जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.177/2008. प्रकरण दाखल दिनांक – 14/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 11/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र). मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. श्रीमती.शिला भ्र.रणजितसिंह चौव्हाण अर्जदार. रा.द्वारा – गोविंदसिंह दशरथसिंह, हबीब टॉकीज मार्ग,गणेशगल्ली,नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि, शाखा सराफा, नांदेड. 2. व्यवस्थापक, दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि, मुख्य कार्यालय,स्टेशन रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे. - स्वतः गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.एच.आर.जाधव. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष प्र.) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदारांची तक्रार आहे. अर्जदार यांनी ठेवलेल्या ठेवीच्या कराराप्रमाणे ठेवीची मुदत संपल्यानंतर गैरअर्जदारानी त्यांना त्यांची रक्कम दिली नाही. म्हणुन त्यांना उपचारासाठी व उदरनिर्वाहासाठी आवश्यक ती रक्कम न मिळाल्यामुळे गैरअर्जदारांनी सेवेतील त्रुटी केली म्हणुन दि.13/11/2006 संपलेल्या तारखे पासुन रु.97,500/- त्यांना व्याजासह गैरअर्जदारांकडुन मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने सांगितल्याप्रमाणे मुदत ठेवीची मुदत दि.13/11/2006 संपलेले आहे हे मान्य केलेले आहे. परंतु आर.बी.आय.ने बँक रेग्युलेशन अक्ट प्रमाणे कलम 35 ए लागु केल्यामुळे व गैरअर्जदार बँकेवर निर्बंध घातल्यामुळे आर.बी.आय.च्या पुर्व परवानगी शिवाय त्यांना ती रक्कम देता येणार नाही. म्हणुन त्यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. गैरअर्जदाराने हार्डशिप ग्राऊंडवर तातडीच्या मदतीसाठी आर.बी.आय.कडे अर्जदाराचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे व मंजुरी आल्यानंतर अर्जदारांना ती रक्कम मिळेल. सबब अर्जदाराचा दावा नामंजुर करण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदर यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदारांनी देखील आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्तऐवज व केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी खालील प्रमाणे मुदत ठेवलेल्या रक्कमेचा तपशिल दाखल केलेला आहे. मुदत ठेव पावती क्र. | मुदत ठेव पावती दिनांक | पावतीच्या परीपक्वतेमुळे झालेली रक्कम | पावतीची मुदत संपल्याचा दिनांक | RDS/IND/28/LF 60/A/C no.27/55 | 13/11/1998 | 32500/- | 13/11/2006 | RDS/IND/28/LF61/AC no.27/56 | 13/11/1998 | 32500/- | 13/11/2006 | RDS/IND/28/LF 19/AC No.16/18 | 13/11/1998 | 16250/- | 13/11/2006 | RDS/IND/28/LF 20 AC No.16/19 | 13/11/1998 | 16250/- | 13/11/2006 |
यानुसार त्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे रक्कम मिळण्यासाठी ते हक्कदार आहे. परंतु गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्याप्रमाणे व आर.बी.आय.च्या परिपत्रकाप्रमाणे आर.बी.आय.ने बँक रेग्युलेशन अक्टप्रमाणे कलम 35 ए लावुन गैरअर्जदार यांच्यावर निर्बंध घातल्या कारणांने आर.बी.आय.च्या मंजुरी शिवाय ती रक्कम त्यांना देता येणार नाही असे केल्याने त्यांनी सेवेत त्रुटी केली असे होणार नाही. म्हणुन नुकसान भरपाई व मानसिक त्रास व दावा खर्च त्यांना मिळणार नाही. गैरअर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे ती आवश्यक बाबींवर रक्कम मिळण्यासाठी आर.बी.आय.च्या परिपत्रकाप्रमाणे हार्डशिप ग्राऊंडवर रक्कम मिळण्यासाठी आर.बी.आय.कडे प्रस्ताव पाठविला आहे व आर.बी.आय.च्या मंजुरीनंतर त्यांना ती रक्कम देता येईल. अर्जदार यांनी त्यांचा प्रस्ताव आर.बी.आय.कडे पाठविल्याचे स्पष्ट केलेले नाही आणि अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जात अशा प्रकारे अर्ज आर.बी.आय.ला पाठविल्याबद्यल गैरअर्जदार क्र. 2 खात्री दिलेली नाही असे म्हटलेले आहे. म्हणुन अशा प्रकारचा प्रस्ताव पाठविले नसल्यास ते पाठविण्यात यावे. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व2 यांनी हा निकाल लागल्या पासुन 15 दिवसांच्या आंत अर्जदाराची रक्कम मिळण्यासाठी हार्डशिप ग्राऊंडवर आवश्यक ते कागदपत्रासह व योग्य ती शिफारस करुन आर.बी.आय.कडे मंजुरीसाठी पाठवावे. आर.बी.आय.च्या मंजुरीनंतर मंजुर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदारास द्यावी. मानसिक त्रास व दावा खर्चाबद्यल आदेश नाही. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार. लघुलेखक. |