Maharashtra

Nanded

CC/08/186

Vinod Sadashivrao Mathapati - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co Ltd - Opp.Party(s)

28 Aug 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/186
1. Vinod Sadashivrao Mathapati R/o Geeta nagar, NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. The New India Assurance Co Ltd Lahoti complex, NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 28 Aug 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नंदेड
 
प्रकरण क्र.186/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  22/05/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 28/08/2008.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे.     अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते.           सदस्‍य.
 
श्री.विनोद पि.सदाशीवराव मठपती,                            अर्जदार.
वय वर्षे 22, व्‍यवसाय व्‍यापार,
रा.गीतानगर, नांदेड.
जि.नांदेड.
 
विरुध्‍द.
 
विभागीय व्‍यवस्‍थापक,                                 गैरअर्जदार.
दि.न्‍यु.इंडिया अशुरन्‍स कंपनी लि,
विभागीय कार्यालय,लाहोटी कॉम्‍प्‍लेक्‍स,वजीराबाद,
 नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.        - अड.आर.एम.कनकदंडे.
गैरअर्जदारा तर्फे      - अड.शामराव राहेरकर.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
     यातील अर्जदार यांची थोडक्‍यात तक्रारी अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्‍यांचे ऑटोरिक्षा क्र. एम.एच-26/एच-1532 चा विमा क्र.160900/31/05/01/00004218 दि.03/03/2006 ते 02/03/2007 या कालावधी करीता उतरविलेला होता. दि.18/05/2006 रोजी भोकर भैंसा रोडवर त्‍यांच्‍या ऑटोरिक्षाचा अपघात झाला व ऑटोरीक्षा खराब झाला. सदर घटनेची सुचना विमा कंपनीला देण्‍यात आली त्‍यांनी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली. सर्व्‍हेअर यांनी घटनास्‍थळाची पाहणी केली व अहवाल विमा कंपनीकडे दिला.  सदरील अपघातानंतर अर्जदार यांना श्री.गुरुगोविंदसिंह मेमोरीयल हॉस्‍पीटल नांदेड येथे दि.18/05/2006 ते 24/05/2006 या कालावधीमध्‍ये उपचार केला नंतर त्‍यांना डॉ.खुर्साळे यांच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये शेरीक करण्‍यात आले तेव्‍हा अर्जदाराचे डाव्‍या पायाचे हाड मोडल्‍याने तेथे शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. अर्जदारास सदरील उपचार व इतर नुकसानी रु.7,88,546/- एवढा आला. अर्जदारास अपघाती अंपगत्‍व, भविष्‍यातील उत्‍पन्‍नाचा हास कायमचे अंपगत्‍व, व्‍यंगत्‍व, शारीरिक त्रास,परावलंबी जीवन या करीता रु.4,00,000/- त्‍यावर 18 टक्‍के व्‍याजासह मिळावे. सदर वाहनाचा अर्जदार हा मालक आहे व त्‍याचा वाहन चालक परवाना आहे. विमा कंपनीकडे अर्जदार यांनी क्‍लेमची मागणी केली मात्र विमा कंपनीने नाकरली किंवा नामंजुर केली नाही आणि असे सांगीतले की, जेव्‍हा नांदेड येथील न्‍यायालयातील अपघाताच्‍या दाव्‍याचा निकाल लागेल त्‍यावेळेस विचार करण्‍यात येईल. विमा कंपनीने क्‍लेम न देऊन सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली म्‍हणुन अर्जदार यांनी ही तक्रार दाखल करुन रु.4,00,000/- नुकसान भरपाई पोटी व्‍याजासह देण्‍याची विनंती केली आहे.
     यात गैरअर्जदार विमा कंपनीला नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला, त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराची तक्रारी ही अपरीपक्‍व आहे. अर्जदाराने वैयक्तिक अपघाता बाबत कोणताही दावा दाखल केलेला नाही. विमा कंपनीने अर्जदाराला पिक अप ऑटो रिक्षा क्र.एमएच-26/एच-1532 चा विमा पॉलिसी दिलेली आहे जी अटी व शर्तीच्‍या आधीन आहे. सदरील ऑटो हा माल वाहतुक वाहन आहे. ज्‍यावेळी अपघात झाला असेल त्‍यावेळी वाहन चालकाकडे योग्‍य वाहन परवाना असायला पाहीजे. अपघता झाला त्‍यावेळी वाहन चालकाककडे लाईट मोटार वाहनाचा परवाना ज्‍यावर नॉन ट्रान्‍सपोर्ट असा शेरा होता, वाहतुकीसाठी असा शेरा नव्‍हता. अर्जदाराकडे योग्‍य व कायदेशिर वाहतुकीचा परवाना नसल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी प्रमाणे अर्जदाराने शर्तीचा भंग केला. म्‍हणुन अर्जदार कोणतीही नुकसानीची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही. अर्जदाराला कोणतेही अपंगत्‍व आलेले नाही त्‍यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. विमा कंपनीने, अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.
     अर्जदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जा सोबत शपथपत्र,अपघातीची फिर्यादीची प्रत,घटनास्‍थ पंचनाम्‍याची प्रत,विमा पॉलिसी, दवाखान्‍याचे प्रवेशपत्र, हॉस्‍पीटलचे बिले इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी आपल्‍या जबाबासोबत शपथपत्र दाखल केले त्‍यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही.
     अर्जदारा तर्फे वकील श्री.एम.एम.कनकदंडे आणि गैरअर्जदारा तर्फे वकील एस.व्‍ही.राहेरकर यांनी युक्‍तीवाद केला.
     मुद्ये.                                           उत्‍तर.
1.   अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे काय?                                 होय.
2.   गैरअर्जदार हे अर्जदारास सेवा देणेमध्‍ये कमतरता केली
          आहे काय?                                                                                    नाही.
3.   काय आदेश?                                                     अंतीम आदेशा प्रमाणे.
                            कारणे
मुद्या क्र. 1
     अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे एमएच-26/एच-1532 या वाहनाचा विमा उतरविलेला होता ही बाब अर्जदारांनी दाखल केलेल्‍या विमा पॉलिसीवरुन स्‍पष्‍ट होत आहे. गैरअर्जदार यांनी या बाबातचा मजकुर त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपत्रामध्‍ये नाकारलेले नाही, याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे.
मुद्या क्र. 2
     अर्जदार यांच्‍या वाहनाचा दि.18/05/2006 रोजी अपघात झाल्‍यानंतर अर्जदार यांनी विमा क्‍लेची मौखीक मागणी गैरअर्जदार यांचे कडे केलेली होती परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदरच्‍या क्‍लेमची रक्‍कम दिलेली नाही, असे अर्जदारांनी त्‍यांच्‍या अर्जामध्‍ये नमुद केलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार हे सदर वाहनाचा अपघात झाल्‍यानंतर गैरअर्जदार यांचेकडे विमा क्‍लेमची मागाणी केलेली नाही. त्‍यामुळे अर्जदार यांचा विमा क्‍लेम गैरअर्जदारांनी नाकारलेली नाही. अशा परिस्थितीत अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्‍यात यावा, तो अपरिपक्‍व (Pre-matured) असा आहे, असे म्‍हटलेले आहे. गैरअर्जदारांनी म्‍हणणे दाखल केल्‍यानंतर अर्जदार यांनी त्‍यांचे प्रतीउत्‍तर दाखल केलेले नाही अगर गैरअर्जदाराचे म्‍हणण्‍यामधील मजकुर नाकारलेले नाही अगर इतर कोणताही पुरावा शपथपत्र या कामी दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा क्‍लेमची मागणी योग्‍य त्‍या कागदपत्रासह केलेली होती असे दर्शविणारे कोणतेही सकृतदर्शनी पुरावा अर्जदाराने या अर्जासोबत यामंचामध्‍ये दाखल केलेले नाही. व युक्‍तीवादाच्‍या वेळी अर्जदारांच्‍या वकीलांना त्‍याबाबत विचारणा केली असता, अर्जदार यांना विचारुन असे कागद दाखल करतो असे सांगण्‍यात आले होते. परंतु आज अखेर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा क्‍लेमची मागणी योग्‍य त्‍या कागदपत्रासह केलेली होती हे दर्शवीणारे कागदपत्रदाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे त्‍या अनुषंगाने अर्जदार यांनी विमा क्‍लेमची मागणी केलेली नसेल तर अशा परिस्थितीत अर्जदाराचा विमा क्‍लेम नाकारुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्‍ये कमतरता केलेली आहे, असे अर्जदारांना म्‍हणता येत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही ही बाब अर्जदार हे शाबीत करु शकलेले नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या अर्जातील कथनास कोणताही अर्थ उरत नाही. सेवेत कमतरता होण्‍यासाठी प्रथम सेवेची उपलब्‍धता अगर मागणी करणे कायदयानुसार गरजेचे आहे.
     गैरअर्जदार यांनी युक्‍तीवादाच्‍या वेळी 2005 (1) सी.पी.आर.439, Insight /diagnostic and Oncological Research Institute pvt.Ltd. v/s Divisional Manager, New India Assurance co.Ltd.
          Where insured/complainant/failed to provide particulars reguired by insurance company in terms of the policy to settle the claim, complaint could not be said to establish deficiency in service on the part of the insurance company.
     वरील वरीष्‍ठ कोर्टाच्‍या निकालाप्रमाणे अर्जदार हे गैरअर्जदार यांनी सेवा देणेमध्‍ये कमतरता केली ही बाब शाबीत करु शकले नाही.
     अर्जदाराचा अर्ज त्‍यांचे शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र त्‍यांच्‍या वकीलांनी केलेला युक्‍तीवाद, गैरअर्जदार यांचे म्‍हणणे त्‍यांचे शपथपत्र त्‍यांचे तर्फे वकीला केलेला युक्‍तीवाद त्‍यांनी दाखल केलेले वरीष्‍ठ कोर्टाचा निकाल याचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                               आदेश.
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्‍यात येतो.
2.   दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.   पक्षकारांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
(श्री.विजयसिंह राणे)       (श्रीमती.सुजाता पाटणकर)         (श्री.सतीश सामते)       
           अध्यक्ष.                        सदस्या                               सदस्
 
 
 
गो.प.निलमवार,
लघुलेखक.