Maharashtra

Nagpur

CC/510/2018

SMT. ANITA PRABHUDAS RAUT - Complainant(s)

Versus

THE NAUNATH COSMIC AND SPIRITUAL, FOUNDATION PROJECT UNDER NAME OF GOVIND DHAM - Opp.Party(s)

ADV. MRS. R.G. NITNAWARE

10 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/510/2018
( Date of Filing : 31 Jul 2018 )
 
1. SMT. ANITA PRABHUDAS RAUT
R/O. PLOT NO. 43, ANUGRAH MANAV MANDIR, COOPERATIVE HOUSING SOCIETY, BEHIND VETNARY COLLEGE, SEMINARY HILLS, NAGPUR-06
NAGPUR
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. THE NAUNATH COSMIC AND SPIRITUAL, FOUNDATION PROJECT UNDER NAME OF GOVIND DHAM
R/O. BLOCK NO. 17, 2ND FLOOR, HOTEL TURISM IN, NEAR JANKI CINEMA, SITABURDI, NAGPUR-01
NAGPUR
Maharashtra
2. THROUGH PROPRIETOR OF SWASTIKA ALIES RAJU S/O. PYARELAL BORIKAR
R/O. PLOT NO. 4, MAHAVIR NAGAR, GREAT NAGROAD, BHANDAR ROAD, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. MRS. R.G. NITNAWARE, Advocate
For the Opp. Party:
Dated : 10 Feb 2020
Final Order / Judgement

           आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्ष  1 ही फर्म असून विरुध्‍द पक्ष 2 त्‍याचे मालक आहे. तक्रारकर्ता I.G.G.M.C. & H Nursing College, Nagpur येथून सेवानिवृत्‍त झालेले आहेत. परंतु त्‍यांना 2016 पासून लखवा मारला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या खसरा क्रं. 55, प.ह.नं. 24, मौजा- गरमसुर, तह. उमरेड, जि. नागपूर येथील “गोविंद धाम” मधील भूखंड क्रं. 24, 25, व 26 (फेज 2) एकूण क्षेत्रफळ 23,270 चौ.फु. एकूण रक्‍कम रुपये 5,81,750/- मध्‍ये दि. 05.07.2012 रोजी विकत घेण्‍याचा करार केला होता. त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे अग्रिम राशी म्‍हणून रुपये 3,35,000/- व रुपये 46,750/- धनादेश क्रं. 332448 द्वारे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ला दिली व उर्वरित रक्‍कम रुपये 2,00,000/-, प्रतिमाह रुपये 5,555/- प्रमाणे  36 महिन्‍यात देऊन दिनांक 05.07.2015 रोजी विक्रीपत्र करुन देण्‍याचे निर्धारित करण्‍यात आले होते.  तसेच विरुध्‍द पक्ष सदरचे भूखंड विकसित करुन त्‍यासोबत असलेल्‍या सुखसोयी जसे इलेक्‍ट्रीक, पाणी, पूर्ण प्रोजेक्‍टला कंपाऊंडींग, एन्‍टरन्‍स गेट, नवनाथ मंदिर, नवनाथ आश्रम, गौशाला, गार्डन, आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्‍पीटल व स्‍पा, लॉन, प्‍ले-ग्राउंड, मेडीटेशन सेंटर  इ. पुरविण्‍याचे आश्‍वासन दिले होते. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला किचन गार्डन त्‍यांच्‍या तर्फे मुफ्त मध्‍ये देण्‍याचे आश्‍वासन दिले होते व नोंदणीकृत विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍यास करावयाचा होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास सदरची जमीन अकृषक करुन देण्‍याचे कबूल केले होते.  ठरल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 5,555/- चे हप्‍ते नियमितपणे भरले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने ठरल्‍याप्रमाणे कोणत्‍याही प्रकारचे भूखंडाचे विकसन न करता तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास नंतर कळविले की, त्‍यांनी सदरची योजना बंद केली असल्‍यामुळे दि. 30.12.2016 रोजी 40 टक्‍के रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत करणार व उर्वरित रक्‍कम 2017 पर्यंत देणार असल्‍याचे कळविले होते. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि.02.01.2018 रोजी कोटक महिन्‍द्रा बॅंकेचा रुपये 2,00,000/- चेक क्रं. 000006 दिला. परंतु सदरचा चेक हा अपु-या रक्‍कमे अभावी अनादरित झाला. यासंबंधी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला कळविले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दिनांक 21.02.2018 रोजी 100/- रुपयाच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून दिले की, मार्च 2018 पर्यंत विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याची संपूर्ण रक्‍कम परत करतील व वि.प.ने त.क.ला विनंती केली की, त्‍यांनी वि.प. च्‍या विरुध्‍द U/S 138 अन्‍वये कोणतीही कार्यवाही करु नये. परंतु विरुध्‍द पक्षाने आजतागायत तक्रारकर्त्‍यास कोणतीही रक्‍कम परत केली नाही किंवा भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र ही करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रसतुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दि. 05.07.2012 च्‍या करारपत्रा अन्‍वये “गोविंद धाम” मधील भूखंड क्रं. 24, 25, व 26 (फेज 2) एकूण क्षेत्रफळ 23,270 चौ.फु. चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे नोंदवून द्यावे. किंवा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये 4,07,750/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याज दरने परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 व 2 विरुध्‍द दि. 03.06.2019 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं. मुद्दे                  उत्‍तर

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?      होय

 

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय?  होय

 

3. काय आदेश ? अंतिम आदेशानुसार

 

                             निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून खसरा क्रं. 55, प.ह.नं. 24, मौजा- गरमसुर, तह. उमरेड, जि. नागपूर येथील “गोविंद धाम” मधील भूखंड क्रं. 24, 25, व 26 (फेज 2) एकूण क्षेत्रफळ 23,270 चौ.फुट एकूण रक्‍कम रुपये 5,81,750/- मध्‍ये दि. 05.07.2012 रोजी विकत घेण्‍याचा विक्रीचा करारनामा केला होता व भूखंडापोटी रक्‍कम जमा केल्‍याच्‍या पावत्‍या  सुध्‍दा दाखल आहेत. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोटक महेन्‍द्र बॅंकेचा धनादेश दिला होता परंतु सदरचा धनादेश सुध्‍दा अनादरित झालेल्‍या असल्‍याची छायांकित प्रत दाखल आहे, याबाबत विरुध्‍द पक्षाला कळविले असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 100/- च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर रक्‍कम परत करण्‍याबाबतचे वचन लिहून दिले होते. एवढे करुन ही विरुध्‍द पक्षाने रक्‍कम न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 04.04.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविलेली होती व उपरोक्‍त सर्व दस्‍तऐवज नि.क्रं. 2 वर दाखल असल्‍याचे दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडापोटी एकूण रक्‍कम रुपये 4,07,750/- स्‍वीकारुन सुध्‍दा तक्रारकर्त्‍याला उपरोक्‍त भूखंडांचे विकसन करुन  नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या   

तक्रारकर्त्‍याला खसरा क्रं. 55, प.ह.नं. 24, मौजा- गरमसुर, तह. उमरेड,जि. नागपूर येथील “गोविंद धाम” मधील भूखंड क्रं. 24, 25, व 26 (फेज 2) एकूण क्षेत्रफळ 23,270 चौ.फुट चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे.

किंवा

 

उपरोक्‍त भूखंडाचे तांत्रिक दृष्‍टया किंवा कायदेशीररित्‍या विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाकडे भूखंडापोटी जमा असलेली रक्‍कम रुपये 4,07,750/- व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास योजना बंद केल्‍याबाबतचे पाठविलेले पत्र दि. 09.12.2016 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला द.सा.द.शे. 14 टक्‍के दराने व्‍याजसह अदा करावे.  

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक , मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. ‍उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क प्रत परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.