shri yuvaraj tukaram mane filed a consumer case on 22 Mar 2016 against the new inda insurance in the Satara Consumer Court. The case no is CC/14/177 and the judgment uploaded on 30 Mar 2016.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 177/2014.
तक्रार दाखल दि. 1-11-2014.
तक्रार निकाली दि. 22-3-2016.
श्री.युवराज तुकाराम माने,
रा.उंब्रज, ता.कराड, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
विभागीय प्रबंधक,
दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.
जीवनतारा, एल.आय.सी.बिल्डींग, पहिला मजला,
सदर बझार, पोवई नाका, सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एस.एस.कोळेकर
जाबदारातर्फे – अँड.श्रीमती पी.सी.इनामदार.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे तो खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे उंब्रज, ता.कराड येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांचे चरिताथार्साठी ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करतात. त्याकरिता तक्रारदार स्वतःचे मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक क्र.MH-11-M-4327 चा वापर करतात. प्रस्तुत ट्रकचा विमा जाबदार विमा कंपनीकडे तक्रारदाराने दि.1-1-2012 ते दि.31-12-2012 या कालावधीसाठी उतरविला होता. प्रस्तुत विमा पॉलिसीचा क्रमांक 151701311101000 असा होता व आहे. तसेच सदरचा विमा हा अपघात काळात म्हणजेच दि.4-6-2012 रोजी चालू होता. तक्रारदार हे वादातीत ट्रक व्यवसायानिमित्ताने दि.4-6-2012 रोजी मुंबई ते त्रिचुरला जात असताना रात्रौ.1.00 वाजणेचे सुमारास सदर ट्रक पुल्लुवानपाडी गावाचे हद्दीत आला असताना रात्रौ.1.00 वाजणेचे सुमारास एक कुत्रे-जनावर ट्रकसमोर येऊन सदर कुत्र्यास वाचवणेसाठी ट्रक चालकाने डाव्या बाजूला गाडी वळवली असता ट्रक रस्त्याचे डावे बाजूस असलेल्या केरळ इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या इलेक्ट्रीक पोल व त्याचे शेजारील इमारतीस जाऊन धडकला, त्यामुळे तक्रारदाराचे ट्रकचे रक्कम रु.1,84,165/- चे नुकसान झाले होते, तसेच इलेक्ट्रीक पोलचे रक्कम रु.29,804/- व इमारतीचे रक्कम रु.65,000/- एवढे नुकसान झाले होते. तसेच तक्रारदाराचा अपघातग्रस्त ट्रक पुल्लुवानपाडी येथून टोईंग करुन आणणेसाठी रक्कम रु.18,000/- इतका खर्च झाला म्हणजेच रक्कम रु.2,96,972/- (रु.दोन लाख शहाण्णव हजार नऊशे बहात्तर मात्र) इतका खर्च तक्रारदारास आला आहे.
जाबदार विमा कंपनीने प्रस्तुत रकमेपैकी फक्त रक्कम रु.69,117/-(रक्कम रु.एकोणसत्तर हजार एकशे सतरा मात्र) तक्रारदारास अदा केली आहे. परंतु उर्वरित रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र) जाबदाराने तक्रारदारास अदा केली नाही म्हणून तक्रारदाराने अनेकवेळा जाबदाराना प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे देय रकमेची मागणी जाबदाराकडे केली असता जाबदाराने उडवाउडवीची व बेजबाबदारपणाची उत्तरे देऊन तक्रारदाराची मागणी धुडकावून लावली. त्यावेळी तक्रारदाराने दि.26-8-2014 रोजी जाबदार विमा कंपनीस वकीलांतर्फे नोटीस पाठवली. प्रस्तुत नोटीस जाबदारांना मिळूनही जाबदाराने प्रस्तुत देय रक्कम तक्रारदारास अदा केलेली नाही, त्यामुळे जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा दिली असून सेवेत त्रुटी केली आहे. सबब तक्रारदाराने या मे.मंचात जाबदाराकडून सर्व देय रक्कम वसूल होऊन मिळणेसाठी तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी जाबदार विमा कंपनीकडून तक्रारदारास देय असलेली रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र)वसूल होऊन मिळावी, सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून 18 टक्के व्याज तक्रारदारास मिळावे, मानसिक त्रासापोटी तक्रारदारास रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च जाबदाराकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती या कामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/16 कडे अनुक्रमे वादातीत ट्रकची विमा पॉलिसी, ट्रकचे फिटनेस प्रमाणपत्र, ट्रान्स्पोर्ट प्रमाणपत्र, आर.सी.टी.सी.बुक, ट्रकचालकाचे ड्रायव्हींग लायसेन्स, पोनन्नी पोलिस स्टेशनचे प्रमाणपत्र, केरळा इलेक्ट्रीसिटी बोर्डाचे एस्टिमेट, केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या पावत्या, इमारतीचे नुकसानीची पावती, तक्रारदाराचे बँकेचा खाते उतारा, टोईंग बील, जाबदारांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी म्हणून पाठवलेले पत्र, तक्रारदाराने जाबदारास पाठवलेली नोटीस, नोटीसची पोहोचपावती, नि.14 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.25 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत.
4. सदर कामी जाबदारांनी नि.12 कडे म्हणणे, नि.13 कडे म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.17 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.20 कडे कागदयादीसोबत नि.21 कडे सर्व्हेअरचे प्रतिज्ञापत्र, नि.20/1 कडे सर्व्हे रिपोर्ट, नि.20/2 कडे रिइन्स्पेक्शन रिपोर्ट, नि.20/3 कडे बील चेक रिपोर्ट, नि.19 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने या कामी दाखल केली आहेत.
जाबदाराने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत. त्यांनी तक्रारअर्जावर पुढील आक्षेप नोंदलेले आहेत-
1) तक्रारअर्ज व त्यातील सर्व कथने मान्य व कबूल नाहीत.
2) वादातीत वाहनाचे अपघाताचे सर्व कथन चुकीचे आहे. वस्तुस्थिती अशी की, तक्रारदाराचा ट्रक क्र. MH-11-M-4327 हा ड्रायव्हर अशोक अंतू जाधव चालवीत होता. त्याचा ट्रक वेगात होता, तो दुस-या वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याचा ट्रकवरील ताबा सुटला व मेनरोड सोडून कच्च्या रस्त्यावर जाऊन केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनीचे इलेक्ट्रिकल पोलला धडक देऊन वेगात जाऊन शेजारच्या इमारतीस धडकला, त्यामुळे त्या इमारतीचे सिमेंट पत्र्याचे छत मोडले. त्यामुळे तक्रारदारासे झालेल्या नुकसानीस ट्रक ड्रायव्हर जबाबदार आहे.
3) प्रस्तुत वादातीत ट्रकचा तथाकथित अपघात झालेनंतर जाबदार विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री.नौशाद बाबू के.के.रा.तिरुर यांनी अपघात स्थळ व तक्रारदाराचे प्रस्तुत ट्रकचा स्पॉट सर्व्हे करुन त्याचा रिपोर्ट दि.10-6-2012 रोजी दिला, त्यानंतर दि.18-6-2012 रोजी दिपक बॉडी बिल्डर्स शिवडे, उंब्रज, ता.कराड यानी गाडी दुरुस्तीसाठी होणा-या खर्चाचे एस्टिमेट दिले. त्यानंतर श्री.नवले यानी सदर वाहनाचे रिइन्स्पेक्शन करुन त्याचा रिपोर्ट दि.20-11-2012 रोजी विमा कंपनीस दिला आहे, तसेच दि.7-12-2012 रोजी बिल चेक रिपोर्ट जाबदार कंपनीस दिला आहे, त्यामुळे विमा कंपनीची जबाबदारी Insurer Net Payable Liability ही फक्त रक्कम रु.69,104/- अशी आहे. यापेक्षा जास्त रक्कम देणेची जबाबदारी विमा कंपनीची नाही. तक्रारदारांना प्रस्तुत रक्कम रु.69,104/-(रु.एकोणसत्तर हजार एकशे चार मात्र) जाबदाराने अदा केली आहे. त्यामुळे तक्रारदारांची कोणतीही देणे बाकी राहीलेली नाही. तक्रारदाराने अकारण जाबदाराविरुध्द सदरची तक्रार दाखल केली असल्याने तक्रारदाराला रक्कम रु.10,000/- दंड करणेत यावा व तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती जाबदारानी याकामी केली आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पुराव्याची प्रतिज्ञापत्रे, लेखी, तोंडी युक्तीवाद या सर्वाचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्यांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदाराने तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. तक्रारदार जाबदार विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणेस
पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे टाटा ट्रक रजि.क्र. MH-11-M-4327 चा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याचा कालावधी दि.1-1-2012 ते 31-12-2012 अखेर होता. तर पॉलिसी क्र. 151701311101000 असा होता व आहे. तसेच अपघात काळात सदरचा विमा चालू होता. ही बाब जाबदार विमा कंपनीने मान्य केली आहे. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार विमा कंपनी तक्रारदारांची सेवापुरवठादार असल्याचे निर्विवाद सिध्द होते. सबब आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे मालकीच्या टाटा ट्रक रजि.क्र. MH-11-M-4327 हा व्यवसायाचे निमित्ताने दि.4-6-2012 रोजी मुंबई ते त्रिचुरला जात असताना रात्रौ. 1.00 वाजणेचे सुमारास ट्रक पुल्लुवानपाडी गावाचे हद्दीत आला असता रस्त्यावर ट्रकसमोर अचानक कुत्रे आडवे आल्याने सदर कुत्र्याला वाचवणेसाठी ट्रकचालकाने सदर ट्रक रस्त्याचे डावे बाजूस वळवला असता तो रस्त्याच्या कडेला असलेल्या केरळ इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या इलेक्ट्रीक पोल व त्याचेशेजारील असलेल्या इमारतीस धडकून झालेल्या अपघातात वादातीत ट्रकचे रक्कम रु.1,84,165/- (रु.एक लाख चौ-याऐंशी हजार एकशे पासष्ट मात्र) एवढा सदर ट्रक दुरुस्तीस खर्च आला परंतु जाबदार विमा कंपनीने त्यापैकी रक्कम रु.69,117/- (रु.एकोणसत्तर हजार एकशे सतरा मात्र)इतकीच रक्कम विमा क्लेमपोटी तक्रारदाराना अदा केली आहे म्हणजेच नमूद रकमेपैकी रु.1,15,048/- (रु.एक लाख पंधरा हजार अठ्ठेचाळीस मात्र) अद्याप जाबदाराने तक्रारदारास अदा केलेली नाही, तसेच जाबदाराचे ट्रक धडकल्याने इलेक्ट्रीक पोलचे रक्कम रु.29,807/- व इमारतीचे नुकसान रक्कम रु.65,000/- व तक्रारदाराची गाडी टोईंगसाठी आलेला खर्च रु.18,000/- अशी रक्कम रु.1,12,807/- (रु.एक लाख बारा हजार आठशे सात मात्र) अद्याप जाबदाराने तक्रारदाराना अदा केलेली नाही म्हणजेच एकूण रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र) जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास अदा करणे आवश्यक असतानाही जाबदाराने तक्रारदाराना फक्त रक्कम रु.69,117/- (रु.एकोणसत्तर हजार एकशे सतरा मात्र) अदा केली आहे व उर्वरित रक्कम रु.2,27,855/- ही तक्रारदाराने नोटीस पाठवून व प्रत्यक्ष मागणी करुनही तक्रारदारास जाबदाराने अदा केलेली नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.5 कडील कागदयादीसोबतचे सर्व कागदपत्रे पाहिली असता तक्रारदाराचे अपघातग्रस्त ट्रकला झालेल्या नुकसानीची व दुरुस्तीस आलेल्या खर्चाची कल्पना येते. जाबदाराने नि.20 चे कागदयादीसोबत सर्व्हेअर नवले यांचा वाहन तपासणीचा रिपोर्ट, सर्व्हेअरचे प्रतिज्ञापत्र, सर्व्हे रिपोर्ट, बील चेक रिपोर्ट दाखल केला आहे व त्याव अवलंबून तक्रारदारास फक्त रक्कम रु.69,117/- (रु.एकोणसत्तर हजार एकशे सतरा मात्र) विमा क्लेमपोटी अदा केले आहेत परंतु तक्रारदाराचे वाहनाचे टोईंगचे बील, अपघातामुळे इलेक्ट्रीक पोलच्या झालेल्या नुकसानीची रक्कम व इमारतीच्या झालेल्या नुकसानीची रक्कम तसेच वाहन दुरुस्तीसाठी आलेल्या खर्चापैकी जाबदाराने अदा केलेली रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम अशी एकूण रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र) जाबदाराने तक्रारदाराना अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे. प्रस्तुत कामी जाबदार कंपनीचे सर्व्हेअर नवले यांच्या सर्व्हे रिपोर्टवर अवलंबून रहाणे किंवा त्यावर विसंबून तक्रारदारास नुकसानभरपाई देणे हे बंधनकारक नाही तसेच सर्व्हेअरचा सर्व्हे रिपोर्ट हा फक्त मार्गदर्शक म्हणून वाचणेत यावा असे मे.सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे प्रस्तुत सर्व्हेअरने दिलेल्या सर्व्हे रिपोर्टनुसारच तक्रारदारानी नुकसानभरपाई द्यावी असे बंधनकारक नाही. सबब जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास वर नमूद केलेप्रमाणे रक्कम अदा न केलेने सेवेत त्रुटी/कमतरता केली असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. याबाबत आम्ही मे.सुप्रीम कोर्टाचे पुढील न्यायनिवाडा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे-
2009 Law Suit (SC) 1035 New India Assurance Co.Ltd. V/s. Pradeep Kumar-
Head Note- Consumer Protection Act 1986- Sec. 21(b)-
Insurance Act 1938- Sec.64 UM (2) deficiency in service- accident with insured truck- Surveyor s Report- Complainant not satisfied- with investigations- National Commission dismissed revision petition- assessment of loss by approved surveyor is pre-requisite is pre requisite for payment or settlement of claim of twenty thousand rupees or more by insurer but surveyors report is not last and final word- it is not that sancrasanct that it can not be departed from- it is not conclusive- approved surveyors report may be basis or foundation for settlement of claim by insurer in respect of loss suffered by insured, but surely such report is neither binding upon insurer nor insured- claim of complainant has been accepted by consumer for a as it- was duly supported by original vouchers, bills & receipts insurance company would have been well advised in not spending public money unnecessarily on avoidable and wholly frivolous litigation such as this- appeal dismissed.
सबब प्रस्तुत कामी तक्रारदाराने त्याचे अपघातग्रस्त वाहनाचा विमा क्लेम त्याने विमा कंपनीकडे मागणी करुनही जाबदाराने सर्व्हेरिपोर्टनुसार फक्त रक्कम रु.69,117/- एवढीच रक्कम तक्रारदारास अदा केल व उर्वरित रक्कम वर नमूद केलेप्रमाणे एकूण रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र) तक्रारदारास अदा केलेली नाही व त्यामुळे जाबदाराने तक्रारदारास सदोश सेवा पुरवली असल्याचे स्पष्ट होते. सबब आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. तसेच वरील न्यायनिवाडयाचा आधार घेता प्रसतुत रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र)तक्रारदार हे जाबदारांकडून मिळणेस पात्र आहेत कारण तक्रारदाराने त्यांची तक्रार दाखल कागदपत्रांवरुन व पुराव्यावरुन सिध्द केलेली आहे. सबब सदर कामी मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
सबब सदर तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून उर्वरित रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र)मिळणेस पात्र आहेत असे मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराना रक्कम रु.2,27,855/- (रु.दोन लाख सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मात्र) अदा करावेत.
प्रस्तुत रकमेवर तक्रारअर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज जाबदारानी तक्रारदारास अदा करावे.
3. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रास व अर्जाचा खर्च म्हणून जाबदारांनी रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार मात्र) तक्रारदारास अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदारांनी आदेश प्राप्त झाले तारखेपासून 45 दिवसात करावी.
5. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदार जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व कलम 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 22-3-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.