Maharashtra

Chandrapur

CC/11/114

Smt Mayura B.Deshmukh - Complainant(s)

Versus

The National Insurance Co.Ltd through Divisional Officer - Opp.Party(s)

Adv .Deshmukh

07 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/114
 
1. Smt Mayura B.Deshmukh
R/o Mouza Mangli (Arab) Tah Nagbhid
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. The National Insurance Co.Ltd through Divisional Officer
2nd floor,Mangalam Arcade Gokulpeth
Nagpur
M.S.
2. Kabal Insurance Broking Servies Ltd
Plot No 1 Parijat Apartment plot No.135 Surendranagar
Nagpur
M.S.
3. Tahsildar
Tah Nagbhid
Chandrapur
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri Anil. N.Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri Sadik M. Zaweri Member
 
PRESENT:Adv .Deshmukh, Advocate for the Complainant 1
 Adv. Vijay Pugliya, Advocate for the Opp. Party 1
ORDER

(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य)

                  (पारीत दिनांक : 07.10.2011)

 

1.           अर्जदार ही, रा.मौजा मांगली (अरब), त.नागभिड, जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून, तिचे पती श्री लहुजी महादेवराव देशमुख यांच्‍या मालकीचे मौजा मोहाळी (मोठे), त.नागभिड, जि. चंद्रपूर येथे सर्व्‍हे नं.76, क्षेञफळ एकूण 0.91 हे.आर.जमा 0.65 ही शेतजमीन आहे.  अर्जदार हीचे पती शेतीचा व्‍यवसाय करीत होते.

 

2.          गैरअर्जदार क्र.1 ही विमा कंपनी असून, गैरअर्जदार क्र.2 ही विमा सल्‍लागार कंपनी आहे व शासनाच्‍या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात  विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा गैरअर्जदार क्र.3 तर्फे उतरविण्‍यात आला होता.  अर्जदार हीचे पती सदर विम्‍याचे लाभधारक आहे. 

 

3.          दिनांक 11.8.2007 रोजी अर्जदार हीचा पती शेतातील मोटारपंप सुरु करावयास गेला असतांना मीटर पेटीच्‍या अर्थींग वायरचा शॉक लागल्‍याने तात्‍काळ मरण पावले. सदर घटनेचे आकस्‍मीक मृत्‍यु खबरी रिपोर्ट, इन्‍क्‍लवेस्‍ट पंचनामा, तसेच घटनास्‍थळ पंचनामा अर्जदार हिने सोबत जोडला आहे. शासनातर्फे तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व पती शेतकरी असल्‍याने व अपघात झाल्‍याने, अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- च्‍या विमाच्‍या रकमेसाठी पाञ होती. अर्जदार हीने, गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे गैरअर्जदार क्र.1 कडे रितसर अर्ज केला. तसेच, वेळोवेळी विरुध्‍द पक्षांनी जे दस्‍ताऐवज मागीतले त्‍याची पुर्तता केली.  रितसर अर्ज केल्‍यानंतर व आवश्‍यक ते सर्व कागदपञे दिल्‍यानंतरही व वारंवार विचारणा केल्‍यानंतरही गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी अर्जदार बाईला कोणतीही सुचना दिली नाही व गैरअर्जदार क्र.3 यांनी सदर दावा गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविल्‍याचे सांगितले.

 

4.          गैरअर्जदार क्र.1 ने गेल्‍या दोन वर्षापासून सदर प्रस्‍तावावर कोणताच निर्णय घेत नसल्‍याने, अर्जदारास वारंवार नागपूरला येवून गैरअर्जदार क्र.1 ला भेटणे व विचारपूस करुन निराश होवून वापस जाणे, यामुळे मानसिक, शारीरीक व आर्थिक नुकसानही झाले.  शेवटी अर्जदार हिने आपले वकीलामार्फत  दि.20.6.2011 ला सर्व गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस देऊन तिच्‍या दाव्‍याचे भुगतान 15 दिवसात करावे अशी सुचना दिली. सदर नोटीसाला गैरअर्जदारांतर्फे कोणतेही उत्‍तर आले नाही.  त्‍यामुळे, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावे. तसेच, अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांना आदेश द्यावेत, अशी प्रार्थना केली आहे.

 

5.          अर्जदाराने निशाणी क्र.4 नुसार 13 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांना नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदार क्र.1 हजर होऊन निशाणी क्र.11 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले. 

 

6.          गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्‍तरात नमूद केले की, सदर तक्रार व यामधील मागणी गैरअर्जदार क्र.1 च्‍या विरुध्‍द अदखपाञ व बेकायदेशीर आहे म्‍हणून सदर तक्रारीस गैरअर्जदार क्र.1 चा प्राथमिक आक्षेप असून ती त्‍याच्‍याविरुध्‍द खारीज करण्‍यांत यावी.

 

7.          गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्‍तरातील विशेष कथनात नमूद केले की, सदर शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघाती विमा योजना गैरअर्जदार क्र.1 कडे 2006-07 या कालावधीसाठी पॉलिसी क्र.260600/47/06/9600000002 नामे कमिश्‍नर अग्रीकल्‍चर, महाराष्‍ट्र शासन नावे काढण्‍यात आलेली आहे.  त्‍याची मुदत 15.7.2006 ते 14.7.2007 कालावधीकरीता वैध होती.  या केसमध्‍ये नमूद अपघात हा दि.11.8.2007 रोजी घडलेला आहे.  एकंदरीत, सदर अपघात वैध कालावधीत घडलेला नाही म्‍हणून अर्जदाराचा गैरअर्जदार क्र.1 कडे सादर केलेला क्‍लेम व मागणी ही मुळातच वैध नाही.  म्‍हणून, या कारणास्‍तव, तक्रार अदखलपाञ आहे.  अर्जदाराने पाठविलेला नोटीस अर्जदाराचा अपाञ क्‍लेम भरुन काढण्‍यास कायदेशीररित्‍या पाञ नाही.  अर्जदाराची तक्रार ही सकृतदर्शनी बेकायदेशीर असून खर्चासह खारीज करण्‍यांत यावी.

 

8.          अर्जदाराने तक्रारीच्‍या कथना पृष्‍ठयर्थ नि.13 नुसार शपथपञ व नि.14 नुसार 1 दस्‍ताऐवज दाखल केले.  गैरअर्जदार क्र.1 ने नि.15 नुसार दाखल केलेले लेखी उत्‍तर हाच शपथपञाचा भाग समजण्‍यात यावा, अशी पुरसीस दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.17 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना संधी देवूनही पुरावा शपथपञ सादर केला नाही, त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.2 व 3 चे शपथपञाशिवाय प्रकरण पुढे चालविण्‍यात यावे, असा आदेश नि.1 वर दि.21.9.11 ला पारीत केला.  तसेच, गैरअर्जदार क्र.2 व 3  सतत गैरहजर, सबब उपलब्‍ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर (Merits) निकाली काढण्‍याकरीता ठेवण्‍यात यावे, असे आदेश नि.1 वर दि.30.9.11 ला पारीत करण्‍यात आले.  अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्‍तीवाद व उभय पक्षाच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                        //  कारणे व निष्‍कर्ष //

 

9.          गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा दावा, शेतकरी अपघात विमा योजनेची वैध कालावधीत घडलेला नाही, म्‍हणून अर्जदाराचा विमा दावा फक्‍त या एक करणाने, खारीज केल्‍याचे म्‍हटले आहे.

10.         गैरअर्जदार क्र.1 चे म्‍हणणे आहे की, शासन योजना 2006-07 या कालावधीसाठी पॉलिसी क्र.260600/47/06/9600000002 याची मुदत दि.15.7.2006 ते 14.7.2007 कालावधीकरीता वैध होती व अर्जदाराच्‍या विमा दावामध्‍ये शेतक-याचा मृत्‍यु दि.11.8.2007 ला घडलेला असल्‍यामुळे, सदर दावा वैध कालावधीचा नाही, म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 ने खारीज केल्‍याचे म्‍हटले आहे.

11.          अर्जदाराने आपल्‍या शपथपञासोबत निशाणी क्र.14 नुसार शासनाचे निर्णय आदेश पञक दाखल केले आहे.  आदेशान्‍वये सदर अपघात विमा योजनेस दि.15 जुलै ते 14 ऑगष्‍ट 2007 एक महिन्‍याच्‍या कालावधीसाठी मुदतवाढ देवून सदर योजना पुढे चालू ठेवण्‍यास, या शासन निर्णयाव्‍दारे मान्‍यता देण्‍यात येत आहे, असे स्‍पष्‍ट उल्‍लेख असल्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.1 चे हे म्‍हणणे गृहीत धरण्‍यासारखे नाही की, सदर विमा दावा वैध कालावधीत नाही.

 

12.         गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराचा विमा दावा शेतकरी मृत्‍युचा वेळी विमा कालावधी वैध नसल्‍याचे कारण सांगितले असले तरी गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराकडून विमा दावा ञुटीपूर्ण असल्‍याचे पञ देऊन ञुटीची पुर्तता करण्‍यासाठी मागणी करणे म्‍हणजे विमा दावा विचाराधीन आहे, असे गृहीत धरण्‍यास हरकत नाही.

13.         एकंदरीत, गैरअर्जदार क्र.1 ने विमा दावा मिळाल्‍यानंतर  ञुटी काढून त्‍याची पुर्तताची मागणी करणे व नंतर विमा दावा हा  विमा कालावधीत वैध नाही म्‍हणून नामंजूर करणे ही गैरअर्जदार क्र.1 ने वापरलेली अनुचित व्‍यापार पध्‍दती असून, न्‍युनतापूर्ण सेवा आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.

 

14.         अर्जदार बाई ही गावांत राहणारी अशिक्षीत आहे व गावांत राहणारी अशिक्षीत बाईस कायद्याचे, विमा कालावधी किती आहे, किंवा शासन निर्णय काय आहे, यांची मा‍हिती राहणे शक्‍य नाही.  शासनाने सदर योजनेसाठी प्रिमिअम म्‍हणून दिलेली भरपूर रक्‍कम विमा कंपनी वापरतात व कोणतेही कारण दाखवून अशिक्षीत, गरीब शेतक-यांचे विमा दावे नामंजूर करुन ञास देण्‍याचे काम करतात, हे न्‍यायसंगत नाही.

 

15.         गैरअर्जदार क्र.2 व 3 ने विमा दावा वेळेवर स्विकारुन त्‍याच्‍यातली ञुटीची पुर्तता अर्जदाराकडून दुरुस्‍त करुन विमा दावा मिळण्‍यासाठी गैरअर्जदार क्र.1 ला दिलेली असल्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.2 व 3 ने कुठलीही न्‍युनतापूर्ण सेवा दिली नसल्‍यामुळे, त्‍यांचे  विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.

 

            वरील विवेचनावरुन हे न्‍यायमंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

(1)   अर्जदाराची तक्रार मंजूर.

(2)   गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास शेतकरी अपघात विमाची रक्‍कम रुपये 1,00,000/- विमा प्रस्‍ताव दिल्‍यापासून म्‍हणजे दि.4.9.2007 पासून द.सा.द.शे. 6 % व्‍याजासह पदरी पडेपर्यंत द्यावे.

(3)   गैरअर्जदार क्र.1 ने, मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अर्जदारास, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(4)   गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्‍द तक्रार खारीज.

(5)   उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 
 
[HONORABLE Shri Anil. N.Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri Sadik M. Zaweri]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.