(घोषित द्वारा श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) तक्रारीची हाकीकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडे ’’ Hospitalisation benefit" पॉलिसी अंतर्गत स्वत:चा आरोगय विमा दिनांक 8/11/2007 ते 7 /11/2008 या कालावधीसाठी काढलेला असून वेळावेळी त्याने पॉलिसीचे नुतनीकरण करुन घेतले आहे. तक्रारदाराने सदर पॉलिसी गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर केली आहे. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे नुतनीकरण केलेल्या पॉलिसीचा कालावधी दिनांक 4/11/2008 ते 3/11/2009 असा आहे. सदर आरोग्य विमा पॉलिसी 9 वर्षे न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडे होती आणि 10 व्या वर्षी गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे नुतनीकरण केले. त्यामुळे गैरअर्जदाराकडे या पॉलिसीचे पहिलेच वर्ष आहे. इन्शुरन्स कंपनीच्या नियमाप्रमाणे नो क्लेम बोनस हा वेळोवेळी जमा होतो. गैरअर्जदार विमा कंपनीचा Cumulative bonus हा 80,000 आहे. तक्रारदार दिनांक 13/6/2009 ते 17/6/2009 या कालावधीत पुना हॉस्पिटल रिसर्च सेंटर मध्ये अंतररुग्ण म्हणून unstabe Angenia and heart attack चा उपचार घेण्यासाठी दाखल होते. त्यांना रक्कम रु 3,47,382/- एवढा खर्च आला. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा क्लेम पॉलिसीच्या क्लॉज 4.1 नुसार तक्रारदारास पॉलिसी घेण्यापूर्वीच आजार होते ही बाब लपविली आणि पॉलिसीचे हे पहिलेच वर्ष आहे या कारणावरुन फेटाळला. तक्रारदाराने आधी घेतलेल्या विमा पॉलिसीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे पॉलिसीचे रिनीवल केलेले आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडून नवी पॉलिसी घेतली असती तर cumulative bonus ची रक्कम शुन्य दाखविली असती. परंतु पॉलिसीमध्ये क्युमिलेटीव बोनसची रक्कम 80,000 दर्शविली आहे. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा चुकीच्या कारणाने फेटाळला आहे म्हणून तक्रारदाराने हॉस्पिटलचा खर्च रु 3,47,382/- 18 टक्के व्याजदराने नुकसान भरपाई आणि तक्रारीच्या खर्चासह द्यावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने वकील हजर. परंतु त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द नो सेचा आदेश मंचाने पारित केला. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्राचे व शपथपत्राचे मंचाने अवलोकन केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडे दिनांक 8/11/2007 ते 7/11/2008 या काढलेल्या पॉलीसीचे अवलोकन केले असता त्यामध्ये पहिला पॉलीसी काढल्याचा दिनांक 8/11/1999 दिसून येतो. तक्रारदाराने दिनांक 13/6/2009 रोजी पुना हॉस्पिटल येथे अँजियोग्राफी केली त्यानंतर दिनांक 15/9/2009 रोजी अँजिओप्लास्टी केली. त्याचा खर्च रु 3,47,382/- मागतात. गेरअर्जदार दिनांक 12/8/2009 च्या पत्राने पॉलिसी घेण्यापूर्वीच तक्रारदारास हा आजार होता म्हणून क्लेम नामंजूर केला. तक्रारदाराने मेडिक्लेम पॉलीसी दिनांक 8/11/1999 रोजी न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडून घेतली होती. त्यानंतर दरवर्षी रिन्यु करुन त्यांनी दिनांक 4/11/2008 ला न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडून ती पॉलीसी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर केली. न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीकडे दिनांक 8/11/2007 ते 7/11/2008 पर्यंत ही पॉलीसी होती त्यावर फक्त हायपर टेंशन आणि डायबिटीसचे लोडींग केले होते म्हणजे जास्तीचा चार्ज लावला होता. त्यानंतर तक्रारदाराने ही पॉलीसी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर केली. दिनांक 8/11/2007 ते 7/11/2008 या पॉलीसीमध्ये ही पॉलीसी दिनांक 8/11/1999 मध्ये घेतलेली दिसून येते. त्यानंतर तक्रारदाराने ही पॉलीसी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर केली त्यामध्ये पॉलीसीचा कालावधी 4/11/2008 ते 3/11/1009 असा दर्शविला आहे. त्यामध्ये Cumulative Bonus ची रक्कम 80,000/- रुपये अशी नमूद केली. याचाच अर्थ पॉलीसी घेतल्यापासून म्हणजेच दिनांक 8/11/1999 पासून ते 2009 पर्यंतची Cumulative Bonus ची रक्कम रु 80,000/- होते हे दिसून येते. म्हणजेच दिनांक 8/11/1999 पासून ते 3/11/2009 पर्यंत पॉलीसी विनाखंडीत होती. ही एक वर्षाची पॉलीसी नाही म्हणून त्यावेळेस घेतलेल्या पॉलीसीच्या प्रपोजल फॉर्मनुसार गैरअर्जदारास क्लेम द्यावा लागतो. पॉलीसीच्या Exclusion clause मध्ये कुठेही हार्टच्या आजारा विषयी नमूद केले नाही किंवा त्यावर लोडींग चार्जेस आकारलेले नाहीत. गैरअर्जदार विमा कपंनीने तक्रारदारास पॉलीसी घेण्यापूर्वी आजार होता यासंबंधी कुठलाही पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने 4.1 क्लॉज नुसार क्लेम नामंजूर केला तो योग्य नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास रककम रु 3,47,382/- दिनांक 12/8/2009 पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत 9 % व्याजदराने निकाल प्राप्तीपासून दोन आठवडयात द्यावेत. 3. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु 500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 500/- निकाल प्राप्तीपासून दोन आठवडयात द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष |