Maharashtra

Thane

CC/11/292

Mr.Shanmugum Srinivasan - Complainant(s)

Versus

The National Insurance Co.Ltd., - Opp.Party(s)

17 Jun 2011

ORDER


.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
Complaint Case No. CC/11/292
1. Mr.Shanmugum SrinivasanR.No.1, Sriram Colony, Near Birla Collage, Kalyan(w), Thane-421304. ...........Appellant(s)

Versus.
1. The National Insurance Co.Ltd.,Office No.5, At Royal Insuracne Building, 6th floor, J.Tata Road, Chruchgate, Mumbai-20. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR ,PRESIDENTHONABLE MRS. Jyoti Iyyer ,MEMBER
PRESENT :

Dated : 17 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्‍यक्ष

 

आदेशः

दि. 9/6/2011 रोजी सदर प्रकरण मंचाने दाखल करुन घ्‍यावे व विरुध्‍द पक्षाला नोटीस जारी करावी यासाठी सुनावणीकरीता आले असता तक्रारदाराचे वकील जी.एस. शहदादपुरी यांचा युक्‍तीवाद मंचाने ऐकला. तसेच कागदपत्रांचे अवलोकन करण्‍यात आले. मंचाचे असे निदर्शनास आले की, याच तक्रारदाराने या मंचासमोर याआधी तक्रार क्र. 180/2006 ची तक्रार दाखल केलेली होती. दि. 25/6/2007 रोजी मंचाने तक्रार मंजूर केली. मंचाचे आदेशाविरुध्‍द मा. राज्‍य आयोगासमोर विरुध्‍द पक्षाने अपिल क्र. 1160/2007 दाखल केले होते. दि. 1/12/2009 रोजी मा. राज्‍य आयोगाने अपिल निकाली काढले. तसेच आपले आदेशात मा. राज्‍य आयोगाने नमूद केले- 2. “Appeal is allowed. The impunged order is quashed and set aside. The complaint stands dismissed.”

थोडक्‍यात मा. राज्‍य आयोगाने केवळ मंचाचे आदेश रद्द केले. असे असून मूळ तक्रार देखील रद्द केली. त्‍यामुळे त्‍याच कारणासाठी परत एकदा तक्रारदारास नव्‍याने तक्रार दाखल करता येणार नाही. मूळ तक्रारीतील मुख्‍य विषय व या नविन प्रकरणातील तक्रारीचा विषय हा समान आहे. विरुध्‍द पक्षाविरुध्‍द काढलेल्‍या पॉलिसीसंदर्भात विमा दावा दाखल करण्‍यात आला होता. दि. 26/7/2005 रोजी मुंबईला झालेल्‍या अतिवृष्‍टीच्‍या कारणामुळे झालेल्‍या नुकसानीबाबत दावा तक्रारदाराने सादर केला होता व तो विरुध्‍द पक्षाने अमान्‍य केला होता. मात्र त्‍यासंदर्भात दाखल करण्‍यात आलेली तक्रार मा. राज्‍य आयोगाने खारीज केलेली आहे. स्‍वाभाविकपणेच त्‍याच कारणासाठी थोडाफार बदल करुन तक्रारदारास नव्‍याने प्रकरण दाखल करता येणार नाही. सबब सदर प्रकरण दाखल करुन घेणे मंचाचे मते योग्‍य ठरणार नाही. सबब तक्रार क्र. 392/2011 खारीज करण्‍यात येते.


 

सही/- सही/-

दिनांक– 17/6/2011. (एम.जी.रहाटगावकर ) (ज्‍योती अय्यर) अध्‍यक्ष सदस्‍या


 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे.


 


[HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT