-- आदेश--
(पारित दि. 30-12-2008)
द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा -
तक्रारकर्ता यांनी पॉलिसी क्रं. 970346188, 970922885 व 971143199 या पॉलिसी कोणत्याही व्याज अथवा दंडाशिवाय पुनर्जिवित करण्यात याव्यात व त्या रायपूर येथे स्थानांतरीत करण्यात याव्यात, विरुध्द पक्ष यांचेकडून शारीरिक व मानसिक त्रासाचे रु.25000/- तर ग्राहक तक्रारीचे रु.3000/- मिळावेत यासाठी सदर ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
वि.प.यांनी ग्राहक तक्रारीचे लेखी उत्तर दिलेले नाही. मात्र दि. 20-02-08 रोजी तक्रारकर्ता व वि.प.यांच्या संयुक्त विद्यमाने नि.क्रं. 14 पुरसीस देवून वि.प.हे तक्रारकर्ता यांच्या पॉलिसीज व्याज व दंडाशिवाय व संपूर्ण लाभासह पुनर्जिवित करण्यास तयार आहेत असे कळविले आहे.
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांनी मे 2003 मध्ये सदर पॉलिसी हया रायपूर येथे स्थानांतरीत करण्यासाठी वि.प.यांचेकडे अर्ज दिला. वि.प.क्रं. 3 यांनी पॉलिसी डॉकेट नसल्यामुळे तक्रारकर्ता यांचेकडून प्रिमीयम घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही कालावधीनंतर तक्रारकर्ता हे विमा हप्ता भरण्यास तयार असतांना सुध्दा पॉलिसी हया रायपूर येथे स्थानांतरीत होवू न शकल्यामुळे पॉलिसी लॅप्स झाल्या व तक्रारकर्ता यांना विद्यमान मंचात तक्रार दाखल करावी लागली.
अशा स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांच्या पॉलिसी क्रं. 970346188, 970922885 व 971143199 हया रायपूर येथे स्थानांतरीत कराव्यात.
2. तक्रारकर्ता यांच्या सदर तिन्ही पॉलिसी हया संपूर्ण लाभासह कोणतेही व्याज अथवा दंड न लावता पुनर्जिवित करण्यात याव्यात.
3. विरुध्द पक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे.