जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.42/2009. प्रकरण दाखल दिनांक –10/02/2009. प्रकरण निकाल दिनांक –30/04/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. रशिदा बेगम भ्र. मोहम्मद अजीजोद्यीन वय वर्षे 62 , व्यवसाय घरकाम, रा. घर क्र.6-1-183, कुंभार टेकडी, करबला रोड. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. दि. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. डिव्हीजनल नंबर 9, कमर्शिअल युनियन हाऊस एक्सीलेसर थेटरच्या मागे, 9, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400 001. गैरअर्जदार 2. विभागीय प्रमुख, कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नंबर 2, दीशा अलंकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर, कॅनाट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे. - अड.एस.एस. अर्धापूरे. गैरअर्जदार 1 तर्फे - अड.एम.बी.टेळकीकर. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांच्या ञूटीच्या सेवेच्या बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. तक्रारदार यांचे मयत पती मो.अजीजोद्यीन पि. मो. जियाओद्यीन हे शेतकरी होते व त्यांची मौजे गणेशपूर ता. वसमत येथे गट नंबर 45, सर्व्हे नंबर 19 क्षेञ 1 हेक्टर 62 आर चे ते मालक व ताबेदार आहेत. मयत अजीजोद्यीन यांचे दि.28.03.2007 रोजी लिंबगांव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने अपघातापासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सूरु केली होती व त्याबददल गैरअर्जदार यांचेकडे वर्ष,2006-07 मध्ये विमा उतरविला होता. ज्यांचे प्रिमियम महाराष्ट्र शासनाने भरलेले आहेत. त्यामूळे अर्जदार हे लाभार्थी आहेत. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शूरस ही ब्रोकर व विमा सल्लागार कंपनी आहे. मयत यांचे वारस म्हणून तक्रारदार यांनी रु.1,00,000/- ची विमा रक्क्म मिळण्यासाठी सर्व कागदपञासह दि.28.05.2007 रोजी तहसिलदार, बसमत यांचेकडे अर्ज दिला. तहसिलदार यांनी कागदपञ व्यवस्थित तपासून प्रपोजल गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविले परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी क्लेम प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याचे आंत मयताचे वारसास रक्कम दिली नाही परंतु दि.29.03.2008 रोजी असे कळविले की, फेरफार व 7/12 मध्ये मयताची नोंद नसल्याकारणाने तूमचा क्लेम नो क्लेम करण्यात येत आहे. महसूल रेकॉर्ड प्रमाणे मयत हे शेतकरी व कब्जेदार आहेत. गैरअर्जदार यांचे कारण खोटे असून गैरअर्जदाराकडून विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 18 टक्के व्याज तसेच मानसिक ञासाबददल रु.15,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विमा पॉलिसीतील करारातील तरतूदी, शर्ती तथा अटींच्या विरुध्द आणि विसंगत आहे. अर्जदाराचे पती शेतकरी होते व त्यांची मौजे गणेशपूर ता. वसमत येथे गट नंबर 45 मध्ये जमिन होती व दि.28.03.2007 रोजी ते मरण पावले हे गैरअर्जदार यांना मान्य नाही. अर्जदाराने 7/12 चा व वारसा नोंद वहीचा उतारा जरी दाखल केला असला तरी सदरील जमिनीचा अंमल त्यांच्या नांवे कोणत्या आधारे झाला व फेरफार क्रमांकाचा उतारा मंचात दाखल केलेला नाही. त्यामूळे अर्जदाराची विम्याची रक्कमेवीषयी मागणी ही न्यायास धरुन नाही. अर्जदाराने रेल्वे अपघातात नूकसान भरपाईसाठी प्राधीकरण किंवा मोटार अपघात किंवा रेल्वे यांचेकडे दावा दाखल केलेला नाही. सदर अर्जदाराचा अर्ज खोटा असल्याकारणाने तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे ते आयआरडीऐ अर्प्रोव्हड इन्शूरन्स कंपनी म्हणून त्यांची नेमणूक महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्याबददल ते शासनाकडून मोबदला म्हणून काहीच स्विकारत नाहीत. त्यांचा रोल फक्त मध्यर्स्थी करुन प्रपोजल तपासणे व ते विमा कंपनीकडे पाठवीणे एवढेच आहे. त्यांनी तक्रारदाराचा क्लेम तपासून विमा कंपनीकडे पाठविला आहे व विमा कंपनीकडून दि.29.03.2008 रोजी क्लेम नाकारल्याचे पञ त्यांना प्राप्त झालेले आहे. यापेक्षा अधिक व वेगळा रोल त्यांचा काही नाही. त्यामूळे त्यांना या प्रकरणातून मूक्त करण्यात यावे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होय. होते काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार यांनी दि.29.03.2008 रोजी तक्रारदाराला पञ लिहून 7/12 मध्ये मयत अजीजोद्यीन जियाओद्यीन यांचे नावांचा अमंल कशा प्रकारे आला व यांचा फेरफार रिपोर्ट नाही. त्यामूळे दावा नामंजूर करण्यात येतो अशा प्रकारचे पञ दाखल केलेले आहे. अर्जदाराने अजीजोद्यीन जियाओद्यीन यांचे नांवे 1 हेक्टर 62 आर जमिन गट नंबर 45 मध्ये मौजे गणेशपूर ता. वसमत येथे होती. यांचा गांव नमूना 7 व पिक घेतल्या बददल गांव नमूना नंबर 12 दाखल केलेला आहे. तसेच गांव नमूना आठ –अ धारणा जमिनीची नोंदवही दाखल केलेली आहे. हे 2007 चे जरी असले तरी दि.15.03.2005 रोजीचा 7/12 तो ही दाखल केलेला आहे व फेरफार बददल तलाठयाची नक्कल व हक्काचे पञ गां.न.नं.6 तो ही दाखल केले आहे. यात दि.29.05.1972 रोजी फेरफार नंबर 130 फाईल नंबर 1970/आरओआर/6 हे दाखल केलेले आहे. यावरुन मयत यांचे वडील निजामोद्यीन हे मयत झाल्यामूळे त्यांचे वारस त्यांची दोन मूले याचेवरुन वारस म्हणून मान्यता देऊन वारस अंमल म्हणून त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे. दूसरे एक 7/12 वर्ष 1986-87चा तो ही दाखल आहे. एवढे सर्व स्पष्ट कागदपञ असताना गैरअर्जदार यांनी त्याबददल विनाकारण हरकत घेतलेली आहे व विम्याची रक्कम देण्यापासून अंग झटकले आहे. तलाठयाने प्रमाणपञ द्वारे अर्जदार यांना वारस म्हणून घोषीत केलेले आहे. मयत अजिजोद्यीन हे भूतपूर्व सैनिक होते व निवृत्त झाले व त्याबददलचे ओळखपञ, फौजी सर्व्हीस बददलचा दाखला व एमऐएच-29/001188 या द्वारे तक्रारदार ही मयत सैनिकाची पत्नी असल्याबददलचे ओळखपञ अर्जदाराने दाखल केलेले आहे. त्यामूळे तक्रारदार हे त्यांचे वारस असल्याबददल चिञ हे स्वच्छ आहे. मयत अजीजोद्यीन यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्या बददलचे एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, पी. एम. रिपोर्ट इत्यादी कागदपञ दाखल आहेत व अपघाती मृत्यू झाला नाही असा गैरअर्जदाराचा आक्षेप ही नाही. गैरअर्जदाराचा आक्षेप फक्त वारसांचे नांव 7/12 वर कसे आले व ते अर्जदाराने कागदपञाद्वारे सिध्द केलेले आहे. या सर्व गोष्टी अतीशय स्वच्छ असताना विनाकारण गैरअर्जदारांनी आक्षेप घेऊन विम्याची रक्कम मयताचे वारसास दिली नाही असे करुन सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर विमा नाकारल्याचा दिनांक 29.03.2008पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.4,000/- व दावा खर्चाबददल रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक.
| [HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |