जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.184/2008. प्रकरण दाखल दिनांक – 22/05/2008. प्रकरण निकाल दिनांक –28/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.विनोद पि.सदाशीवराव मठपती, अर्जदार. वय वर्षे 22, व्यवसाय व्यापार, रा.गीतानगर, नांदेड. जि.नांदेड. विरुध्द. विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार. दि.न्यु.इंडिया अशुरन्स कंपनी लि, विभागीय कार्यालय,लाहोटी कॉम्प्लेक्स,वजीराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.आर.एम.कनकदंडे. गैरअर्जदारा तर्फे - अड.शामराव राहेरकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रारी अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्यांचे ऑटोरिक्षा क्र. एम.एच-26/एच-1532 चा विमा उतरविलेला होता. दि.18/05/2006 रोजी भोकर – भैंसा रोडवर त्यांच्या ऑटोरिक्षाचा अपघात झाला व ऑटोरीक्षा खराब झाला.सदर घटनेची सुचना विमा कंपनीला देण्यात आली. त्यांनी सर्व्हेअरची नियुक्ती केली. सर्व्हेअर यांनी घटनास्थळाची पाहणी केली व अहवाल विमा कंपनीकडे दिल. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना इगल ऑटो, शिवाजीनगर,नांदेड यांच्याकडुन ऑटो दुरुस्ती बाबत झालेल्या खर्चाचे अहवाल सादर करण्यास सांगितले त्याप्रमाणे इगल ऑटो एजन्सीने सदरील ऑटोचे रु.58,036/- एवढे नुकसान झाल्याचा अहवाल दि.27/05/2006 रोजी दिला. दि.11/09/2006 रोजी एक पत्र अर्जदारांना देऊन ट्रान्सपोर्ट वाहन चालविण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्यांचा क्लेम नामंजुर करण्यात येत आहे. नंतर अर्जदारांनी विनंती केली, ट्रान्सपोर्ट व नॉन ट्रान्सपोर्ट ऑटो चालविण्याची परिवहन अधिकारी यांचेकडे कोणतीही वेगळी परीक्षा नाही, अर्जदार अशा प्रकारचे वाहन कौशल्याने चालवू शकतो. याबाबत जिल्हा अपघात न्यायात काही जखमी व्यक्तिनी नुकसान भरपाईची केस दाखल केली आहे, त्याचा नर्णिय लागल्यानंतर याचा विचार केला जाईल असे कळविले. अपघात दावा क्र.679/2006 बाबुमीयॉ विरुध्द शेख युसूफ यामध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रु.25,000/- नुकसान भरपाई दिलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम नाकारुन सेवेत कमतरता केली. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदार यांचेकडुन रु.1,00,000/- नुकसान भरपाई 18 टक्के व्याजाने देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यांनी दाखल केलेली तक्रार मुदतबाहय आहे. अर्जदाराने पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास पिक अप व्हॅन क्र.एमएच-26-1532 या माल वाहतुक करणा-या वाणिज्य वाहनाचा विमा दिलेला होता. त्यामध्ये वाहन चालवीणा-या चालकाकडील परवानामध्ये वाहतुकीसाठी (ट्रान्सपोर्ट) असा शेरा असणे आवश्यक आहे. परंतु सदरील प्रकरणांत ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळी चालकाकडे माल वाहतुक वाहनाचा परवाना नव्हता, त्यामुळे अर्जदाराच क्लेम नामंजुर करण्यात आला. गैरअर्जदारांना अपघाताची सुचना मिळाल्यानंतर सर्व्हेअरची नेमणुक केली, त्यांनी वाहनाची नुकसानी सॉलवेज वगळुन रु.29,111/- झाल्याचा अहवाल दिलास. अर्जदाराच्या वाहनाचे नुकसान रु.58,036/- झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम कायदेशिररित्या नाकारलेले आहे, त्यामुळे त्यांनी सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावे अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत शपथपत्र,इगल ऑटो एजन्सीचा दि.27/05/2006 चा अहवाल, सदि.141/09/2006 रोजी क्ल्ेम नाकारलेचे पत्र, एम.ए.सी.पी.679/06 चे निकालपत्र इतर कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत शपथपत्र, पॉलिसीची प्रत, बिल चेक रिपोर्ट, रिइन्सपेक्शन रिपोर्ट, फायनल सर्व्हे रिपोर्ट, वाहन चालकाचा परवाना इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. अर्जदारा तर्फे वकील आर.एम.कनकदंडके आणि गैरअर्जदारा तर्फे वकील श्री.शामराज राहेरकर यांनी युक्तीवाद केला. अर्जदारा तर्फे वकील आर.एम.कनकदंड आणि गैरअर्जदारा तर्फे वकील श्री.शामराज राहेरकर यांनी युक्तीवाद केला. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदारगैरअर्जदारयांचेग्राहकआहेतकाय? होय. 2. गैरअर्जदारयांनीअर्जदाराससेवादेणेमध्येकमतरताकेलीकाय? नाही. 3. कायआदेश? अंतिमआदेशाप्रमाणे. कारणे मुद्याक्र. 1 – अर्जदारयांनीगैरअर्जदारयांचेकडेऑटोरिक्षायावाहनाचीपॉलीसीघेतलेलीहोती. गैरअर्जदारयांनीत्यांचेलेखीप्रतिज्ञालेखामध्येअर्जदारहेगैरअर्जदारयांचेग्राहकआहेतहीबाबनाकारलेलीनाही. गैरअर्जदारयांनीत्यांच्यालेखीम्हणण्यासोबतपॉलिसीचीप्रतदाखलकेलेलीआहे. यासर्वांचाविचारहोता, अर्जदारहेगैरअर्जदाराचेग्राहकआहेत, असेयामंचाचेमतआहे. मुद्याक्र. 2 – अर्जदारयांनीएमएच.26एच.1532 याऑटोरिक्षाचाविमागैरअर्जदारयांचेकडेउतरविलेलाहोता. सदरवाहनाचादि.18/05/2006 रोजीअपघातझालेलाआहेवसदरअपघतामध्येऑटोखराबझालेलाअसुनसदरचेनुकसानीचीरक्कमेचीमागणीगैरअर्जदारयांचेकडेकेलेनंतरगैरअर्जदार यांनीअर्जदारयांचाविमाक्लेमदि.11/09/2006 रोजीनाकारलेलीसआहे, सदरगैरअर्जदारयांनीअर्जदारयांनादिलेल्यापत्राचेअवलोकनकेलेअसता, गैरअर्जदारयांनीअज्रदारयांचाक्लेमलायसन्सट्रान्सपोर्टअसाशेरानमारलेनेसदरचेचालकपरवानाअपघताच्यावेळीवैधठरतनाहीवत्यामुळेपॉलिसीतीलअटीवशर्तींचासअर्जदारानेभंगकेलेलाआहे. गैरअर्जदारयांनीत्यांच्यालेखीम्हणण्यामध्येअर्जदारयांचेवाहनाचाअपघाताच्यावेळीअर्जदाराच्याचालकाकडेवाहतुकीसाठी (ट्रान्सपोर्ट) असाशेरालायसन्ससाठीअसणेआवश्यकआहे. परंतुअर्जदारयांचेवाहनाचाअपघातझालात्यावेळीत्यांच्याचालकाकडेमालवाहतुकवाहनाचापरवानानव्हता, त्यामुळेगैरअर्जदारयांनीअर्जदारयांचाक्लेमनाकारलेलाआहेवत्याअनुषंगानेकोणतीहीसेवेतकमतरताकेलेलीनाहीअसेम्हटलेलेआहे. गैरअर्जदारयांनीत्यांच्यायुक्तीवादाच्यावेळीवरीष्ठकोर्टाचेनिकालपत्रन्यु.इंडियाअशुरन्सकंपनीलिविरुध्दप्रभुलाल, सुप्रिमकोर्ट, 541, हेनिकालपत्रदाखलकेललेआहे. सदरीलसर्वोच्चन्यायालयचेनिकालपत्राचेअवलोकनकेलेअसता, एखादेवाहनाचाअपघातझाल्याससदरअपघाताच्यावेळीतेवाहनचालवीणा-याचालकाकडेज्याप्रकारेवाहनतेचालवितहोतेत्याबाबतचाशेराम्हणजेचट्रान्सपोर्टअगरनॉनट्रान्सपोर्टअसाशेराअसणेकायदेशिरवआवश्यकआहे. सदरच्याकेसमध्येअर्जदाराचेवाहनाचाअपघाताच्यावेळीसदरचालकाजवळतसापरवानानसल्याचेस्पष्टझालेलेआहे. गैरअर्जदार यांनीअर्जदारयांचाक्लेमयोग्यप्रकारकायादयाच्या आधीन राहुन नाकारलेला आहे, याचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदा यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र आणि त्यांनी केलेला युक्तीवा. गैरअर्जदार यांचा प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र त्यांनी केलेला युक्तीवाद व वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र याचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. तक्रारीचा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह राणे) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |