-ः अंतिम आदेश ः- 1. सदरची तक्रार कंपनीविरुध्द दाखल केली आहे. तक्रारदारानी सामनेवाले कंपनीकडे विमा उतरवला होता. याबाबत तक्रारदारानी सामनेवाले नॅशनल इन्शुरन्स सामनेवालेनी त्यांना 1-3-06 रोजी पत्र देऊन क्लेम सेटल केला असून रु.3,373/- घेणेसाठी कळवले. तक्रारदाराच्या क्लेमच्या मानाने त्यांची रक्कम खूप कमी होते म्हणून त्यांनी ती घेतली नाही. त्यानंतर तक्रारदारानी सामनेवाले कंपनीबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करत राहीले तसेच त्यांनी कार्यालयात जाऊन समक्ष भेट घेतली होती. परंतु सामनेवालेनी त्यांना काही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवालेनी त्यांना फक्त भुलवत ठेवले. तक्रारदारानी दि.30-3-06 व 30-10-07 रोजी पत्रव्यवहार केला आहे. सामनेवालेनी त्यांना उत्तर दिले नाही. शेवटी तक्रारदारानी त्यांना 3-8-10 रोजी त्यांच्या प्रकरणाबाबत पुन्हा विचार करण्यास सांगितले. परंतु सामनेवालेनी त्यांना दाद दिली नाही म्हणून त्यांनी 17-9-10 रोजी अँड.मोहन पाटील यांचेतर्फे सामनेवालेना नोटीस दिली व रु.2,25,000/- रक्कम देणेस सांगितले. ती नोटीस सामनेवालेना मिळूनही त्यांनी त्याची पूर्तता केली नाही म्हणून त्यांनी सामनेवालेविरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. 2. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दि.17-9-10 रोजी नोटीस पाठवल्यानंतर ती सामनेवालेना मिळाल्यानंतर सामनेवालेनी त्याला उत्तर दिले नाही म्हणून तक्रारीस कारण घडले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रार दाखल करुन घ्यावी व ती मुदतीत आहे. 3. याबाबत तक्रारदाराना मुदतीचे मुद्दयावर युक्तीवाद करण्यास सांगितले असता त्यांनी आम्ही सामनेवालेबरोबर पत्रवयवहार करत होतो व ते प्रत्येक वेळी आश्वासन देत होते. शेवटी त्यांच्याकडून काहीच न आल्यामुळे त्यांना नोटीस दिली म्हणून तक्रार मुदतीत असल्याचे त्यांचे कथन आहे. 4. मंचाने तक्रारीचे पूर्ण अवलोकन केले. त्यावरुन असे दिसते की, सामनेवालेनी दि.1-3-06 रोजी क्लेम सेटल करुन रु.3,373/-. तर तक्रार क्र.27/11 मध्ये रु.1,35,976/-, तक्रार क्र.28/11 मध्ये रु.48,970/- देण्याची तयारी दाखवली होती परंतु तक्रादारानी ती रक्कम कमी असल्यामुळे घेण्याचे नाकारले. वास्तविकतः दि.1-3-06 रोजी तक्रारीस कारण घडले आहे. तेथून ती दोन वर्षात दाखल करणे आवश्यक होते, तशी त्यांनी ती केलेली नाही. केवळ आम्ही भेट घेत होतो असे म्हटले आहे. मंचाचे मते असा एकतर्फा पत्रव्यवहार केल्यामुळे मुदतीच्या बाहेर गेलेली बाब मुदतीत येत नाही. जर सामनेवालेनी त्यांच्या पत्रव्यवहाराला दाद देऊन त्यांना काही प्रतिउत्तर दिले असेल तर कदाचित तक्रार मुदतीत राहिली असती. परंतु तसे या कामी झालेले नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयानुसार केवळ एकतर्फा पत्रव्यवहार केल्यामुळे मुदतीच्या बाहेर गेलेली बाब मुदतीत येत नाही असे स्पष्ट होते. 5. ग्राहक संरक्षण कायदयात मुदतीच्या बाहेर गोष्ट गेली असल्यास विलंब माफ करुन मागण्याची तरतूद आहे. जर मंचाला योग्य कारण वाटले तर तक्रारदाराच्या झालेल्या विलंबास माफी देऊन तक्रार दाखल करुन घेण्याचा अधिकार मंचाला आहे. तक्रारदारातर्फे वकीलांनी याबाबत स्पष्ट कल्पना देऊनही त्यांनी योग्य प्रकारे अर्ज दिलेला नाही व पुन्हा आम्ही शेवटची कायदेशीर नोटीस दिली तेव्हा तक्रार मुदतीत असल्याचे कथन त्यानी केले आहे. मंचाचे मते त्यांनी केलेला युक्तीवाद समर्थनीय व कायदेशीर नाही. या तक्रारीस मुदतीची बाधा येते. 6. सबब ही तक्रार मुदतीच्या मुद्दयावर दाखल करुन घेणेचे वेळी मुदतीचे मुद्दयावर निकाली करण्यात येत आहे. 7. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदाराना पाठवणेत यावी. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.15-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |