्‍यभामा उपेन्‍द्र अष्‍टपुत्रे,

रा. प्‍लॉट नं.15561,53 व्‍यंकटेश नगर,

उल्‍कानगरी, सावरकर मार्ग, औरंगाबाद      ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

1.   दि न्‍यू इंडिया एश्‍युरन्‍स कंपनी लि.,

     मार्फत-विभागीय व्‍यवस्‍थापक, अधिकृत सहीकरणार,

     विभागीय ऑफिस क्रं.1, अजय इंजि. वर्क्‍स कंपाऊंड,

     अदालत रोड, औरंगाबाद                        ………गैरअर्जदार                                 

______________________________________________________________________________________________________________________

तक्रारदारातर्फे  – अॅड. आर.बी.बागुल

गैरअर्जदारातर्फे  – अॅड. एन.जी.माळी

______________________________________________________________________________________________________________________

निकाल

      (घोषित द्वारा श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

          तक्रारदारास अमेरिका  येथील Seattle या ठिकाणी जायचे होते. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांच्या कडून ‘Overseas Mediclaim Policy’  रु.8134/- प्रीमियम भरून दि.22 मार्च 2011 रोजी घेतली. तक्रारदाराचे दि.13 मार्च 2011 ते 2 जून 2011 या कालावधीत अमेरिकेत वास्तव होते. त्या कालावधीत तक्रारदारास तेथील पावसाळी व थंड हवामानामुळे खोकल्याचा त्रास सुरू झाला. तक्रारदाराचे पती देखील त्यांच्या समवेत प्रवास करत होते. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी काही औषधे तक्रारदारास दिली. त्या औषधाने काही काळ  त्रास थांबला, परंतु औषधे संपल्यानंतर गंभीर स्वरुपात खोकला  सुरू झाला. त्याबरोबर ताप, अशक्तपणा, वजन कमी होणे आणि nausea ई. त्रास सुरू झाले. त्यामुळे आवश्यक तपासण्या करून पुढील उपचार करण्याच्या दृष्टीने तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांच्या सोबत tie up असलेल्या अमेरिका स्थित कंपनीशी संपर्क करून डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेण्याबाबत विनंती केली. तेथील कंपनीने तक्रारदारास कळवले की त्यांनी दि.17 मे 2011 रोजी आवश्यक कागदपत्रांसह त्यांनी डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेण्यासाठी अर्ज केला आहे . दि. 20 मे 2011 रोजी आणखी काही कागदपत्रे मागवली, तक्रारदाराने ती कागदपत्रे fax द्वारा पाठवली. परंतु तेथील कंपनीने अपॉईंटमेंट विषयी तक्रारदारास काहीही कळवले नाही. सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर देखील अपॉईंटमेंट मिळाली नाही. तक्रारदार आजारी असल्यामुळे ती अमेरिकेतील वास्तव्याचा आनंद उपभोगू शकली नाही. तक्रारदार अमेरिकेहून दि.2 जून 2011 रोजी भारतात परतली. त्यानंतर दि.6 जून 2011 रोजी  तक्रारदाराच्या अमेरिका स्थित मुलाला त्या विमा कंपनीकडून डॉक्टरची  अपॉईंटमेंट मिळाल्याचा कॉल आला. अशा रीतीने गैरअर्जदार क्रं 1 व  ज्या कंपनीसोबत त्यांचे tie up होते त्या कंपनीने तक्रारदारास सेवेमध्ये त्रुटी दिली आहे. त्यामुळे तक्रारदाराने नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.

 

          गैरअर्जदार क्रं 1 याने त्याचा लेखी जवाब नोंदवला. त्यांनी काही प्राथमिक मुदद्ये कबुल केले आहेत व इतर मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराने स्वतः कबुल केलेले आहे की,  गैरअर्जदार क्रं 1 यांचे ज्या कंपनीसोबत tie up आहे त्या  अमेरिका स्थित कंपनीने दि.6 जून 2011 रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली होती. तक्रारदाराने proposal form वर सही करण्याआधी ते पुर्णपणे वाचून समजून घेतले आहे. तक्रारदारास ज्या वेळी त्रास झाला त्यावेळेस त्यांनी तेथील स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे होते. तो खर्च विमा कंपनीकडे  क्लेम दाखल करून reimburse करणे योग्य होते. विमा पॉलिसीच्या कलम A मध्ये ‘nature of coverage’ मध्ये या बाबीं नमूद केलेल्या आहेत. परंतु तक्रारदाराने तिथे उपचार घेतल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदाराने प्रस्तुत गैरअर्जदार विमा कंपनीसोबत केलेला करार        ‘contract of indemnity’ आहे, त्यानुसार विमा पॉलिसीच्या schedule नुसार भरपाई मिळेल . त्यात प्रवासाचा खर्च देण्याची तरतूद नाही. या सर्व कारणांमुळे  गैरअर्जदाराने तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.

 

          आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराचे तक्रार, गैरअर्जदाराचा युक्तिवाद आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.

          तक्रारदाराने पुढील कागदपत्रांच्या  प्रती दाखल केल्या आहेत :- पॉलिसीची प्रत, डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेण्यासाठी केलेला विनंती अर्ज व  तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांना दिलेली कायदेशीर नोटिस.

 

          गैरअर्जदाराने पुढील कागद पत्रांच्या प्रती दाखल केल्या  आहेत:- overseas mediclaim policy विषयी माहिती व  त्या पॉलिसी च्या नियमांची माहिती असलेली पुस्तिका.

 

          तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून दि.22/3/11 रोजी OVERSEAS MEDICLAIM BUSINESS AND HOLIDAY POLICY (HOSPITALISATION BENEFIT POLICY) घेतली व त्यासाठी रु. 8134/- चा प्रीमियम भरला. पॉलिसीचा कालावधी दि. 30 मार्च 2011 ते 12 जून 2011 पर्यंतचा आहे.

 

          तक्रारदाराच्या अमेरिका येथील वास्तव्यात त्यांना प्रकृती बरी नसल्यामुळे अतिशय त्रास झाला. गैरअर्जदार क्रं 1 यांना  कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची असेल तर CORIS ( गैरअर्जदार क्रं यांच्या सोबत tie up असेली अमेरिका स्थित  कंपनी) यांच्या मार्फत अपॉईंटमेंट घेऊन मग घ्यावी, असे त्यांना फोनवर सांगण्यात आले . त्यामुळे  त्यांनी CORIS ला अनेक वेळा संपर्क केला आणि सर्व  कागदपत्रे पाठवली परंतु  त्यांनी डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली नाही. तक्रारदार अमेरिकेहून भारतात परत आल्यानंतर त्यांच्या मुलाला डॉक्टरांची अपॉईंटमेंट  मिळाल्याचा CORIS कंपनीकडून फोन आला.

 

         तक्रारदाराने  सदर पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी  गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. तक्रारदाराने कोणत्या तारखेस दावा दाखल केला याचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही. परंतु गैरअर्जदार क्रं 1 यांच्या दि.29/11/12 च्या  पत्रावरून असे दिसून येते की, तक्रारदाराने दावा दाखल केल्यानंतर त्यांना पुढील कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले होते :- 1. Claim form 1. Copy of e –tickets 3. Copy of passport 4. Original insurance policy 5. Original medical reports 6. Original medical bills and payment receipts . तक्रारदाराने अमेरिकेत  कोणत्याही डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतली नाही असे तक्रारीत म्हटलेले आहे. त्यामुळे मेडिकल रिपोर्ट्स आणि मेडिकल बिल्स भरल्याच्या पावत्या त्यांनी दाखल केलेल्या नाहीत. 

  

          तक्रारदाराची प्रकृती अस्वस्थ असल्याचे कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल केलेले नाहीत. गैरअर्जदार क्रं 1 यांनी तक्रारदारास मेडिकल रिपोर्ट्स आणि मेडिकल बिल्स दाखल करण्याविषयी संगितले होते. परंतु तक्रारदाराने USA मध्ये ट्रीटमेंट घेतल्याचा आणि घेतलेल्या  औषधांच्या पावत्या उपलब्ध नाहीत. इतकेच काय , त्यांच्या कोणत्याही तपासण्या झाल्याचा देखील पुरावा नाही. केवळ फोन केल्याच्या रेकॉर्ड वरुन आणि तक्रारदाराच्या तोंडी कथनावर विश्वास ठेऊन  त्यांना नुकसान भरपाई मिळणे अशक्य आहे. तक्रारदाराच्या USA येथील वास्तव्यामध्ये त्यांचे प्रकृती खरोखर जर अस्वस्थ असली असती तर तेथील डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊन ती रक्कम नुकसान भरपाईचा म्हणून reimburse करता आली  असती . परंतु तक्रारदारांनी त्या संदर्भात कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार सदर विमा पॉलिसी च्या नियमांनुसार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.

 

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
  2. खर्चाबद्दल आदेश नाही.

               

 

     (श्रीमती संध्‍या बारलिंगे)                                    (श्री.किरण.आर.ठोले)                           (श्री.के.एन.तुंगार)

सदस्‍या                                                                 सदस्‍य                                      अध्‍यक्ष

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.