Maharashtra

Thane

CC/09/28

Smt. Nasim Mohammed Asalmir - Complainant(s)

Versus

The Mgr. Of Max New York Life Insurance Co. Pvt. Ltd. - Opp.Party(s)

25 Feb 2010

ORDER


.
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
consumer case(CC) No. CC/09/28

Smt. Nasim Mohammed Asalmir
...........Appellant(s)

Vs.

The Mgr. Of Max New York Life Insurance Co. Pvt. Ltd.
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

ग्राहक तक्रार क्रमांकः-28/2009

तक्रार दाखल दिनांकः-13/01/2009

निकाल तारीखः-25/02/2010

कालावधीः-01वर्ष01महिने12दिवस

समक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

श्रीमती नसीम मोहम्‍मद असलमीर

सद्या.रा-शफिक दिवकर चाळ, मु.पो.कसारा,

ता.शहापुर जि.ठाणे ...तक्रारकर्ता

विरुध्‍द

1)दि मॅनेजर ऑफ मॅक्‍स न्‍युयॉर्क,

लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी प्रा.लि.,

मरोल नाका,वेलिंगटन,बिझनेस पार्क,

अंधेरी(पु)मुंबई. ...वि..1

2)दि मॅनेजर ऑफ द ग्रेटर बॉम्‍बे बँक

को.ऑप बँक लि., मेघमाला को.ऑप.सोसा,

संत जनाबाई मार्ग,विलेपार्ले(पु)मुंबई.400 057 ... वि..2

उपस्थितीः-तक्रारकर्त्‍यातर्फे वकीलः-श्री.एस.बी.मोरे

विरुध्‍दपक्षातर्फे वकीलः-श्री.जे.मेहता

गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ, मा.प्रभारी अध्‍यक्षा

2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्‍य

-निकालपत्र -

(पारित दिनांक-25/02/2010)

श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्‍य यांचेद्वारे आदेशः-

1)तक्रारकर्ती ही मृतकाची पत्‍नी असुन कायदेशीर वारसदार आहे. त्‍यांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा1986 नुसार कलम 12अन्‍वये दाखल केली असून, त्‍यातील कथन संक्षिप्‍तपणे खालीलप्रमाणे.

तक्रारकर्ती असे कथन करते की, तिचे पति दिवंगत मोहमद आरिफ असनमीर हे रेल्‍वे खात्‍यामध्‍ये क्रॉप्रसरमन नोकरी करीत होते व त्‍यांचे मासिक वेतन दि ग्रेटर बॉम्‍बे को.ऑपरेटीव्‍ह बँक लि.शाखा विलेपार्ले येथे खाते क्रमांक 0013-0-000-009730 मध्‍ये जमा होत असे. त्‍या खात्‍यातून मॅक्‍स न्‍युयॉर्क

2/-

लाईफ इन्‍शुरन्‍सकडून विमा पॉलीसी प्रियीयमपोटी रुपये 16,980/- कापुन घेण्‍यात आली. वरील रक्‍कम बँकेच्‍या खात्‍यामधून वजावट केली. दिनांक25/05/2008 रोजी नोंद केली आहे. विमा धारकाचा मृत्‍यू दिनांक23/08/2008 रोजी मेंदुतील रक्‍तस्‍त्रावाने रेल्‍वे हॉस्‍पीटल कल्‍याण येथे झाला.

तक्रारकर्ती विमाधारकाच्‍या मृत्‍युच्‍या विमा रकमेची मागणी करण्‍यासाठी विरुध्‍द पक्षकाराकडे चौकशी करण्‍यासाठी गेले असता त्‍यांनी उडवा उडवीची उत्‍तरे दिली व विमा रक्‍कम देण्‍यास नकार दिल्‍यामुळे तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल केली असुन तक्रार मुदतीच्‍या सिमेच्‍या आत आहे व विमा रक्‍कम या मंचाचे अधिकार क्षेत्रामध्‍ये येत असल्‍यामुळे या मंचाला ही तक्रार चालविण्‍याचा व निर्णयीत करण्‍याचा पुर्ण अधिकार आहे असे कथन केले. तक्रारकर्तीची प्रार्थना खालीलप्रमाणेः-

1)संपुर्ण विम्‍याची रक्‍कम बोनससह तक्रारकर्तीस अदा करावी. 2)विमा रक्‍कम मिळण्‍यास दिरंगाई व हयगयीसाठी बँकेलाही सहभागी ठरवावे.3)इतर योग्‍य व फायद्याचे आदेश व्‍हावेत.

2)वरील तक्रारीची मंचाची नोटीस विरुध्‍दपक्षकारांना नि.4वर पाठविली. विरुध्‍द पक्षकारास नि.5वर नोटीस प्राप्‍त झाल्‍याची पावती दाखल. विरुध्‍दपक्षकार नं.1 यांनी लेखी जबाब दाखल करण्‍यास नि.6 नुसार अवधी प्राप्‍त झाली. नि.7नुसार विरुध्‍दपक्षकार नं.1ने वकीलपत्र दाखल केले. नि.8वर लेखी जबाब विरुध्‍दपक्षकार नं.1ने दाखल केले. नि.9वर प्रतिज्ञापत्र दाखल केले. दिनांक.21/01/2009 रोजी नोटीस मिळूनही लेखी जबाब विहीत मुदतीत दाखल न केल्‍यामुळे नि.10वर त्‍यांचेवर रुपये1,000/- कॉस्‍ट बसवुन नैसर्गिक न्‍यायावर गुणदोषावर तक्रार निर्णयीत करण्‍यासाठी लेखी जबाब दखल करण्‍यास परवानगी दिली. नि.11वर विरुध्‍दपक्षकार नं.2ने लेखी जबाब दाखल केला. प्रतिज्ञापत्र नि.12वर दाखल. नि.13वर विरुध्‍द पक्षकार नं.1 ने कागदपत्रे दाखल केले. नि.14वर विरुध्‍दपक्षकार नं.2ने लेखी युक्‍तीवाद दाखल केला.नि.15वर विरुध्‍दपक्षकार नं.1ने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारकर्तीने नि.16 वर प्रतिज्ञापत्र व नि.17वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

विरुध्‍दपक्षकार नं.1यांचे लेखी जबाब व लेखी युक्‍तीवादातील कथन खालीलप्रमाणेः-

कायद्यानुसार तक्रार चालविण्‍यास पात्र नाही. तक्रार खोटी,खोडसाळ व

3/-

तक्रारीस कोणतेही कारण घडले नाही. तक्रारदार स्‍वच्‍छ हाताने मंचात आले नाहीत. विरुध्‍दपक्षकार नं.2ने विहीत मुदतीत कागदपत्रे पाठविली नाहीत. म्‍हणुन कार्यवाही केली नाही. तक्रारीतील मुद्दा क्र.12 मान्‍य परंतु मुद्दे नं.3,4,5,6मान्‍य नाहीत.

मुद्दा क्र.7मधील कथन खालीलप्रमाणेः-

Quote7(a)”That Mohd.Sharif Asalmir was one of The Participeting member Under Group Credit Life Insurance Policy beaning No.1103 issued to the Opposite Party No.2 Greater Bombay Coop Bank Ltd by the answering opposite Party dt.02/03/2007 The Insurance Contract Contains the following stipulation regarding Exclusion under The policy The 4 Exclusion, The Policy also has the following stipulations regarding clams:-The 7.8 CLAIM:-It shall be a condition precedent to the liability of the Company to make payment of any benefit hereunder that satisfactory proof of death of the Insured Member, its cause, Claimant's Statement, Original Certificate of Insurance, Death Certificate, Attending physician's statement, Hospital Treatment Certificate, Burial/Cremation Statement, Employer's Certificate,F.I.R/Postmortem report(wherever applicable), documents establishing right of the Claimant and such other documents required by the Company.”

विरुध्‍दपक्षकार नं.2 यांचे लेखी जबाब व लेखी युक्‍तीवादातील कथन खालीलप्रमाणेः-

तक्रार खोटी, खोडसाळ व मंचात चालण्‍यासारखी नाही. तक्रारदार मंचात स्‍वच्‍छ हाताने आले नाहीत. विरुध्‍दपक्षकाराने सेवेमध्‍ये कोणतीही त्रुटी केली नाही. विमाधारकास दिनांक20/05/2008 रोजी रुपये3,00,000/- कर्ज मंजुर केले व विमाधारकाकास ग्रुप इन्‍शुरन्‍स पॉलीसी घेण्‍यास सांगितले व रुपये16,980/- दिनांक20/05/2008 रोजी मॅक्‍स न्‍यु लाईफ ग्रुप इन्‍शुरन्‍स प्रित्‍यर्थ प्रिमियम अदा केला. विमाधारकाने विमा कागदपत्रे दिनांक 07/08/2008 रोजी सही केली. विमा पॉलीसी नं.110302 दिनांक13/08/2008 पासुन कार्यान्‍वीत झाली. Exclusion Clause नुसार विमाधारकाचा मृत्‍यु विमा जोखीम तारीख पासून 90दिवसांचे आत दाखल

4/-

केल्‍यास कंपनी विमा प्रिमियम रक्‍कम वजा खर्च जे की विमा प्रिमियम पेक्षा10टक्‍के पेक्षा जास्‍त नसेल ती देण्‍यात येईल. बँकेने विमा प्रिमियम दिनांक20/05/2008 रोजी दिला. कंपनीच्‍या नियमानुसार विमा पॉलीसी दिनांक 26/05/2008 पासुन सुरु होते व विमा धारक दिनांक26/08/2008 पासुन विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरतात. परंतु विमा धारक दिनांक21/08/2008 रोजी झाल्‍यामुळे विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरत नाहीत. विमा धारकाने विमा पेपरवर दिनांक07/08/2008 रोजी सही केली. परंतु बँकेने विमा पेपर विमा कंपनीला उशिराने पाठविण्‍यास देण्‍यास ते जबाबदार आहेत. म्‍हणुन तक्रार रद्दबातल ठरवण्‍यात यावी.

3)वरील तक्रारीसंबधी उभय पक्षकाराने लेखी जबाब, प्रत्‍युत्‍तर,प्रतिज्ञापत्र, लेखी युक्‍तीवाद इत्‍यादी दाखल केले. त्‍या सर्व कागदपत्रांची सुक्ष्‍मरितीने पडताळणी व अवलोकन केल्‍यास न्‍यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो खालीलप्रमाणेः-

()तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्षकाराने सेवेमध्‍ये त्रुटी,न्‍युनता,बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्‍द करु शकले काय.? उत्‍तर-होय.

()तक्रारदार मानसिक नुकसानीपोटी भरपाई मिळण्‍यास तथा न्‍यायिक खर्च मिळण्‍यास पात्र ठरतात काय.? उत्‍तर-होय.

कारण मिमांसा

()स्‍पष्‍टीकरणाचा मुद्दाः- तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या बँकेच्‍या विवरणपत्रानुसार दिनांक 20/05/2008 रोजी विमा धारकाच्‍या खात्‍यामधून रुपये16,980/- वजा करण्‍यात आले आहेत. विरुध्‍दपक्षकार नं.12 यांचेमधील आपसी करारानुसार व ती रक्‍कम विमा कंपनीला प्राप्‍त झाली असे कथन केल्‍यानुसार त्‍यांचे लेखी जबाबातील परिशिष्‍ठ 7-अ नुसार विमाधारक ग्रुप क्रेडीट जिवन विमा पॉलिसी नं.110302 जी विरुध्‍दपक्षकारने विरुध्‍दपक्षकार नं.2ला दिनांक20/03/2007पासूनच लागु झाली. विमाधारकाच्‍या बँक खात्‍यामधून दिनांक20/05/2008 मध्‍ये रुपये16,800/- रक्‍कम वजा केली तेव्‍हापासूनच सबब उभय पक्षकारामध्‍ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्‍ट्रॅक्‍ट होता व आहे. व त्‍यासंबंधी कनसीडरेशनही झाले आहे. विमाधारकाच्‍या खात्‍यावरुन दिनांक20/05/2008रोजी16,980/-वजा केले आहेत व वजा केलेली रक्‍कम विमा कंपनीच्‍या नांवावर जमा केली आहे.

5/-

त्‍याअर्थी विमा जोखीम दिनांक 20/05/2008 पासूनच सुरु व्‍हावयास पाहिजे अथवा सुरु होतो. विमाधारकाने विमा पेपरवर दिनांक07/08/2008 रोजी सही केली. त्‍याअर्थी तक्रारदार नियमाप्रमाणे विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरतात. विरुध्‍दपक्षकाराने 90दिवसाची अट/शर्थ लावून तक्रारकर्तीचा दावा नामंजुर करुन "UTMOST GOOD FAITH” संपुर्ण विश्‍वास या सुवर्ण तत्‍वाचे उल्‍लंघन केले आहे. विरुध्‍दपक्षकाराचे आक्षेपाप्रमाणे Sr.No.4 Exclusion 4.1चा विचार केल्‍यास दिनांक20/05/2008 रोजी विमा रक्‍कम प्राप्‍त झाली व विमा दावा 90 दिवसांत दाखल करावयास पाहिजे. म्‍हणजे 17/08/2008 या तारखेस विमा दावा ग्राहय धरणे आवश्‍यक व कायदेशीर आहे. कारण विरुध्‍द पक्षकाराचे नियमाप्रमाणे 90 दिवस 17/08/2008 रोजी होतात. तथापी विमा धारकाचा मृत्‍यु दिनांक23/08/2008 रोजी झाला असल्‍यामुळे म्‍हणजे पॉलीसी काढल्‍यानंतर 94दिवसाचे आत झाला असल्‍यामुळे तक्रारकर्ती विमा दावा रक्‍कम मिळण्‍यास नैसर्गिक न्‍यायाचे दृष्‍टीनेही पात्र ठरतात. विमा दावा रक्‍कम देय असुनही न देणे, वेगवेगळया अटी व शर्थी लादून विमा दावा मिळण्‍यास अडथळे निर्माण करणे न्‍यायोचित, विधीयुक्‍त व कायदेशीर नाही. तसेच वरील कृति ही सेवेमध्‍ये त्रुटी आहे व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे स्‍पष्‍टपणे दिसते. सबब तक्रारकर्तीचा विमा दावा रक्‍कम पारीत करणे न्‍यायोचित व विधीयुक्‍त आहे.

()स्‍पष्‍टीकरणाचा मुद्दाः- तक्रारकर्तीने व विरुध्‍दपक्षकाराने दाखल केलेल्‍या विवरण पत्रानुसार स्‍पष्‍टपणे रक्‍कम रुपये16,980/- दिनांक25/05/2008 रोजी वजावट केली आहे. व विरुध्‍दपक्षकार नं.1व विरुध्‍दपक्षकार नं.2 यांचेमध्‍ये ज्‍याचे खाते बँकेमध्‍ये आहे त्‍याचा विमा काढण्‍यासंबधी करार झाला आहे व त्‍यांनी रुपये15,282/-एवढी रक्‍कम प्रिमियम पोटी दिनांक07/08/2008 रोजी पाठविले व ती दिनांक11/08/2008 रोजी विमा कंपनीमध्‍ये जमा झाली असा लेखी जबाब परिशिष्‍ठ 2मध्‍ये स्‍पष्‍ट उल्‍लेख असल्‍यामुळे विमा जोखीम दिनांक जरी ती रक्‍कम दिनांक20/05/2008 रोजी विमा धारकाच्‍या खात्‍यातून वजा करण्‍यात आली. तेव्‍हा पासुन विमा जोखीम चालु होण्‍यास हरकत नाही. तरीही विरुध्‍द पक्षकाराचे लेखी जबाबानुसार त्‍यांना रक्‍कम दिनांक11/08/2008 रोजी मिळाले हे जरी ग्राहय धरले तरीही दिनांक11/08/2008 पासून विमा रक्‍कम देण्‍यास कायदयानुसारही विरुध्‍द पक्षकार विमा दावा रक्‍कम देणे लागतात.विमा दावा रक्‍कम देय असुनही न देणे व ती रक्‍कम न देण्‍यासाठी निरनिराळया अटी/शर्थी लादणे म्‍हणजे

6/-

सेवेमध्‍ये त्रुटी करणे होय तक्रारीमध्‍ये सादर केलेल्‍या बँकेच्‍या विवरणपत्रानुसार रुपये 16,980/- वजावट केली आहे. तेव्‍हा पासूनच विमा जोखीम चालू होत असल्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा मान्‍य करणे न्‍यायोचित व विधीयुक्‍त आहे. त्‍याप्रित्‍यर्थ हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

-आदेश -

1)तक्रार क्रमांक 28/2009 ही अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2)तक्रारकर्तीस विमा दावा रक्‍कम रुपये3,00,000/-(रुपये तीन लाख फक्‍त)त्‍वरीत अदा करावी.यदा कदाचित उभय पक्षकारामध्‍ये विम्‍याची रक्‍कमेसंबंधी पैश्‍याची देवाण घेवाण करतांना फरक पडल्‍यास/पडत असेल तर उभयतांनी आपापसात हिशेब तपासणी/पडताळणी करुन त्‍याप्रमाणे रक्‍कम वळती/वजा अधिक करण्‍याची जबाबदारी आहे व त्‍याची खात्री एकमेकात/आपसात करुन घ्‍यावी.

3)तक्रारकर्तीस मानसिक नुकसानीपोटी रुपये10,000/-(रुपये दहा हजार फक्‍त)द्यावे.

4)तक्रारकर्तीस न्‍यायिक खर्च रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्‍त)द्यावा.

5)वरील आदेशाची तामिली विरुध्‍दपक्षकार नं.12यांनी वैयक्‍तीकरीत्‍या तथा एकत्रितरित्‍या 30दिवसांचे आत सही शिक्‍क्‍याची प्रत मिळाल्‍या तारखेपासून परस्‍पर करावी. अन्‍यथा अन्‍य दंडात्‍मक आदेश पारीत करण्‍याचे अधिकार या मंचास आहेत.

6)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

7)तक्रारदार यांनी मा.सदस्‍यांकरीता तक्रार दाखल केलेल्‍या दोन प्रती (फाईल)त्‍वरीत परत घेऊन जाव्‍यात.अन्‍यथा मंच जबाबदार राहणार नाही.

दिनांकः-25/02/2010

ठिकाणः-ठाणे



 

(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ)

सदस्‍य प्रभारी अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे