Maharashtra

Nagpur

CC/544/2015

Rajesh Kanhaiyalal Kanungo - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co Ltd - Opp.Party(s)

Sachin R. Gupta

30 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/544/2015
( Date of Filing : 28 Sep 2015 )
 
1. Rajesh Kanhaiyalal Kanungo
R/o 1135,Tulsi Bhawan Central Avenue Nagpur 440002.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co Ltd
New India Assurance Building 87 M. G. Road Fort Mumbai
Mumbai
Maharashtra
2. The New India Assurance Co Ltd
Shriram Shyam Tower 5th Floor S. V. Patel Marg Kimgsway Near NIT Building Sadar Nagpur 440001.
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Sachin R. Gupta , Advocate
For the Opp. Party: Adv. Ms. Bhatia, Advocate
Dated : 30 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍याचा स्‍वतःच्‍या उपजीविकेकरिता वाहतूकिचा  व्‍यवसाय आहे आणि त्‍याच्‍याजवळ स्‍वतःचे  Model Tata Motor /LPK3118 Tipper हे कमर्शिअल वाहन असून त्‍याचा RTO क्रं. MH 34- M-8400 , Chassis No. 396522ERZ212884, Engine No. 80E62675884 असा आहे. तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या वाहनाचा विरुध्‍द पक्षाकडे विमा पॉलिसी क्रं. 16010031140100002445  अन्‍वये दि. 04.06.2014 रोजी सकाळी 12.00.01  ते दि. 03.06.2015 च्‍या रात्री 11.59.59 पर्यंतच्‍या कालावधीकरिता रुपये 14,00,000/- एवढया किंमतीचा विमा उतरविला होता व त्‍यापोटी विमा हप्‍ता म्‍हणून रुपये 23,542/- भरला होता. तक्रारकर्त्‍याने दि. 03.10.2014 ला मधुर टायर्स यांच्‍याकडून टॅक्‍स इन्‍व्‍हाईस नं. 2014-15/020 अन्‍वये 11 नविन टायर एकूण रुपये 3,25,462/- एवढया किंमतीत विकत घेतले होते व त्‍याच्‍या वाहनातील जुन टायर बदलून नविन टायर बसविले होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या ग्राहकाला डोलोमाईट द्यावयाचे होते. याकरिता तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा ड्रायव्‍हर देवेंद्र ओसाराम यादव यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या सूचनेनुसार दि. 20.10.2014 ला मेसर्स विदर्भ मिनरल्‍स किल्‍लोड येथून डोलोमाईट सनफ्लॅग इंडस्‍ट्रीज भंडारा येथे वाहून नेण्‍याकरिता वाहन ताब्‍यात घेतले. परंतु जेव्‍हा तक्रारकर्त्‍याचे सुपरवायझर मुन्‍ना चंद्रभान भोयर याने दुपारी 1.00 वाजता विदर्भ मिनरल्‍स यांना माल भरल्‍याबाबत चौकशी केली असता विदर्भ मिनरल्‍स यांनी सदर वाहन अद्याप माल भरण्‍याकरिता पोहचले नसल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे सुपरवायझर मुन्‍ना भोयर यांनी तक्रारकर्त्‍याचे वाहन चालक देवेंद्र यादव याच्‍या मोबाईलवर संपर्क साधला असता वाहन चालक देवेंद्र यादव याचे  दोन्‍ही मोबाईल बंद असल्‍याचे आढळले. सदर वाहनामध्‍ये जी.पी.आर.एस. सिस्‍टीम स्‍थापित केलेली होती,  त्‍याद्वारे वाहनाचा शोध घेतला असता सदर वाहन विनोबा भावे नगर जवळ आढळले. सुपरवायझरने कोणताही वेळ न घालविता इतर   कर्मचा-यानां सोबत घेऊन जिथे वाहन आढळले तिथे गेले आणि त्‍यांना वादग्रस्‍त  (टाकलेले वाहन) सोडून दिलेले वाहन विनोबा भावे नगर, मज्जिद जवळ राजा चौक, नागपूर येथे मिळाले व त्‍यावेळी असे लक्षात आले की,  सदर वाहनाचे 10 नविन टायर व एक वाहनाची स्‍टेफनी डिस्‍कसह चोरी गेलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे सुपरवायझर मुन्‍ना भोयर यांनी दि. 21.10.2014 ला यशोधरा नगर, पोलिस स्‍टेशन नागपूर येथे सदर वाहनाचे ड्रायव्‍हर देवेंद्र यादव याच्‍या विरुध्‍द आय.पी.सी.च्‍या कलम 408 अंतर्गत एफ.आय.आर.नं. 291/2014 अन्‍वये गुन्‍हा दाखल केला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि. 28.10.2014 ला  विरुध्‍द पक्षाकडे वाहनाचे ट्रकचे 11 टायर आणि वाहनाची एक डिस्‍क चोरीबाबतचा विमा दावा प्रस्‍ताव सादर केला व त्‍यासोबत वाहनाचे 11 टायरची निविदा रुपये 3,25,600/- आणि दुरुस्‍ती रक्‍कम रुपये 85,634/- सादर केली. विरुध्‍द पक्षाने नेमलेल्‍या व्‍यक्‍तीने वाहनाची तपासणी केली व अहवाल सादर केला.
  3.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयाला जाऊन अनेक वेळा विमा दावा मंजूर करण्‍याबाबत विनंती केली. दि. 12.02.2015 ला विरुध्‍द पक्षाकडून तक्रारकर्त्‍याला पत्र प्राप्‍त झाले व त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याची विमा मागणी Criminal Breach of Trust is out of Scope of the policy  या आधारावर नाकारण्‍यात आली असल्‍याचे नमूद होते. त्‍यामुळे दि. 10.05.2015 ला तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने  दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
  4.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रक्‍कम रुपये 6,71,208/-, 18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली.
  5.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने आपल्‍या लेखी जवाबात असे नमूद केले की, सदरची  तक्रार तक्रारकर्त्‍याचे वाहन चालक यांनी वाहनाचे टायर चोरल्‍याबाबतची आहे. त्‍याबाबतची चार्जशिट तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केली आहे. चार्जशिटचे अवलोकन केले असता असे दिसून येते की,  IPC च्‍या कलम 408 अंतर्गत अपराध्‍यावर / ड्रायव्‍हर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून Which is criminal breach of trust and not theft कमर्शिअल वाहनाचे पॉलिसच्‍या शर्ती व अटी दर्शविते की, Criminal Breach of Trust is out of Scope of the policy  . पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ता हा विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या तक्रारीचे, दस्‍तऐवजाची तपासणी केली असता तक्रारकर्त्‍याचे वाहन चालक हा चोरीच्‍या गुन्‍हयात गुंतला आहे आणि त्‍याच्‍या विरुध्‍द IPC च्‍या कलम 408 अंतर्गत गुन्‍हा दाखल असून सदरची बाब पॉलिसीच्‍या शर्ती व अटीच्‍या अंतर्गत येत नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍यामुळे सदरची घडलेली घटना चोरीच्‍या Purview  मध्‍ये येत नाही. तसेच मोटर वाहन जोपर्यंत क्षतिग्रस्‍त किंवा चोरी होत नाही तो पर्यंत विमा कंपनी क्षतिग्रस्‍त चोरीला गेलेल्‍या टायरची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नसते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन कुठलीही दोषपूर्ण सेवा केलेली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर करण्‍या योग्‍य नसल्‍याने प्रस्‍तुत  तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.  
  6.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           नाही

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच्‍या उपजीविकेकरिता त्‍याचे वापरात असलेला Model Tata Motor /LPK3118 Tipper, RTO No. MH34-M-8400, या कमर्शिअल वाहनाचा विरुध्‍द पक्षाकडे विमा पॉलिसी क्रं. 16010031140100002445  अन्‍वये दि. 04.06.2014 रोजी सकाळी 12.00.01 सेकंद ते दि. 03.06.2015 च्‍या रात्री 11.59.59 से. पर्यंतच्‍या कालावधीकरिता रुपये 14,00,000/- एवढया किंमतीचा विमा उतरविला होता व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याने रुपये 23,542/- चा विमा हप्‍ता भरला होता हे दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने  दि. 03.10.2014 ला मधुर टायर्स यांच्‍याकडून टॅक्‍स इन्‍व्‍हाईस नं. -2014-2015 /020 अन्‍वये 11 नविन टायर एकूण रक्‍कम रुपये 3,25,462/- एवढया किंमतीत विकत घेतले होते व त्‍याच्‍या वाहनातील जुन टायर बदलून नविन टायर बसविले होते. तक्रारकर्त्‍याचे वाहन दि. 20.10.2014 ला मेसर्स विदर्भ मिनरल्‍स किल्‍लोड येथून डोलोमाईट सनफ्लॅग इंडस्‍ट्रीज येथे वाहून नेण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन चाल‍क देवेंद्र ओसाराम यादव यांना सांगितले व त्‍याप्रमाणे चालक याने वाहन ताब्‍यात घेतले. परंतु तक्रारकर्त्‍याचे वाहन दि. 20.10.2014 ला चोरीला गेले त्‍या अनुषंगाने तक्रारकर्त्‍याच्‍या सुपरवायझरने वाहनाचा शोध घेतला असता चोरीला गेलेले वाहन विनोबा भावे नगर जवळ आढळले. त्‍यावेळी ट्रकचे 10 नविन टायर व एक वाहन स्‍टेफनी डिस्‍कसह चोरीला गेल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या सुपरवायझरने दि. 21.10.2014 रोजी यशोधरा नगर पोलिस स्‍टेशन नागपूर यांच्‍याकडे वाहनाचे ड्रायव्‍हर देवेंद्र ओसाराम यादव याच्‍या विरुध्‍द IPC च्‍या कलम 408 अंतर्गत एफ.आय.आर. क्रं. 291/2014 अंतर्गत गुन्‍हा दाखल केला होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 28.10.2014 ला वाहनाचे टायर चोरी झाल्‍याबाबत विमा दावा मागणी प्रस्‍ताव सादर केला व त्‍यासोबत आवश्‍यक दस्‍तऐवज सादर केले. विरुध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या कंपनीच्‍या व्‍यक्‍तीची वाहनाच्‍या तपासणीकरिता नेमणूक केली व त्‍यांनी वाहनाची तपासणी करुन अहवाल सादर केला. विमा कंपनीने विमाधारकाचा विमा दावा प्रस्‍ताव Criminal Breach of Trust is out of Scope of the policy  या आधारावर नाकारलेला असल्‍याचे दिसून येते.
  2.      तक्रारकर्त्‍याचा वाहन चालक देवेंद्र यादव हा टायर चोरीच्‍या गुन्‍हयात गुंतला आहे व पोलिस अधिका-यांनी मा. प्रथम श्रेणी दंडाधिकारी, कोर्ट नं. 7, नागपूर यांच्‍याकडे दाखल केलेल्‍या अंतिम अहवाल नमुन्‍याचे अवलोकन केल्‍यावर असे दिसून येते की, सदर गुन्‍हयातील तपासात आरोपी अशपाक अली व लियाकत अली राह. संजय बाग कॉलनी नागपूर हे गुन्‍हेगार निष्‍पन्‍न झाले आहेत व वाहन चालक देवेंद्र यादव हा फरार आहे. आरोपीकडून रुपये 1,20,000/- किंमतीचे ट्रकचे टायर व 6 नग लोखंडी डिस्‍क जप्‍त करण्‍यात आले व ते पोलिसांच्‍या ताब्‍यात आहे. विमा पॉलिसीचे अट नुसार मोटर वाहन जोपर्यंत क्षतिग्रस्‍त किंवा चोरी होत नाही तो पर्यंत विमा कंपनी क्षतिग्रस्‍त किंवा चोरीला गेलेल्‍या टायरची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नसते. Commercial Vehicle Policy package अंतर्गत

The Company shall not be liable to make any payment in respect of :

  1. Consequential loss, depreciation, wear and tear mechanical or electrical breakdowns failures or breakages nor for damage caused by overloading or strain of the Motor vehicle nor for loss of or damage to accessories by burgulary housebreaking or theft unless such Motor Vehicle is stolen at the same time.

त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विमा पॉलिसीच्‍या स्‍कोप अंतर्गत येत नसल्‍याच्‍या कारणाने नाकारण्‍यात आला असल्‍याचे दिसून येते. तसेच विरुध्‍द पक्षाने आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी Zuber Transport Sohaibbhai Unusbhai Vohra VS. Reliance General Insurance Co. यांनी रिव्‍हीजन पिटीशन क्रं. 1449/2012 दि. 28.02.2012 अन्‍वये दिलेल्‍या प्रकरणातील  न्‍यायनिवाडा हा सदरच्‍या प्रकरणाशी तंतोतंत जुळत असल्‍याचे दिसून येते.

                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.