निकालपत्र :- (दि.30/11/2010) (सौ.प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार यांचा छोटया प्रमाणावर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याच्यावर त्यांची उपजिवीका अवलंबून आहे. सदर व्यवसायासाठी तक्रारदार यांना अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक क्र.KA-35-7417 विकत घेतला व सदर ट्रकचा सामनेवाला विमा कंपनीकडून विमा उतरवला. सदर पॉलीसीचा क्र.151104/31/06/01/00000418 असून सदर पॉलीसी मुदत दि.22/04/2006 ते 21/04/200 पर्यंत होती. तक्रारदाराने दि;03/05/2006 रोजी RTO हॉस्पेट येथे रु.850/- भरुन परमिट घेण्यासाठी अर्ज दिला. सदर ऑफिसने तक्रारदारांना दि.28/05/2006 रोजी वाहन घेऊन इन्स्पेक्शनसाठी येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.28/05/2006 रोजी सदरहू वाहन RTO हॉस्पेट यांच्याकडे तपासणीसाठी नेले. तेथून परत येत असताना तक्रारदाराच्या वाहनाला अपघात झाला व त्याच्या दुरुस्तीसाठी तक्रारदारास सुमारे रु.80,000/- खर्च आला. ज्यावेळी अपघात झाला. त्यावेळी सदरहू वाहन पूर्णपणे रिकामे होते. तसेच वाहनाला फिटनेस सर्टीफिकेटही मिळाले होते. सदर घटनेची माहिती तक्रारदाराने सामनेवाला यांना दिली व Own Damages साठी क्लेम दाखल केला. ब) सर्व्हेअरने सदर अपघाताचा सर्व्हे करुन रक्कम रु.64,000/- चा अंदाज दिला व त्यानंतर दि.01/07/008 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून अधिकृत परमिट दाखल करण्यास सांगितले. तक्रारदाराने दि.13/0/2008 रोजीच सामनेवाला विमा कंपनीला पत्र पाठवून वरीलप्रमाणे सर्व माहिती कळवली. त्यानंतर सामनेवालाने दि.18/02/008 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून अपघाताच्या दिवशी तक्रारदाराकडे अधिकृत परमिट नसल्याचे कारण दाखवून तक्रारदाराचा न्याय क्लेम नामंजूर केला. तक्रारदाराने परमिटसाठी RTO कडे रक्कम भरुन तपासणीसाठी वाहन नेऊन परत येत असताना तक्रारदाराच्या वाहनाला अपघात झाला. त्यावेळी वाहन पूर्ण रिकामे होते ही सर्व वस्तुस्थिती तक्रारदाराने सामनेवालांना सविस्तर कळवूनही सामनेवालाने कुठलेही संयुक्तिक कारण नसताना तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम सामनेवालाने बेजबाबदारपणे व अन्यायाने नामंजूर केला आहे ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने मा. मंचासमोर प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्या म्हणून विनंती केली आहे.सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमप्रमाणे रक्कम रु.80,000/- दि.18/12/008 पासून 18 % व्याजासह दयावेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना अधिकृत परमिट दाखल करणेकरिता पाठविलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना अपघाताच्या वेळी वाहन रिकामे असलेबाबतचे पाठविलेले पत्र, परमिट दाखल करणेबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठविलेले स्मरणपत्र, क्लेम नाकारलेचे सामनेवाला यांचे पत्र, परमिट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (03) सामनेवाला यांनी आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे; परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या कथनात पुढे असे म्हणतात की, सामनेवालांना तक्रारदाराच्या क्लेमबाबत निर्णय घेण्यास काही कागदपत्र अत्यावश्यक होते. परंतु तक्रारदाराच्या स्वत:च्याच कथनावरुन असे स्पष्ट होते की तक्रारदाराकडे अपघाताच्यावेळी दि.28/5/006 रोजी अधिकृत परवाना नव्हता. तक्रारदाराचे वाहन हे Heavy Duty Vehicle असल्यामुळे ते भरलेल्या किंवा रिकाम्या कशाही अवस्थेत असले तरी ते रस्त्यावर आणण्यापूर्वी अधिकृत परवाना असणे आवश्यक आहे. असा परवाना असल्याखेरीज तक्रारदाराचा क्लेमचा सामनेवाला विचार करु शकत नाही. कारण विनापरवाना वाहन रस्त्यावर आणले तर विमा कराराच्या मूलभूत अटींचा भंग होतो. नुसते परवान्यासाठी पैसे भरले हे पुरेसे नाही. त्यामुळे सामनेवाला विमा कंपनीने योग्य कारणाने व पूर्ण जबाबदारीनेच तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत एम.आर.रेड्डी यांचा सदरील कामातील सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे. (05) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. कागदपत्र तपासले. (06) तक्रारदाराचा ट्रक नवाकोरा होता व तो पासिंगसाठी RTO ऑफिसकडून येत असताना त्याला अपघात झाला. याबाबत सर्व्हेअरच्या अहवालात सर्व्हेअरने नोंद केली आहे. सर्व्हे रिपोर्टमध्ये सदर वाहनाला फिटनेस सर्टीफिकेट मिळाले होते. त्याचा क्र.CF/369/2006-07 dtd.05/0506to 04/05/08 असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच परमिट नं.PGDC No.KA-35-341 dt.29/05/06 पासून असल्याचेही सर्व्हेअरने नमूद केले आहे. अधिकृत परवान्यासाठी तक्रारदाराने रक्कम रु.850/- फी सुध्दा भरली आहे व त्यासाठी RTO ऑफिसकडे तपासणीहून वाहन परत येत असताना सदर अपघात झाला आहे. सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम केवळ अपघाताच्यावेळी तक्रारदाराने अधिकृत परवाना नसल्यामुळे नामंजूर केला आहे. (07) प्रस्तुत प्रकरणाचा विचार करताना प्रामुख्याने तक्रारदाराने इन्शुरन्स पॉलीसीच्या कराराचा भंग केला होता का ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. तक्रारदाराकडे फिटनेस सर्टीफिकेट होते, अधिकृत परिमटसाठी ट्रक RTO ऑफिसकडे तपासणी करुन परत येत असताना अपघात झाला. परवान्यासाठी आवश्यक फीसध्दा त्याने भरलेली होती इत्यादी सर्व बाबी विचारात घेता विमाकरारातील कुठल्याही अटींचा तक्रारदाराने भंग केला नव्हता हे तक्रारदाराचे कथन हे मंच ग्राहय धरत ओ. त्यामुळे केवळ अधिकृत परवाना नव्हता या तांत्रिक कारणासाठी सामनेवाला विमा कंपनी तक्रारदाराचा न्याय क्लेम नामंजूर करु शकत नाही. याबाबतीत मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या G. Kothainachiar Vs United India Insurance Co. या तक्रारीतील निकाल आम्ही आधारभूत मानत आहोत. सदर निकालपत्रात मा. राष्ट्रीय आयोगाने निसंदिग्धपणे असे सांगितले आहे की “ The parties of Insurance contract are governed by the terms of contract of there is no apparent breach of terms of insurance contract the claim cannot be repudiated.” (08) मा. राष्ट्रीय आयोगाच्या वरील निकालपत्राच्या प्रकाशझोतात प्रस्तुत तक्रारीचा विचार करता हे सुस्पष्ट होत आहे की तक्रारदाराने सदर प्रकरणात विमा कराराच्या कुठल्याही अटी व शर्तींचा भंग केला नाही. त्यामुळे सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात निश्चित सेवात्रुटी आहे अशा अपरिहार्य निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व एम.आर.रेड्डी यांचे सर्व्हे रिपोर्टमध्ये वाहन दुरुस्तीचे दिलेले असेसमेंट हे मंच ग्राहय धरुन पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमप्रमाणे रक्कम रु;64,000/-(रु.चौसष्ट हजार फक्त) दि.18/12/2008 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह अदा करावेत. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |